तुझी साथ गरजेची भाग 1
©️®️शिल्पा सुतार
"मनाली झालं नाही का अजून? किती वेळ? एवढं हळूहळू केलं तर कसं होईल? माझा डबा दे. आरव तयार झाला का?" सचिन पुढच्या खोलीतून आवाज देत होता.
"मनाली झालं नाही का अजून? किती वेळ? एवढं हळूहळू केलं तर कसं होईल? माझा डबा दे. आरव तयार झाला का?" सचिन पुढच्या खोलीतून आवाज देत होता.
सहा महिन्याची प्रेग्नंट मनाली पोट सांभाळतं आवरत होती. ही तिची दुसरी प्रेग्नंनसी होती. आरव चार वर्षाचा होता. बालवाडीत जात होता. सचिन ऑफिसला जातांना त्याला शाळेत सोडत होता. तिची कंडीशन माहिती असून ही कोणी तिला समजून घेत नव्हतं.
"इतक्या वर्षापासुन स्वयंपाक करते. अजूनही तिला पटापट काम जमत नाही." आशाताई बडबड करत स्वतः उठल्या. त्या सचिनचा डबा भरत होत्या. मनालीने आरवला तयार केलं. सचिन त्याला घेवून निघाला. जवळच शाळा होती. येतांना आरव रिक्षाने येत होता.
"लवकर घरी ये ये सचिन." आशाताई म्हणाल्या.
" हो आई. "
मुलगा त्यांच्या शब्दा बाहेर नव्हता. बाबा गेल्या पासून तर तो आईची खूपच काळजी घेत होता. आशाताई ही त्यामुळे अति करत होत्या.
ते दोघ गेल्यावर मनाली थोड बसली. ती घामेघूम झाली होती. तिने बाटलीतलं पाणी पिलं. पोटावरून हात फिरवला. बाळा मी दमते रे. पण आपल्या कडे कोणी बघत नाही. अस चालू राहील तर आपलं काही खर नाही. कोणी समजून घेत नाही. मी यांना म्हणत होती दुसरा चान्स घ्यायला नको. म्हणजे मला माफ कर बाळा. तू मला हवा आहेस. पण पहिल्या डिलिव्हरीत झाला तेवढा छळ, त्रास कमी झाला का? खूपच हाल झाले. म्हणून हे दुसर गर्भारपण नको वाटतं. आता परत तेच व्हायला नको.
कालच डॉक्टरांकडे जावून आली. अंगात रक्ताची कमी आहे. आराम करायला सांगितला. माझ्याकडून अजिबात घरकाम होतं नाही. थकायला होत. पण घरचे ऐकतील तर शप्पथ.
"काय ग काय झालं? अस बसून घेतलं? व्यायाम हा हवाच. आटोप... सगळं घरकाम बाकी आहे. आमच्या काळी आम्ही किती काम केलं. आमच्या चार चार डिलेव्हरी झाल्या. दवाखान्यातून आल की बाळाला पाळण्यात टाकायचं आणि कामाला लागायचं." आशाताई नेहमी प्रमाणे तेच सांगत होत्या.
यांनी केल म्हणून मी पण तेच करायच का? प्रत्येकाचं शरीर वेगळ असतं. मला पहिल्या वेळेपेक्षा आता जास्त त्रास होतो आहे. मला आराम हवा आहे. पण सासुबाईं पुढे काय बोलणार. तिने हळू हळू आवरलं. स्वयंपाक केला.
" आई जेवायला वाढू का? "
" तू जेव मी थोड्या वेळाने बसते." आशाताई म्हणाल्या.
आरवला जेवायला देवून तिने जेवण केलं. ती आराम करत होती. तिला झोप लागली. संध्याकाळी चहा झाल्यावर तिने आरवला आभ्यासाला बसवलं. कढी, खिचडी केली.
सचिन आला. तो पुढे टीव्ही बघत होता.
"चला जेवून घ्या. " मनाली आवाज देत होती.
" पोळी, भाजी नाहिये का? " सचिन म्हणाला.
"मी करून आणते." आशाताई म्हणाल्या.
" नको आई तू बस." तो मनालीकडे बघत होता. ती हळूच उठली. दोन पोळ्या केल्या. चटणी पोळी खा. आता भाजी होणार नाही.
" तुला जेवण जात नाही म्हणजे आम्हाला ही काही नको का?" आशाताई ओरडल्या.
" मनाली उद्या पासून व्यवस्थित स्वयंपाक करत जा." सचिन म्हणाला.
" अहो आपण स्वयंपाकाला बाई लावू या का? मला स्वयंपाक करतांना खूप गरम होत. श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो. सहन होत नाही." मनाली म्हणाली.
" हो मी चौकशी करतो." सचिन म्हणाला.
" कश्याला. घरचं ते घरचं असतं. एवढ्यात बाई लावायची गरज नाही. " आशाताईंनी मोडता घातला. सचिन गप्प बसला. सगळं आवरून ती रूम मधे बसली होती. तिला खूप राग आला होता.
सचिन सुद्धा घरच्यांच्या बाजूनेच बोलतात. कधीच ठाम पणे माझी बाजू घेत नाही. त्यांना माझी दया येत नाही का? सासुबाई नेहमीच मला त्रास देतात. आता हे बाई लावायला ऐकत होते ना. सासुबाईंनी का नकार दिला? मी पण मला होईल तितकं करेन. नाहीतरी अतिशय मठ्ठ हळूहळू काम करणारी व्यक्ति म्हणुन माझी ओळख आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा