तुझी साथ हवी मला... भाग 13

काव्या तुझा फोन स्विच ऑफ कर, मावशी तुम्ही पण फोन स्विच ऑफ करा, रघु आणि माझाही फोन स्विच ऑफ आहे ",..



तुझी साथ हवी मला... भाग 13

©️®️शिल्पा सुतार
.........

सुरेशराव सोहम सोबत होते, अगदीच भरून आल होत सोहमला, तो अजूनही विचार करत होता का केलं काव्याने असं? मी बोलणार आहे तिच्याशी, खूपच पाहुणे आहेत घरात, त्यामुळे जमत नाही,

नव्या जोडीने सगळ्यांचे आशीर्वाद घ्या, काव्या शशी सगळ्यांच्या पाया पडत होते, खूप गिफ्ट मिळत होते, सुरेश रावांनी दोघांना जवळ घेतलं, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.

मावशींच्या पाया पडले, सोहम आणि सुरभी दोघांना भेटायला गेले, सुरभीत खूपच आनंदात होती तिने दोघांना जवळ घेतलं,

सोहम सारखा काव्याकडे बघत होता, काव्याने दुर्लक्ष केलं, जेवायला खुप छान पदार्थ होते, सगळ्यांच जेवण झाल,

गुरुजी थांबलेले होते, चार पाच मुहूर्त त्यांनी काढलेले होते, प्रमिला ताई, सविता ताई त्यांच्याशी बोलत होत्या,.. "शक्यतो जवळचा मुहूर्त बघा",

हो.

सव्वा महिन्यानंतरचा पुढचा मुहूर्त निघाला, प्रमिलाताई सुरभी सविताताई शशी सगळे खूप खुश होते, काव्या वेगळीच गप्प होती, पूर्ण कार्यक्रमात मावशी तिच्याकडे लक्ष देऊन होत्या,

एकदा दोनदा सोहमने मावशींना डोळ्यांनीच विचारलं,.. "काय झालं आहे हिला?,स्वतः होकार दिला आता उदास दिसते आहे काव्या ",

मावशींनी नंतर सांगते म्हणून सांगितलं.

सगळे पाहुणे जायला निघाले काव्या, एका बाजूला शांत उभी होती,

शशी सविता ताईं जवळ उभा होता, त्याने सुरभीला जवळ बोलवलं, तिच्या कानात काहीतरी सांगितलं, ती हसली तिने प्रमिला ताईंना सांगितलं.

"अरे जा मग बोल काव्याशी तुझी होणारी बायको आहे ती लाजतो का एवढा",.. प्रमिला ताई.

"जा बेटा काव्या, सुरभी बघ जरा या दोघांकडे, एकदम लाजून लाजून अर्धी झाले आहेत ते",.. सविता ताई.

बाजूच्या हॉलमध्ये काव्या सुरभी शशी सचिन असे सोबत होते, एका बाजूच्या सोफा सेटवर सुरभीने काव्याला बसवलं, शशी तिच्या बाजूला जाऊन बसला, सुरभी उठून सचिनला घेऊन बाजूला जाऊन उभी होती.

खरं तर शशीला काव्याला धमकी द्यायची होती की आता लग्नाला एकच महिना बाकी आहे, गडबड केली तर काहीही होऊ शकतं, कारण तो केव्हाचा बघत होता सोहम काव्याकडेच बघतो आहे.

"आज खुप सुंदर दिसतेस काव्या तु, खूप भोळी असल्यासारखं करू नको काव्या, अजिबात गडबड नको आहे मला, केव्हाच बघतो आहे मी सोहम जीजू तुझ्याकडेच बघता आहेत, त्यांना काही सांगितलं तर बघ, ते एकटे जातात ऑफिसला, माझ्या बहिणीचा नवरा आहे असं सुद्धा विचार करणार नाही मी, त्यांना त्रास होईलच तुला पण सोडणार नाही मी फोडून काढेल ",.. शशी.

काव्या घाबरून त्याच्या कडे बघत होती,.." मी काही सांगितलं आहे का आतापर्यंत कोणाला, मी काही त्रास दिला का तुला शशी, तू का मला सारखं असं बोलतो दादा बद्दल",

सुरभीने ऐकला तो आवाज, तिने सचिनला बाहेर पाठवून दिलं, ती काव्या आणि शशी जवळ आली,.." काय सुरू आहे तुमच्या दोघांचं?",

काव्या गप्प बसली.

