तुझी साथ हवी मला... भाग 19

आदेश हसत होता, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला शोधाव लागेल ऑफिस मध्ये कोणी नवीन मुलगी तर नाही आली ना, दादा नक्की प्रेमात पडला आहे,


तुझी साथ हवी मला... भाग 19

©️®️शिल्पा सुतार
.........

" ट्रेन कोणती ती रघु? ज्यात काव्या बसली?",.. सोहम.

त्याने नाव सांगितलं,

या मार्गावर कोणकोणते गाव येतात हे सोहम बघत होता, त्याला अभिजीतच गाव दिसल, तिथे थांबली होती ट्रेन, अभिजितची मदत घेता येईल, ठीक आहे इथे शोध घ्यायचा काव्याचा, आता त्याला थोडं बरं वाटत होतं.

त्याने दोन तिन फोन केले त्याची टीम कामाला लागली, काव्या कडे पैसे नाहीत, लवकर शोधा तिला, अजून प्रॉब्लेम नको व्हायला.

" कशी होती रे काव्या रघु? शशीने काही केलं नाही ना तिला, मला बोलला होता शशी की मी मागे आलो तर तो काव्याला त्रास देईल म्हणून मला भीती वाटत होती ",.. सोहम.

" ठीक होत्या मॅडम ",.. रघुने काही सांगितलं नाही किती मारलं तिला, उगीच सोहमला समजलं असतं तर खूप अडचण आली असती, शशी आणि त्याचे लोक चांगले नाहीत उगाच परत मारामाऱ्या होतील, एक मुलगा तेवढा चांगला होता तो मोहन, ज्याने आम्हाला सोडलं त्याचं काय होईल आता काय माहिती?

सोहमचा फोन त्याने सुरू केला होता, त्यावर काव्या फोन करेल की काय त्याला आशा होती,

सुरभी सोहमला फोन करत होती, तो उचलत नव्हता, आई मी जाते सासरी काय झाल काय माहिती, सोहम चिडले आहे माझ्या वर, अजून आले नाहीत ते घरी, शशी मूर्ख आहे नुसता, सगळ उलट पुलट झाल,

सुरभी घरी आली प्रमिला ताई सुरेश राव यांच्या खोलीत गेली,.. "बाबा मदत करा ना सोहम बोलत नाही माझ्याशी, कुठे आहेत ते, घरी बोलवा त्यांना",

शशी त्याच्या मित्रांसोबत त्याच्या नेहमीच्या ठिकाणी बसलेला होता, काव्या आणि रघु ज्या ट्रेनमध्ये बसून गेले त्याची माहिती त्याचे लोक काढत होते, पळाले कसे पण ते दोघं याची माहिती मी बरोबर काढणार आहे, ज्याने कोणी मदत केली त्याला सोडणार नाही मी.

"आपल्या पैकीच कोणीतरी त्यांना मदत केली आहे, तुम्हाला समजत आहे का माझ किती नुकसान झाल आहे" ,.. शशी चिडलेला होता,

" अरे पण शशी तुझ्या साठी काव्या एवढी महत्वाची होती तर तू अस का वागत होता तिच्याशी" ,.. शरद.

शशी शरद वर चिडला होता खुप, काही बोलला नाही तो, काव्या त्याच्या नाकावर टिच्चून पळून गेली होती, खूप अपमान झाला होता त्याचा, त्याला वाटल कुठे जाईल ही, आपण कस ही वागा, पण साध्या लोकां मागे मदत करणारे लोक असतात ,

आता शरद मोहन कडे बघत होता, दोघं गप्प होते, मोहनला वाटल शरद खर सांगतो की काय कारण तो शशी चा बेस्ट फ्रेंड होता, ज्या पद्धतीने शशी वागत होता काव्या सोबत खरं तर ते दोघांनाही आवडत नव्हतं, प्रेम असणं लग्न करणं वेगळं आणि अशा पद्धतीने बायकोला मारणं, दुसर्‍या वर अन्याय करण एकदम चुकीच आहे.

काव्याचा काही दोषच नव्हतं याच्यात, किती साधी छान आणि हुशार होती ती, अशी बायको मिळावी म्हणून किती जण वाट बघत असतात, छान, सुंदर, श्रीमंत, शांत, नाजूक, बर झाल निघुन गेली ती.

शशीला बायको म्हणून हवी होती ती पण तो तिची किंमत करत नव्हता शशीने तिला एवढा त्रास दिला तरी काव्या काही म्हटली नव्हती, तिची खूपच किवी येत होती म्हणून मोहनने तिला पळायला मदत केली होती

शरदने बघितलं होतं ते, तो पण गप्प होता, शशीचा चांगला मित्र होता तो, पण काव्याकडे बघून ही कसं तरी वाटतं होत, साधी पोरगी आहे ती, शशी बरोबर लग्न झालं तर हा हाल करेल तिचे, त्यांच्या घरी कोण जाणार आहे त्याला अडवायला, अश्या प्रकारे मारण भांडण करण कितपत योग्य आहे, शशीचा रागावर कंट्रोल नव्हता, किती लागल होत काव्याला, शशीच तोंड फोडावस वाटत होत मोहनला, तिथेच त्याने विरोध केला असता तर मोहनला बाकीच्या मुलांनी मारल असत त्या पेक्षा त्याने शांत राहून काव्याला तिथून बाहेर काढल.

घरी सुरभी प्रमिलाताई आणि सुरेश राव यांना सगळं समजलं होतं, शशी काव्याला घेऊन घरी येत होतं पण काय झालं असं मध्येच काव्या परत पळून गेली, सोहम मावशी सोबत होता, तो घरी यायला नकार देत होता, तिघ काळजीत होते, नक्कीच काहीतरी झालं असणार, सुरभीला खात्री होती, शशीने काहीतरी केल, तिने शरदला फोन करून विचारलं,.. "काय झालं तिकडे शरद? काव्या कुठे गेली? सोहम का नाही आले सोबत?",..

" तो शशी मूर्ख आहे, त्याने काव्याला खूप मारलं, ती चान्स मिळाल्यावर पळून गेली" ,.. त्याने मोहनचं नाव सांगितलं नाही.

सुरभी डोक्याला हात लावून बसली होती, सोहम बद्दल काही समजलं का?

" जिजाजींना काही नाही केलं शशीने, रघु आला होता काव्याला सोडवायला, त्या रघु समोरच शशीने काव्याला मारल, थोड्या वेळाने शशी बाहेर गेल्यावर रघुने बऱ्याच मुलांना मारलं आणि तो काव्याला घेऊन पळून गेला, एका ट्रेनमध्ये सोडल" , .. शरद.

" आता सापडले का ते ",.. सुरभी.

" नाही काही मुलं गेले आहेत शोधायला",.. शरद.

"कठिण आहे सगळं जर आता काव्या सापडली तर लगेच मला सांग शरद मी स्वतः येईल तिथे ",.. सुरभी.

"हो ताई तेच ठीक राहील, जरी काव्या वहिनी सापडली ना तरी शशीच काही खरं नाही, तू लक्ष दे ताई तिच्या कडे, चिडका आहे खूप शशी, खूप मारतो तो कोणाला ही, आता तर काव्या वहिनी सारखी पळून जाते म्हणून खूप चिडला आहे तो शशी ",.. शरद.

सुरभीने हे आई-बाबांना काही सांगितलं नाही, सुरेश राव आता खूपच काळजीत होते,.." पुरे झाली ही पळापळ, आता मला मुलं घरी हवे आहेत",.. त्यांनी सोहमला फोन लावला

सोहमने फोन उचलला नाही

परत त्यांनी फोन लावला

आता सोहमने फोन उचलला

" कुठे आहे तू सोहम? घरी कधी येणार?",.. सुरेश राव.

" मी घरी येणार नाही आता बाबा मी इथेच राहणार आहे मावशी सोबत त्या मामाकडे, माझा तुमच्या तिघांशी काही संबंध नाही",.. सोहम.

"का बोलतो आहेस असं सोहम",.. सुरेश राव.

" काय म्हणणार मग बाबा तुम्हाला माहिती आहे का तुमच्या लोकांच्या अशा वागण्यामुळे काव्या सोबत काय काय झालं आहे",.. सोहम.

" कुठे आहे काव्या काय झालं? ",.. सुरेश राव.

" शशी तिला इथून मारत घेऊन गेला, रघु मागे गेला होता, शशीने रघुला मारलं, काव्याला लागल आहे अस मावशी सांगत होत्या ",... सोहम.

" आता काव्या कुठे आहे? ",.. सुरेश राव.

" माहिती नाही, ती पळून गेली, एका ट्रेनमध्ये चढली एवढं समजलं ",...सोहम.

" आता काय होईल ?",..सुरेश राव.

"माहिती नाही काय होईल, बघतो आहे मी, माझी बहीण आहे ना, तुम्ही लोक काही काळजी करू नका ",.. सोहम.

" अस का बोलतो आहेस, आम्हाला ही खूप काळजी वाटते आहे",.. सुरेश राव.

" काळजी असती तर काव्याच लग्न शशी सोबत ठरवल नसत तुम्ही ",.. सोहम.

" तू घरी केव्हा येणार? सुरभी वाट बघते आहे ",. सुरेश राव.

" आता सुरभी सोबत माझा काही संबंध नाही, मी तिला घटस्फोट देणार आहे",... सोहम.

"सोहम घरी ये, मी आहे तुझ्या बाजूने ",... सुरेश राव.

" मला तुमचा राग नाही बाबा, पण काव्या एवढ नाही म्हणत होती शशी सोबत लग्नाला तर तिला जबरदस्ती नव्हती करायला हवी होती आईने सुरभीने आणि तुम्ही ही, मी ठेवतो फोन ",... सोहम.

त्याने फोन ठेवून दिला, सुरेशराव काळजीत होते, आपल्या मुलांना खूपच त्रास होतो आहे आणि आपण काहीच करत नाही, माझी एवढी लाडकी मुलगी कुठे फिरते आहे काय माहिती, त्यांनी त्यांच्या मॅनेजरला बोलवलं काय झाल ते सांगत होते त्यांना, कामाला लागा मला सोहम काव्या घरी हवे आहेत.

"सुरभी.... सुरभी इकडे ये",.. सुरेश राव.

"काय झालं बाबा",. सुरभी.

"आधी शशीला इकडे बोलवून घे आत्ताच्या आत्ता",.. सुरेश राव.

"अहो काय झाल? ",.. प्रमिलाताई.

"ऐकायला आल ना सुरभी ",... सुरेश राव.

"हो मी करते फोन",.. सुरभी फोन घेवून बाहेर गेली, शशी तुला घरी बोलवलं आहे आता.

"ताई हे बघ मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे ",.. शशी.

" मला ते माहिती नाही तुला बाबांनी बोलावलं आहे आत्ताच्या आत्ता ",.. सुरभी.

" काय काम आहे? ",.. शशी.

"माहिती नाही पण ते चिडलेले आहे ",.. सुरभी.

"फोन आला होता का जिजाजींचा वगैरे",.. शशी.

"नाही फोन आला असता तर मला दिला असता ना, तेच म्हणत असतील की तू काव्याला शोध लवकर, अरे आपल्या बाजूने चांगलं असेल तर ये ना पटकन",.. सुरभी.

" ठीक आहे",... शशी.

"अहो सोहमचा फोन होता ना आत्ता, काय म्हटला तो? कधी येतोय वापस आणि सुरभी कडे का नाही दिला फोन",.. प्रमिला ताई.

सुरेशराव काही म्हटले नाही.

थोड्यावेळाने शशी आला, सुरेशराव प्रमिलाताई सुरभी समोर बसलेले होते,

" कुठे आहे काव्या, काय झालं होतं नक्की तिकडे? सोहम कुठे आहे?",.. सुरेश राव खूप प्रश्न विचारत होते.

"मला जिजाजी भेटले नाहीत, काव्या माझ्यासोबत होती, पण तो रघु आला आणि त्याने काय तिचे कान भरले तर ती त्याच्याबरोबर निघून गेली",.. शशी.

"बस एवढेच झालं होतं का शशी? खरं सांग? तुला काय वाटतं मला माहिती नाही काय झालं असेल तिकडे, तुझी हिम्मतच कशी झाली काव्याला हात लावायची, समजतो काय तू स्वतःला, एक तर तू तिला मारत मारत घेऊन गेला, तुझ्या अशा वागणुकीमुळे ती परत रघु सोबत निघून गेली आणि आता सोहम इकडे यायला नाही म्हणतो आहे, सुरभी ला घटस्फोट द्यायचं म्हणतो आहे",... सुरेश राव.

सुरभीने ते ऐकलं आणि ती एकदम शॉक झाली,.." यांचा फोन आला होता का बाबा? मला का नाही दिला",

" सोहमला नाही बोलायच तुझ्याशी, कसा देणार फोन तुझ्या कडे ",.. सुरेश राव.

" कुठे आहेत हे मला जायचं आहे यांच्याकडे, मला बाकी काही नको, सोहम सोबत राहायचं आहे, शशी तुझ्यामुळे झालं आहे हे, मी आता तुझ्यासोबत राहणार नाही, कुठे आहेत हे सांगा ना बाबा",.. सुरभी.

" सोहम आणि मावशी मामाकडे आहे गावाला, काही जाऊ नको तू तिकडे, काही उपयोग होणार नाही",.. सुरेश राव.

सुरभी रडत होती, शशी तिच्याकडे काळजीने बघत होता, तो तिच्या जवळ जाऊन उभा राहिला, ताई रडू नको.

" स्वतःच्या बहिणीला त्रास होतो तर कसं तरी होतं का शशी, तरी सोहम शांत आहे काही बोलत नाही तुझ्या बहिणीला, आमच्या काव्याशी तू कसा वागला? इतक्या निर्दयीपणे कधी कोणाशी वागत नाहीत शशी, ते पण इतक्या चांगल्या मुली सोबत, तू अस केल, तुला मी असं सोडणार नाही, कोण आहे तिकडे?",.. सुरेश राव.

सुरेश रावांचे टीम मधले दोन-तीन जण पळत आले, त्यातल्या एक चांगल्या तब्येतीच्या माणसाला सुरेशरावने जवळ बोलावलं, एक जोरात कानामागे द्या या शशीच्या,

तो दोन मिनिटं उभा राहिला

" ऐकू आलं नाही का ",.. सुरेश राव.

हो साहेब

" मग उशीर का करता आहात आटपा",.. सुरेश राव.

त्या माणसाने शशीच्या एक साटकन काना मागे लावली, शशी घाबरला, रागाने तिथून निघून गेला,

सुरभी, प्रमिला ताई खूप घाबरल्या होत्या, न जाणो आपल सत्य समजल तर काही खर नाही आता, सुरभी अजून रडत होती, बाबा आपण जावू ना मामा कडे सोहमला घेवून येवू.
.........

आदेश संध्याकाळी ऑफिस मधे आला, थोड्या वेळ काम केल, दोघ भाऊ घरी आले, अभिजीत रस्त्यात शांत होता काही प्रश्न विचारले नाही त्याने आदेश ला ऑफिस बद्दल त्यामुळे आदेश खुश होता, देवा दादाला अस शांत राहू दे,

घरी आल्यावर बर्‍याच वेळ अभिजीत आजीं जवळ बसला होता, चला जेवायला, जेवताना तो खुष होता, आदेश बघत होता, शोधव लागेल काय झाल ते दादाला ,
.....

काव्या सकाळी उठली तिचा धुतलेला ड्रेस वाळलेला होता, तिने अंघोळ करून तोच ड्रेस घातला, तोच एक बरा ड्रेस होता इंटरव्यू साठी, श्रद्धाचे दोन ड्रेसही छान होते पण ते थोडे सैल होते तिच्यासाठी उद्या घालावाच लागेल त्यातला एक ड्रेस, ठीक आहे काही हरकत नाही, खूप मदत करते आहे श्रद्धा मला,

ती नाश्त्यासाठी खाली गेली, श्रद्धा होतीच आलेली, जायचं ना मग आज आपण ऑफिस मध्ये

"हो पण आज अभिजीत सर येणार आहे घ्यायला",.. काव्या.

"कोण अभिजीत पाटील ते सर",.. श्रद्धा.

हो.

"तू ओळखते का त्यांना",.. श्रद्धा.

"नाही पण त्यांच्या ओळखीने मी इथे आली राहायला",.. काव्या.

"हो हे महिला आधार केंद्र त्यांच आहे, खूप चांगल काम करतात पाटील ग्रुप",.. श्रद्धा.

हो ना

"सरांना माहिती कुठे आहे इंटरव्यू आणि किती वाजता आहे",.. काव्या.

"हो मग ते येतील आणि इंटरव्यू ला घेऊन जातील तुला ",..श्रद्धा.

" तू पण चलशील का आमच्या सोबत ",.. काव्या.

" नको मी तिथेच काम करते त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये जर उशीर झाला नऊ नंतर तर ओरडतात, मी जाईन माझी माझी, येतांना येवू सोबत ",.. श्रद्धा.

" ठीक आहे मी थांबेन मग तुझ्या साठी",.. काव्या.

" तुझा तर काय आज फक्त इंटरव्यू आहे ना सोमवारपासून जॉईन होशील ना ",.. श्रद्धा.

" हो काम झालं तर, पास तर व्हायला पाहिजे ना मी, मला काही अनुभव नाही कामाचा ",.. काव्या.

" होशील तू पास चांगले आहे इकडचे लोक गरजू लोकांना मदत करतात ते नोकरी देतात",.. श्रद्धा.
......

