Login

तुझी साथ गरजेची भाग 3

तुझी साथ गरजेची
तुझी साथ गरजेची भाग 3

©️®️शिल्पा सुतार

मधे दोन महिने गेले. मनाली कसतरी काम करत होती. अर्धा वेळ सचिन मदतीला होता. शेवटी त्याने स्वयंपाकाला बाई लावली.

रत्ना साडे सहाला आली.

" काय ग या वेळेला तू इथे काय करते आहेस? " आशा ताई विचारत होत्या.

" मला इथलं स्वयंपाकाचं काम दिल."

"कोणी सांगितलं?"

"वहिनींनी ."

"आम्हाला बाई नको. तू जा." आशाताई म्हणाल्या.

"थांब रत्ना. आई तुम्ही बाहेर बसा. वरण, भात, फ्लॉवरची भाजी, पोळ्या कर. काकडीची कोशिंबीर ही कर. आरवसाठी थोड फिक्क वरण बाजूला काढ."

" हो वहिनी. " ती कामाला लागली. मनाली आत गेली.

आशाताई चिडल्या होत्या. त्या सचिनची वाट बघत बाहेर बसून होत्या. तो आला.

" सचिन या बाईला स्वयंपाकाचं कोणी सांगितल. मला अस तिने केलेला स्वयंपाक आवडत नाही. "

" आम्ही दोघांनी ठरवलं. मनालीला नववा महिना लागला. तिची अवस्था तर बघ. तिला यावेळी त्रास होतो आहे. तू मदत करत नाही. माझ्या कडून काम होत नाही." सचिन म्हणाला.

" आम्ही ही पोर सांभाळून सगळं केल. " त्या म्हणाल्या.

" तुम्हाला त्रास झाला म्हणून मनालीला व्हायला हवा का? काय आहे हे आई. शांत हो ना. "

माझा मुलगा चक्क सुनेची बाजू घेतो आहे. मला शांत बसायला सांगतो त्यांना सहन झालं नाही. त्यांना त्यांच त्या घरातलं सिंहासन डळमळीत झाल्या सारख वाटलं. जेवतांना त्या नाराज होत्या. कोणी लक्ष दिलं नाही.

" आई काय झालं जेवण आवडलं नाही का?"

" बरं आहे. "

" तुला आवडत नसेल तर उद्यापासून तु तुझ थोडं करून घेत जा. बाईला सांगू का तसं. की तुझा स्वयंपाक करू नको." सचिन म्हणाला.

" नको, ती करते ते बरं आहे. "

मनालीचे दिवस भरत आले होते. आशाताई काळजी करत होत्या. हीच कोण करेल?

"सचिन अरे हिला माहेरी पाठवून दे."

"ती नाही म्हणते."

"मग माझ्या मदतीला तिच्या आईला बोलवून घे."

"त्या बिझी आहेत. आई मी आहे ना. आपण मिळून करू. पंधरा वीस दिवस नंतर मनाली हळू हळू करेल."

"अरे पण बाळ बाळंतीणच आवरण सोप असत का? काय बाई हिच्या माहेरचे लोक आहेत. जरा मुलीची काळजी नाही." आशाताई बडबड करत होत्या.

मनालीने ऐकुन न ऐकल्या सारखं केलं. काहीही झालं तरी आई इकडे येणार नाही. नाहीतर या सासुबाई नुसत बसुन राहतील. ऑर्डर सोडतील. आई काम करत राहील. परत नाव ठेवतील. अपमान करतील. यांच्या अश्या स्वभावामुळे कोणी त्यांना मदतीला येत नाही.

रात्री तिच्या पोटात कळा येत होत्या. सचिनने गाडी काढली लगेच हॉस्पिटल मधे आले. पहाटे पहाटे मुलगी झाली. सगळे खुश होते. एक मुलगा एक मुलगी छान झाल. सचिन विशेष खुश होता. त्याला मुलीची आवड होती.

रमा ताई, राघव तिचा भाऊ हॉस्पिटलमध्ये आले. एक दिवस थांबून तिथून परत निघाले.

" तुम्ही थांबा वहिनी ." आशाताई म्हणाल्या

"मला कस जमेल? माझी ही सून गरोदर आहे. तुम्ही चांगल करणार्या आहात ना. एवढ्या हुशार. तुम्ही तुमच्या नातीकडे नीट बघाल ." रमाताई म्हणाल्या.

" मला वाटलं तुम्ही मनालीला आरामासाठी घरी घेऊन जाल. " आशाताई म्हणाल्या.

" पहिल्या बाळंतपणाला तिला घरी माहेरी ठेवून बघितलं. पण तुमच्या मते तिथे तिची गैरसोय झाली. मला हवं तसं बाळ बाळंतीणीचं काम जमत नाही. तेव्हा तुम्ही पंधरा दिवसातच तिला घरी घेऊन गेल्या. यावेळी तुम्हीच करून बघा ताई." म्हणून रमाताई मुलासोबत घरी गेल्या.

मनालीला पाच दिवसांनी घरी सोडलं. तोपर्यंत आशाताई काम करून करून दमल्या होत्या. चिडचिड करत होत्या.

पाचच दिवस झाले तरी यांच्या कडून माझ काही काम होत नाही. मी या सगळ्यांचं पाच सहा वर्षे झाले काम करते आहे. मला काही जीव नाही का? मनाली विचार करत होती. पण आता तिने सुद्धा प्रॅक्टिकल व्हायचं ठरवलं. ती दोघं मुलांना घेऊन आत मध्ये झोपली होती.

रत्ना होती म्हणून जेवायला तरी मिळत होत. ती स्वयंपाक झाला की मनालीला वाढून देत होती.

"सचिन अरे आता एक आठवडा झाला माझ्याकडून काही होत नाही. माझं वय तरी बघ. " आशाताई म्हणाल्या.

"काय काम करायचं आहे आई? मला सांग. सगळ्या कामाला तर बाई येते. ताईच्या डिलिव्हरीला तुला असं वाटत नव्हतं. आता तुला फक्त आरवकडे बघायचं आहे."सचिन म्हणाला.