तुझी साथ गरजेची भाग 4 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
आईची चिडचिड बघून सचिन कंटाळला होता. तो आत मध्ये आला. थोडा रागात होता.
" मनाली किती दिवस तू अशी झोपून राहणार आहे? ती आई बघ कशी करते."
" मनाली किती दिवस तू अशी झोपून राहणार आहे? ती आई बघ कशी करते."
" माझी डिलिव्हरी होऊन किती दिवस झाले? मला सव्वा महिना आराम मिळेल का? नाहीतर आयुष्यभर काम संपत नाही." ती मोठ्याने म्हणाली.
सचिनला समजत होतं. आई ऐकत नव्हती. काय करावं अस झाल होत. मनाली नेहमी पूर्ण घराच करते. तीच करायला कोणीच तयार नव्हतं.
त्याला आता बऱ्यापैकी समजलं होतं की आई कशी वागते. पहिल्या बाळाच्या वेळी उगीचच मनालीवर चिडचिड केली त्याला वाईट वाटत होतं. तो आता मुलांना नीट सांभाळत होता. मनालीला बर्यापैकी आराम देत होता. शेवटी तो एका मुलीचा बाप झाला होता. तो एवढासा जीव हातात घेतल्यावर त्याला फार मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली होती. उद्या ही पण सासरी जाईल. तिला कोणी असा त्रास दिला तर? विचार करून त्याला त्रास होत होता.
बाळ महिन्याचं झालं. आता मनाली बऱ्यापैकी उठून काम करत होती.
"आपली स्वयंपाकाची बाई काढून टाकू." आशाताई म्हणाल्या.
"अजून पंधरा दिवस राहू द्या. बाळ रात्रीच रडत मला सकाळी उठायला जमणार नाही. " मनाली म्हणाली.
चहा नाश्ता करून सचिन ऑफिसला निघाला. तो गेल्याबरोबर आशाताईंनी बडबड सुरू केली. त्या मनालीला खूप बोलत होत्या." तुला काहीच काम नको असत. आपल्याकडे अस सगळया कामाला बाई चालत नाही. पुरे झाला आराम. तू जास्त करते आहे. आहे त्या गोष्टीचा गैरफायदा घेते. तुझ्या आईचा रोज फोन असतो ना? त्याच हे शिकवत असतिल. बरोबर बाळंतीणीला माझ्यावर सोपवून त्या आरामात आहेत. "
मनाली काही म्हणाली नाही. तरी तिने शांततेत घेतलं.
" आई बाळाकडे आरव कडे बघता का? मी आंघोळ करून घेते."
" मला जमणार नाही. यापुढे तुला जे काही काम करायचं ते तुझ्या मुलांना सांभाळून कर. डीलेव्हरी होवून बरेच दिवस झाले. पुरे झालं कौतुक. कामाला लाग आता. " आशाताई ओरडल्या.
काहीतरी राहिलं होतं म्हणून सचिन आत मध्ये आला. त्याने सगळं ऐकलं. "आई काय चाललं आहे? तू कश्या भाषेत मनाली सोबत बोलते आहेस. किती ते तिखट शब्द? तुझे नात नातू आहेत ना. मुल लहान आहेत तिला सपोर्टची गरज आहे. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती."
"हे असंच चाललेलं असतं त्यांचं. कवडीची मदत नाही. त्रास मात्र खूप देतात. नेहमी त्या आरवला मारत असतात. तरी मी तुम्हाला काही सांगत नाही. " मनाली म्हणाली.
" आई थोड समजुतीने घे. तुझ्याकडून काय अपेक्षा करणार म्हणा. चल मनाली आत. मी थोडा वेळ थांबतो तू आंघोळ करून घे. "
पंधरा दिवसांनी आशाताईंनी रत्नाला येऊ नको असं सांगितलं. एक दोन दिवस मनालीने स्वयंपाक केला. आरवची परीक्षा झाली होती.
" मी थोडे दिवस आईकडे जाऊन राहू का? बाळही सांभाळलं जाईल. " मनाली म्हणाली.
"हो मी तुला सोडून येतो. "
सकाळी ती तयारीत होती.
"कुठे जाते आहेस?" आशाताई विचारत होत्या.
"मी माहेरी जाते आहे."
" सांगायची काही पद्धत? "
" यांना माहिती आहे ते पुरेसं आहे. तुम्ही ना सारखं आमच्या मधे मधे करत जावू नका आई. " मनाली म्हणाली.
ते निघाले. रत्नाला उगाच काढलं असं आशाताईंना वाटत होतं. म्हणजे नेहमी स्वतःवर वेळ आली की काम नको. दुसरे करत आहेत तर भरपूर करून घ्या. किती घाणेरडा स्वभाव आहे.
मनाली माहेरी आली. तिचा भरपूर आराम होत होता. आईच्या हातचे भरपूर पदार्थ खाल्ले. तिच्या माहेरी बाळाचं बारसं पण झालं. बारशाला सचिन आणि आशाताई दोघे आले होते. येताना ती परत आली.
रत्ना कामाला आलेली होती.
"काय ग तुला तर नाही सांगितलं होतं ना?" मनालीने विचारलं.
"तुम्ही गेल्यानंतर आठ दिवसातच परत मला तुमच्या सासूबाईंनी बोलवून घेतलं." रत्ना सांगत होती.
"त्यांना तू बनवलेले जेवण आवडत नव्हतं ना?"
"स्वतः करावं लागलं की सगळं आवडतं."
"बरोबर आहे."
सचिन आता लवकर घरी येत होता. तो मुलांबरोबर छान रमला होता. मेन म्हणजे मनालीला समजून घेत होता.
ती खुश होती. उशिरा का होई ना यांचे डोळे उघडले. हे माझ्यासोबत असतील तर सासुबाईंची फिकीर नाही. तशाही त्या सचिनपुढे काही बोलत नाही. ते दोघं खुश होते.
आशा ताई ही आता मनाली सोबत सांभाळून बोलत होत्या. कारण आता सचिन तिच्या बाजूने होता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा