तुझी साथ हवी मला... भाग 2

शशी काव्या कडे बघत होता, तो चिडला होता, पटकन पुढे गेला तो , त्याने काव्याचा हात जोरात धरला, तो हात आधीच पिरगळल्या मुळे दुखत होता



तुझी साथ हवी मला... भाग 2

©️®️शिल्पा सुतार
.........

सुरभीने फोन ठेवला, काय करतो हा शशी काय माहिती?

शशी आत येवून बसला,.. "आटपा रे मुलांनो किती पिणार, एवढा खर्च करू नका इथे पैसे नाही माझ्याकडे",..

वेटर आता आला,

"या पुढे जो कोणी दारू मागेल त्याच बिल त्याच्या कडुन घे",.. शशी.

"काय यार शशी बस का? श्रीमंत मुल तुम्ही",.. शरद

"कसल काय श्रीमंत? , आतुन पोखरलो गेलो आहे मी, सुरभी ताई ओरडली मला, खुप खर्च होतो आहे आपला, जरा काम करत जा, उद्या पासुन माझ्या मदतीला या जरा, काव्यावर लक्ष द्या, कुठे जाते ती काय करते सगळी माहिती हवी आहे मला, त्या काव्याशी माझ लग्न झाल तर रोज पार्टी देईन मी तुम्हाला, काव्याच्या पैशातुन",.. शशी.

"वरण भाताची नसेल ना पार्टी? साधी भोळी आहे काव्या वहिनी",.. सगळे हसत होते.

" तुम्ही म्हणाल ते, माझ्या पुढे काही बोलते का ती काव्या, नुसती थरथर कापते, चला मला निघावं लागेल आता",.. शशी.

" आता काय झालं? कुठे जातोस तू? ",.. शरद.

" काही नाही ती काव्या कुठेतरी वाढदिवसाच्या पार्टीला गेली आहे, तिला घ्यायला जायच आहे, रस्तात हिसका दाखवावा लागेल तिला, मला न सांगता गेली ती, बघतो जरा तिच्या कडे",.. शशी.

" हळू रे नाजूक आहे वहिनी, मारू वगैरे नको तिला",.. शरद.

" चीड येते तिला बघितल की, मला अजिबात आवडत नाही अश्या मुली, घाबरट नुसती",.. शशी.

" अरे एवढ्या लवकर नाही संपणार ती बर्थडे पार्टी, जरा दोन तासाने गेले तरी काही हरकत नाही, बस जरा आमच्या जवळ ",.. शरद.

"हो बरोबर बोलतो आहे तू नंतरच जातो",.. शशी.

" तू काव्याशी लग्न करणार आहे का?,म्हणजे ती हो बोलली का? ",..शरद

"हो मग ती माझीच बायको होणार आहे, ठरलं आहे आमच आधीपासून, ती नाही म्हंटली तर आपला तो फॉर्म्युला वापरेन मी, उचलुन घेवुन जाईल तिला मी, मग कोणी काही करू शकत नाही , लगेच लग्न लावुन देतील ते आमच ",.. शशी जोरात हसत होता, तो हसला म्हणुन त्याचे मित्र त्याच्या सोबत हसत होते. नशीब जोरावर आहे तुझ शशी, करोडपती बायको, ती ही सुंदर,

काव्या प्रीती वाढदिवसाला गेल्या, आर्याचा वाढदिवस खूप छान झाला, खूप एन्जॉय केलं त्या सगळ्यांनी, गर्ल गँग रॉक करत होती, खूप हसल्या त्या, डान्स फूड एकदम मस्त झाल, या सगळ्या आनंदात जरा वेळ काव्या तिचं दुःख विसरली.

सोहमचा फोन आला,.. "झाली का पार्टी काव्या? वेळ झाला आता नीघ बर तिथुन",..

" हो दादा जरा वेळाने येते मी घरी, आहे मैत्रिणी सोबत, गाडी आहे आपली ",.. काव्या.

सोहम एकच असा होता ज्याला काव्याची काळजी होती,..

"तू कुठे आहेस दादा?",.. काव्या.

"मी पण आता घरी चाललो आहे तुझ्या वहिनीने सांगितलं की तू बाहेर गेली म्हणून फोन केला, मी येवु का तुला घ्यायला? ",.. सोहम.

" नको गाडी आहे आपली",.. काव्या.

" ठीक आहे, लवकर ये",.. सोहम.

वाढदिवस संपला प्रीती आणि काव्या बाहेर आल्या, त्यांनी ड्रायव्हरला फोन केला, त्याच्या आधी शशी त्याची गाडी घेऊन समोर आला, काव्या समोर बघत होती, प्रिती... प्रिति..

" काय झालं काव्या? ",.. प्रिति

" समोर बघ शशी आला आहे ",.. काव्या.

ओह माय गॉड..

"हा काय करतो आहे इथे, काय कटकट आहे, प्रीती काय करू या आता? ",.. काव्या.

"तुला खरच लग्न नाही करायचं आहे का याच्याशी काव्या? ",.. प्रीती.

" नाही ग प्रीती",.. काव्या.

"मग तू त्याला स्पष्ट सांगून का नाही देत, उगीच मागे मागे करतो तो",.. प्रीती.

" सांगितलं कितीतरी वेळा, समजत नाही त्या दोघं भावा-बहिणींना त्याला मी काय करणार ",.. काव्या.

"तुझा दादा इतका चांगला आहे आणि ही वहिनी का ग तुझी अशी? ",. प्रिति

" काही माहिती नाही मला का करतात ते सगळे जण अस, मला तर खूप वैताग आलेला आहे, आज ही खूप बोलली मला वहिनी, नक्की तिने पाठवल असेल शशीला",.. काव्या

शशी हॉर्न वाजवत होता,.." काव्या आत मध्ये बस, उशीर होतो आहे ",

" नाही शशी तु जा मी माझ्या ड्रायव्हर सोबत येईल",.. काव्या

"तो नाही आहे इथे, त्याला घरी पाठवून दिलं आहे मी, गुपचूप गाडीत येऊन बस, का उतरू मी खाली? ",.. शशी.

गाडीत दारुचा वास येत होता,

"बापरे हा शशी पिऊन आला आहे वाटत काव्या, कठिण आहे सगळ",.. प्रीती आणि काव्या दोघी मागे बसत होत्या.

मी तुमचा ड्रायव्हर नाहीये, काव्या पुढे येऊन बस" ,.. बोलतांना शशी प्रिती कडेही खूप खालून वर बघत होता, प्रीती त्यामुळे गडबडून गेली होती ,.. "काव्या मी माझी माझी जाते टॅक्सीने" ,

"नको प्रिती थांब ना, रात्र खुप झाली आहे, प्लीज मला याच्यासोबत एकट नको सोडू, चुपचाप चल माझ्यासोबत",.. काव्या.

प्रीती मागे बसली काव्यापुढे बसली, शशी गाडी चालवत होता, तो पूर्ण वेळ आरश्यातुन प्रीती कडे बघत होता,.. "प्रिती काय करते तू? कुठे आहे तुझं घर? ",

"मी काव्याच्या वर्गात आहे ",.. प्रीती

" काव्या तू सांगितलं नाही मला की तुझ्या वर्गात खूप सुंदर मुली आहेत",.. शशी

काव्या प्रीती दोघी कशातरी बसल्या होत्या कार मध्ये,

"फोन नंबर काय आहे प्रिती तुझा? ",.. शशी

"कशाला हवा आहे माझा फोन नंबर तुम्हाला? ",.. आता प्रिती चिडली होती.

" अरे म्हणजे तू काव्याची मैत्रीण आहे ना, माझी साली, साली तो आधी घरवाली होती है ना",.. शशी जोरात हसत होता.

काव्या प्रिती एकदम घाबरून गेल्या होत्या, न जाणो अजुन काय काय विचारेल हा, उगीच माझ्या सोबत प्रिती धोक्यात येते, प्रितीचं घर आल ती उतरली,

"प्रिती तुझा फोन नंबर घेतो मी काव्याकडून",.. शशी.

" काळजी घे अलर्ट रहा, घरी पोचल्यावर फोन कर ग मला",.. तिने काव्याला हळूच सांगितलं.

प्रिती गेली तिकडे शशी बघत होता.

काव्या आणि शशी निघाले, आता त्याला काव्याची आठवण आली, इतका वेळ तो प्रितीकडे बघण्यातच व्यस्त होता,.. "कुठे फिरत होती काव्या? एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये काय काम होतं तुझं? ",

" मी वाढदिवसाला आली होती आर्याच्या",.. काव्या.

"सांगून जाता येत नाही का तुला? , किती वाजले आता ",.. शशी.

" तुला सांगून यायचं काय संबंध शशी? ",.. काव्या.

" परत एकदा तुला माझ्या तोंडून ऐकायचं आहे का, ठीक आहे, मी तुझा होणारा नवरा आहे काव्या, एवढ्या रात्री इकडे तिकडे फिरलेल मला चालणार नाही ",.. शशी,

" मी मला हव ते करेन, अजुन लग्न जमल नाही आपल, मी तुला किती वेळा सांगितलं आहे शशी की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, माझ्या वर हक्क दाखवायचा नाही ",.काव्या.

तसा शशीने करकचून ब्रेक दाबून रस्त्याच्या कडेला कार थांबवली, बाजूला बसलेल्या काव्याचा हात जोरात हातात घेतला आणि तो थोडासा पिरगळला, तशी काव्या घाबरली आणि ओरडली,.." काय म्हटलीस तू काव्या? कोण आहे मी? ",

" शशी हात दुखतोय, सोड मला",.. ती खाली उतरत होती पण गाडी लॉक होती,

"यापुढे जर मला न सांगता कुठे गेलीस तर बघ मी काय करेन आणि सुरभी ताई सांगते त्याप्रमाणे लग्नाला तयार व्हायचं, काय ऐकल मी तू तिला उलटून बोलते, त्याने काव्याचे दोन्ही गाल एका हाताच्या चिमटीत पकडले, ताईला त्रास झाला तर तू आहे मी आहे, मी तुझ्या सोबत काय करू शकतो याचा तु विचार केला नसशील कधी , मला नकार दिला तर सगळ्यांसमोर मी तुला उचलून घेऊन जाईन, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, तुझा काय प्रॉब्लेम आहे मला समजेल का? तुझा कुणी तुझा यार आहे का कॉलेजमध्ये, अस करु नको, उगीच जीव जाईल त्याच्या",... शशी

काव्याने त्याच्या हाताला झटका दिला.. " तू का माझ्या मागे लागला आहे शशी, मला एवढ्यात लग्न करायचं नाही आणि माझा दादा बोलेल तिकडेच मी लग्न करणार ",

" ठीक आहे मग तुझा दादा बोलेल बरोबर माझ्याशी लग्न कर अशी परिस्थिती निर्माण करेल मी, शशी तिच्या कडे बघत होता, हे काय घातल आहे आज?, असे ड्रेस मला चालणार नाही, म्हणजे आपण दोघ असतांना ठीक आहे सगळ्यां समोर फक्त फुल ड्रेस हवा, समजल ना",... शशी तिच्या जवळ येत होता, काव्या अजून मागे सरकली, गाडीत अजून जागा नव्हती, ती दाराला टेकली, त्याने तिच्या पायाला हात लावला, छान दिसतेस आज,

उगीच घातला हा वन पीस, ओह माय गॉड, काय करू मी,

शशीचा हात वर येत होता, काव्या घाबरली,.." शशी नाही सॉरी, सोड, मला घरी जायचं आहे, हात नको लावुस मला " ,

तो तिच्या अगदी जवळ येवुन थांबला,.. "या पुढे असा ड्रेस घातला तर अस करेन मी, काही बोलणार नाही मी, डायरेक्ट ॲक्शन घेईन आणि मी सांगितलं तसंच राहायचं, हे असे छोटे कपडे चालणार नाही, समजल का",

हो

"हे जे झाल ते कोणाला सांगायचा नाही समजल ना",.. शशी.

हो

"जायचं का घरी?",.. शशी.