" शशी शांततेत घे जरा आणि तुही काव्या शशी तुझा होणारा नवरा हे जरा मला मानपानात बोलत जा, सदोदित भांडू नको त्याच्याशी ",.. सुरभी.

" ते नको सांगू हिला, तोंड बघ कसं करून घेतल आहे तिने, मारून मुटकून लग्नाला उभी आहे जशी, हसली का संध्याकाळ पासून एकदा ते विचार हिला ताई ",.. शशी.

सुरभी काव्याकडे बघत होती, तेवढ्यात दारातुन सोहम आत आला, तो येऊन सुरभी जवळ उभा राहिला,.." काय चाललं आहे इथे?",

" काही नाही शशीला बोलायचं होतं काव्यासोबत म्हणून आम्ही इथे आलो ",.. सुरभी.

" झालं का बोलून मग? ",.. सोहम शशी कडे रागाने बघत होता.

" बोलता आहेत ते छान, चल आपण बाहेर जाऊ सोहम",.. सुरभी.

"मी इथे थांबलो तर काही प्रॉब्लेम आहे का शशी काव्या?",.. सोहम.

" नाही दादा",.. सोहम जाऊन काव्याजवळ बसला,

"बोल शशी काय म्हणणं आहे तुझ? , काँग्रॅच्युलेशन मनाप्रमाणे बायको मिळाली तुला, यासाठी तु काय केलं हे माहिती नाही मला, पण मी ते शोधून काढेन लवकरच, आणि जशी माझी बहिण तुझ्या जवळ आहे तशी तुझी बहीण माझ्या जवळ आहे हे लक्ष्यात ठेवायच ",.. सोहम.

" असं काय बोलतो आहेस सोहम, चिडला आहेस का तु आज? एवढा छान दिवस आहे, सोड ना ",.. सुरभी मध्ये पडली.

" सुरभी जरा शांत रहा, बाहेर काय हवं नको ते बघ जरा पाहुण्यांचं, हा बोल शशी कसं काय होकार मिळवला तू काव्याचा? मला बोलायचं होतं तुमच्या दोघांशी जरा, पटकन बोल काव्या",.. सोहम.

शशी रागाने काव्या कडे बघत होता,.." दादा प्लीज नको बोलू तु काही शशीला, तो चांगला आहे, मीच होकार दिला शशीला, आई वहिनी काय म्हणतात ते पटलं मला, इथेच राहील मी जवळ, वहिनी आणि शशीचा काही दोष नाही यात, तु नको ना चिडू प्लीज ",

" मला माहिती नाही काव्या तु असं का करते आहे, ठीक आहे तु तुझ्या मनाने निर्णय घेतला आहे तर ऑल द बेस्ट, या पुढे मी तुमच्यात मधे मधे करणार नाही काहीही करा ",.. सोहम उठून बाहेर निघून गेला, त्याच्यामागे सुरभी गेली,

रूममध्ये आता शशी आणि काव्या होते, शशी तिच्याकडे बघत होता,.." शाब्बास काव्या असंच करायचं, यापुढे नवऱ्याची बाजू घ्यायची, नाही तर काय होईल हे माहिती आहे तुला, छान वाटलं पण तू माझी बाजू घेतली तर, त्याने पुढे घेऊन येऊन तिला जवळ घेतलं, वाटल नव्हत पण छान आहेस तु " ,

काव्या पटकन लांब सरकून बसली, शशी हसत होता,.. "एक महिना फक्त, नंतर काय करणार आहे, दिवस-रात्र माझ्यासोबत असणार आहेस तु काव्या, माझी सुंदर बायको, ठीक आहे होईल सवय तुला, आणि आपल सिक्रेट कोणाला सांगायच नाही, नाहीतर प्रॉब्लेम येईल ",

हो

दोघ बाहेर आले. शशी त्याच्या घरचे घरी गेले,

खूप छान कार्यक्रम झाला ना, सगळे सोफ्यावर बसले होते, सुरभी येऊन काव्याला भेटली, मी खूप आनंदी आहे तुझ्यासाठी काव्या, विश्वास ठेव खूप सुखी राहशील तू शशी सोबत,

" चला आता सगळ्यांनी आवरा",.. प्रमिला ताई.

सगळे रूम मध्ये आले, काव्या तिच्या रूम मध्ये आली, ती नुसती बसलेली होती, मावशी आल्या त्या तिला आवरायला मदत करत होत्या, काव्या एकदम गप्प होती,

"काय झालं आहे काव्या?",.. मावशी.

"काही नाही मावशी",..काव्या.

"बोल काय मनात आहे तुझ्या?",.. मावशी.

"काहीच नाही माझ्या मनात आता, जे होईल ते होईल कुठल्याच गोष्टीच काहीच वाटत नाही मला आता",.. काव्या.

"असं करून कसं चालेल यातून बाहेर पडायचा मार्ग शोध",.. मावशी.

"पुष्कळ प्रयत्न करून बघितले मी मावशी असं काही होऊ शकत नाही, संपलं माझ आयुष्य, अजून एका महिन्याने माझ्या बाबतीत काय होईल हेच मला माहिती नाही",.. तिने कपडे बदलून झोपून घेतलं, मावशींनी तिच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि त्या त्यांच्या रूममध्ये आल्या, खूपच धसका घेतला आहे पोरीने, काहीतरी करायला पाहिजे, तो सोहम सुद्धा भेटत नाही, ती सुरभी त्याला येऊ देत नाही कुठे आणि तो जरी आला तरी ती त्याच्या मागे मागे असते,

मावशी खाली किचन मधे पाणी प्यायला गेल्या, सोहम मागच्या बाजूला एकटा बसलेला होता, मावशी जावुन त्याच्या जवळ बसला, सोहमच्या डोक्यात पाणी होत, मावशींनी त्याचे डोळे पुसले,... "का करते काव्या अस मावशी? मी तिची लाइफ अस खराब नाही होवु देणार, तुम्ही मदत करा ना, विचाराना तिला",

"मला माहिती आहे सगळ",.. मावशी.

"काय झाल?",.. सोहम.

"त्या शशीने काव्याला धमकी दिली लग्न नाही केल तर तो तुझ्या वर हल्ला करेल, म्हणुन काव्या नाराज आहे, तिला वाटत तुला काही व्हायला नको",.. मावशी.

" काही होणार नाही मला, मावशी काही तरी करायला हव आपण काव्या साठी",. सोहम.

" हो मी तयार आहे मदत करायला काय करू या आपण",..मावशी.

"काव्याला इथुन दूर पाठवू या, तीच एखादा चांगला मुलगा बघून लग्न करून देवू काय वाटतय ",.. सोहम.

" अस झाल तर माझ्या पेक्षा जास्त आनंद कोणाला होणार आहे ",.. मावशी.

दोघ जण काही तरी ठरवत होते,... उद्या निघायच लगेच?

" हो आता साखरपुडा झाला आता ते लोक गाफील असतिल उशीर केला तर अजुन मुश्किल होईल ",.. सोहम.

" नक्की होईल ना अस सोहम ",.. मावशी.

" हो करू मावशी पण अजुन काव्या ला काही सांगु नकोस",.. सोहम.

नाही

मावशी रूम मध्ये येवून झोपल्या, आता बर वाटत होत त्यांना,
........

दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलवर सगळे हजर होते, अभिजीत आदेश प्रताप राव आशा ताई आणि आजी

" सुरू झाला का काम तुझ आदेश? ",.. अभिजीत.

हो दादा

" जमत आहे का पण आदेशला काही काम? ",.. आजी विचारत होत्या.

तसे सगळे हसायला लागले.

" तुम्हा लोकांना काही मी हुशार वाटत नाही का? , मला इथं सगळे काम येतात , आजी काल मी मीटिंग घेतली माहिती का ऑफिस मधे" ,.. आदेश,

" हुशार आहे माझा आदेश",.. आजी कौतुकाने बघत होत्या.

अभिजीत हसत होता, प्रताप राव गालात हसत होते,.. काय करतो हा आदेश काय माहिती?

" बाबा तुम्ही येत आहात का आज ऑफिसला? ",.. अभिजीत.

" हो येतो आहे जरा वेळाने येईन मी दुपारून मला थोडं काम आहे",.. प्रताप राव.

"त्या मंत्री साहेबांबरोबर तुमची मीटिंग कधी आहे",.. अभिजीत.

"आजच आहे ती दुपारून",.. प्रताप राव.

"आपल्या प्रोजेक्ट बद्दल बोला ना त्यांच्याशी, ते टेंडर आपलं मिळायला पाहिजे",... अभिजीत.

हो.

" बाबा माझ्या सुद्धा इलेक्शन साठी त्यांच्याशी बोला ना, थोडं प्रचारासाठी मदत झाली पाहिजे",.. आदेश.

ठीक आहे

" तुमच्या दोघींचं काही म्हणणं आहे का अजून?, काही हव का मंत्री साहेबांकडून , ज्याला त्याला आपल्या कामाच पडल आहे",.. आजी आणि आशाताई दोघ हसत होत्या,
........

दुपारी काव्या तिच्या रूम मधील बसलेली होती तिने नुकताच प्रीतीला फोन केला ,.. " प्रीती माझ लग्न ठरलं शशी सोबत, आणि कालच साखरपुडा होता",..

" काय तू का होकार दिला त्याला पागल ",... प्रिति

"तो शशी डेंजर आहे, मला धमकी दिली त्याने, दादाच्या जिवाला धोका आहे ",..काव्या.

" खरच करेल का तो अस? नुसत घाबरवत असेल तो तुला, पण तू तुझ आयुष्य खराब करते आहेस ",..प्रिति.

"जे होईल ते होईल आता ",...काव्या.

त्या दोघी खूप बोलत होत्या आणि काव्या रडत होती, प्रितीला खूप कसतरी वाटत होत,

जरा वेळाने सोहमचा फोन आला,.. "बोल दादा",

"आता कशाला बोलते आहेस तू माझ्याशी, काय प्रकार चालला आहे हा? एकदम शशी बरोबर लग्न करायचं ठरवलं तू",.. सोहम.

"मी काय म्हणते दादा तुला बॉडीगार्ड बघणार का तु रघु सारखा एखादा",.. काव्या.

"काय गरज आहे? ",.. सोहम.

" नाही तर आता मला मी कुठे जात नाही तर रघुला तुझ्यासोबत राहू दे ना",.. काव्या.

" काय झालं आहे काव्या? ",.. सोहम.

" काही नाही दादा पण जरा बॉडीगार्ड तुझ्यासोबत असला तर बरं वाटेल",.. काव्या.

" काही बोलला का तुला शशी? ",.. सोहम.

" नाही कशाला तो मला काही म्हणेल, दादा पण तू तुझ्यासाठी बॉडीगार्ड घे ना",... काव्या.

" मला सगळ समजल आहे काव्या, तू काळजी करू नकोस मी करतो बरोबर",.. सोहम.

काव्या रडत होती..," दादा तुला काही व्हायला नको ",

" काही होणार नाही मला काव्या, मी म्हणतो ते ऐक आपण जातो आहोत इथून ",.. सोहम.

कुठे?

" जावू कुठे तरी, काव्या तुला आता निघाव लागेल ",..सोहम.

" मला आई आणि वहिनी कुठे जाऊ देत नाही",.. काव्या.

"गाडीत बसून निघून ये ना, मावशींना घेऊन ये मी सांगतो सुरभी ला फोन करून की काव्याला ऑफिसमध्ये पाठव, वाटलं तर तू पण ये म्हणजे तिला संशय येणार नाही, जमिनीच्या केस मध्ये तुझ्या सह्या हव्या आहेत असं सांगतो",.. सोहम.

"ठीक आहे दादा काय काय घेवू सोबत ",.. काव्या.

"काहीच नाही तसच ये ",... सोहम.

सोहम सुरभीला फोन केला,.." मी केव्हाचा काव्याला फोन करतो आहे कुठे आहे ती? ",

"माहिती नाही तिच्या रूम मध्ये असेल",.. सुरभी.

" तिला तयारी करून ऑफिसला यायला सांग थोडं काम आहे ",.. सोहम.

" काय काम आहे? ",... सुरभी

"जमिनीच्या पेपरवर सह्या घ्यायच्या आहेत तिच्या, आमच्या दोघांच्या नावावर आहे ना ती जमीन, माझा विचार होतो आहे की तिथे शॉपिंग मॉल तयार करायचा आणि आपल्या दोघांच्या नावावर करायची ती जमीन",.. सोहम.

सुरभीच नाव जमिनीवर येणार होतो म्हणून ती प्रचंड खुश होती,.." ठीक आहे सांगते मी काव्याला ",

" हे बघ सुरभी तू पण ये तिच्यासोबत काही वेळेस तुझ्या सह्या पण लागतील, थांब एक मिनिट वकील साहेब बोलत आहेत",.. त्याने वकीलांना कॉन्फरन्स कॉल वर घेतलं.

" सुरभी मॅडमच्या सह्या आता नाही लागणार, आधी काव्या मॅडमच्या सह्या घेऊ, ती जागा सुरभी मॅडमच्या नावावर करू मगच ते काम होईल",.. वकील.

