तुझी साथ गरजेची भाग 2
©️®️शिल्पा सुतार
पहिल्या बाळंतपणात ही असच केल. खूपच त्रास दिला. त्या दिवसांची आठवण जरी आली तरी अंगावर काटा येतो. तेव्हा पंधरा दिवसात घरी घेऊन आले. मी किती सांगितलं होतं. हे ऐकतं नव्हते. नुसतं आई म्हणेल ते करतात. घरकाम केल्याने काही होत नाही असं म्हणायचे.
सासूबाई पण सगळ्यांसमोर म्हणत होत्या की मी सगळं करेन. माझा नातू आहे. पण इथे आल्यानंतर माझ्याकडे, बाळाकडे बघायलाही तयार नव्हत्या. सगळं आवरून खायला मिळायचं नाही. आरवला दूध कमी पडायचं. परत मानसिक त्रास तो किती. कोणाचा सपोर्ट नाही.
तिथे आईकडे हे झालं नाही ते झालं नाही. किती नाव ठेवले. सारखे ऐकवायचे. इथे स्वतः काहीही करत नाही.
एकदा आरव खूप रडत होता मी त्याला दुध पाजत होते. भाजी थोडी जळाली. सासुबाई किती बोलल्या होत्या. यांना नाव सांगितलं होतं. हे पण माझ्याकडे रागाने बघत होते. आईवर इतका विश्वास. सगळं सांभाळता येत नाही का? हे अस म्हणाले होते.
चोवीस तास घरकाम करून बाळ सांभाळून दाखवा. यांच्यात पेशंश नाहीत. अर्धा तासात यांचा राग कंट्रोल बाहेर जातो. आणि आम्हाला सांगता.
खरच यांना काही सांगायची सोय नाही. त्यांना माझी कुठलीच गोष्ट खरी वाटत नाही.
पहिल्या डिलेव्हरी नंतर ते म्हणाले तेव्हा मी सासरी येत नव्हते तर तिकडे माझ्याशी किती भांडण केलं. आईच्या सांगण्यावरून मला दम दिला. फटका मारता मारता राहिले. बाळाकडे पण बरेच दिवस बघत नव्हते. मी घरचे काम करून त्याला मोठा केला. जावू दे आधीच्या गोष्टींचा विचार करून करून तब्येत खराब व्हायची. ती झोपली.
सकाळी नेहमी प्रमाणे ती आवरत होती.
"मला डबा नको देत जावू." सचिन आत येत म्हणाला.
"त्याने काय होणार आहे? आम्हाला तर जेवण करावेच लागेल ना. तुमच्या दोन पोळ्या कमी झाल्या तर असा विशेष फरक पडणार नाही. तुम्ही नका काळजी करू. मी हळूहळू स्वयंपाक करते. तुम्ही आई म्हणतात तेच ऐका." ती स्वयंपाक करत म्हणाली.
सचिन तिच्याकडे बघत होता. त्याला कसतरी वाटत होतं. पण आईच्या पुढे काय म्हणणार. आधी तर तो खूपच रागीट होता. लग्नाला पाच वर्ष झाले होते. आता तरी तो थोड समजून घेत होता. त्याच्यात थोडा फरक पडला होता. थोड्या वेळाने आवरून तो आरवला घेवून ऑफिस मधे गेला.
तिचा फोन वाजत होता. आई नाव बघून ती खुश होती. ती बेडरुम मधे आली. दार लोटून घेतलं.
" मनू बेटा तुझी तब्येत कशी आहे? काय सुरू आहे." रमाताईंनी विचारलं.
"नेहमीच सुरू आहे ग आई काही विशेष नाही." मनाली म्हणाली.
"आरव शाळेत गेला का?"
"हो. त्याचा ही अभ्यास वाढला आहे."
"मी काय म्हणते तू डीलेव्हरी साठी इकडे येतेस का?"
"नाही आई, मागच्या वेळी काय झाल होतं माहिती आहे ना. किती भांडण. या लोकांनी आपल्याला अगदी नको नको करून सोडलं होतं. सारखं आपलं अस नाही तस करा. मलाही सारख घरी चल अस करायचे. जस खूपच प्रेम आहे. आणि सासरी येवून काय झालं? हाल झाले ना. त्यापेक्षा मी इथे बरी." मनाली म्हणाली.
" अग पण ते लोक कसे आहेत. तुझा आराम होणार नाही. बाळाला घेवून काम करत बसशील का. निदान एक महिना तरी ये. मला तुझ्याकडे बघवत नाही. परत आरवच ही कराव लागेल. " रमाताईंनी डोळ्याला पदर लावला.
" आई रडू नकोस ना. मी बरोबर करेन. तिकडे आली तरी हे लोक पंधरा दिवसाच्या वर राहू देत नाही. उगीच धावपळ होते. मला आता या लोकांच्या वागण्याची सवय झाली आहे. "
" मी तिकडे येवू का?"
"अजिबात नाही त्यांचे नात नातू आहे ते बघतील. वाटलं तर कामाला बाई लावतील. त्यांनी तुला विचारलं तरी स्पष्ट नाही सांगून दे. तु काही आमच्या घरी फक्त काम करायला येणार का? इतर वेळी यांना माझ्या माहेरचे लोक नको असतात. काम असल की ते आठवतात का? "
" असू दे ग. मी तुझ्यासाठी सहन करेल. " रमाताई म्हणाल्या.
" नाही आई. मला हे चालणार नाही. असं केलं तर हे लोक कधीच नीट होणार नाहीत. " ती बराच वेळ आईशी बोलत होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा