तुझी साथ हवी मला... भाग 22

हो ना काव्या विचार करत होती मला लगेच पैसे मिळाले कसे? पण तिला आवश्यकता होती त्यामुळे ती काही म्हटली नाही, अभिजितला विचारु का?


तुझी साथ हवी मला... भाग 22

©️®️शिल्पा सुतार
.........

सुरभी खूप फोन करत होती सोहमला, त्याने दोन दा फोन कट केला, नंतर तिचा नंबर ब्लॉक केला, त्याने वकीलाला फोन लावला,.. "तयार झाले का डिवोर्स पेपर? ",

हो.

"मग द्या पाठवून तिकडे",.. सोहम.

"ठीक आहे संध्याकाळ पर्यंत मिळतील त्यांना पेपर",.. वकील.

सुरभी सुरेश राव प्रमिला ताईंच्या रूम मधे आली, ती रडत होती,.. "आई बाबा मदत करत ना, मला जायच आहे गावाला सोहम कडे, मी काय केलं आहे?, का हे बोलत नाही माझ्याशी? जे केलं आहे ते शशीने केल आहे, त्याला द्या तुम्ही शिक्षा",

प्रमिला ताई सुरेश रावांकडे बघत होत्या,." अहो सुरभी बरोबर म्हणते आहे, पुरे झाल आता बोलवा ना सोहमला घरी ",

सुरेश रावांना आता पर्यंत पूर्ण माहिती मिळाली होती की नक्की काय झाल आहे इकडे, सुरभी शशी कसे वागत होते काव्या सोबत, बहुतेक सोहम हिला माफ करणार नाही,.. " प्रमिला तुला काही माहिती नाही सुरभी आणि शशी बद्दल, तू जरा गप्प बस, आणि सुरभी तू जरा शशीला मदत करण्याच्या आधी दोन वेळा विचार करायला पाहिजे होता",

"बाबा माझी चूक झाली मला एक चान्स द्या",.. सुरभी.

"माझ्या हातात काही नाही आता, सोहम आणि तू बघ काय करायचं ते",.. सुरेश राव.

त्यांनी सोहमला फोन केला, त्याने फोन उचलला, सुरभी ऐकत होती.

" कसे आहेत आई बाबा तुम्ही? " ,.. सोहम

"आम्ही ठीक आहोत, तू कसा आहे सोहम? मावशी कशी आहे? ",.. सुरेश राव

" ठीक आहोत आम्ही ",.. सोहम

" इकडे ये सोहम, ऑफिसच काम खूप पेंडींग आहे, मला तुझी गरज आहे, आई आठवण करते आहे, सुरभी कधीची वाट बघते आहे",... सुरेश राव.

"बाबा मी येईन तिकडे पण एक अट आहे, सुरभी त्या घरातून जायला पाहिजे, तिचा चेहरा ही मला बघायचा नाही",.. सोहम.

" ठीक आहे तू ये ",.. सुरेश राव.

"येतो उद्या",.. सोहम.

"सुरभीशी बोल तू स्वतः सांग तिला, मी नाही मधे पडणार तुमच्यात ",.. सुरेश राव

सुरभीने फोन घेतला ती रडत होती,

" सुरभी तुला माझा वकील भेटला का? ",. सोहम.

" का कश्यासाठी? ",.. सुरभी.

" मला तुझ्या सोबत रहायच नाही, मला डिवोर्स हवा आहे" ,.. सोहम.

सुरभी रडत होती,.. "मी काही केल नाही सोहम. मला माफ कर",

" तुझा भाऊ कसा वागला काव्या सोबत तुला माहिती नाही का, तू पण सामिल होती त्यांच्यात, काव्या सापडत नाही आता, तिला खूप मारल त्या शशीने, मला तुमच्या फॅमिली सोबत काहीही संबंध ठेवायचे नाही, तुझा सपोर्ट होता त्याला मला सगळ समजल आहे, किती वेळा मी तुला सांगितल अस करु नकोस, तू ऐकल नाही या पुढे आपला काही संबंध नाही ",..सोहम.

" शशीला मी बोलली होती नको त्रास देवू काव्याला, मी नव्हती मदत करायला पाहिजे शशीला मी यापुढे असं करणार नाही, तू म्हणशील तेच करेन मी, मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय सोहम एक चान्स दे ",.. सुरभी.

त्याने फोन ठेवला, सुरभी रडत होती,.." बाबा आई प्लीज हेल्प करा ",

" सुरभी मला वाटत तू तुझ्या घरी जा नाहीतर सोहम इथे येणार नाही ",.. सुरेश राव

" बाबा प्लीज ",.. सुरभी.

" मला काहीही ऐकायच नाही सुरभी, तुम्ही दोघ तुमचे प्रॉब्लेम साॅल्व करा, आणि तू काय केल काय नाही हे मला सगळ माहिती आहे, मला माझा मुलगा इथे आलेला हवा आहे, एका तासात निघायचं नाहीतरी मी पोलिस बोलवेन ",... सुरेश राव आत निघून गेले.

"आई तुम्ही सांगा ना बाबांना, आई तुम्ही मला मदत नाही केली तर मी तुम्ही काय केल ते बाबांना सांगेन ",. सुरभी.

" काय केल मी? सांग कोणालाही, काही प्रूफ आहे का तुझ्या कडे माझ्या विरुद्ध, माझ्या सोबत अजिबात शहाणपणा चालणार नाही, मी तुम्हा भाऊ बहिणीला सोडणार नाही, जर माझ थोड जरी नाव आल यात तर माझ्याशी गाठ आहे, सोहमने तुला बाजूला केलं आहे, ते कस नीट करायच ते बघ जरा आता ",.. प्रमिला ताई.

"आई माफ करा मदत करा ना बाबांना सांगा ना ",.. सुरभी.

" बघते मी थोडे दिवस शांत रहा जरा ",.. प्रमिला ताई.

" आता मी शशी कडे लक्ष देणार नाही, या पुढे मला सोहम महत्वाचा आहे ",.. सुरभी.

" काव्या गेली हातची, सोहमही जाईल, काहीतरी कर, हात पाय पड त्याच्या, आणि आधी इथून जा तू, सोहम यायला हवा घरी, मग बघु पुढच पुढे",.. प्रमिला ताई.

सुरभी माहेरी आली, खूप रडत होती ती, आई बाबा शशी समोर बसलेले होते,

" मला घराबाहेर काढल त्या लोकांनी, या शशी मुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला, जरा शांत रहाता येत नाही का तुला, काय करू मी आता ",.. सुरभी.

" सोहम कुठे आहेत? ",.. सविता ताई.

" ते आले नाही अजून, त्यांना डिवोर्स हवा आहे",.. सुरभी.

काय?

शशी नुसत बघत होता,

"मला रहायच आहे त्यांच्या सोबत आई बाबा, काही तरी करा ना",.. सुरभी.

आई समजावत होती तिला, शशी नुसता बसला होता, सुरभीला बघून त्याला कसतरी वाटत होत.

सविता ताई सुरभीला आत घेवून गेल्या, ती जरा वेळ झोपली, त्या खूप काळजीत होत्या.

सोहम मावशी दुपारी घरी आले, सुरेश राव प्रमिला ताई खुश होत्या, जेवण करून तो लगेच ऑफिसला निघून गेला, मावशी तिकडे काय काय झाल ते सुरेश रावांना सांगत होत्या, कस शशीने मारल काव्याला ते ऐकुन सुरेश राव चिडले होते ,

"खूप रडत होती काव्या, तिला ओढून घेवून गेला होता तो शशी, रघु बेशुद्ध होता, काही कमी जास्त झाल असत तर" ,.. मावशी.

"नंतर काय झाल? ",.. सुरेश राव.

"रघु गेला परत काव्याच्या मागे कारण शशीने सोहमला धमकी दिली होती की तो जर त्यांच्या मागे गेला तर परत काव्याला मारेल तो आणि तसंच झालं रघु मागे गेल्यामुळे शशीने सगळ्या मुलांसमोर काव्याला बाहेर आणून मारलं, तिच्या नाका तोंडातून रक्त येत होत, गालावर बोट उमटले होते ",.. आता प्रमिलाताई सुरेशराव मावशी तिघे रडत होते.

" हे सोहमला माहिती नाही त्याला सांगू नका, मी रघुला नंतर सगळं व्यवस्थित विचारलं, त्याने सांगितलं",... मावशी

" मग ते तिथून निसटले कसे? ",.. सुरेश राव

" शशी बाहेर गेला होता तेव्हा पळाले ते ",.. मावशी

" आता कुठे आहे पण काव्या?",.. सुरेश राव

"ते कोणालाच माहिती नाही, सोहमने चौकशी केली पण काही समजलं नाही अजून",.. मावशी.

" रघु कुठे आहे",.. सुरेश राव.

"तो गावाला गेला त्याच्या",.. मावशी.

खर तर रघु काव्याला शोधायला गेला होता. तो सोहम खूप प्रयत्न करत होते.

" हे बहीण भाऊ नको आता आपल्याला",.. सुरेश राव प्रमिला ताईंना सांगत होते.

" हो ना माझ्या मुलांना त्रास झालेला मला चालणार नाही, अहो काव्याला शोधा आधी ",.. प्रमिलाताई

" हो माझी माणस काम करत आहेत",.. सुरेश रावांनी पोलिसांना फोन लावला, ते आत त्यांच्याशी बोलत होते, प्रमिला ताई मावशी बाहेर बोलत बसल्या होत्या.
........

शशीचा फोन वाजत होता

" तुझे जिजाजी आले वापस ऑफिस मधे गेले आज ",.. शरद.

त्यांना भेटाव लागेल, शशी घरातून निघाला, आज भेटू त्यांना, तो सोहमच्या ऑफिस मध्ये गेला, त्याला भेटायची परवानगी मिळाली नाही, तो तिथे बसुन होता.
.........

ऑफिस सुटलं कसं जायचं या विचाराने काव्या बाहेर उभी होती, श्रद्धा दिसली,

"बरं झालं तू दिसली मी हाच विचार करत होती की तुला कॉन्टॅक्ट कसा करायचा, तुझा फोन नंबर देऊन ठेव मला, मी रिसेप्शन मधुन फोन करेल",.. काव्या.

"हो हे बर राहील",.. श्रद्धा.

काव्या कशीतरी स्कूटर वर बसली, तिला अजिबात सवय नव्हती,

"नीट धरून बस काव्या, नाहीतर पडशील मागच्या मागे ",.. श्रद्धा

" तू कुठे शिकलीस स्कूटर ",.. काव्या

" माझ्या मैत्रिणीने शिकवली, तिचं मागच्याच महिन्यात लग्न झालं ",.. श्रद्धा.

" मला शिकवणार का?",.. काव्या.

" लगेचच नको उगीच पडली तर आपल्याकडे पैसे नाही",.. श्रद्धा.

"हो बरोबर, आहे तसे माझ्याकडे आहे हजार दोन हजार रुपये ",.. काव्या.

" कोणी दिले?",.. श्रद्धा.

" पर्समध्ये सापडले उद्या माझ्याबरोबर चलते का ड्रेस घ्यायला ",.. काव्या

" आताच चलना मग, परत उद्या इतक्या लांब येता येणार नाही",.. दोघीजणी दुकानात गेल्या,

" साधस दुकान बघ जरा",.. काव्या.

" हे दुकान छान आहे कपडे पण चांगले टिकतात इथले",.. श्रद्धा.

"दोन-तीन ड्रेस दाखवा चुडीदार सेट",.. काव्या.

खूप व्हारायटी होती, छान गुलाबी पिस्ता कलर पिवळा निळा असे तीन चार ड्रेस तिने घेतले,अजून आवश्यक ते कपडे घेतले, दोन हजार रुपये काहीतरी झाले, त्या निघाल्या, छान आहेत इथे कपडे,

हो ना.

" मला तुझ्याशी बोलायचं आहे श्रद्धा थोडसं, आपण दोघी सोबत स्कुटीवर जाऊ तर मी पण पेट्रोलचे पैसे देईल",.. काव्या.

"हो ते बघू नंतर काव्या, इतक्यात विचार करू नको",.. श्रद्धा.

"लगेच जमेल की नाही मला माहिती नाही पण मी देईन तुझे पैसे, माझा हिशोब तू करून ठेव",.. काव्या.

"हो करून ठेवेल ग बाई आणि मी तुला रोज एवढे ड्राईव्ह करत घेऊन जाते म्हणून तुझ्याकडे पार्टी पण घेईल दर महिन्यात",.. श्रद्धा.

" हो चालेल ",.. काव्या.

" कसं वाटलं तुला ऑफिस? ",.. श्रद्धा.

" खूप छान, चांगले लोक आहेत इकडे, आदेश सर लहान आहेत ",.. काव्या.

" हो अभिजीत सर शांत आहेत, आदेश सर बडबडे आहेत, सकाळी अभिजीत सरां सोबत आलीस का तू ",.. श्रद्धा.

" हो मोठे सर छान आहेत, आवाज काय जबरदस्त आहे त्यांचा",.. काव्या.

हो ना

" आज चांगली दिसते आहेस तू काव्या, काल तुझा चेहरा खूप सुजलेला होता, काय झालं होतं तुझ्या चेहऱ्याला? कोणी मारलं तुला?",.. श्रद्धा.

"ट्रेनमध्ये एका गुंडाने मारलं, माझी बॅग खेचून घेतली म्हणून मी इकडे उतरली तर स्टेशनवर सर दिसले, त्यांनी मला महिला आधार केंद्राचा पत्ता दिला, आताही नोकरी मिळाली",.. काव्या.

" बापरे डेंजर ग, खूपच लागलं आहे तुला,काळजी घेत जा, अस एकट फिरण चांगल नाही ",... श्रद्धा.

काव्याच्या डोळ्यात पाणी होतं, तिने ते गुपचूप पुसल, दादा मावशी कुठे असतील? रघु कुठे असेल? ते माझी खूप काळजी करत असतील, कसं काय करणार पण फोन, दादाचा तो दुसरा नंबर कुठे आहे, त्यावर करू शकते का फोन, दादाचा नंबर टॅप केला असेल तर, नको पण घाई करायला, समजा जर शशीला समजलं तरी इथून पळून जावं लागेल, चांगला जॉब लागला आहे, राहायला जागा आहे तर गडबड नको आणि तसेही आमचं महिला आधार केंद्र जरा चांगल्या ठिकाणी आहे, काही जास्त गडबड नाही.

"श्रद्धा मला तू इथे कागदावर या महिला आधार केंद्राचा पत्ता आपल्या ऑफिसचा पत्ता आणि तुझा फोन नंबर लिहून दे",..काव्या.

हो देते.

"मला या गावाची काहीच माहिती नाही, कधी एकटं वापस यायची वेळ आली तर काय करणार, असावी माहिती ",..काव्या.

" हो बरोबर आहे मी देते तुला",.. दोघीजणी चार वाजता केंद्रात आल्या, रूम मध्ये गेल्या, काव्या थकली होती.
.....

अभिजीत कामात होता कधी चार वाजले ते समजल नाही त्याला, तो बघत होता, ऑफिस सुटल होत, काव्या गेली असेल का?, आज हाफ डे होता, काही समजायला मार्ग नव्हता, कशी जाईल ती? , त्याला काळजी वाटत होती, तो आदेशच्या डिपार्टमेंट मधे आला, पवार निघणार होते,

"सगळे गेले का पवार साहेब ?",.. अभिजीत.

"हो सर आज हाफ डे होता ना ",.. पवार

तेवढ्यात आदेश बाहेर आला,.. "दादा तू परत इथे? काय काम आहे?",

" काही नाही माझ पवार साहेबांनी सोबत काम होत ",.. अभिजीत.

आदेश दोघांकडे बघत होता, त्याला समजल दादा का आला इथे, नक्की तो काव्या वहिनीला शोधतो आहे ,." झाल का मग काम? ",

कोणत?

" पवार साहेब सोबत होत ना काम दादा ? ",.. आदेश हसत होता.

" हो झाल ",.. अभिजीत.

पवार साहेब आश्चर्याने बघत होते, ते काही म्हटले नाही,

" जायच का मग घरी",.आदेश.

हो.. ते दोघ निघाले

अभिजीत नाराज होता, त्याला काव्या सोबत घरी जायचं होत, जमल असत तर तो तिला लंच साठी घेवून जाणार होता, अस कस मी कामात व्यस्त झालो, वाट बघत असेल काव्या, आता उद्या सुट्टी, सोमवारी भेटेल ती, काय यार बोर होत नुसत,

आदेश हसत होता, दादा गेला कामातून.
........

"काव्या श्रद्धा इकडे या, तुम्ही दोघी काय काम घेणार आहात सांगून टाका, कारण आज सकाळीच बाकीच्यांचे काम ठरले आहे",.. काकू.

"आम्ही दोघी संध्याकाळच्या कुकिंग टीम मध्ये राहू का? ",.. श्रध्दा.

"हो चालेल, तुला येतो का काव्या स्वयंपाक? ",.. काकू.

"हो येतो मी, पोळ्या करू शकते बाकीच्या भाज्या तुम्ही शिकवल्या तर ते पण करेन",.. काव्या.

"ठीक आहे तू पोळ्यांना मदत कर या ताईंना रोज, एका आठवड्याने ड्युटी बदलेल",.. काकू.

" ठीक आहे ",.. काव्या.

"सकाळी आपली आपली रूम झाडून पुसून घ्यायची, काव्या तू सकाळी बागेच्या त्या बाजूच्या झाडांना पाणी टाकायचं",.. काकू.

" हो चालेल काकू",.. काव्या.

त्या आता श्रद्धाला द्यायचं काम सांगत होत्या, काव्या तिच्या रूममध्ये आली, आजी बसलेल्या होत्या.

"कसा गेला ग तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस? , त्या मुला सोबत गेली होती का तू सकाळी? मी वरून बघितल ",.. आजी.

" आजी खूप छान गेला पहिला दिवस, हो अभिजीत घ्यायला आले होते मला ",.. काव्या.

"छान आहे मुलगा हीरो सारखा",.. आजी.

"आमचे बॉस आहेत ते ",.. काव्या.

" काय आहे पिशवीत? ",.. आजी,

" ड्रेस आणले आहेत चार ",.. काव्या.

" अरे वा चांगलं ऑफिस आहे वाटत, तुला जाऊन दोन तास झाले नाही तर पगार झाला वाटतं ",.. आजी.

हो ना काव्या विचार करत होती मला लगेच पैसे मिळाले कसे? पण तिला आवश्यकता होती त्यामुळे ती काही म्हटली नाही, अभिजितला विचारु का? नको खरच ऑफिस कडून जाॅयनिंग बोनस देत असतिल, ती आजींना ड्रेस दाखवत होती, छान ड्रेस होते,

" सगळे रंग खूप छान आहेत ग मला खूप आवडतात ड्रेस",.. आजी.

"आजी तुम्ही घ्या यातला एक ड्रेस",.. काव्या.

आजी खूप हसत होत्या,.. "या वयात कुठे घालणार आहे आता ड्रेस? आयुष्यभर साड्या नेसल्या",

"एखाद्या वेळी घालायला काही हरकत नाही" ,.. काव्या.

"जेव्हा मला ड्रेस घालायचा असेल तेव्हा मी तुला सांगेल, जेवली का तू आज ",.. आजी.

" नाही आजी ",.. काव्या.

"सोमवारपासून डबा घेऊन जात जा",.. आजी.

" असा डब्बा मिळतो का इथे",... काव्या.

" हो काम करणाऱ्या बायकांचा स्वयंपाक सकाळी होतो, आपल्या हाताने डबा भरायचा आणि घेऊन जायचा, तसं सोमवार पासून ने तु डबा, तू त्या तिथल्या लोकांना सांग ",.. आजी.

"मी पण आहे आता स्वयंपाकाच्या टीम मध्ये ",.. काव्या.

" मग तर झालं काम, पण येतो का तुला स्वयंपाक? ",.. आजी.

हो येतो... सगळ्यांना का अस वाटत की मला काही येत नसेल, काव्या विचार करत होती.

"जा आता काहीतरी खाऊन घे ",..आजी.

हो आजी.

🎭 Series Post

View all