हो

अतिशय गुंड प्रवृत्तीचा शशी अजिबात चांगला मुलगा नव्हता हे आधीपासून काव्याला माहिती होतं, त्यामुळे तिला त्याची भीती वाटत होती, सदोदित धमकी देत होता तो, त्या सुरभी वहिनीची त्याला फुस होती, काव्याला माहिती होतं की शशीच तिच्यावर अजिबात प्रेम नाही, फक्त पैशासाठी तो तिच्या मागे आहे, एकदा लग्न झालं तर काही खरं नाही, शशी मला खूप त्रास देईल, आत्ताच काही संबंध नाही तरी माझा हात पिरगळला, किती कसतरी बघतो तो माझ्या कडे, पुढे जाऊन काय होईल याच्यासोबत? अंगालाच काटा आला तिच्या, घर आलं,

आलिशान बंगल्यात गाडी आत मध्ये गेली, सोहम दादा बाहेरच उभा होता, तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता, काव्या पटकन खाली उतरली ती दादाशी बोलायला गेली, शशी मग्रुरीने आत चालला गेला,

"झाली का पार्टी?",.. सोहम.

"हो दादा",.. काव्या.

"आलोच मी कॉल झाला की" ,.. सौहम.

काव्या आत मध्ये निघाली,

शशी आत आला, सुरभी सोफ्यावर बसलेली होती,

"भेटली का तुला काव्या",. सुरभी.

"हो घेऊन आलो आहे तिला, बाहेर उभी आहे ती, ताई एकदा सांगून दे काव्याला काही तरी, ती माझ्याशी नीट वागत नाही, नीट बोलत नाही मी वाजवेल ह तिला",.. शशी.

" एक मिनिट शशी तू काही केलं का काव्याला? मारत जाऊ नकोस तिला",.. सुरभी.

"आज फक्त हात पिरगळला आहे",.. शशी.

" तुला काही अक्कल आहे का शशी? , तिने सोहमला सांगितलं म्हणजे? ",.. सुरभी

" नाही सांगणार तशी धमकी दिली आहे तिला",.. शशी.

" काय कराव या मुलाला काही समजत नाही",.. सुरभी.

दादाशी बोलून काव्या आत मध्ये आली.

" काव्या इकडे ये एक मिनिट",.. सुरभी.

काव्या शशी कडे बघत होती, नकोच थांबायला इथे,.. " वहिनी प्लीज मी खूप थकली आहे, मला जायचं आहे रूम मध्ये" ",

"तू शशी सोबत व्यवस्थित का वागत नाही?, एवढ ही समजत नाही का तुला काव्या? काय अस हे ",.. सुरभी.

" नाही तसं काही नाही, मी काहीही बोलली नाही शशीला वहिनी",.. काव्या.

" शशी सांगतो आहे की तो तुझी काळजी घेतो आणि तू त्याला उलट उत्तरं देते",.. सुरभी.

"मी आधीच सांगितल होत तुला वहिनी, मला घ्यायला शशीला का पाठवल तु? ",.. काव्या.

" बघितल ताई हे अस आहे ",.. शशी.

" काव्या जेवढ्या लवकर तू समजून घेशील की तुला शशी बरोबर राहायचं आहे तेवढ तुझ्यासाठी चांगला आहे",.. सुरभी.

" वहिनी मी आई बाबा आल्यावरच बोलेल तुझ्याशी, मी जाते",.. काव्या.

" काव्या थांब, अजिबात ऐकत नाही ही पोरगी, उद्या आई बाबा आल्यावर काय करेल काय माहिती? ",.. सुरभी

शशी काव्या कडे बघत होता, तो चिडला होता, पटकन पुढे गेला तो , त्याने काव्याचा हात जोरात धरला, तो हात आधीच पिरगळल्या मुळे दुखत होता, काव्य ओरडली, माझा हात दुखतोय शशी, ती रडायला लागली, हात सोड.

"बोल काय म्हणते तु काव्या, सांगितल होत ना शहाणपणा नको आहे ",.. शशी.

" मी दादाला सांगेन हे",.. काव्या.

शशीने तिला ओढून जवळ घेतल,.. "एक शब्द जरी बोलली ना तु या बद्दल काही तर तुला आताच्या आता उचलुन घेवून जाईन मी, घाबरत नाही कोणाला",

सुरभी मधे पडली, शशी सोड तिला, शशी.... कसतरी तिने काव्याचा हात शशीच्या हातातून सोडवला,.." काव्या रडू नको शांत हो, जा आत",

काव्या पळत आत गेली.

🎭 Series Post

View all