तुझी साथ हवी मला... भाग 23

आता इलेक्शनला दोन महिने बाकी आहेत, गावात काय काय समस्या आहे त्याची लिस्ट मला हवी आहे, अडी अडचणीला सगळ्यांना मदत करा


तुझी साथ हवी मला... भाग 23

©️®️शिल्पा सुतार
.........

श्रद्धा आली बोलवायला,.." चल काव्या आपण जेवून घेऊ",

" मला पण भूक लागली आहे ",.. काव्या.

" आज हाफ डे होता म्हणून डबा नेला नव्हता",.. दोघीजणी डायनिंग रूम मध्ये आल्या, छान भेंडीची भाजी पोळी होती, वरण भात होता, जरा गार होत जेवण पण तरी दोघींनी वाढून घेतलं थोडं आणि जेवण केल,

" तू का राहते आहे आधार आश्रमात श्रद्धा",.. काव्या.

"मी पण तुझ्यासारखीच अनाथ आहे, आधी मी अनाथ आश्रमात होती, नंतर तिथुन निघालो आम्ही , जॉब मिळाला मग इथे आली, माझ्या बरोबरीच्या बऱ्याच मुली आहेत इथे, त्यांच लग्न झाले मग त्या इथून गेल्या",.. श्रद्धा.

" तुझ्या घरचे कोणीच नाही का? ",.. श्रद्धा.

नाही.

" लग्न झाल्यावर तुला छान फॅमिली मिळेल बघ, तू कधी लग्न करणार आहेस ",.. काव्या.

" अजून तरी एक दोन वर्ष नाही",.. श्रद्धा लाजली होती.

तू काव्या?

" माझाही काही विचार नाही, अजून कशात काही नाही, थोडे पैसे कमवायचे आहेत ",.. काव्या.

करोडो रुपयाची मालकीण होती ती ,आज ज्या ऑफिसमध्ये जॉईन झाली होती तिथे सोहमने आदेशला इलेक्शनचे मदत म्हणून पाच करोडचे देणगी दिली होती, वेळ आता अशी आली होती तिला तिथेच नोकरी करावी लागत होती, त्यांनी तिला पाच हजार जाॅइनिंग बोनस दिला होता,

जरा वेळाने काव्या श्रद्धाच्या रूममध्ये गेली तिचे ड्रेस घेऊन घे,.. तुझे ड्रेस घे श्रद्धा...थँक्स

"असू दे इथे केंद्रात घालायला, ऑफिसला जाताना तुझे नवीन ड्रेस घाल ,केंद्रात हे ड्रेस लागतील, नाहीतर तुझे सगळे ड्रेस खराब होऊन जातील, आपलं ऑफिस किती छान आहे बघितलं ना, सगळे खूप छान नटून थटून येतात",.. श्रद्धा,

"हो चालेल, राहू देते ड्रेस, हे बघ आपण दुकानात गेलो होतो तर माझ्यासाठी सामान घ्यायचं लक्षातच नाही, थोडं कंगवा पावडर टिकली हवी होती",.. काव्या.

" तेव्हा का नाही सांगितलं",.. श्रद्धा.

" लक्षात नाही राहिल",.. काव्या.

श्रद्धाने तिच्याजवळच सामान काव्याला दिलं, घे पावडरचा छोटा डबा , ती काव्याकडे बघत होती,.." खरं तर तुला तयारी करायची काही गरज नाही, खूप तेज आहे तुझ्या चेहऱ्यावर आणि तुझा रंग पण किती छान आहे, केस लांब सुंदर वाह, तुला कोणी बॉयफ्रेंड नाही का काव्या",

"मला कसा असेल बॉयफ्रेंड",.. काव्या हसत होती.

"एवढी सुंदर मुलगी अजून तशीच? ",.. श्रद्धा

" काहीही काय बोलते ग श्रद्धा",..काव्या हसत रूम मध्ये आली.

याआधी ती त्यांच्या घरात सुरक्षित होती, तिच्यासाठी बॉडीगार्ड होते, नंतर रघु होता, कोणाची काय हिम्मत एवढ्या श्रीमंत मुलीकडे बघायची, राहुल करायचा तसा मागे मागे पण बहुतेक त्याला शशीने धमकी दिली असेल, त्यामुळे तो पण चालला गेला, कोणीच माझ्या कधीच मागे आलं नाही, काव्या विचार करत होती आणि मलाही असं आधी कोणी आवडलं नाही.

अचानक तिला अभिजीतचा विचार आला, तिला तिचं हसू आलं, बापरे अभिजीतने मला एवढी मदत केली, नोकरी मिळाली रहायला मिळालं छान आहे तो , मालक आहे इथला, त्याच्या मागे मागे नको करायला, तिला तिच्या विचारांचा हसू आलं.

संध्याकाळी सात वाजता श्रद्धा काव्याला बोलवायला आली , ती लोळलेली होती.. काय ग?

"काय ग काय? काय ग? खाली चल पोळ्या करायला",.. श्रद्धा.

बापरे हा अनुभवच नव्हता काव्याला, आरामात रूम मध्ये रहायच, खाली जायचं फक्त जेवायला, मला जमतील का पोळ्या? .

ती उठली दोघी किचनमध्ये गेल्या, चार-पाच मुली आधीच पोळ्या करत होत्या.

"एवढ्या पोळ्या लागतील का?",.. काव्या.

"मग किती जणी आहोत आपण बघ, आता बाकीच्या जेवता आहेत, गरम पोळ्या लागतील",.. ताई.

काव्याने पोळपाट लाटणे घेतलं, अतिशय आरामात एक पोळी लाटली, तोपर्यंत बाजूच्या मुलींच्या तीन-चार पोळ्या झाल्या,

"एवढं हळू काम आहे का तुझं काव्या? ", .. एक दोघी हसत होत्या.

"अश्या पोळ्या केल्या तर उद्या सकाळ साठी आता पासून काम कराव लागेल",.. ताई.

कधी केलंच नव्हतं काम तर काय येणार आहे, काव्या नर्वस होती.

"होईल सवय तिला बोलू नका कोणी",... काकू.

"कर काव्या तू पोळ्या दोन-चार दिवसांनी जमतील",... श्रद्धा.

काव्याने अर्धा तासात सात आठ पोळ्या केल्या, सगळेजण कौतुकाने तिच्या पोळ्यांकडे बघत होते, काही जणी हसत होत्या, सगळ्यांचं छान हसत खेळत जेवण झालं,

काव्या खुश होती, मावशीला किती आनंद होईल मी पोळ्या केल्या हे ऐकुन, पण कस सांगणार, तिने मागच आवरायला मदत केली.

काकू बोलवायला आल्या,.. "तुझा फोन आहे काव्या",

"कोण असेल? कोणाला माहिती आहे मी इथे आहे ते, अभिजीत असेल बहुतेक",... ती गेली फोन घेतला.

हॅलो काव्या.

हॅलो.

"काय करते आहेस",.. अभिजीत.

"मी पोळ्या करत होती",.. काव्या.

"येतात का तुला पोळ्या? , स्वयंपाक येतो का? ",.. अभिजीत.

"सगळ्यांना का अस वाटत की मला काहीच येत नाही",.. काव्या.

" काय झाल अजून कोणी काही बोलल का? ",.. अभिजीत.

\"हो बाकीच्या मुली मला हसत होत्या ",. काव्या.

" अग तु दिसते एवढी गोड की वाटत काहीच काम येत नसेल तुला", ..एकदम अभिजीत बोलून गेला, तो पटकन गप्प बसला.

काव्याच लक्ष नव्हत, ती पोळ्यांचा विचार करत होती, मला थोड काम शिकव लागेल .." तश्या येत नाही नीट पोळ्या अजून पण होईल प्रॅक्टिस हळू हळू",

बर झालं हिने ऐकल नाही.. अभिजीत हसत होता, बर झाल थोड काम येत, आई आजी खुश होतील.

"कसा होता आजचा ऑफिसचा पहिला दिवस? , तुझ डिपार्टमेंट ठीक आहे ना? ",.. अभिजीत.

"थँक्स जॉब बद्दल, छान गेला दिवस, थोड काम केल मी",.. काव्या.

"मला कशाला थँक्स ,तू इंटरव्यू दिला, बाबांनी घेतल तुला",..अभिजीत.

"मला तिकडे काहीच विशेष बोलता आल नाही तरी घेतल, पण मी नीट काम करेल मला माहिती आहे तुमच्या मुळे घेतल मला म्हणून थँक्स ",.. काव्या.

