तुझी साथ हवी मला... भाग 5

दुसऱ्या दिवशी काव्या कॉलेजला गेली, रघु होता सोबत म्हणून काव्या प्रीती खुश होत्या, छान काम केलं हे सोहम दादाने, किती बर वाटत आहे.



तुझी साथ हवी मला... भाग 5

©️®️शिल्पा सुतार
.........

सुरभीने फोन केला

"आता काय आहे ताई? ",.. शशी.

"तुला घरी बोलवलं आहे आईंनी",.. सुरभी.

" मला काम आहेत थोडी, मी येणार नाही ",.. शशी वैतागला होता .

" काव्या विषयी बोलायच आहे महत्वाच आहे हे ये लगेच ",.. सुरभी.

" येतो पंधरा मिनिटात, काय एक एक ",.. शशी आला, समोर बसला होता.

" काय सांगितलं होतं तुला शशी तुला काव्याचं मन जिंकायचं आहे",.. प्रमिला ताई.

" हे असे काम मला येत नाही येत नाही",.. शशी.

" म्हणजे काय? नुसतेच पैसे हवे का मग तुला? हे काय आहे सुरभी? ठीक आहे तुम्हाला बहिण-भावांना नको असेल काव्या सोबत लग्न तर अजून एक माझा दुसरा मावस भाऊ आहे त्याला तयार करते मी, त्याचा मुलगा चांगला आहे शशीपेक्षा",.. प्रमिला ताई.

"नाही थांबा आई तुम्ही, मी समजावते शशीला",.. सुरभी.

"लवकर करा जे करायच ते ",.. प्रमिला ताई.

" शशी काय करतो आहेस असं? स्वतःच्या फायद्यासाठी थोडं झुकतं माप घेता येत नाही का तुला? ",.. सुरभी.

" झुकत माप घेऊ म्हणजे काय करू मी? ",.. शशी.

" हे असं आहे शशीचं, अजिबात नीट वागत नाही, परवा तु काव्याचा हातही पिरगळला होता, आज विचारत होते ना बाबा, समजल असत त्यांना म्हणजे? काय चाललं आहे हे शशी",.. प्रमिला ताई.

" ती काव्या माझ्याशी उद्धट सारखी वागते ",.. शशी.

"वागू दे ना, तू प्रेमाने वाग तिच्याशी थोडे दिवसाचा प्रश्न आहे, एकदा जर ती प्रेमाने तुझ्या ताब्यात आली तर आयुष्यभर तुझ्या सोबत राहील",.. सुरभी.

हो ना.. प्रमिला ताई.

" ठीक आहे मी प्रयत्न करेल",.. शशीच्या फोनवर फोन येत होता, मी येतो, तो गाडीत जाऊन बसला,

सुरभी त्याच्या मागे पळाली बोलायला,.. " समजलं ना शशी आई चिडल्या आहेत ते व्यवस्थित वाग जरा आता",..

" एवढं काही करायची टेन्शन घ्यायची गरज नाही ताई",.. शशी.

म्हणजे?

" मला तू परमिशन दे मी काव्याला उचलतो इथून, लग्न करेल एक रात्र तिच्यासोबत थांबेल, तिला मी काही केलं नाही तरी आपोआपच तुझे सासू-सासरे आम्हाला दोघांना पूजेला बसवतील ",.. शशी.

" तू असं काहीही करणार नाही शशी, हे जे तुझ्या डोक्यात सुरू आहे ना ते काढून टाक, तुला माहिती का आज बॉडी गार्ड नेमला तिच्या साठी सोहमने",.. सुरभी.

"कोण आहे तो? ",.. शशी.

रघु..

" काय एक एक आणि तुझ्या सासुबाई जास्त करतात, आपल्या दोघांना रस्त्यातून बाजुला करायला बघता आहेत त्या ताई, विचार कर आपण आपल प्लॅन केला पाहिजे, मी सांगतो ते ऐक, जालीम उपाय आहे हा ताई, नुसतं गोड बोलत काव्याच्या मागे फिरण्यापेक्षा एक घाव दोन तुकडे, दोन दिवसात बायको होईल ती माझी ",.. शशी हसत होता.

सुरभी विचार करत होती की जर काही नाही झालं ह्या लोकांनी आपलं नाही ऐकलं तर शशीच हे ऐकायला काही हरकत नाही, आता काही बोलायला नको पण, थोड शशीला समजुतीने घ्यायला सांगु,

काव्या कॉलेजला आली, गाडीत रघु पुढे बसला होता, किती बर वाटत होत रघु सोबत होता तर, कॉलेज मधे राहुल भेटला, तिने त्याला वही दिली, दोघ बराच वेळ बोलत होते,

" चहा घ्यायचा का काव्या?" ,.. राहुल

हो,.. प्रिती काव्या राहुल अजून एक दोन मुल मुली कॅन्टीन मधे गेले, किती चांगला आहे हा राहुल, अभ्यासातही हुशार आहे.

