तुझी साथ हवी मला... भाग 3

अग पण त्यात काव्याचं काय म्हणणं आहे ते पण महत्त्वाचं आहे ना, सगळ आपल्या मनाप्रमाणे होणार आहे का


तुझी साथ हवी मला... भाग 3

©️®️शिल्पा सुतार
.........

काव्या आत निघून गेली, तीने रूमचा दरवाजा बंद केला, काॅटवर पडुन ती रडत होती, थोड्या वेळाने तिने हाताला क्रीम लावल, खुप हात दुखत होता तिचा,

" बघितल का ताई कशी बोलते ही काव्या , नेहमी उलट सुलट, एवढी अकड आहे हिला, आपल्याला कमी समजते, पण या वेळी तिची गाठ माझ्याशी आहे ",.. शशी,

सुरभीने शशीचा हात दाबला,.. "मूर्ख आहेस का तू शशी, गप्प बस जरा, का मारतो त्या काव्याला, लग्नानंतर काय करशील तू, एवढा काय राग येतो तुला? जरा शांततेत घेत जा, स्वतः साठी तरी नमतं घेत जा जरा ",

"ताई तू बघितलं ना.... ",.. शशी

"गप्प बस काही बोलू नको, सोहम आत येईल , ती सांगेन सगळ्यांना, आणि तू दारु पिऊन आला का आज , मी नाही सांगितल होत ना तुला, काव्याला समजल का तु पिऊन आला आहे ते ",.. सुरभी

"समजल तर समजल मी नाही घाबरत तिला आणि आता मला काय माहिती आज इकडे यायच आहे ते, ताई पैसे दे थोडे ",.. शशी

"हो देते उद्या, मी सांगते ते ऐक आधी, शांत हो जरा, त्या काव्याची व्यवस्थित समजून का काढत नाही तु",.. सुरभी.

" समजुत काढू म्हणजे काय करू? , मला नाही येत ते मुळुमुळु वागता",.. शशी

"नीट वाग तिच्याशी, प्रेमाने बोल, एखाद्या स्त्रीच मन जपणं तुला जमत नाही का? हे काय मी सांगायचं का तुला आता, तू या आधीच हे करायला पाहिजे होतं, या पुढे तिला मारल किंवा रडवल तर बघ",.. सुरभी.

" मला तिच्यापुढे पुढे करणं जमणार नाही ताई, किती बोर आहे ती काव्या",.. शशी.

" तुला इंटरेस्ट नाही का तिच्यात, जाऊ दे मग, मीच माझ्या बाजूने प्रयत्न करते आहे आणि तू मी सगळं ठरवलेला प्लॅन चौपट करतो ",.. सुरभी चिडली होती.

" असं काही नाही ताई मी मदत करायला तयार आहे, यापुढे शांततेत घेईन मी, नाही मारणार मी तिला, बस का?, या पेक्षा जास्त चांगल मला वागता येणार नाही, मी लग्न करणार आहे तिच्याशी ते केवळ तिच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी मुळे, तुलाही माहिती आहे हे, तू ही जिजाजींशी त्यासाठीच लग्न केलं आहे ना, या दोघं भाऊ बहिणीच्या नावावर करोडोची इस्टेट त्यांच्या आजोबांनी करून ठेवलेली आहे",.. शशी

" हळू बोल सोहम मध्ये येईल ",.. सुरभी

" मी जातो आता माझे मित्र वाट बघत असतील, आम्ही चांगले बसलो होतो हॉटेलमध्ये, तू मला हे काम दिलं हिला घरी आणून सोडायचं मी काही ड्रायव्हर आहे का हीचा ",.. शशी

" अरे मग तू जोपर्यंत तिच्या आजूबाजूला करणार नाही तोपर्यंत तिला कसा पसंत पडेल ",.. सुरभी

" नाही तरी तिला मी पसंत नाही ताई ",.. शशी

" नसु दे पसंत, लग्न करून घे तिच्याशी मग तू तुझं आयुष्य आनंदाने जगू शकतो, ही राहील घरी",.. सुरभी

" तेच करणार आहे मी, हिची मग्रुरी चांगली उतरवणार आहे ",.. शशी

सोहम आत मध्ये आला, शशी घरी निघून गेला,

" हा शशी काय करतो आहे इकडे? ",.. सोहम

"काय करतो म्हणजे?, तो काव्याला घ्यायला गेला होता",.. सुरभी

" कशाला? ऐवढे ड्रायवर कुठे गेले आपले? ",.. सोहम

" तुम्हा दोघा भावा बहिणींना शशीचा काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही मला",.. सुरभी

" मी तुला परत एकदा सांगतो सुरभी अजिबात तू शशी आणि काव्याचं लग्न जमवण्याची भानगड करू नको, हे बघ माझी बहीण एकदम साधी आणि शांत मुलगी आहे, शशी त्याच्या एकदम विरुद्ध आहे, तुला समजत नाही का सुरभी, मुलीचं लग्न करण्यासाठी जसं चांगला आणि व्यवस्थित मुलगा हवा तसे एकही गुण त्या शशी मध्ये नाहीत",.. सोहम

सोहम आत मध्ये चालला गेला, तो काव्याच्या रूममध्ये गेला, टकटक केली

" कोण? ",.. काव्या दचकली शशी नसेल ना. ती कपडे बदलून पुस्तक वाचत होती,

" मी काव्या सोहम",..

तिने दार उघडलं, सोहम दादाला बघून तिला एकदम भरून आलं होतं, वाटत होतं एकदम दादाला मिठी मारावी आणि त्याला सगळ सांगाव शशी आणि वहिनी बद्दल, नको पण उगीच भांडण मारामारी होतील, शशी डामरट आहे, त्याने दादाला काही केल तर,

तिचे डोळे रडल्यासारखे दिसत होते,..

" येऊ का दोन मिनिट काव्या",.. सोहम.

" ये ना दादा",.. काव्या.

" कशी झाली पार्टी ",. सोहम.

" छान होती पार्टी दादा",.. काव्या.

" काय झालं नेहमी सारखा उत्साह नाही तुझ्यात, नेहमी किती जास्त बोलते तु, तिकडे काय काय झालं ते सांगते, शशी काही बोलला का? ",.. सोहम.

" मला तुझ्याशी त्याच विषयावर बोलायचं आहे दादा",.. काव्या.

बोल ना

" मला माहिती आहे की वहिनी चांगली आहे पण ती सदोदित शशीच लग्न माझ्याशी ठरल पाहिजे यासाठी दबाव आणते आहे ते मला अजिबात आवडत नाही",.. काव्या.

" मलाही नाही आवडल आहे ते काव्या",.. सोहम.

" तू बोल ना दादा वहिनीशी तो शशी विचित्र मुलगा आहे",..काव्या.

" सांगितलं समजून बरेच वेळा तुझ्या वहिनीला ती ऐकतच नाही आता मी जरा ओरडूनच सांगतो तिला तेव्हा समजेल",.. सोहम.

" मी सांगितल तुला अस सांगू नको दादा नाही तर वाहिनी ओरडेल मला परत",.. काव्या.

हो..

" आई बाबा कधी येणार आहेत?",.. काव्या.

" ते उद्या येणार आहेत, त्यांची एनिवर्सरी आहे या आठवडय़ात, त्यासाठी आपण काय गिफ्ट घ्यायचं आहे",.. सोहम.

" हो काय घेऊया",.. काव्या.

" दोघां साठी कपल वॉच घ्यायचं का? ",.. सोहम.

" चालेल दादा ",.. काव्या.

"तू रडते का?",.. सोहम.

"नाही दादा दमली आहे मी",.. काव्या.

