तुझी साथ हवी मला... भाग 8

काय सांगणार आता बाबांना तो ज्या पद्धतीने माझ्याकडे बघतो, हात लावतो, मला त्रास देतो, नक्की खात्री आहे की भविष्यात हे लग्न खूप त्रासदायक होईल


तुझी साथ हवी मला... भाग 8

©️®️शिल्पा सुतार
.........

दुपारी जेवणा साठी काव्या खाली आली, प्रमिलाताई सुरभी बसलेल्या होत्या या दोघींनी परत शशीचा विषय नको काढायला, मावशी काव्याच्या बाजूने होत्या त्यामुळे बरं होतं, लवकर जेवण करून काव्या उठली, नकोच बोलायला यांच्याशी जास्त, उगीच वाद होतात.

"काय झालं काव्या जेवत का नाही?, पोळी घे अजुन",.. प्रमिला ताई.

" जेवली मी भरपूर उद्या पेपर आहे, घाई आहे जरा",.. काव्या रूममध्ये निघून गेली.

"काल काय बोलला शशी हिच्याशी? एकदम गप्प झाली आहे ही कालपासून",.. प्रमिला ताई.

"नुसतीच गप्प नाही तर आज ती माझ्यावर खूपच चिडली होती सकाळी",.. सुरभी.

"का काय झालं? ",.. प्रमिलाताई.

" काय माहिती",.. सुरभी.

प्रमिलाताई विचार करत होत्या.

" आई तुम्ही परत बोला ना बाबांशी",.. सुरभी.

" हो ते बोलले आहे काव्याशी, तिने परीक्षा झाल्यावर बोलायला सांगितला आहे त्यामुळे एवढी घाई करायला नको, नाहीतर कुठे जाणार आहे ती, आपण जे म्हणू तेच होईल, किती का हो नाही म्हणत नाही, एक तारीख ठरवून घेवु, द्यायचं सोपवून तिला शशीकडे, त्याला सांगायच की पैसे काढून घेत जा काव्य कडून वेळोवेळी, जेवढ्या लवकर यांच्या तिजोरी खाली होतील, तेवढ बर, मग आपण श्रीमंत होवु ",.. प्रमिलाताई

" हो आई",... सुरभी आता खुश होती.
......

काव्याची आज पासुन परीक्षा होती, ती सकाळी खाली आली, सोहम आई बाबांना भेटून नाश्ता करून काव्या निघाली, परीक्षा असल्या मुळे ती कोणाशी जास्त बोलली नाही, अभ्यासात सिरियस होती ती, घरचेही काही बोलले नाही,

आजचा पेपर झाला, चांगला गेला होता पेपर, रघु होता गाडीत हजर होता, तोच एक दिलासा होता, ती वापस येत होती, पटकन घरी जाऊन उद्याच्या पेपरची तयारी करावी लागेल, अभ्यास बराच बाकी आहे,

गाडी कॉलेज बाहेर आली, समोर शशी उभा होता, काव्या बघत होती काय झालं? , काय यार आता याच एक एक, उगीच त्रास देतो हा शशी, तो पुढे चालत आला , ड्रायव्हरने गाडी थांबवली.

"हाय काव्या",.. शशी.

काव्या दचकली.

"परीक्षा सुरू आहे ना तुझी, ऑल दे बेस्ट, थोडा वेळ असेल तर चल, मला थोड बोलायच आहे तुझ्याशी",.. शशी.

काव्या रघु कडे बघत होती.

"काय काम आहे साहेब तुम्हाला? ",.. रघु.

"कोण आहे हा? ",. शशी.

"मी मॅडमचा बॉडी गार्ड रघु",.. रघु.

"मधे मधे का बोलतोस तु एवढ, समजत नाही का, काव्या याला सांग मी कोण आहे",... शशी.

" शशी आम्हाला जावु दे",.. काव्या.

" गुपचुप गाडीतून उतरायच आणि माझ्या सोबत लंच साठी यायच, समजल ना",.. शशी.

"उद्या पेपर आहे मला अभ्यास करायचा आहे",.. काव्या.

" सांगितल ते समजल नाही वाटत, लंच साठी चल",.. शशी.

रघु बघत होता,.." मॅम तुम्हाला जायच का साहेबां सोबत ",

नाही.

" काव्या चल, उतर खाली, अर्धा तासात सोडतो तुला घरी, रघु तू गाडी घेवून जा, आमच्या मागे यायच नाही ",.. शशी.

" नाही मला घरी जायच आहे" ,.. काव्या.

शशीने गाडीचा दरवाजा उघडला, काव्या मागे सरकली,

रघु मधे आला,.. "साहेब जा तुम्ही इथून, अस करु नका, मॅडम नाही म्हणता आहेत, त्यांना त्रास देवू नका",

तरी शशी ऐकत नव्हता,

"साहेब मी परत एकदा सांगतो आहे, अस करु नका आम्हाला जावू द्या ,उगीच मी एक्शन घेईल" ,... रघु

" काय करशील तु? मार मला, मारायच आहे ना मार ",.. शशी पुढे येत होता, रघु चिडला होता, त्याने हळूच एक ठोसा शशीला मारला, तो बाजूला जावून पडला, मागच्या गाडीतून पाच सहा मुल उतरले, ते रघु जवळ आले, कोणाला मारतो आहे तु समजत का, धरा रे याला,

एकदम मारामारी सुरू झाली, कोणाच काहीच चालल नाही रघु समोर, त्याने सगळ्यांना मारल, मुल घाबरले होते , बघून घेवु तुला.

रघु आत येवुन बसला, काव्याने मारामारी होतांना, पडलेल्या मुलांचे फोटो काढुन घेतले, गाडी निघाली, ते सरळ घरी आले,
....

शशीच्या अड्ड्यावर सगळे मुल बसलेले होते, बर्‍याच मुलांना लागलेल होत, शशी चिडलेला होता,.. "कोण आहे हा रघु चौकशी करा जरा, मला मारतो का, ही हिंमत त्याची, आपल्या एका ही मुला मधे दम नाही का? सगळ्यानी मार खाल्ला , काय अस? , तुम्हाला सगळ्यांना मी एवढं उगाच पोसतो, काही उपयोग नाही तुमचा",

"शशी तू आम्हाला काय बोलतो आहेस नुसता, तु पण तर मार खाल्ला त्या रघुचा, तू का नाही मारलं मग त्याला",.. शरद.

"शट अप.. शहाणपणा नको आहे मला, रघुचा बंदोबस्त करायचा सोडून जास्त बोलतो आहेस तू शरद, कामाला लागा जरा" ,.. शशी.

बाकीचे मुलं लागलं त्या ठिकाणी मलम लावत होते, शशी मुलांकडे बघत होता, कठिण आहे हे.

काव्याच्या सोबत रघु राहिला तर कठीण आहे, या पुढे काव्याशी बोलता येणार नाही, ताईला सांगाव लागेल. त्याने सुरभीला फोन केला,.." काय ताई काय लोक भरून ठेवले आहे तुम्ही नोकरीला",

"काय झालं आता",.. सुरभी.

"मी आज काव्याला भेटायला गेलो होतो तर त्या बॉडीगार्डने मला तिला भेटू दिलं नाही, माझं आणि त्या रघुच भांडण झाल, कसला डेंजर मुलगा आहे तो, त्याने मारल आम्हाला, त्याला काढून टाका काव्याच्या मागून ",.. शशी.

"हो मी सांगते आज सोहमला, काय केलं त्याने? ",.. सुरभी.

" काही नाही मी नुसतं काव्याशी बोलत होतो तेवढ्यात त्याने मला ठोसा मारला",.. शशी.

" लागलं का तुला",.. सुरभी.

" हो मग लागलं ना, माझ्या बरोबरच्या बाकीच्या मुलांनाही उगाच मारलं त्या रघुने",.. शशी.

" कठीण आहे हे ",.. सुरभी.

" हो ना, असंच जर तो रघु तिच्या मागे येत राहिला तर काही खरं नाही ताई, काही तरी कर ",.. शशी.
......

काव्या घरी आली, आज फारच बर वाटत होत तिला, एक आशा होती की शशीला टक्कर देवू शकु, पण जे केल ते रघुने केल, मी पण हिम्मत दाखवायला हवी या पुढे,

ती गाडीतून उतरली, थँक्यू रघु, ती आत आली, सुरभी समोर बसली होती, काव्या आत जात होती,

"काव्या एक मिनिट काय सुरू आहे तुझ हे?",.. सुरभी.

"काय झालं वहिनी" ,.. काव्या.

"आज तु तुझ्या बॉडी गार्डला शशी बद्दल उलट सुलट सांगितल, त्यांने मारमारी केली शशी सोबत",.. सुरभी.

"शशीने सांगितलं ना हे, मग बरोबर आहे, तो नेहमी उलटीच बातमी देतो, वहिनी शशीने काय केलं ते नाही सांगितलं असेल ना ",.. काव्या.

"काय झालं तु सांग मग ",.. सुरभी.

" वहिनी शशी उगीच माझ्या मागे कॉलेजला आला होता, माझी परिक्षा सुरु आहे मी सांगत होती मला अभ्यास आहे तरी तो ऐकत नव्हता, तो मला जबरदस्ती गाडीतून बाहेर काढत होता ",.. काव्या.

" अगं मग जायचं ना त्याच्यासोबत, नाही तरी तो लंचला चल म्हणत होता ना, आता जेवशीलच ना तू घरी, त्यापेक्षा त्याच्या सोबत जेवून आली असती ना",.. सुरभी.

" वहिनी तुला खरच काही समजत नाही का, जाऊ दे मला बोलायचं नाहीये तुझ्याशी मी जाते माझ्या रूममध्ये",.. काव्या.

"मी आई बाबांना सांगते सगळ, तु कस वागते ते ",.. सुरभी.

"हो सांग मला काही फरक पडत नाही वहिनी" ,.. काव्या.
......

संध्याकाळी जेवायला टेबलवर सोहम हजर होता, काव्या आली ती समोर बसली होती, आई बाबा यायचे होते, सुरभीने मुद्दाम सोहम जवळ काव्याचा विषय काढला,.. "काव्यासाठी बॉडीगार्ड का हवा आहे का? ",..

"काय झालं आता? ",.. सोहम

" त्याने कॉलेजमध्ये शशी सोबत मारामाऱ्या केल्या ",.. सुरभी

"काय झालं काव्या? रघुनी काय केलं",.. सोहम.

"काही नाही दादा, शशी आणि त्याचे मित्र उगाच माझ्यामागे येत होते, त्यांना मारलं रघुने, चांगलेच घाबरले होते ते",.. सोहम आणि काव्या हसत होते, तिने सोहमला दुपारी मारामारी झाल्याचे फोटो दाखवले, उगीच शहाणपणा करतो तो शशी.

सुरभीला खूप राग आला होता,.." काय बोलते आहेस तू काव्या शशी बद्दल? समजतं का ",

सुरेशराव प्रमिलाताई जेवायला आले सगळे गप्प बसले, नको यांच्याजवळ विषय काढायला, उगाच बाबांना समजेल शशीचे प्रताप, शशीला सांगावच लागेल हे, सोहम आणि काव्या कसे हसत होते, काव्याला शिक्षा झालीच पाहिजे, शशी समोर कशी गप्प बसते, मग वहिनी वहिनी हाक मारते, चांगली बघते हिच्याकडे,... सुरभी चिडली होती.

थोड्यावेळाने तिने शशीला फोन केला, इकडे काय झालं ते सांगितलं,.. " खुप अकडते ती काव्या, काही तरी कर शशी",

शशी चिडला होता, त्याला माहिती होतं की रघुसमोर आपली ताकद कमी पडते आहे, काहीतरी आयडिया करावी लागेल... " त्या रघुला इतक मारेन ना मी ताई",

"जे काही करायच ते लवकर कर ",.. सुरभी.

हो ताई..

सुरभीला आता बर वाटत होत.
...
परीक्षा व्यवस्थित पार पडली, त्यानंतर शशीने परत काव्याची वाट अडवली नाही, हे खूप बरं झालं.
.....

अभिजीत सकाळी उठला, तो मॉर्निंग वॉकला गेला होता, वापस येताना एका बाकावर बसून आदेश कोणाशी तरी फोनवर बोलताना त्याला दिसला, एकदम खुश होता तो, अभिजित जाऊन आदेश जवळ बसला, तसा आदेशने फोन ठेवून दिला, दचकला तो,

"काय झालं? का ठेवला फोन? कोणाशी बोलत होता तु? ",.. अभिजीत.

"काही नाही ते पक्षाचं कार्य होतं",.. आदेश.

"मग मी आल्यावर का फोन ठेवला",.. अभिजीत.

"तसं काही नाही दादा, माझं काम झालं मग मी फोन ठेवला",.. आदेश.

"तुझ्या चेहऱ्यावर वेगळच काहीतरी दिसत आहे",..
अभिजीत उठला परत रनिंग करायला पुढे गेला, लगेच मागे फिरला तो,.." मी याचा शोध लावेन, त्या आधी तुला मला काही सांगायचं असेल तर विचार करून ठेव" ,.. तो निघून गेला

आदेशाने एक सुस्कारा सोडला, या दादा समोर माझं काही चालत नाही, याला समजल तर काय करेल हा? , बापरे, त्याने परत फोन लावला,.. नंतर करतो फोन अकरा वाजता.

नाश्त्याच्या टेबलवर सगळे हजार होते, अभिजीत अजूनही संशयाने आदेश कडे बघत होता.. "आज येणार आहे का ऑफिसला आदेश? ",

"दादा मला थोडं काम होतं",.. आदेश.

"हे बघ इलेक्शनला अजून बराच वेळ आहे, थोडा वेळ तू ऑफिसमध्ये द्यायला पाहिजे, आधी पण तु असच करत होता म्हणून मला बाबांनी इकडे बोलवुन घेतलं, आता आपण ठरवून घेऊ, दिवसातला काही फिक्स वेळ ऑफिसमध्ये द्यायला पाहिजे, तुझे इलेक्शन अगदीच आठ दिवसावर आला आहे तर मी समजू शकतो ",.. अभिजीत.

आदेश आई आजी कडे बघत होता, त्या दोघी हसत होता, हेल्प करा ना, आईने मानेने नाही सांगितल.

अभिजीत दादासमोर आदेशच काही चाललं नाही,.. "चालेल दादा तू म्हणशील तेव्हा तेवढे तास मी ऑफिसमध्ये येते जाईल",

" यावच लागेल सगळं व्यवस्थित शिकून घे, मी परत जाणार आहे फॉरेनला",.. अभिजीत.

"मी शिकतो पण तु नको जावु वापस",.. आदेश.

अभिजीत कामात खूप पर्टिक्युलर होता तो ऑफिसमध्ये पण ठरलेल्या वेळातच व्यवस्थित मीटिंग घ्यायचं तो ऑफिसमध्ये असला म्हणजे वेगळी शांतता असायची, सगळे काम व्यवस्थित वेळेवर व्हायचे, डोळे झाकून विश्वास ठेवू शकत होतो असा होता अभिजीत.
....

उद्या आई बाबांची एनिवर्सरी होती आजच दादाशी बोलायला पाहिजे,..." दादा मला फार महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी, तू माझ्या खोली येतो का? , इथे वहिनी येईल , म्हणजे सॉरी तिला सांगायचं नाही असं नाही, पण तिचे आणि माझे काही विचार पटत नाही",

" समजलं ते तू काळजी करू नकोस मी येतो तिकडे",.. सोहम तिच्या रूम मध्ये आला,.. काय झालं काव्या?

" हे घरचे लोकं माझं लग्न शशी सोबत जमवण्याचा विचार करत आहेत आणि उद्या ते काहीतरी अनाउन्समेंट करणार आहेत एनिवर्सरी पार्टीत, तर तू प्लीज बाबांना सांग ना की सध्या तरी असं काही करू नका, मला अजिबात लग्न करायचं नाही शशी सोबत, कधीच तेच सुरू आहे घरात, माझ्या मनावर दडपण येत, आज बघितल कस वागला शशी केवळ रघु मुळे ते मूल घाबरून वापस गेले, नाही तर आज ही त्याने मला त्रास दिला असता ",.. काव्या.

" तू काही काळजी करू नको काव्या, तुझ्या मनात जे आहे तेच होईल, मी आहे तुझ्यासोबत, मी आजच बोलतो बाबांसोबत",.. सोहम.

ते दोघे बोलत होते तेवढ्यात सुरेश राव आत मध्ये आले.

बरं झालं बाबा इकडेच आले, मेन म्हणजे आई सोबत नव्हती हे छान झालं, काव्याने इशारा केला सोहमने तिच्या रूमचा दरवाजा लावून घेतला,

" काय झालं आहे? ",.. सुरेश राव विचारत होते.

" बाबा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे",.. काव्या.

"त्यासाठी आलो आहे मी इकडे, मलाही तुझ्याशी बोलायचं आहे शशी बद्दल, तू म्हटली होती ना परीक्षा झाल्यावर बोलू अस",.. सुरेश राव.

"हो बाबा मला अजिबात शशी सोबत लग्न करायचं नाही",.. काव्या.

" काय झालं बेटा चांगला मुलगा आहे तो ",.. सुरेश राव.

" चांगला आहे तो पण त्याचं आणि माझं पटत नाही, तो खूप रागीट आहे आणि माझ्यापेक्षा खूप मोठा पण आहे, मी अस ऐकला आहे की तो वाईट काम करतो ",.. काव्या

" तो वाईट काम वगैरे करत नाही त्याच्या वडिलांचा बिजनेस आहे, तो त्यांना मदत करतो, नसेल तुला लग्न करायचं तर काही हरकत नाही",.. सुरेश राव.

" बाबा अजून एक रिक्वेस्ट आहे, लगेच तुम्ही काही सांगू नका याबाबत आई आणि वहिनीला, फक्त उद्या काही अनाउन्समेंट करू नका",.. काव्या.

" बेटा तुझी आई आणि वहिनी तुझ्या चांगल्याचाच विचार करतात, मुलीला लग्न होऊन सासरी जावं लागतं, जर तुझं लग्न शशी सोबत झालं तर तू डोळ्यासमोर राहशील आणि तुला वाटतं तेवढा शशी वाईट नाही",.. सुरेश राव.

" बाबा तो तुमच्यासमोर वेगळा वागतो आणि माझ्यासमोर वेगळा वागतो",.. काव्य

" वेगळा वागतो म्हणजे काय?, नीट सांग ",.. सुरेश राव.

" काय सांगणार आता बाबांना तो ज्या पद्धतीने माझ्याकडे बघतो, हात लावतो, मला त्रास देतो, नक्की खात्री आहे की भविष्यात हे लग्न खूप त्रासदायक होईल, पण बाबांना जास्त सांगता येणार नाही, शशीचा काही तरी स्वार्थ आहे या लग्नात ",.. काव्य विचार करत होती.

"सांग ना काव्या वेगळा वागतो म्हणजे काय? हे बघ बेटा तू लहान आहेस अजून, पती-पत्नीचं नातं असच असतं, पती पूर्ण जगाशी वेगळा आणि पत्नीशी वेगळा असतो, ठीक आहे तुझं म्हणणं आहे तर उद्या मी काही अनाउन्समेंट करणार नाही, पण मलाही असं वाटतं आहे की तू शशी बाबतीत विचार करावा. सोहम तुला काय वाटतं आहे? ",..सुरेश राव.

" मला असं वाटतं आहे बाबा की जे काव्या म्हणते त्यावर आपण एकदा विचार करावा, कारण शेवटी काव्याला राहायचं आहे शशी सोबत, आपण तर तीच लग्न करून मोकळं होवु, जर तिच मन नसेल या लग्नात तर बळजबरी करण्यात काही अर्थ नाही",.. सोहम.

" मग तुझ्या मनात कोणी आहे का काव्या? तस सांग, माझी काही हरकत नाही",.. सुरेश राव.

" नाही बाबा अजून तसं काही नाही माझ ",.. काव्या,

" ठीक आहे विचार करू आपण यावर, आतापासून टेन्शन नको, चला आता बाहेर जेवायला, किती वेळ आतच बसणार आहे",.. सुरेश राव.

" येते मी बाबा",.. काव्या.

सुरेशराव बाहेर निघून गेले.

" दादा मदत कर ना, बाबा सुद्धा आईच्या बाजूने आहेत, उद्याचा प्रसंग टळला तरी भविष्यात तो प्रसंग येईलच तू एकदा शशीची चौकशी कर ना ",.. काव्या

"तो वाईट धंदे करत नाही फक्त तो चिडका आहे आणि त्याचा भरोसा नाही तो त्रासदायक आहे, चल जेवायला बाहेर, काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासाठी ",.. सोहम

सोहम दादा ही निघून गेला काव्याला आता समजत नव्हतं काय कराव, दादा तरी थोड ऐकतो माझ , पण बाबा अजिबात ऐकत नाहीत , आता जर बाहेर जेवतांना वाहिनीने शशी रघुच भांडण झाल अस सांगितल तर झाल, परत आई बाबा मला ओरडतील.


🎭 Series Post

View all