तुझी साथ हवी मला... भाग 10

मावशी आणि काव्या गावी पोहोचल्या, अतिशय सुंदर कौलारू घर होतं मामाच, खरच खूप छान वाटत होतं, कोणाची भीती नाही की काही दबाव नाहीतुझी साथ हवी मला... भाग 10

©️®️शिल्पा सुतार
.........

संध्याकाळी हॉटेलवर कार्यक्रम होता, तिकडे सगळे तयारी करून निघाले, प्रमिलाताई आणि सुरेश राव यांची तयारी खास होती,

काव्या खूपच सुंदर दिसत होती, लाल रंगाचा अनारकली, छान केस मोकळे सोडले होते तिने , मॅचिंग बांगड्या कानातले सगळच छान दिसत होतं, मुळातच सुंदर काव्याला डार्क रंग छान दिसत होता, डोळ्यात थोडी भीती होती, वहिनीच्या माहेरचे सगळे लोक येतीलच तिकडे, स्पेशली शशी.

ते सगळे निघाले.

प्रमिलाताई सुरेशराव यांच्या गाडीत काव्या होती, सोहम आणि सुरभी मावशी दुसऱ्या गाडीत होते, तिने गाड्या निघाल्यावर लगेचच शशीला फोन केला,.. "निघाले का तुम्ही सगळे?",

" हो आम्ही निघालो आहोत, आई बाबा आणि मी काकू काका आणि सचिन तोही येतो आहे",.. शशी.

"चालेल या लवकर",.. सुरभी.

सोहम खूप खुश होता, तो रस्ता भर प्रमिला ताई आणि सुरेशराव यांच्या बद्दलच मावशी आणि सुरभीशी बोलत होता,

सगळे हॉटेलवर आले, नेहमी प्रमाणे काव्यासोबत कोणीच नव्हतं, ती मावशींच्या आजूबाजूलाच होती.

" काय झालं काव्या का असा चेहरा केला आहेस? ",.. मावशी.

"मला भीती वाटते आहे ग मावशी, तो शशी येईल आता",.. काव्या.

" हेच तर करायच नाही, तु घाबरली की गेलीस, सामना कर सगळ्या परिस्थितीचा, आज इतकी छान तुझ्या आई बाबांची एनिवर्सरी आहे, कशाला घाबरतेस त्याला, मी आहे ना" ,.. मावशी.

एकेक करून पाहुणे येत होते सगळे सुरेशराव प्रमिलाताईंना भेटत होते,

काव्याने रघुला फोन लावला,.." कुठे आहेस रघु ? ",

" मी इथे आहे तुमच्या मागे मॅडम",.. तिने मागे बघितल, रघुने तिला हात दिला, तिला आता खुप बर वाटत होत, ती त्याच्या जवळ गेली, बी कंफर्टेबल रघु,

हो मॅडम..

शशी आणि फॅमिली आले, सुरभी वहिनी पुढे पळत जाऊन त्यांना भेटली, सगळे एकमेकांना भेटत होते, स्टेजच्या मागच्या बाजूला जाऊन काव्या उभी होती, सुरभी तिला शोधत होती, तिला काव्या दिसली, ती जाऊन तिला घेऊन आली.

" सोड वहिनी मला नाही यायचं आहे तिकडे",.. काव्या.

"अरे शशी माझे आई बाबा आले आहेत जाऊन भेट त्यांना, पाया पड त्यांच्या गेल्यावर, गुपचूप मी म्हणते ते करत जा काव्या ",.. सुरभी.

"पाया पडायला काही हरकत नाही वहिनी, मी येते माझा हात सोड",.. काव्या.

सगळे उभे होते तिकडे काव्या आणि सुरभी आले, सगळे काव्याकडे बघत होते, खूपच छान दिसत होती ती,

सुरेश रावांनी काव्याला जवळ बोलवलं,.." बेटा जा सगळ्यांना भेट ",

बाबांनी सांगितल्यामुळे नाईलाज झाला, काव्याने शशीच्या आई-वडिलांच्या पाया पडल्या, काका काकूंच्या पाया पडल्या, सचिन काव्याला भेटला,.. "खूपच छान दिसते आहेस तू वहिनी",

सगळे हसत होते, शशी एकदम सभ्य असल्यासारखा लाजत होता आणि गप्प उभा होता.