"झोपुन घे मग ",.. सोहम

एक दादा सोडला तर बाकी एकही लोक इथे चांगले नाहीत आणि तो शशी तर आता हल्ली अतिच करतो, आज त्याने मला विचित्र पद्धतीने हात लावला, मला इथे नाही राहायचं काय करू जाणार तरी कुठे आहे पण मी,

आई बाबा चांगले आहेत पण आई सुद्धा वहिनीची बाजू घेते, त्या लोकांना समजत नाही का माझं चांगलं वाईट, यापुढे शशी दिसला तर मी त्याच्याशी बोलणार नाही आणि त्याच्याशी लग्न तर मुळीच करणार नाही, त्याच्याशी लग्न झालं तर माझं काय होईल सांगता येत नाही, एक तर मलाच आत्महत्या करावी लागेल, नाहीतर तोच मला मारून टाकेल,

काहीतरी करायला हव, स्वतः चा बचाव स्वतः करावा लागेल, काव्याला झोप येतच नव्हती, खूपच विचार येत होते तिच्या मनात, काय आहे हे संकट असं विचित्र, कोणत्या मुहूर्तावर आम्हाला भेटले हे बहीण भाऊ काय माहिती.

काव्याचे आजी आजोबा खूप श्रीमंत इंडस्ट्रियलीस्ट होते, घरची शेती भरपूर, कसलीही कमी नव्हती घरात,
त्या दोघांचा सौरभ काव्या वर खूप जीव होता, त्यांनी जाता जाता सगळी प्रॉपर्टी सोहम काव्याच्या नावावर केली होती, सुरेश रावांच्या नावावर वेगळी प्रॉपर्टी होती, ते पण पूर्वीपासून मेहनती होते,

मुलांचे नावावर असलेली प्रॉपर्टी कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याच्या नावावर होणार नाही, एक तर ती सोहम आणि काव्याला मिळेल, नाहीतर ती एका अनाथाश्रमात जाईल अशी अट त्यांनी ठेवली होती, प्रॉपर्टीची अशी व्यवस्था त्या आजोबांनी करून ठेवली होती, त्यामुळे मुलांची सही करून कोणीही प्रॉपर्टी हस्तगत करू शकत नव्हतं, पैसे हवे असले तर फक्त सोहम आणि काव्याने दिले तरच मिळू शकत होते, त्यासाठी त्यांच्यासोबत राहणं गरजेचं होतं, त्यामुळे सुरभी तिचा भाऊ शशी सावत्र आई प्रमिला मामा संपत सगळे दोघ भाऊ बहिणीच्या मागे होते, ते त्रास देत होते त्यांना ,

दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या कॉलेजला जायला निघाली, ती नाश्ता साठी खाली आली, सोहम समोर बसलेला होता, मावशी बाजूला उभ्या होत्या, सुरभी आली, बरेच मदतनीस नाश्ता वाढत होते,

"काव्या हाताला काय झालं?",.. मावशी विचारात होत्या.

"कुठे काय",.. तिने हात लपवला, उगीच काही सांगितल तर शशी अजुन त्रास देईल मला,

"काव्या काय झालं हाताला दाखव" ,.. सोहम उठून जवळ आला.

"दादा काही नाही" ,.. काव्या घाबरली होती.

"नीट सांग काव्या, कुठे पडली का तु, पार्टीत काही झाल का, की शशी आहे या मागे ",.. सोहम.

काव्या सुरभी कडे बघत होती,

"हो शशी काही तरी बोलत होता काव्या सोबत हात धरून मी बघितल, मी येत होती खाली तेवढ्यात काव्या रूम मध्ये निघुन गेली ",.. मावशी.

"काय झाल काव्या? , सुरभी काय झाल काल? , कोणी सांगणार आहे का मला",.. सोहम.

दोघी गप्प.

" मावशी मला अस वाटतय यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, काव्या मी या पुढे बोलणार नाही तुझ्याशी",.. सोहम

" दादा थांब सॉरी... अस करु नकोस बोल माझ्याशी, सांगते मी, शशीने काल माझा हात पिरगळला संध्याकाळी",.. काव्या.

का?

" माहिती नाही, मला त्याच्या सोबत नाही राहायच दादा",. काव्या.

" तु मला का सांगत नव्हती हे? घाबरली का तु? ",.. सोहम सुरभी कडे रागाने बघत होता, काय आहे हे सुरभी? , काय सुरू आहे? , शशी का येतो इकडे आपल्याकडे? , त्याला काव्या पासून दूर रहायला सांग.

"आता मला काय माहिती यांच्यात काय झाल ते सोहम, काव्या बोल काय झालं नक्की ",.. सुरभी.

सुरभी काव्या कडे बघत होती ती थोडी घाबरली,.. "हो दादा वहिनीला नाही माहिती काही",

"ठीक आहे मी बोलतो आज शशी सोबत",.. सोहम.

" काव्या अग कपल मधे होतात असे वाद, मी बोलते शशी सोबत, सोहम तु दोघ दुसर टोक गाठु नकोस, प्रेमाने धरला असेल त्याने काव्याचा हात काय सांगाव",.. सुरभी

सोहम काव्य कडे बघत होता ती गडबडली.

" काहीही सुरभी एक तर काव्या शशी कपल नाहीत, काव्याला शशी सोबत रहायच नाही मी मागे पण सांगितल होत तुला बळजबरी नकोय काव्याबाबतीत, शशीला दोन शब्द सांग तु, त्रास देवु नका माझ्या बहिणीला ",.. सोहम

" हो तुम्ही पण शशीला समजून घ्या ना जरा, चांगला आहे तो, काव्य विचार कर त्याच्या, आपण शांततेत बोललो की समजून घेतो शशी",.. सुरभी

" मूर्खासारख काहीही बोलू नकोस सुरभी म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का काव्या त्याला काहीतरी बोलली म्हणून तो चिडला, मला काहीही ऐकायचं नाही काव्याच्या मागे मागे करायचं नाही, यापुढे जर तिला काही झालं तर मी शशीला सोडणार नाही",.. सोहम सुरभीला ओरडत होता,

तो फोन घेवून आत निघुन गेला त्याने तिथुन काव्या साठी बॉडी गार्ड साठी फोन केला, हो आत्ताच हवा आहे बॉडीगार्ड माझ्या बहिणीसाठी तो ऑफिसला जायची तयारी करत होता, रागाने सुरभीशी न बोलता ऑफिसला निघुन गेला.

काव्या निघाली, आज नक्की वहिनी माझ नाव शशीला सांगेल, बापरे काय होईल दादा ही चिडला आहे, रस्त्यातच प्रीती भेटली प्रीती गाडीत येऊन बसली.

"काल व्यवस्थित गेली ना ग तू घरी तो शशी कसला घाणेरडा आहे, कसा बघत होता तो" ,.. प्रिति

" हो ना तुझ्याकडे अर्धा वेळ त्या नंतर माझ्या कडे बघत होता तो, सॉरी प्रीती या पुढे मी तुला आमच्या सोबत यायचा आग्रह करणार नाही, माझ जे व्हायचं ते होवु दे या पुढे शशी असेल तर तु बाजुला निघुन जा",.. काव्या

" तु त्याच्या बंदोबस्त कर आधी, बापरे काय घाणेरडा मुलगा आहे तो दारू पिऊन आला होता, काही केल तर नाही ना त्याने तुला ",.. प्रीती

"प्रीती तुला माहिती आहे का काल त्याने माझा हात पिरगळला, घरी गेल्यावर पण वहिनी समोर त्याने परत माझा हात धरला होता, धमकी देत होता तो, मला भिती वाटते तो काही करणार तर नाही ना मला ",.. काव्या

" बापरे तुझा हात काळा निळा झाला आहे, तु दादाला सांग ना ",.. प्रीती

" समजल आज दादाला तो चिडला आहे ",.. काव्या.

" बरोबर आहे, का पण असं केलं त्याने ",.. प्रिति

" माहिती नाही ग खूप रागीट विचित्र आहे तो, ही वहिनी पण काय सारखं त्याला मला घ्यायला पाठवते, आई बाबा आल्यावर मी त्यांच्याशी शशी बद्दल बोलणार आहे ",.. काव्या

" हो एकदा नीट सांग तु तुझ्या घरच्यांना, शशी जे मागे मागे करतो ते बंद कर म्हणा",.. प्रिति

ऑफिसमध्ये गेल्यानंतर सोहमने शशीला फोन लावला शशीला वाटलंच नक्कीच काहीतरी झालं असेल घरी त्यांनी फोन उचलला

" शशी तुझी हिम्मत कशी झाली काव्याला हात लावायची",.. सोहम.