इकडे अभिजीतची हालत खराब होती, रात्रभर त्याला व्यवस्थित झोप आली नाही, सारखी स्वप्नात काव्या येत होती, तिच्यासोबत तो हातात हात घालून नदीकिनारी फिरत होता, छान गप्पा मारत होते ते, तू महिला आधार केंद्रात नको राहू माझ्या सोबत चल माझ्या घरी काव्या,

" नको मला नाही रहायच इथे मी जाणार आहे इथून",.. काव्या.

"मला सोडून जावू नको तू प्लीज",.. अभिजीत.

काव्याचा गाल स्वप्नातही खूप सुजलेला होता, त्याने त्याच्या हाताने तिला क्रीम लावून दिली, काव्याच्या डोळ्यात पाणी होत ते त्याने स्वतःच्या हाताने पुसल, काळजी करू नकोस काव्या ज्याने कोणी तुझे हे हाल केले त्याला मी सोडणार नाही,

अभिजीत उठून बसला, आता त्याला झोप येत नव्हती, काव्या काही पिछा सोडत नाही माझा, किती वाजले त्याने बघितल, काव्या कडे फोन का नाही, बोलत बसलो असतो आम्ही दोघ थोडा वेळ, तिला फोन घ्यायला पाहिजे.

सकाळी लवकरच उठुन तो खाली वॉकला गेला, काही सुचत नव्हतं त्याला, बाहेर बेंचवर आदेश बसलेला होता त्याच्याकडे न बघता तो समोर गेला

काय झालं आहे आज दादाच लक्ष नाही कशाकडे

कसंतरी थोडं फिरून अभिजीत वापस आला, तयार होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसला, आई आजी काहीतरी विचारत होत्या त्यांच्याशी तो थोड बोलला,

कधी एकदा महिला आधार केंद्रात जाऊ काव्याकडे असं झालं होतं त्याला, पण त्याआधी बाबांना सांगायला लागेल काव्याचा इंटरव्यू आहे, अवघड काम आहे हे, त्याला टेंशन आल होत

कस सांगणार पण सगळे आहे इथे, कसातरी नाश्ता केला,

" अजून पोहे देऊ का",.. दोन-तीन वेळा आईने विचारलं

लक्षच नव्हतं अभिजीतच, चहा पण बिना साखरेचा तसाच पिऊन घेतला.

"दादा.. दादा.. आदेश हाका मारत होता अरे आज चहात साखर नाहीये, आई केव्हाच सांगते आहे",.. आदेश.

तेव्हा अभिजीतने आशाताईंकडे बघितलं,.. "झाला चहा पिऊन आता चांगला होता चहा",

आदेश हसत होता, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला शोधाव लागेल ऑफिस मध्ये कोणी नवीन मुलगी तर नाही आली ना, दादा नक्की प्रेमात पडला आहे, त्याशिवाय असं नाही करणार, माझं आधी असं झालं होतं जेव्हा मी प्रियाच्या प्रेमात पडलो होतो,

प्रतापरावांचं नाश्ता झाला होता, ते पुढे बसून पेपर वाचत होते

"बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे",.. अभिजीत बघत होता आदेश आई आजी नाहीत ना आजूबाजूला.

"बोल अभिजीत",..

"एक मुलगी आहे",... अभिजीत

प्रतापराव डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होते.

"नाही म्हणजे असं काही नाही, तिला नोकरी हवी आहे अनाथ आहे, गरजू आहे ती, तर आज ती इंटरव्यूला येणार आहे ऑफिसमध्ये, चालेल का ",.. अभिजीत खूप नर्व्हस होता.

"काही हरकत नाही अकरा वाजेपर्यंत पाठवून दे तिला मी आहे केबिनमध्ये",.. प्रताप राव.

अभिजीत आता खुश होता, बाबांनीच तिचा इंटरव्यू घेतला तर काही अडचण येणार नव्हती, बरं होऊन जाईल तो पटकन बाहेर निघून गेला.

कार घेऊन तो महिला आधार केंद्राकडे निघाला .

"गेला का दादा? मी पण जात होतो ना ऑफिसला, काय अस? ",.. आदेश.

" आपल्याला भेटला सुद्धा नाही आजी",..आशा ताई.

"हो ना काय झालं याला?" ,.. आई आजी आणि आदेश आश्चर्याने बाहेर बघत होते, नाश्ता करतानाही लक्ष नव्हतं,

" हो आणि दादा फिरायला गेला तेव्हा ही विचारात होता",
.. आदेश.

" विचारते मी त्याला रात्री",.. आशा ताई.
.....


🎭 Series Post

View all