तुझी साथ हवी मला... भाग 7

घरचा कारभार मोठा प्रतापराव आदेश किती करणार म्हणुन अभिजीतला फॉरेन हून बोलावून घेतल, आदेश त्यांच्या सारख डॅशिंग होता,



तुझी साथ हवी मला... भाग 7

©️®️शिल्पा सुतार
.........

मावशी काव्याच्या रूम मधे आल्या, रूम बंद होती, काव्या... काव्या.. तिने दार उघडल,.. "काय झालं तू रडतेस का काव्या?",

"मावशी शशी आला होता",.. काव्या.

केव्हा?

"आता तु आत गेली होती तेव्हा",.. काव्या.

"काय म्हटला तो?",.. मावशी.

"धमकी दिली मला",.. काव्या.

त्या काळजीत होत्या, काव्याची फरपट होते आहे,.. "आई बाबा कुठे होते तुझे?, मला हाक मारायची ना " ,

"तिथे होते त्यांना पसंत आहे शशी ",.. काव्या.

"त्यांच्या समोर दिली का धमकी? ",.. मावशी

"नाही पुढच्या हॉल मध्ये वहिनी घेवून गेली होती मला",.. काव्या

" काही केल का त्याने तुला? काय म्हटलं तो शशी? ",.. मावशी

"काय म्हणणार मावशी विचित्र मुलगा आहे तो, आई-बाबांसमोर वेगळा वागतो आणि माझ्याशी वेगळा वागतो, मला त्याची प्रॉपर्टी समजतो, मला अजिबात चालणार नाही हे",.. काव्या

" मोठा प्रॉब्लेम आहे हा ",.. मावशी.

" हो ना, मला नको आहे शशी माझ्या आयुष्यात, मावशी वहिनीला समजत नाही का ग माझं चांगलं वाईट",.. काव्या

" परीक्षा झाली की बोलून बघ तु सोहम दादाशी, स्पष्ट सांग आई-बाबांना की मला त्याच्याशी लग्न करायचं नाही कसला गुंड आहे तो",.. मावशी

" त्याचे लोक मी कॉलेजला जाते ना तेव्हा ही माझ्या मागे येत असतात ",... काव्या.

" शशीने सांगितलं असेल त्यांना तसं",.. मावशी

"हो वैताग आला आहे",.. काव्या

"काय करायच त्याच आता? ",.. मावशी

" हो ना मावशी मला नाही रहायच इथे, उद्या तो शशी येईल भेटायला परत त्याने काही केल तर मला",.. काव्या.

"आज काही केल का त्याने",.. मावशी.

"हो म्हणजे हात हातात घेतला, मला नाही आवडत तो",.. काव्या.

"घाबरू नको, प्रतिकार कर तू तुझ आयुष्य नीट करू शकते, स्वतः साठी उभ रहा",.. मावशी.

"काय करू? पण मी तोच विचार करत होती",.. काव्या.

" तु कमजोर नाहीस तुझ आयुष्य तु नीट कर, स्वतः निर्णय घ्यायला शिक ",.. मावशी तिला समजवत होत्या,

काव्या विचार करत होती. मी आता प्रयत्न करणार स्वतः साठी लढाव लागेल, पुरावे गोळा करू आपण शशी आणी वहिनी कसे वागतात त्याचे,

काव्यांनी बऱ्याच वेळ अभ्यास केला.

दुसर्‍या दिवशी कॉलेजला सुट्टी होती सकाळी सुद्धा ती बराच वेळ तिच्या रूम मधनं बाहेर आली नाही, नंतर नाश्ता करून परत अभ्यासाला बसली ती, आता तिला खाली जायची ही भीती वाटत होती, ना जाणो वहिनीने शशीला बोलवून ठेवल असेल तर,

थोड्या वेळाने वहिनी वरती आली,.. "काय चाललय आज काव्या? एकदम गप्प गप्प, काय म्हटला काल शशी?",

"वहिनी माझी परिक्षा आहे, मला जरा अभ्यास करू दे, सारख सारख तेच बोलू नको, समजल ना",.. काव्या.

"काव्या तुला समजत ना काय बोलते तु ते? , आणि कोणाशी बोलते आहेस हे अस उद्धट सारख? ",.. सुरभी

"हो समजत आहे मला, तुझ्याशी बोलते आहे मी वहिनी, या आधी करायला हव होत मी हे, या पुढे माझ्या आयुष्यात उगीच कारण नसताना ढवळाढवळ करायची नाही, जा इथून आता मला अभ्यास करू दे ",.. काव्या.

" बापरे बरच बोलता येत तुला काव्या, शशीला सांगावं लागेल",.. सुरभी.

" सांग काय करायचं ते कर, मी सुद्धा काही कमी नाही, आता तुम्हा दोघांना पुरून उरेल ",.. काव्या.

सुरभी रूमच्या बाहेर आली ती विचार करत होती काय झालं आहे काव्याला? एकदमच चिडली आहे ती, काल शशीने परत काही केलं का तिला? त्याला विचारावं लागेल तिने शशीला फोन लावला,.." काय झालं शशी काल इकडे? काव्या खुप चिडली आहे",

" काहीच नाही मी फक्त तिला बोललो लग्नाला होकार दे, शांत होती ती मी जे म्हणेल ते ऐकल तिने, आता नेहमी भेटणार मी तिला, बोलत राहणार तिच्याशी",.. शशी.

"ठीक आहे मग परीक्षेच टेंशन असेल जावु दे",. सुरभी.

"तुला काही बोलली का ती? ",.. शशी.

" नाही मला कशाला बोलेल ती, चांगली वागते ",.. सुरभी.

" ताई मी ठेवतो फोन थोड काम आहे ",.. शशी.

हो ठीक आहे.. सुरभी विचार करत होती, एक तर नीट वागतो आहे शशी मी काही सांगितल तर उगीच काव्याला काही करायचा, याला शांत राहू देवू जरा.
....

सोहम ऑफिसमध्ये आला, बर्‍याच अपॉइंटमेंट होत्या आज, पण त्यात एक महत्त्वाची अपॉइंटमेंट होती अभिजीत पाटील याची, काल रात्री भेटला हा आज परत का येतो आहे ऑफिस मधे? , नक्की निधी गोळा करायला येत असेल हा, सोहम विचार करत होता,

लहानपणीचा मित्र होता तो , कॉलेज मध्ये सोबत होते ते दोघ, येत असेल सहज भेटायला , राजकारणी घरातील आहे तो , कामाला अतिशय धडाडीचा तरी वागायला शांत म्हणून त्याची ओळख होती, सोहम काही कामासाठी केबिन बाहेर आला, बाहेर खूप गर्दी होती, चार पाच पांढर्‍या गाड्या एका रांगेत उभ्या होत्या, बरेच मुल तिथे उभे होते,

"काय चाललं आहे हे?, एवढे लोक काय करता आहेत ऑफिस मधे? " , सोहम विचारात होता,

"ते अभिजीत साहेब आले आहेत , त्यांचे लोक आहेत हे" ,.. वॉचमन.

"कुठे आहे तो?" ,.. सोहम.

" ते काय गार्डन मधे फोन वर बोलता आहेत" ,.. वॉचमन.

सोहम बघत होता, अभिजीत बागेत फिरत फोन वर ओरडून बोलत होता, त्याचे असिस्टंट तो काय सांगतो म्हणून आजूबाजूला होते, बाकीच्या लोकांना काय कराव माहिती नव्हत म्हणून ते नुसते उभे होते.

" हे बघा इथे गर्दी करू नका, ज्यांच काम नाही त्यांनी बाजूला उभ रहा", ..सोहम.

जरा वेळाने अभिजीत त्याला भेटायला आला,

"काय नाटक चालु आहेत तुझे अभिजीत? एवढे लोक घेवून का फिरतो तू? ",..सोहम.

"नाटकं म्हणजे काय? ते माझे लोक आहेत माझे कार्यकर्ते, काम असतात आम्हाला ",..अभिजीत.

"उगीच गोंधळ घालता तुम्ही लोक गर्दी करून, आम्ही पण काम करतो, साधा आवजही होत नाही", ..सोहम.

"समजल किती बोलणार आहेस मला", ..अभिजीत.

"बोल काय म्हणणं आहे तुझ अभिजीत, काय सुरू आहे, एकदम निवडणूकीला उभ आहेस का तू? ",..सोहम.

"नाही माझा लहान भाऊ आदेश उभा आहे निवडणूकीला ",..अभिजीत.

"तु काय करतोस सध्या? ",.. सोहम.

"मी फॅक्टरी सांभाळतो त्याला मदत करतो",.. अभिजीत.

दोघ छान बोलत होते.

"इलेक्शन साठी मदत हवी आहे तुझी" ,.. अभिजीत.

"कशाला? तुझी प्रॉपर्टी, घरदार बँक बॅलन्स एवढ्या फॅक्टरी काय वरती घेवून जाणार का ते वापर आधी",.. सोहम.

"पक्षा साठी म्हणतोय मी, पक्ष मदत करेल तुला, काही प्रोब्लेम येणार नाही ",..अभिजीत.

"ठीक आहे पण त्याने आमचा काय फायदा होणार?, एक तर तुम्ही लोकं बाजूच्या गावातले तसा विशेष संबंध नाही आपला ",.. सोहम.

" बापरे सोहम तू एकदमच बिझनेस मॅन झाला आहे प्रत्येक गोष्टीत फायदा बघतो ",..अभिजीत.

"अरे मग असंच करावं लागतं, बोल ना तुला मदत केली तर तू आम्हाला काय मदत करणार",..सोहम.

"तु म्हणशील ते ,आमच्या खूप ओळखी आहेत पुढे जाऊन आपल्याला ते शॉपिंग सेंटरच प्रोजेक्ट पण करायचा आहे ना ते तुमच्या टेंडर कामात मी मदत करू शकतो ",..अभिजीत.

" ते तर आम्हालाच मिळतं, कारण या एरियात आमचीच एक मोठी चांगली कंपनी आहे ",..सोहम.

" दळणवळण इतर गोष्टीचा मी मदत करू शकतो, युनियन लागू देणार नाही कंपनीत, वरपर्यंत ओळख आहे माझी इंटरनॅशनल काम करून देईल ",... अभिजित.

" किती पर्यंत मदत हवी आहे तुला? काय म्हणणं आहे तुझ",.. सोहम.

" तु बोल, श्रीमंत माणस तुम्ही ",.. अभिजीत.

" हो तुझ्यासाठी काम करतो मी, थांब जरा पप्पांशी बोलावं लागेल मला थोडसं ",.. सोहम.

" ठीक आहे कुठे आहे त्यांची केबिन",.. अभिजीत.

" शांततेत घे जरा, तु इथे बस अभिजीत, मी जरा पाच मिनिटात बोलून येतो त्यांच्याशी",... सोहमने फोन हातात घेतला काका आत मधे चहा पाठवा आणि बाहेर अभिजीत साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांना ही चहा पाणी करा बसायला खुर्ची द्या,

हो साहेब.

सोहम आत मध्ये गेला, तो सुरेश रावांशी बोलत होता,.." तो अभिजीत मागे लागला आहे, पक्ष कार्यात निधी द्या म्हणतोय , आता इथे आला आहे तो, किती पर्यंत मदत करता येईल आपल्याला त्याला",

"त्याला चार पाच कोटीची मदत देऊन टाकू, पुढारी लोक ते त्यांच्याशी पंगा घेऊन चालणार नाही, तुझा मित्र आहे ना तो" ,... सुरेश राव,

"ठीक आहे त्याला आत घेऊन येतो, तुम्ही द्या स्वतः त्याला चेक",.. सोहम.

अभिजीत सोहम आता आले, त्याने सुरेश रावांच्या पाया पडल्या, तो बराच वेळ त्यांच्याशी बोलत होता, नंतर चेक घेवुन तो बाहेर आला.

" अजून काय म्हणतो सोहम? लग्न झालं तुझ अस समजल आम्हाला बोलवलं नाही, या एकदा जोडीने आमच्या कडे",.. अभिजीत.

"हो येइन मी, मागच्या वर्षी झाल माझ लग्न ",.. सोहम.

" लव मॅरेज का? ",.. अभिजीत.

"नाही प्रॉपर ठरवून झाल",... सोहम.

"तुझ झाल का लग्न? ",..

"आम्हाला कोण देत पोरगी",.. अभिजीत.

"एवढा साधा आहे का तु? ",.. सोहम हसत होता .

" अरे खर, अजुन कशात काही नाही, साधी गर्ल फ्रेंड ही नाही मला ",.. अभिजीत.

" होईल लवकर काही तरी, मोस्ट एलीजेबल बॅचलर आहे बाबा तू, गावातील लोकांच्या नजरा असतिल तुझ्या वर ",.. सोहम.

" असच होवु दे",.. अभिजीत.

" घाई झाली का? ",.. सोहम.

हो... दोघ हसत होते, ठरेल लवकर आता,

" चल मी निघतो", ... अभिजीत फॅक्टरीत आला, थोडा बिझी होता तो, मॅनेजर कदम आत आले , पेपर वर सह्या घेवून गेले,.." आदेश कुठे आहे?, त्याला आत पाठवा",

" ते पार्टी ऑफिस मधे गेले आहेत ",.. कदम.

अभिजितने चेक नीट बॅग मधे ठेवला, बर झाल काल भेटला तो सोहम, लगेच आज मदत घेतली त्याची, थोड काम होत ते झाल, पर्सनल असिस्टंट माया आत आली काय काय आहे मीटिंग आज, तिने माहिती दिली, चार वाजता पासून सुरू होणार आहेत मीटिंग, मी घरी लंचला जातो मग,

अभिजीत निघाला, आशा ताईंचा फोन आला.. कुठे आहेस?

"येतो आई घरी रस्त्यात आहे" ,.. अभिजीत.

"आदेश कुठे आहे? तो येतो का?",.. आशा ताई.

" माझ्या सोबत नाही तो, तिकडे पार्टी ऑफिस मध्ये आहे करतो त्याला फोन" ,.. अभिजीत.

अभिजीतने आदेशला फोन लावला,

"बोल दादा",.. आदेश.

"घरी येतोस ना तू जेवायला",.. अभिजीत.

"हो आलोच",.. आदेश मीटिंग मधुन उठला,

"काय आदेश भाऊ कुठे एवढ्या घाईत ",.. मंगेश.

" घरी आणखी कुठे, अभिजीत दादाचा फोन होता घरी बोलवलं ",.. आदेश.

" तू त्याला एवढ का घाबरतो किती साधा आहे तो",.. मंगेश.

"अरे दादा आहे मोठा" ,.. आदेश.

मोठ्या वाडाच्या परिसरात अभिजीतची गाडी आली, मोठ गेट वॉचमनने उघडल, अभिजित आत येवून फ्रेश व्हायला निघून गेला,

आदेश घरी आला, अभिजीत फ्रेश होवुन आला, आशा ताई आजी होत्या हजर, बाबा प्रतापराव रूम मध्ये होते, ते बाहेर येवून बसले, आता हल्ली ते दोन तीन तास ऑफिसला जावून यायचे, दुपार नंतर घरी असायचे, बिझनेस बद्दल खूप नॉलेज होत त्यांना, पूर्वी सारख काम होत नव्हत त्यांच्या कडुन, आता हल्ली फक्त सल्ला द्यायच काम करायचे ते , पूर्वी पासून राजकारणात सक्रिय होते ते, त्यात त्यांना इंट्रेस्ट होता, छोट्या मोठ्या निवडणूक त्यांनी लढवल्या होत्या, अजूनही कधी कधी पार्टी ऑफिस मधे जावुन बसतात ते,

घरचा कारभार मोठा प्रतापराव आदेश किती करणार म्हणुन अभिजीतला फॉरेन हून बोलावून घेतल, आदेश त्यांच्या सारख डॅशिंग होता, अभिजीत शांत होता तो आदेशला मदत करायचा, दोन तीन फॅक्टरीच काम तोच करायचा, अतिशय हुशार होता तो, एवढ असून आदेश अभिजीत दादाला घाबरून होता, त्याचा फोन आला म्हणजे हातातला काम सोडून पळत यायचा तो, दोघ भावांच एकमेकांवर खुप प्रेम होत.

चला जेवायला बसा, बाबा येवून बसले, अभिजित आदेश समोर बसले होते, आशा ताई आजी बाजूला बसल्या होत्या मदतनीस वाढत होते त्यांच्या घरचा नियम होता शक्य होईल तेव्हा ते सगळे एकत्र जेवत होते,

ऑफिस इलेक्शनच्या गप्पा सुरू होत्या,.. "कुठे पर्यंत आला प्रचार?",

"सुरू आहे दादा" ,.. आदेश.

"ऑफिस कडे लक्ष देत जा",.. प्रताप राव.

हो बाबा,

"निधी मिळाला का",.. आदेश.

"हो",.. अभिजीत.

"कोणा कडुन",.. आदेश.

"सोहम देशमुख कडुन",.. अभिजीत.

"ते देशमुख इंडस्ट्रीज वाले का?",.. आदेश.

हो

" तो तुझा मित्र आहे ना दादा ",.. आदेश.

" हो आम्ही सोबत होतो कॉलेजला" ,.. अभिजीत.

" किती मिळाला? ",.. अभिजीतने चेक दाखवला आदेश खुश होता,

हे इलेक्शन खूप महत्त्वाच होत आदेश साठी, अजून महिना होता, त्यामुळे काम सावकाश सुरू होते,

"पण तुम्ही लोक दुसर्‍या कडुन निधी का घेतात? ",.. आजी.

"अस असत काम आजी, आपण त्यांच्या कडुन निधी घ्यायचा, त्यांच काम आपण करायच म्हणजे आपली प्रसिद्धी होते, नाव होत, आपल्या ओळखीचा त्यांना उपयोग करून द्यायचा, त्यांचे पैसे आपण वापरायचे",.. आदेश.

"आपल्या कडे आहेत ना पण पैसे",.. आजी.

सगळे आजी कडे बघत होते,

" दे ना मग आजी प्लीज मला, किती आहेत ते सांग",.. आदेश मागे लागला सगळे हसत होते,

" मी देणार नाही ते पैसे तुझ्या आईचे आणि माझे आहेत",.. आजी.

" आजी प्लीज, किती आहेत ते तरी सांग",.. आदेश.

नाही.

" आदेश आजीला त्रास देवु नको" ,.. अभिजीत.

आजी ही हसत होत्या.

जेवण करून अभिजीत ऑफिस मधे निघुन गेला, आदेश ही कामाला लागला.


🎭 Series Post

View all