" काय झालं आहे जीजू? ",.. शशी.

" काव्याचा हात किती हिरवा निळा झाला आहे, तिचा हात का पिरगळला तु",.. सोहम.

"नाही मी तर फक्त प्रेमाने धरला होता, इतकी नाजूक आहे काव्या तीला लागलं असेल मला नाही माहिती काही",.. शशी.

" तुझ्याशी तर बोलणं कठीण आहे शशी एकतर तू अर्धा वेळ शुद्धीत नसतो, मी तुला परत एकदा सांगतो आहे काव्यापासून दूर राहा, तू आणि तुझ्या बहिणीने काही जरी ठरवलं तरी ते मी पूर्ण होऊ देणार नाही इतका ऐकून घे",.. सोहम.

" जिजाजी तुमचं काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे कोणी सांगितलं तुम्हाला हे ",.. शशी.

" कोणी कशाला सांगायला हव मला दिसत आहे ना काव्याचा हात, यापुढे असं होता कामा नये ",.. सोहमने रागाने फोन ठेवून दिला.

सुरभी तिच्या रूम मध्ये होती, सोहमची आज समजुत काढावी लागेल, बघते बोलुन शशी सोबत, आईला सांगाव लागेल, तिने तिच्या आईला सविता ताईंना फोन लावला,.. "काय करते आहेस आई? ",

" काही नाही हे तुझे बाबा शशी काही सुचू देतात का मला ",.. सविता ताई.

"काय झालं आता",.. सुरभी.

" आजही भांडण झाल त्या दोघांचा, तुझे बाबा बरोबर बोलता आहेत , शशी आता हल्ली चिडचिड करतो, आमच काही ऐकत नाही",.. सविता ताई.

"काय म्हणत होते बाबा",.. सुरभी.

"आपला जो काही छोटा मोठा बिझनेस आहे तो नीट सांभाळ अस सांगत होते ते शशीला, पण तो ऐकत नाही त्याला फॅक्टरी टाकायची आहे मोठी",... सविता ताई.

" हो मला बोलला तो, त्याला जरा शांत रहायचा सल्ला दे आणि माझ्याकडून ",.. सुरभी.

" काय झाल आता? ",.. सविता ताई.

" काल त्याने काव्याचा हात पिरगळला, सोहम किती बोलला मला आज, सगळा प्लॅन फ्लॉप होईल अश्याने",..सुरभी.

" कसला प्लॅन? करतात कश्याला पण तुम्ही भाऊ बहीण अश्या गोष्टी ",.. सविता ताई.

" आई प्लीज थोड्या दिवसाची गोष्ट आहे, एकदा काव्याच शशी सोबत लग्न झालं तर मग टेंशन नाही",.. सुरभी.

" आपलं आहे तस चांगल आहे, समाधानी का रहात नाही तुम्ही? ",.. सविता ताई.

" आई तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, जे आहे त्याहून अजून चांगले झाले तर काय हरकत आहे ",.. सुरभी.

" अग पण त्यात काव्याचं काय म्हणणं आहे ते पण महत्त्वाचं आहे ना, सगळ आपल्या मनाप्रमाणे होणार आहे का?",.. सविता ताई .

" किती श्रीमंत लोकं आहेत ते, प्रेमाने जिंकलं असतं शशीने काव्याच मन, पण नाही हा भांडण करतो तिच्याशी, अशी बळजबरी चालते का संसारात",.. सुरभी.

" मी समजावते शशीला की जरा व्यवस्थित वाग, आणि तुम्ही त्या पोरीला त्रास देवु नका ",.. सविता ताई

सुरभीनी फोन ठेवला तिला टेन्शन आलं होतं, सोहम घरी आला की परत चिडणार आहे नक्की माझ्यावर.

🎭 Series Post

View all