त्यांच्या वर शशीचे लोक लक्ष देवून होते.

"शशी काव्या आज कॉलेजमध्ये एका मुलाशी बोलत होती, काहीतरी दिलं तिने त्या मुलाला",.. शरद.

"कोण आहे तो मुलगा त्याची पूर्ण हिस्ट्री मला संध्याकाळपर्यंत हवी आहे",.. शशीने फोन ठेवला, तो कामात बिझी होता, कोण असेल तो मुलगा? सहज बोलतो का तो काव्याशी? की काही असेल त्यांच्यात? , मी सोडणार नाही त्याला.

शरदचा फोन आला,.." काव्याच्या वर्गातला मुलगा आहे तो, वही पुस्तक मागतो, साधा आहे, आज चहा घ्यायला गेली होती काव्या त्याच्या सोबत" ,

"बंदोबस्त करा त्या मुलाचा" ,.. शशी.

कॉलेज संपलं काव्या प्रीती बाहेर आल्या, राहुल त्यांच्यासोबत होता, त्याने काव्याची वही वापस केली, तिघं पाच मिनिट बोलत होते, शशीच्या माणसाने त्यांचे फोटो काढून घेतले.

शशी ऑफिसमध्ये बसलेला होता, त्याच्या मोबाईलवर तो या तिघांचे फोटो बघत होता, फोटो बघता बघता तो स्क्रीन प्रीतीवर झूम करत होता, छान आहे ही काव्याची मैत्रीण, जर माझं काव्याशी लग्न झालं तर ही घरी येईल का? काव्या मुळे हिच्याशी ओळख होवु शकते माझी.

"काय बघतो आहे शशी",.. त्याचा मित्र मोहन समोर येऊन बसला.

शशीने त्याला फोटो दाखवला.

" कोण आहे हा मुलगा?",.. मोहन.

"काव्याच्या वर्गातला मुलगा आहे राहुल, त्याला जरा समज द्यावी लागेल चांगल्या प्रकारे, काव्यापासून लांब थांब म्हणा, आणि ही जी प्रीती आहे तिची माहिती काढा",.. शशी.

"आता कशाला तिची माहिती हवी आहे तुला? ",.. मोहन.

"भारी आहे ही प्रीती बघ एकदा ",.. शशी.

"पण लग्न तुला काव्याशी करायचं आहे ना?",.. मोहन.

"हो मग काय झालं? ",.. शशी.

"कठीण आहे तुझं शशी, चांगली आहे काव्या, किती छान आहे, सुंदर आहे, साधी आहे",.. मोहन.

"तुला आवडते की काय काव्या? होऊ दे माझं लग्न, देतो तुला",... शशी.

मोहनने कानावर हात ठेवला, काय बोलतो आहेस तू शशी? तुला तरी समजतं का?... मोहन रागाने बाहेर निघून गेला, शशी हसत होता , मोहन जरी शशीचा मित्र असला तरी तो प्रामाणिक मुलगा होता, त्याच्या सोबत कामाला होता, तो नेहमी शशीला रागवत होता काही झालं की, चुकीचा मार्ग बंद करायला सांगत होता.

राहुल घरी येत होता, त्याला शशीच्या मित्रांनी अडवल,.. "काय सुरू आहे सध्या राहुल?",

" कोण आहात तुम्ही? मी ओळखतो का तुम्हाला?",.. राहुल.

"नाही तू नसेल ओळखत पण मी ओळखतो तुला, सध्या खूपच काव्या मॅडमशी बोलतो असतोस तू, काय काम असतं तुला तिच्याशी?",.. शरद.

"काही नाही आम्ही एका वर्गात आहोत, अभ्यास बद्दल बोलतो ",.. राहुल.

" बस लिमिट मधे राहायच राहुल, तुला माहिती आहे ना काव्या मॅडमच लग्न जमल आहे शशी साहेबां सोबत, मोठ्या घरचे लोक ते, अजिबात मधे मधे करायच नाही ",.. शरद.

राहुल घाबरला होता,.." मी फक्त वहि घेतली होती काव्याची",

" कशाला? वर्गात बाकीचे लोक नाही का? त्यांनी कोणीच लिहिलं नसेल का? यापुढे वही नाही.. पेन नाही.. पेन्सिल नाही.. काही घ्यायच नाही, काव्या मॅडम पासून लांब थांबायचं, नाहीतर तुझ्या बरोबर काय होईल सांगता येत नाही, बघायचं आहे का ट्रेलर, डेमो देतो ",.. शरदने सटकन राहुलच्या थोबाडीत मारली, साधा भोळा राहुल एकदम घाबरून गेला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पटकन त्याचा सामान घेऊन तिथून निघून गेला, काव्या खूप डेंजर लोकांच्या हातात सापडली आहे याची त्याला कल्पना आली.

