तुझी साथ हवी मला... भाग 1

काव्या अतिशय सुंदर साधी, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली मुलगी, तीच सोहम दादावर खूप प्रेम होत , तोच एक आधार होता तिच्या जगण्यासाठी


तुझी साथ हवी मला... भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.........

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, कथा हळू हळू फुलत जाते, पात्र काल्पनिक आहेत, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, कोणाच मन दुखवायचा हेतू नाही.

वाचकांचे खूप आभार.
....

गडद अशा वनराईतून वाट काढत काव्या तिच्या आईसोबत जात होती, झाडी संपली अचानक गाव लागलं, मधेच आईच्या मैत्रिणी भेटल्या, आई बोलत भराभर चालत होती, काव्या मागे मागे पळत होती,

काव्या... काव्या... तीला मैत्रिणी बोलवत होत्या , आई मी त्यांच्याशी खेळायला जावु का? ,

हो जा

आई मैत्रिणीं सोबत आहे म्हणून काव्या बिनधास्त होती, आई कडे लक्ष देत ती खेळत होती ,

अचानक आई दिसेनाशी झाली , आई... आई... कुठे आहेस तू? काव्या वेड्यासारखी रडत पळत आईला शोधत होती , या गल्लीतून त्या गल्लीत, आई कुठेच दिसत नव्हती , दमुन ती एका झाडाखाली बसली,

"का रडते आहेस काव्या?", ..मैत्रिण .

"माझ्या आईला बघितलं का?",.. काव्या.

"हो तुझी आई आत्ताच मंदिराच्या बाजुला गेली",..

काव्या पळत मंदिराकडे जाते , कोणीच नसत तिथे, आई.. आई.. कुठे आहेस तू.? ... किती रडते ती, आई परत दिसत नाही, तिथे थकून झोपुन जाते ती,

काव्या... काव्या... उठ, रडु नको, पहाटे पहाटे काव्या दचकुन उठली, खुप घाम आलेला होता तिला, समोर मावशी उभ्या होत्या, त्यांनी तिला पाणी दिलं प्यायला, जवळ घेतल, काव्या थरथर कापत होती.

"अस करतात का काव्या? का त्रास करून घेतेस दरवेळी? ",.. मावशी

काव्या काही म्हटली नाही.

"झोप आता शांत एवढा विचार करत बसु नकोस",.. मावशी

भल्या मोठ्या देशमुख वाड्यात सगळे झोपलेले होते, मावशी बाजुच्या रूममध्ये होत्या, त्यांनी काव्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकला, त्या पटकन तिच्या रूममध्ये आल्या होत्या, मावशी बाजुला उभ्या होत्या, काव्या झोपण्याचा प्रयत्न करत होती ,.." झोप येत नाही मावशी",

"परत तेच स्वप्न बघितले का तू?",.. मावशी.

हो मावशी...

मावशींनी तिला जवळ घेतलं, जास्त विचार करू नकोस काव्या, काव्या रडत होती,

"असं करतात काव्या? शांत हो बरं",... मावशी.

"मावशी आई जातांना मला का नाही भेटली? मी शाळेतून येईपर्यंत का नाही थांबली ती? मला बोलायचं होतं खूप तिच्याशी, खुप गोष्टी दाखवायच्या होत्या, इतर वेळी पण कोणी तिला भेटू देत नव्हतं, का अस? ",.. काव्या

"बेटा आई आजारी होती ना तुझी, तिची शुद्ध हरपली होती शेवटचे पंधरा दिवस, म्हणून तुला कोणी भेटू दिलं नव्हतं तेव्हा",... मावशींनी काव्याला थोपटत होत्या, आता दहा वर्ष झाले या गोष्टीला, किती मनाला लावून घेतलं आहे पोरीने, त्या काळजीत होत्या,

काव्या लहान असतानाच तिची आई मोठ्या आजारपणात वारली होती, पण त्या घटनेचा काव्याच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला होता, नेहमी तिला असे स्वप्न पडत होते, आईला शोधत असायची ती , एकदा भेटायच होत तिला आईला, खूप बोलायचं होतं आईशी, तिच्या मैत्रिणी सांगतात त्याप्रमाणे आई सोबत राहायचं होतं, या घटनेमुळे काव्या थोडी घाबरट झाली होती, कोणी मोठ्याने बोलाल तरी दचकत होती ती,

देशमुख कुटुंब अतिशय श्रीमंत, घरात काव्या तिचा भाऊ सोहम, हे दोनच अपत्य, त्यांना सांभाळायला मावशी लहानपणापासून होत्या, त्या त्यांच्या दूरच्या नातेवाईकच होत्या, आईच्या नात्यातल्या, त्यामुळे त्यांच्यावर खूप विश्वास होता सगळ्यांचा, त्यामुळे बरं होतं.

काव्याच्या वडिलांनी सुरेश राव यांनी नंतर लग्न केलं, नवीन आई प्रमिला वडिलांसमोर चांगली वागत होती मुलांशी, पण तिचं सगळं लक्ष मुलांच्या नावावर असलेल्या इस्टेटीवर होतं, त्यात तिचा भाऊ संपत तिच्या मदतीला इथेच येऊन राहिलेला होता, तो मामा म्हणजे तिच्या असिस्टंटच होता, वरवर दाखवायची ती खूप प्रेम आहे, नवर्‍या समोर जपायची ती खूप मुलांना, पण नेहमी मुलांना त्रास होईल असंच वागायची,

सोहमच मागच्या वर्षी लग्न झाल होत, ते स्थळही प्रमिलाताईंनी त्यांच्या मनानेच आणलं होतं, त्या जे सांगतील ते सुरभी ऐकत होती,

लग्न तर झालं होतं सोहम आणि सुरभीच पण त्यांच मन कधी जुळले नाही, सुरभी अतिशय लालची व्यक्ती होती, प्रमिला ताई जे सांगतील तेच ती ऐकत होती, पण सोहम पुढे कोणाचं काही चालत नव्हतं, तो व्यवस्थित वागत होता, त्यामुळे सोहम कडून पैसे मिळण्याचे चान्सेस खूप कमी झाले होते, बाकी होती ती काव्या, साधी भोळी काव्या फसायची या लोकांच्या तावडीत, सदोदित काव्याच्या मागे होती सुरभी,

काव्या अतिशय सुंदर साधी, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली मुलगी, तीच सोहम दादावर खूप प्रेम होत , तोच एक आधार होता तिच्या जगण्यासाठी, बाबा खूप चांगले होते, पण ते प्रमिला ताईंच ऐकत होते त्यामुळे ती त्यांना काहीही सांगत नसे, प्रमिला ताई वर पण ती विश्वास ठेवत होती, प्रेम करत होती तिला काय माहिती त्या कश्या आहेत.

सुरेशराव प्रमिलाताई नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते, ते लग्न प्रमिला ताईच्या बाजूच होत, त्यामुळे तीन चार दिवस आधीच ते गेले होते, तिथून एक दोन ठिकाणी ते देवदर्शनाला जाणार होते,

काव्या आवरून खाली आली, सोहम सुरभी नाश्ता करत होते, मावशी सुद्धा बसलेल्या होत्या, ... "बरं वाटत आहे का आता काव्या?",

" काय झालं काव्याला?",.. सोहम काळजीत होता.

"काही नाही दादा परत तेच स्वप्न बघितले मी, आई आली होती स्वप्नात",.. काव्या.

"काय तु पण वेडाबाई ? चल इकडे ये",.. काव्या जाऊन सोहम दादाला भेटली. जास्त काळजी करायची नाही.

नाश्ता करून काव्या कॉलेज मध्ये आली, प्रीती तिची मैत्रीण होती सोबत,

"झाल का लिहुन काव्या, आज सबमिशन आहे ",. प्रिति

" हो तुझ झाल का? ",. काव्या.

" हो माझ ही झाल" ,.. प्रिति

मॅडम आल्या क्लास सुरू झाला, लंच ब्रेक मध्ये सगळ्या मुलींची गडबड सुरू होती, क्लासमधल्या आर्याचा बर्थडे होता, त्यामुळे आज सकाळपासून धावपळ सुरू होती, छोटासा केक कापला, आर्या खुश होती,.. "थँक्यू गर्ल्स संध्याकाळी सगळ्यांनी बर्थडे पार्टीला यायचं ",

" कसं काय शक्य आहे मला घरातुन निघणं काय माहिती? दादाचं काही नाही पण वहिनी सोडणार नाही, आई बाबा कधी वापस येतील घरी काय माहिती? ",.. काव्या विचार करत होती.

" सगळ्यांनी यायचं आहे मला काही माहिती नाही",.. एक दोन मुली नाही म्हणत होत्या त्यांना आर्या आग्रह करत होती.

" जायच का ग प्रिती आपण पार्टीला? काय घालायचं आहे?", .. काव्या.

"वन पीस घालूया का?",.. प्रिति

"चालेल, मी येते तुला घ्यायला संध्याकाळी ",.. काव्या.

ठीक आहे..

कॉलेजला सोडायला घ्यायला नेहमी गाडी ड्रायव्हर असायचा, काव्या घरी आली,

"आटोप काव्या लगेच खाली ये मी ताट करते आहे",.. मावशींनी तिला जेवायला दिलं, मावशी अतिशय प्रेमळ होत्या, त्यांना नेहमी काव्या आणि सोहम बद्दल काळजी होती, काव्याचं जेवण झालं, ती रूममध्ये गेली, जरा वेळ अभ्यास केला, कारण परीक्षा पंधरा दिवसावर आली होती, युनिट टेस्ट होती ती, तयारी करून काव्या बाहेर आली, रस्त्यात प्रीतीला तिला घ्यायच होतं,.. "मावशी मी येते, रात्री उशीर होईल",

" कुठे चालले आहे काव्या? एक मिनिट थांब, काही सांगुन जायची पद्धत आहे की नाही? ",.. सुरभी वहिनी विचारत होती.

"वहिनी मला वाटल तु रूम मध्ये आराम करत असशील, मी मावशींना सांगितल होत, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, पार्टी आहे, तिकडे जात आहोत आम्ही",.. काव्या.

"पंधरा दिवसावर परीक्षा आली आहे ना तुझी काव्या, मग अस फिरण्यात काय अर्थ आहे",.. सुरभी तिला वरुन खालून बघत होती, हा काय ड्रेस घातला आहेस काव्या?

"वहिनी प्लीज मी येते ना तीन चार तासात, मी दादाला पण सांगितला आहे तसं ",.. काव्या.

" बस दादाला सांगितलं म्हणजे झालं का तुझं सगळं",..सुरभी

"तसं नाही वहिनी, मी नको जाऊ का? ",.. काव्या.

" ठीक आहे जा, नाही तरी तुला काही बोलण्यात अर्थ नाही , तू कुठे ऐकते नाही तरी आमचं काही",.. सुरभी

" असं काही नाही वहिनी, का अस म्हणतेस, सांग काय म्हणण आहे तुझ? ",.. काव्या.

" तु शशीला लग्नासाठी होकार का नाही देत? ",.. सुरभी

" वहिनी आपलं झाला आहे ना या बाबतीत बोलणं, मला एवढ्यात लग्न करायचं नाही, काय ग तेच तेच ",.. काव्या.

"ते काही नाही तुला माझं ऐकावं लागतं लागेल, मला असं वाटतं की तुझं बाहेर काहीतरी प्रकरण आहे, त्यामुळे तु माझ्या भावाला लग्नाला होकार देत नाही, चांगला आहे माझा भाऊ सुखी राहशील तु ",.. सुरभी.

" नाही ग वहिनी तसं काही नाही माझ , तु उगीच काही ठरवु नको इतक्यात, मी येते",.. काव्या.

काव्या घरातनं निघाली, कार मध्ये ती विचार करत होती की हे लोक खूपच मागे लागले आहेत माझ्या, मला अजून एक दोन वर्षे लग्न करायचं नाही, काय करू आई बाबा कधी येतील काय माहिती?

आई बाबा उद्या येणार होते.

सुरभीने तिच्या भावाला शशीला फोन केला, शशी म्हणजे अगदीच गुंड मुलगा होता, कुठल्याही गोष्टीची दया माया त्याला नव्हती, व्यायामाने कमावलेलं शरीर, अतिशय हुशार पण अक्कल दुसऱ्याच ठिकाणी वापरायचा तो, त्याच्या आजूबाजूला त्याचे उनाड मित्र सदोतीत असायचे त्याच्या मदतीला, आजही ऑफिस मधुन निघुन तो या मित्रांसोबत हॉटेलमधे बसलेला होता,

शशीचं आणि सुरभीच्या जीवनात एकच लक्ष होतं, सोहम काव्याची प्रॉपर्टी त्यांना हवी होती, फुकटचे पैसे कसे मिळतील हेच बघत होते ते , शशीच्या वडलांचा छोटा बिझनेस होता, तो नीट सांभाळायचा सोडून शशीला मोठी फॅक्टरी टाकायची होती, ते पैसे त्याला काव्या कडुन मिळणार होते, त्यामुळे त्याला तिच्याशी लग्न करायच होत,

सुरभी तर त्यात यशस्वी झाली होती तिने सोहमला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी व्यवस्थित लग्न करून घेतलं होतं, राहिला होता प्रश्न काव्याचा, त्यासाठी तिला आपल्या भावाचं शशीचं स्थळ या लोकांच्या माथी मारायचं होतं, भाऊ आपला कसा का असेना पण एकदा श्रीमंत मुलीशी लग्न झालं तर तिची सगळी इस्टेट त्यालाच मिळेल हीच आयडिया होती तिची, त्यासाठी ती काहीही करायला तयार होती.

"काव्या निघाली आहे घरातुन",.. सुरभी.

" कुठे गेली आता ती एवढ्या संध्याकाळी? ",.. शशी.

"वाढदिवस आहे म्हणे मैत्रिणीचा, लक्ष ठेव जरा तिच्यावर, नाहीतर मैत्रीण करता करता मित्राला जावुन भेटायची ती, हुशार आहे खुप तशी ती ",.. सुरभी

"ताई आता मला काय तेवढेच काम आहे त्या काव्याकडे लक्ष द्यायचं, काय टेंशन घेते तु पण, एकदा दम दिला की झाल काम , आहे केवढी ती काव्या माझ्या एका हातात बसेल ",.. शशी.

" अस तस समजु नको हे बहीण भाऊ खुप हुशार आहेत असे गुंडाळतात मला ",.. सुरभी.

" या वेळी गाठ माझ्याशी आहे, फिरू दे किती फिरायचं तिला, शेवटी मीच आहे तिच्या नशिबात, तिच्या अस मागे मागे करण मला जमणार नाही ",.. शशी.

" पैसे हवे आहेत ना तुला तिचे, मग तुला लक्ष द्यावंच लागेल तिच्या कडे ",.. सुरभी

शशी वैतागला होता, कर्जही किती होऊन बसल आहे, ताई जास्त करते, किती बोर आहे ती काव्या, अजिबात मोकळी रहात नाही, छान बोलत नाही,

" ताई थोडे पैसे आहेत का , कस काय देणार आहे मी लोकांचे पैसे , बाबांना सांगता येत नाही, ते देणार नाही पैसे मला ",.. शशी.

"देते मी पण जरा सांभाळून वापर, मागच्या आठवड्यात दिले होते ना पन्नास हजार, काय झाल त्याच?",.. सुरभी.

"दिखावा करायला लागतात पैसे ताई, होतो खर्च, मला फॅक्टरी पण टाकायची आहे, कधी होणार आहे हे , तू बोलली का तुझ्या सासू-सासऱ्यांशी",.. शशी.

" ते उद्या येणार आहे तेव्हा मी त्यांच्याशी बोलते, तसं हे लग्न ठरल्यासारखंच आहे तू काळजी करू नको",.. सुरभी .

"जर नाही ठरवलं तर मी काव्याला उचलून घेऊन जाईल",.. शशी.

" थांब शशी असं काहीही करणार नाहीस तू, आई बाबांसमोर तू एक अतिशय साधा सक्सेसफुल बिझनेस मॅन आहे, असे चित्र आपण उभं केलं आहे, आईंच काही नाही पण पप्पांना तुझ्यावर विश्वास बसायला पाहिजे की तू काव्याला सुखी ठेवशील",... सुरभी

" सुखी माय फूट काकूबाई काव्या मला अजिबात आवडत नाही, मी माझ स्वप्नं पूर्ण करायला लग्न करतोय तिच्याशी ",.. शशी.

" तेच लक्ष्यात ठेव, मग शांत रहा जरा ",.. सुरभी,

" काय वैताग आहे एक एक",.. शशी.



🎭 Series Post

View all