" मी करतो तुला थोड्या वेळात फोन, सुरभी तोपर्यंत तू काव्याला तयार राहिला सांग",.. सोहम.

सुरभी काव्याच्या रूम मध्ये गेली, ती झोपलेलीच होती.

" काय चाललं आहे हे काव्या? एवढा अंधार करून ठेवला रूममध्ये आणि आता एवढे अकरा वाजले तरी काय झोपलेली आहे, उठ लवकर तयार हो, तुला ऑफिसमध्ये जायचं आहे, सोहम केव्हाचा फोन करतो आहे तुला",.. सुरभी.

" कशासाठी वहिनी मी नाही जाणार",.. मुद्दामच काव्या बोलत होती.

" काय काम आहे ते आता मला काय माहिती, आटोप लवकर",.. सुरभी.

" तू चल ना माझ्यासोबत वहिनी",.. काव्या.

" मी आली असती पण मला लग्नाचे खूप काम आहेत आणि आज माझं नाही तरी काही काम नाही तिकडे तू मावशींना घेऊन जा तुझ्यासोबत",... सुरभी.

" ठीक आहे",.. तयार होऊन काव्या आणि मावशी खाली आल्या.

" कुठे चालले आहेत या दोघी ",.. प्रमिला ताई.

" आम्ही ऑफिसला जातो आहे, दादाने बोलावलं आहे",.. काव्या.

"काय काम आहे? ",... प्रमिला ताई.

" माहिती नाही",.. काव्या.

" काय ग सुरभी",... प्रमिला ताई.

यांना नको सांगायला काही की माझ्या नावावर जमीन होणार आहे, उगाच त्या मध्ये सोहमला फोन करू नकार देतील, यांना तसं सगळं स्वतःच्याच नावावर हव आहे,

" मला काही माहिती नाही आई ",.. सुरभी.

" लवकर ये काव्या घरी आपल्याला खरेदीला जायचं आहे",... प्रमिला ताई,

" हो आई",.. गाडीत बसून काव्या आणि मावशी निघाल्या,

"मी सांगितलं ते सगळं घेतलं का काव्या? तुझे सगळे पैसे डेबिट क्रेडिट कार्ड" ,.. मावशी.

" मावशी तु का येते आहेस माझ्या सोबत? , तुला नाही झेपणार हे, तु आत जा ",.. काव्या.

"नाही आता तु जिथे तिथे मी ",.. मावशी.

" खुप संकट असतात माझ्या मागे तुझी परवड होईल ऐक",.. काव्या.

नाही.

रस्त्यात रघु आणि सोहम भेटले, ते गाडीत बसले.

" दादा मावशीला घरी जायला सांग, तिची धावपळ होइल, तिला झेपत नाही आता ",.. काव्या.

" मी जाणार नाही काव्या आधीच सांगते",.. मावशी.

दादा

" असू दे मावशीला तुझ्या सोबत काव्या ",.. सोहम.

गाडी पटकन गावाबाहेर जात होती

"काव्या तुझा फोन स्विच ऑफ कर, मावशी तुम्ही पण फोन स्विच ऑफ करा, रघु आणि माझाही फोन स्विच ऑफ आहे ",.. सोहम.

" तू आणि मावशी लगेच गावाला जात आहात, एका जागी तुमची रहायची सोय केली आहे",.. सोहम.

"अरे पण ती जागा कोणाला समजली तर सोहम",.. मावशी.

" काळजी करू नका मावशी सध्या हे लग्न कॅन्सल होण महत्वाच आहे, नाही समजणार" ,.. सोहम.

ते सगळे एका जागी चहा पाण्याला थांबले

"काय चाललं आहे दादा नीट सांग",.. काव्या.

"तुला लग्न करायचं आहे का शशी सोबत",.. सोहम.

नाही

" तेच सुरू आहे ",.. सोहम.

" पळून पळून कुठे पळणार मी? तुला माहिती नाही किती डेंजर आहे तो शशी ",.. काव्या.

" आम्ही आहोत ना सोबत किती धसका घेतला आहेस",.. सोहम.

" ठीक आहे सॉरी दादा आता मी काही म्हणणार नाही काय करायचं आहे ",.. काव्या.

" मी तुझं लग्न त्याच्याशी सोबत होऊ देणार नाही, काहीही झाल तरी ",.. सोहम.

🎭 Series Post

View all