" छान दिसते आहेस तू काव्या, ये बाई आता लवकर घरी",.. सुरभीची आई सहाजिकच प्रेमाने असं म्हणत होती,

तसे लोक चांगले होते, फक्त शशी सोडला तर, ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं ती व्यक्तीच बरोबर नाही तर कसलं लग्न करणार, नाहीतर काही प्रॉब्लेम नव्हता या लोकांचा, काव्या परत जाऊन मावशीं जवळ बसली, तिने एकदा मागे वळून बघितल रघु होता बसलेला, तो लक्ष देवुन होता, तिला बर वाटल,

खूप गप्पा टप्पा सुरू होत्या, केक कटिंगची वेळ आली सगळे टेबल जवळ जमा झाले होते, घरचे बाकीचे लोक समोर उभे होते, काव्या बिझी होती, जेव्हा जेव्हा काव्या इकडे तिकडे बघत होती तेव्हा शशी तिच्याकडे बघत होता असं तिला जाणवलं, केक कटिंग झाल्यावर सगळ्यांना केक खायला दिला, सरबत स्टार्टर सर्व केले जात होते, सगळे छान एकत्र बोलत होते,

शशी सुरभी जवळ आला तिच्या कानात काहीतरी सांगितलं.

" थांब जरा वेळ",.. सुरभी

एका टेबलवर सोहम सुरभी शशी सचिन आणि अजून एक दोन तरुण नातेवाईक बसलेले होते, सुरभीने जाऊन काव्याला तिथे आणलं, ती सोहम जवळ बसली होती, सगळे बोलत होते ती ऐकत होती,

"बोर होत आहे नाही इथे, चला आपण सगळे छान गार्डनमध्ये फिरू",.. सुरभी.

सोहम सोबत होता त्यामुळे काव्याला काही वाटलं नाही, सगळे गार्डनमध्ये गेले, सुरभी मुद्दाम सोहमच्या आजूबाजूला होती, त्याचा हात धरून फिरत होती, दादा वहिनी असे फिरत असल्यामुळे काव्याला कोणी सोबत राहिल नाही, ती असं कसं म्हणणार वहिनीला की मला दादा सोबत राहू दे.

हॉलमध्ये वापस जाऊ असा ती विचार करत होती, ती निघाली , समोर शशी उभा होता,.. "कुठे चालली आहेस काव्या, आज माझ्याशी थोड is सुध्दा बोलली नाहीस तु, काय अस? ",

काव्या एकदम दचकली, शशी हसत होता,.. "तू एवढी का घाबरतेस मला? इथे सगळे घरचे आहेत, कार्यक्रम सुरू आहे, इथे काय करणार आहे मी तुला?",.. त्याचा असं हे विचित्र बोलणं ऐकून अजूनच काव्या घाबरली,ती बघत होती सोहम कुठे आहे.

"मला आत जायचं आहे सरक बाजूला",.. काव्या.

"नाही जाऊ दिलं तर",.. त्याने पुढे येऊन काव्याचा हात धरला,.. "बघ ना सगळे किती छान फिरत आहेत, आपण दोघं फिरू असं, चल त्या बाजुला बागेत जावुन बसु छान एकांत आहे तिकडे ",

काव्या इकडे तिकडे बघत होती, रघु समोर उभा होता, शशीने बघितल रघुला, त्याला अजुन राग आला, त्याने मुद्दाम काव्याचा हात जोरात धरला, तिला जवळ ओढल,

" शशी मुद्दाम करतोस का तू?",.. काव्या.

" हो बोलव रघुला, मार हाक, मी पण बघतो आज तो काय करतो ते " ,.. शशी.

रघु... काव्या बोलवत होती,

तो लगेच पुढे आला,.. "यु निड हेल्प मॅडम",

येस.

\"साहेब हात सोडा मॅडमचा ",.. रघु

" नाही सोडत, कर काय करायच ते, तुला माहिती नसेल मी होणारा जावई आहे इथला, तेव्हा लायकीत रहायच रघु, आणि तुझ्या मॅडमला माझ्या पासुन कोणी वाचवु शकत नाही ",.. शशी.

" परत एकदा सांगतो हात सोडा नाही तर प्रॉब्लेम होईल",.. रघु.

"काय करशील तू? ",.. शशी.

रघुने त्याच्या बोटात स्वतःचे बोट अडकवले आणि एकदम हात फिरवला, तसा शशी थोडासा ओरडला, एकदम झटका बसला सारखा त्याने काव्याचा हात सोडला, त्याचे बोट पिरगळले होते रघुने, काव्या तिथुन पळत मावशी बसल्या होत्या तिथे आली, ती खूप घाबरली होती, थोडी रडत होती, मावशी तिला आत घेवून गेल्या, सरबत दिल.

" काय झालं काव्या? ",.. मावशी.

"शशी त्रास देत होता, रघु आला मदतीला" ,... काव्या.

"काय बाई एक एक , ठीक आहे ना आता तु, मी बोलु का त्याच्याशी? " ,... मावशी

"नको काही उपयोग नाही",.. काव्या.

" इथे बस माझ्या जवळ, कुठे जावु नकोस आता, जेवते का तु?",.. मावशी.

"नको थोड्या वेळाने आई बाबां सोबत जेवेन",.. काव्या.
......

अभिजीत कार्यक्रमाला आला, आदेश सोबत होता, सोहम येवून भेटला, त्याने ओळख करून दिली, सोहम सोबत ते दोघ सुरेश राव प्रमिला ताईंना भेटायला आले पुष्पगुच्छ दिला, जेवण केल्या शिवाय जायच नाही, दोघ छान बोलत होते, आदेश इकडे तिकडे बघत होता, छान सुरु आहे कार्यक्रम, सोहमच्या आग्रहा मुळे दोघांनी थोड खाल्ल.

" चला थँक्स आम्हाला निघाव लागेल" ,.. सोहमने सुरभीची त्यांच्याशी ओळख करून दिली,

" काव्या कुठे आहे सुरभी? " ,... सोहम.

"माहिती नाही केव्हाची दिसली नाही ती कुठेच" ,... सुरभी.

"या तुम्ही आमच्या कडे वहिनी" ,... अभिजीत.

"हो नक्की" ,.. सुरभी.

"चला आम्ही निघतो",.. दोघ निघाले,
.....

"श्रीमंत पार्टी दिसते आहे ही",.. आदेश.

"हो यांच्या कडून निधी घेतला ना मी तुझ्या साठी, भविष्यात उपयोग होवु शकतो यांचा, म्हणुन आज आलो आपण प्रोग्राम साठी, एकदा बोलवु त्यांना आपण घरी ",.. अभिजीत

हो

" थोड लांब आहे हे गाव आपल्या गावा पेक्षा ",.. आदेश

हो

दोघ घरी आले, आई बाबा बाहेर गेलेले होते, आजी होत्या, दोघ आजीशी गप्पा मारत बसले.
....

कार्यक्रम झाला, जेवण झाल, काव्या फॅमिली सोबत होती, सगळे निघत होते, शशीची फॅमिली निघाली, त्याचे आई बाबा सुरेश राव प्रमिला ताई सोबत बोलत होते,

शशी सुरभी सोबत बोलत होता,.. "फार प्रॉब्लेम झाला आहे रघु मुळे ताई, आता घाई करायला हवी,

" हो बाबा पण काव्याची साईड घेतात, त्यांच ऐकण्यात आता काही पॉईंट नाही, तू आता तुझ्या पद्धतीने ही केस हॅण्डल कर मला असं वाटतं तू म्हणतो ते बरोबरच आहे",.. सुरभी

" बघ मी म्हणत होतो ना तुला ताई ",.. शशी

" तु घरी ये आता काव्याला भेटायला तिथेच तो रघु येत नाही",.. सुरभी

"हो बरोबर आहे तेच करूया आता",.. शशी.

" हाताला काहीतरी लाव",.. सुरभी.

" हो बोट दुखता आहेत माझे, तो रघु सारख मारतो मला, चान्स मिळु दे सोलून काढेन मी त्याला ",.. शशी

सगळे घरी आले, खूप छान झाला कार्यक्रम, काव्या तिथे बसून सगळं ऐकत होती, वहिनी तिच्याकडे रागाने बघत होती, तिला समजलं शशीने नक्की सांगितलं आहे हिला काहीतरी, असंच पाहिजे पण त्या शशीला,

" मला अभ्यास आहे मी आत मध्ये जाते",.. ती रूममध्ये निघून आली,

कॉलेज जवळजवळ संपलं होतं, खूप अभ्यास सुरू होता, कुठे जात नव्हती काव्या रूम मधुन, रघुची ड्युटी सुरू होती तरी ही, कॉलेजला जातांना तो सोबत असायचा, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं, हे आठ पंधरा दिवस खूप छान गेले,

काव्याची वार्षिक परीक्षा झाली, छान गेले होते तिला पेपर, दरवेळी प्रमाणे मैत्रिणींनी पार्टी ठेवली होती, तिथे ही काव्या जावून आली, आल्यावर ती मावशींच्या रूम मध्ये गेली, कुठे जायची तयारी मावशी?