त्या लोकांनी शशीला फोन करून राहुलचा बंदोबस्त केला असं सांगितलं, शशीने हसत फोन ठेवला, किती जरी इकडे तिकडे केलं तरी शेवटी काव्याला माझ्यासोबतच राहायचं आहे हे समजत नाही त्या लोकांना, तिला मी सोडणार नाही..."अरे त्या प्रीतीची माहिती काढली का कोणी?",..

करतो चौकशी ...कोणीतरी आतुन बोलल.

सुरेशराव संध्याकाळी ऑफिस मधून घरी आले ते त्यांच्या रूममध्ये आवरत होते, प्रमिलाताई बाजूला उभ्या होत्या,.. "काय केलं मग आज दिवसभर? ",

"काही नाही हो, हे मुलं ऐकत नाहीत, नुसत आपल्या लग्नाच्या एनिवर्सरीचा कार्यक्रम ठरवत आहेत, खूपच उत्साह आहे त्यांना, त्यांचा उत्साह मोडवत नाही, मग मुलांच्या आनंदात सामील झाली मी जरा",.. मुद्दामच प्रमिला ताई सुरेश रावां समोर अतिशय चांगलं वागत होत्या,

सुरेश रावही खुश होते, खूपच छान वाटत होतं त्यांना, प्रमिलाताई खूप सांभाळून घेत होत्या, सावत्र मुलं असून सुद्धा सख्या मुलांपेक्षा जास्त करत होत्या त्या, असं त्यांना वाटत होतं.

" अहो मी काय म्हणते सुरभी म्हणत होती की शशीचं स्थळ काव्यासाठी चांगलं आहे" ,.. प्रमिला ताई.

" पण सोहम आणि काव्याला हे स्थळ पसंत नाही ना",.. सुरेश राव.

" सोहमच नाही काही, काव्याच नकार देते आहे, ती नकार देते म्हणून तिचा भाऊ तिला सपोर्ट करतो, पण मी म्हणते शशी मध्ये नाकारण्यासारखं काय आहे? किती बिझी असतो तो आता हल्ली, वडिलांना मदत करतो, मागे पण तुम्ही त्याला मदत देऊ केली तर घेतली नाही इतका स्वाभिमानी आहे तो, त्याच्याशी लग्न झाल तर मुलगी आपली डोळ्यासमोर राहील, त्याची बहीण सुरभी या घरात आहे तर ते लोक काव्याशी चांगलं वागतील, जरा विचार करा ना, काव्याशी बोलून बघा एकदा",.. प्रमिला ताई.

सुरेशराव विचार करत होते,.." प्रमिलाताई बरोबर बोलत आहेत, जेव्हा जेव्हा त्यांनी शशीला बघितलं तेव्हा तो चांगलाच वाटला, नेहमी बिझी असतो, खरच घेतले नव्हते त्यांने पैसे, जसा त्यांचा बिझनेस आहे तसा करतो, शेवटी हे जे सगळं आहे ते काव्या आणि सोहमचच आहे, खरंच पोरगी डोळ्यासमोर राहील नाहीतर कुठे लांब दिले तर येणारही नाही महिने महिने",

प्रमिलाताई खुश होत्या त्या जे बोलल्या त्याचा सुरेश रावांवर थोडा परिणाम होत होता, या सगळ्या गोष्टीचा त्यांनाच फायदा होणार होता, शेवटी सुरभी आणि शशी त्यांचे मोहरे होते.

जेवायच्या वेळी सगळे खाली आले. सुरेश राव काव्याशी छान बोलत होते, त्यांनी तेव्हा विषय काढला नाही, बोलू उद्या.

सुरभी प्रमिलाताईंकडे बघत होती, त्यांनी तिच्याकडे हसून बघितलं, तिला समजले की या बोलल्या आहेत बाबांशी, तिला आता समाधान वाटत होतं.

सोहम सुरेशराव ऑफिसच्या गप्पा मारत होते, सगळे बाकीचे ऐकत होते,

"उद्या आपण खरेदीला जायचं आहे आई-बाबा ",.. सुरभी.

" कशाला आता खरेदी",.. प्रमिला ताई.

"तुम्हाला एनिवर्सरी साठी घालायला कपडे घ्यायला लागतील",.. सुरभी.

"आहेत भरपूर कपडे",.. प्रमिला ताई.