" मग नुसत थँक्स नाही पार्टी द्यावी लागेल ",.. अभिजीत.

" हो चालेल ना आपण करू मस्त पार्टी ",..काव्या.

कधी ?

"पेमेंट झाला की ",..काव्या.

"ठीक आहे ना त्या डिपार्टमेंटचे लोक ",.. अभिजीत.

" हो आदेश सर, पवार बाकीचे चांगले आहेत ",.. काव्या.

" थँक्स जॉइनिंग बोनस दिल्याबद्दल ",.. काव्या.

" मी नाही दिला",..अभिजीत.

" मला माहिती आहे तुम्ही दिला, तुम्ही आले होते आमच्या डिपार्टमेंट ",.. काव्या.

" मग काय काय घेतलं त्याचं",.. अभिजीत.

"तीन-चार ड्रेस घेतले ",.. काव्या.

" बस एवढेच अजून घ्यायचे आहेत का ड्रेस? ",.. अभिजीत.

नाही .

" मग आता तुझ्याकडे पार्टी द्यायला पैसे आहेत, कधी देणार पार्टी ",.. अभिजीत.

"पैसे जरी असले तरी ते जपून वापरावे लागतील, अजून पूर्ण महिना जायचा आहे ",.. काव्या.

"बर ठीक आहे मग मी देतो पार्टी आता नंतर तू दे, जायचं का डिनरला ",.. अभिजीत.

" नाही शक्य नाही संध्याकाळी सात नंतर इथून कोणाला बाहेर जाता येत नाही तुम्हाला माहिती नाही का? तुमचं आहे ना हे महिला आधार केंद्र, मला डिनरला यायला जमणारच नाही",.. काव्या.

" लंचला येऊ शकते ना, उद्या जायचं का मग लंचला" ,.. अभिजीत खुश होता.

काव्या विचार करत होती कस काय जाणार, नको पण. नाही कस म्हणणार,.." मी सांगते काकूंना विचारून ",

" अरे काय अस काव्या चल ना ",. अभिजीत.

" अरे एवढ सोप आहे का ते ,काकू ओरडतील",.. काव्या.

"मी विचारू का त्यांना",.. अभिजीत.

"नको, मी सांगते ना",.. काव्या.

"ठीक आहे, वाटत तुला माझ्या सोबत यायच नाही ",.. रागाने अभिजीतने फोन ठेवून दिला,

अभिजीत... अभिजीत.... काय यार एक एक काय करू आता? जावू दे नको त्याच्या सोबत जायला , कस वाटत अस? हा अभिजीत का अस करतो, जरा जास्त माझ्या मागे मागे करतो का हा, ती रूम मध्ये चालली गेली,
...........

शशी सोहमच्या ऑफिस मध्ये आला, बराच वेळ तो बाहेर बसलेला होता, त्याला आत बोलावलं नाही, थोड्या वेळाने सोहम मीटिंग साठी जात होता, शशीने हाक मारली... जिजाजी.

सोहम थांबला,.. "काय म्हटला तू? यापुढे मला जिजाजी म्हणून हाक मारायची नाही, ते नात आता लवकरच संपवणार आहे मी, इथे काय करतो आहेस तू?",

" थोडं बोलायचं होतं",.. शशी.

"अरे वा आज अगदीच शांततेत घेतो आहेस तू, मार ना मला, सोहम पुढे आला, धमकी दे",.. सोहम.

शशी गप्प होता.

"त्या दिवशी तर खूपच एटीट्यूड मध्ये होता तू, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही ",.. सोहम.

" सॉरी.. ते सुरभी ताई खूप त्रासात आहे, रडते आहे तिला अस करु नका मला शिक्षा द्या",.. शशी.

" काव्या बाबतीत काय केल तू लक्ष्यात आहे ना, तिला किती त्रास झाला, अजून सापडत नाही ती, मी तुम्हा भावा बहिणीला सोडणार नाही, निघायचं इथून, नाहीतर पोलिसात देईन मी ",.. सोहम.

" माझ प्रेम आहे काव्या वर, थोड चिडलो होतो तिच्यावर",.. शशी.

"या पुढे तुझ्या तोंडात काव्याच नाव जरी आल तरी माझ्याहून कोणी वाईट नाही, तुला जे करायचं ते तू केलं शशी, आता मला जे करायचं आहे ते मी करेल, या पुढे इथे यायच नाही, माझा हात चालेल नाहीतर तुझ्यावर, लवकरात लवकर इथून निघून जा, नाहीतर माझ्याकडून कोणी वाईट नाही, कोणी कितीही रडल तरी मला फरक पडत नाही, पैसे हवे ना तुला सुरभीला मिळून जातील, या साठी त्रास दिला ना तुम्ही काव्याला, सही कर आधी म्हणा डिवोर्स पेपर वर",.... सोहम.

"जिजाजी ताईचा यात काही दोष नाही, तिला माहिती नव्हत काही, तुम्ही मला शिक्षा द्या पोलिसात द्या, ताईला अस करु नका",.. शशी.

"सिक्युरिटी... सिक्युरिटी... हा माणूस इथे परत दिसला तर तुझी नौकरी जाईल",.. सोहम.

"चला हो साहेब",.. सिक्युरिटी.

शशी जात नव्हता, त्याला ढकलत नेल,.. "जिजाजी प्लीज, नका करू अस ",

शशी घरी आला,.." कशी आहे ताई? ",

" आहे तिच्या रूम मध्ये ",.. सविता ताई.

शशी आत गेला, सुरभी झोपलेली होती, ती परत शशीला बघून रडायला लागली,.." शशी तु जा ना सोहम कडे, त्यांना समजून सांग ना",

शशी तिच्याजवळ बसला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला, काही बोलला नाही तो, जरा वेळाने तो बाहेर निघून गेला.

शशी त्याच्या मित्रां सोबत बसलेला होता, जिजाजींनी माझं काहीही ऐकून घेतला नाही, सुरभी ताईला खूप त्रास होतो आहे, नुसती रडते ती, मला नाही बघवल जात, नक्की ते जिजाजी काव्याच्या संपर्कात असतिल, मी सोडणार नाही काव्याला, माझ्या ताईला असा त्रास देतात का , जर काव्या माझ्यासोबत असेल तरच जिजाजी ताईला घरात घेतील, कुठे आहे ती काव्या शोधा, मला हवी ती, त्याने दोन तीन मुलांना सोहम वर नजर ठेवायला सांगितल, काही समजल की लगेच सांगा या वेळी कोणाला काही सांगायच नाही सरळ काव्या सोबत लग्न करायच मला , मग बघू कस सुरभी ताईला त्रास देतात ते.
.......

आदेश घरी आल्यानंतर जरा वेळाने नंतर त्याच्या पक्ष कार्यालयात गेला, दोन-तीन मुलं आले होते त्याला घ्यायला, तिथे काय काय काम करायचं त्यांची मीटिंग सुरू होती,

दोन-तीन वेळा प्रियाचा फोन येऊन गेला, आदेश कॉल कट करत होता.

"आता इलेक्शनला दोन महिने बाकी आहेत, गावात काय काय समस्या आहे त्याची लिस्ट मला हवी आहे, अडी अडचणीला सगळ्यांना मदत करा, सगळीकडे आपलंच नाव झालं पाहिजे, काही झाल की आपली आठवण यायला हवी लोकांना",.. आदेश.

बरोबर आहे आदेश दादा, कामाच प्लॅनिंग सुरू होत.

तो जरा वेळाने प्रियाला भेटायला गेला,

उंचीला मध्यम गोऱ्या रंगाची प्रिया छान होती, ती आदेशच्या वर्गात होती पाहिल्या पासून, शिक्षण झालं होतं, घरचे तिच्यासाठी लग्नाच्या स्थळ बघत होते, त्याच टेन्शनमध्ये होती ती,

आदेश आला,.. "हाय प्रिया",

ती बोलतच नव्हती त्याच्याशी,

"काय झालं आहे आता? मी थांबू का जाऊ",.. आदेश.

"मी कधीच फोन करते आहे तुला, तू माझा फोनच उचलत नाही",.. प्रिया.

"मीटिंगमध्ये होतो",.. आदेश.

"ऑफिसमध्ये तसंच.. पार्टी ऑफिसमध्ये तसंच, सदोदित मीटिंग मीटिंग",.. प्रिया.

"अरे मग काही काम करायला नको का आम्ही",.. आदेश.

"जेव्हा तुला वेळ असतो तेव्हा तू माझ्याशी बोलतो आणि मला तुझ्याशी बोलायचं असलं की तू माझा फोन कट करतो",.. प्रिया.

" आता हेच बोलत बसणार आहोत का आपण? आता भेटलो आहे तर प्रेमाने बोल थोडं, कसलं टेन्शन आहे",.. आदेश.

त्याशिवाय उगीच प्रिया चिडचिड करणार नाही हे आदेशला माहिती होत,

" माझ्या घरचे माझ्यासाठी स्थळ बघत आहेत, मी तुला कधीची सांगते आहे कधी सांगायचं आहे आपण घरी",.. प्रिया.

"अजून माझ्या मोठ्या दादाचं लग्न झालं नाही, मी कस काय माझा विषय काढणार ",.. आदेश.

" हे काय कारण झालं का, अभिजित दादांना अजून लग्न करायच नसेल तर आपल ही लग्न होणार नाही का आदेश ",.. प्रिया.

" तसं काही नाही करायचं आहे दादाला लग्न ",.. आदेश.

" एखादी मुलगी आहे का नजरेत ",.. प्रिया.

"हो पण दादाच तिच्यावर प्रेम आहे की नाही हे माहिती नाही",.. आदेश.

" कोण आहे ती",.. आता प्रियाला खूप इंटरेस्ट आला.

" आहे ऑफिसमध्ये नवीन जॉईन झालेली मुलगी, कोणाला सांगू नको बाई तू",.. आदेश.

" नाही सांगणार इंटरेस्टिंग स्टोरी दिसते आहे अभिजीत दादांची, त्यांचं लग्न ठरलं की मग आपलं करायचं का",.. प्रिया.

" बरीच घाई झालेली दिसते",.. आदेश प्रिया कडे बघत होता ती लाजली, त्याने तिला जवळ ओढून मिठीत घेतल.

" आदेश तोपर्यंत जर काही प्रॉब्लेम आला तर",.. प्रिया.

"काही होणार नाही, तू म्हणशील ते करू आपण ",.. आदेश.

" ठीक आहे सोड मला ",.. प्रिया.

" नाही अशी रहा थोड्या वेळ",.. आदेश.

"आदेश प्लीज" ,.. आदेश बाजूला झाला, काळजी करायची नाही प्रिया.

दोघ निघाले, आदेशने प्रियाला घरी सोडल.

रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे हजर होते, अभिजित नाराज होता, काव्या का येत नाही माझ्या सोबत लंचला? काय करणार आहे मी उद्या, मला तिच्या सोबत रहायच आहे, मला बोलाव लागेल लवकर काव्या सोबत,

आदेश वेगळच अभिजीत कडे बघत होता, अभिजीतला ते लक्षात आलं, त्यांने दोन-तीनदा त्याच्याकडे बघितलं, हा चिडवत आहे का मला? का पण? काव्याला पैसे द्यायला सांगितले म्हणून का? काही खरं नाही,

आशा ताई आजी बसलेल्या होत्या,

प्रतापराव अभिजीत ऑफिस बद्दल बोलत होते, आदेश ऐकत होता, प्रिया बद्दल घरी सांगाव लागेल, त्या आधी दादाच ठरलं तर बर होईल, मला काहीतरी कराव लागेल,

" पुरे झाल्या तुमच्या ऑफिसच्या गप्पा, जेवण करा",.. आजी.

"मग कोणत्या गप्पा मारायच्या आजी",.. आदेश.

" जरा काहीतरी छान बोला, तुझं कुठपर्यंत आल काम इलेक्शनचं",.. आजी.

" सुरू आहे आजी, अजून एक दोन महिने आहेत, तोपर्यंत आम्ही गावातल्या लोकांची सेवा करणार आहोत ",.. आदेश.

" अरे वा घरच्या कामाच बघ जरा आदेश",.. आजी.

प्रतापराव, अभिजित, आशा ताई हसत होते.

"मी बिझी असतो आजी, ऑफिसला जातो अर्धा वेळ, चार वाजे नंतर पार्टी ऑफिस मध्ये जातो, काय काय करू ",.. आदेश.

🎭 Series Post

View all