"यावर्षी देवदर्शनाला गेली नाही ना मी, तर उद्या जाणार आहे मी गावाला, काव्या नीट राहायचं घरात",.. मावशी.

"मी येऊ का मावशी सोबत? नाहीतर परीक्षा झाली आहे आणि कधीची कुठे गेली नाही मी",.. काव्या.

"चालेल तुझ्या बाबांना विचारून बघ" ,... मावशी.

काव्या त्यांच्या रूम मधे गेली,.." बाबा मला मावशी सोबत जायचं आहे गावाला उद्या ",.

" ठीक आहे जावुन ये, पण काळजी घ्यायची तिकडे, रघुला सोबत घेवुन जा ",.. सुरेश राव.

खुपच खुश होती काव्या, उद्या निघणार होत्या त्या दोघी देव दर्शनाला , घरचीच गाडी होती त्यामुळे सगळ्यांनी होकार दिला.
.......

सुरभी सुद्धा सात आठ दिवस माहेरी गेली होती ती तिच्या आई-बाबांसोबत नाश्ता करत होती, आई बाबा होते तोपर्यंत शशी गप्प होता, आई-बाबा उठून आत मध्ये गेले, बाबा ऑफिसला जायची तयारी करत होते.

"ताई किती दिवस चालणार आहे हे अस? , किती त्या काव्याचे नखरे? कधी होणार आहे आमचं लग्न? कुठे आहे ती काव्या?",.. शशी.

" आता ती त्या मावशींसोबत फिरायला गेली आहे, ती आली की मी लगेच सासूबाईंकडे विषय काढते ",.. सुरभी.

" कुठे गेली आहे ती मी बघू का",.. शशी.

" काही उपयोग नाही तो रघु आहे त्यांच्यासोबत, अजून एक दोन लोक आहेत",.. सुरभी.

"काही खरं नाही आधी त्या रघुचा बंदोबस्त करायला पाहिजे",.. शशी.

"कशाला बंदोबस्त करायचा? एकदा तुझं व्यवस्थित रित्या काव्याशी लग्न झालं की रघु सुद्धा तुझा बॉडीगार्ड होईल",..सुरभी.

" ती आली की सांग लगेच मी स्वतः येतो तिला भेटायला तर फारच झालं आहे",.. शशी.

" काय ठरवलं आहेस तू शशी ",.. सुरभी.

" साम-दाम-दंड-भेद सगळं वापरणार आहे, मी चांगल्या शब्दात जर काव्याने ऐकलं नाही तर धमकी देणार आहे, पुढच्या पंधरा दिवसात आमचा साखरपुडा नक्की होणार आणि पुढच्या एका महिन्यात लग्न",.. शशी.

सुरभी आता खुश होती

मावशी आणि काव्या गावी पोहोचल्या, अतिशय सुंदर कौलारू घर होतं मामाच, खरच खूप छान वाटत होतं, कोणाची भीती नाही की काही दबाव नाही की दडपड नाही, त्यात रघु सोबत होता शांत आणि चांगला रघु आजूबाजूला असला की टेन्शन नसायचं,

मावशीचा दूरच्या नात्यातला भाऊ होता तो, छोटासा जमिनीचा तुकडा होता त्यांचा, तिथे शेती करत होते ते मामा, पोचल्याबरोबर काव्याने फिरून सगळं घर बघितलं तोपर्यंत स्वयंपाक झालाच होता, मामा आणि मावशी दोघेजण छान बोलत बसले होते, इकडे कोण कोण आहे काय काय आहे हे सगळं मावशी सांगत होती, स्वयंपाक झाला मामीने जेवायला वाढलं, छान जेवून घेतलं,

काव्याचे खूप लाड होत होते, त्यांची मुलगी राधा कॉलेजला गेली होती, ती आली तिची आणि काव्याची खूप गट्टी जमली, दुपारनंतर ते सगळेच देवाला निघाले, रात्रीपर्यंत पोहोचले,

तिकडे दुसऱ्या दिवशी पहाटे दर्शन होतं, सकाळी छान दर्शन झालं, काव्याने देवा कडे प्रार्थना केली माझ्या वरच हे संकट टळु दे, परत येईल दर्शनाला, खुप छान वाटत होत मंदिरात.

🎭 Series Post

View all