हो ना... सुरेश राव.

"नाही हा आई-बाबा यावे लागेल तुम्हाला ",.. सुरभी.

काव्या सगळेच आग्रह करायला लागले, दुसऱ्या दिवशी खरेदीला जायचं ठरलं, रात्री काव्या रूम मध्ये अभ्यास करत होती, दोन-तीनदा तीने बघितलं राहुल ऑनलाईन नव्हता, त्याला उद्या वही हवी आहे का? हे ती विचारणार होती, जाऊदे घेऊन जाऊ वही, दिसला तो तर देऊन टाकू,

सुरभीच्या माहेरी शशी आई बाबा जेवायला बसले होते, शशीच्या फोनवर मेसेज आला सुरभीचा, मेसेज बघून त्याला हसू आलं,.. "इकडे आई बोलल्या आहेत बाबांशी काव्याबाबत",

"मग पुढे काय झाल, एनिवर्सरी पार्टीत तुम्ही लोक काही अनाउन्समेंट करता आहात का?",.. शशीने मेसेज केला.

" नाही माहिती एवढं मी आता उद्या व्यवस्थित बोलेल आईशी तेव्हा समजेल",.. सुरभी.

" जरा आटपायला घ्या आता",.. शशी.

" उतावीळ झाला आहेस का तू लग्नासाठी? काव्या फारच आवडते वाटतं तुला? ",.. सुरभी.

" लग्नासाठी नाही मला फॅक्टरी टाकायची आहे आणि काव्या बाबतीत माझ्याशी गंमत करायची नाही ताई, तुला माहिती आहे मी तिच्याशी का लग्न करतो आहे",.. शशी.

" अरे पण जरा नीट जरा प्रेमाने राहिला तर काही बिघडेल का ",.. सुरभी.

" मला तिच्याकडे बघून अशी काही प्रेमाची फिलिंग येत नाही त्याला मी काय करू ",.. शशी.

" शशी जेवणाकडे लक्ष दे ",.. सविता ताई.

"ठीक आहे ताई मी बोलतो तुझ्याशी नंतर आई रागवते आहे इकडे",.. शशी.
....

दुसऱ्या दिवशी काव्या कॉलेजला गेली, रघु होता सोबत म्हणून काव्या प्रीती खुश होत्या, छान काम केलं हे सोहम दादाने, किती बर वाटत आहे.

हो ना... काव्या.

दोघी कॉलेज मध्ये आल्या, काव्याने किती बघितलं राहुल कुठे आहे , सर आल्यानंतर राहुल आत मध्ये आला, तो अतिशय लांब काव्यापासून बसला होता, लेक्चर संपल्यानंतर काव्या त्याच्याशी बोलायला गेली,.." तुला वही हवी होती ना राहुल ही घे ",

" नको माझं झाला आहे लिहून काव्या थँक्यू",.. राहुल.

"कोणाची वही मिळाली तुला राहुल ? कालपर्यंत नव्हती ना मिळाली",.. काव्या.

"माझ्या मित्रांनी दिली रात्रीतुनं झाल लिहून",.. राहुल.

प्रीती बाजूला उभी होती,.. "काय झालं याला?",

"माहिती नाही ग जाऊदे नसेल हवी वही, आई-बाबांची ऍनिव्हर्सरीची पार्टी आहे तू येशील का प्रीती",.. काव्या.

"नाही ग काव्या एकतर तुमच्याकडे कार्यक्रमाला खूप उशीर होतो आणि तो शशी येईल ना तिकडे मला त्याची भीती वाटते ",.. प्रिति.

शशीची आठवण करून काव्याचा चेहरा पांढरा पडला.. "हो ग त्याचा विचारच केला नव्हता मी, आज बोलते मी दादाशी",
....

शशी समोर प्रीतीची माहिती होती, साधी मध्यमवर्गीय घरातली मुलगी होती ती, घरचे तिच्या लग्नाचा विचार करत होते, एक दोन स्थळ येऊन गेले होते,

" काय चाललं आहे हे शशी? तू आता ह्या प्रीतीचा गोंधळ मध्ये घालू नको, जर काही करता काही झालं तर तुझं काव्याशी लग्न कॅन्सल होईल, कशाला त्या प्रीतीसाठी गडबड गोंधळ करतो, एक तर ती काव्याची बेस्ट फ्रेंड आहे, ती सांगून देईल तिला सगळं, तुला काय महत्त्वाचा आहे काव्याशी लग्न की प्रीती ",.. मोहन.

" काव्या.. ठीक आहे सोडला प्रीतीचा विषय ",.. शशी अजूनही तिच्या फोटोकडे बघत होता.

🎭 Series Post

View all