तुझी साथ 3

Marathi katha

ऋतू बेंच वर डोकं ठेऊन डोळे झाकून होती.

......बरं नाही ये का ?
ऋतू:ह्म्म्म.
तिला आवाज ओळखीचा वाटला. तिने मान वर करून पाहिलं .

आता पुढे:

ती अवाक् होऊन पाहत होती.
आरव : मी काही विचारलं ,बरं नाही आहे का तुला?
ऋतू अनपेक्षित होत त्याच असं विचारानं.
ऋतू :अ...हो ..नाही..मी ठीक आहे.
आरव :अच्छा.
ऋतू :तु तर ठीक आहे ना?
आरव :मला काय झालंय ,i 'm absolutely fine.
आरव च्या मनात मात्र विचार सुरु असतात ,काय करतोय मी काल पासून ?,काय होतय हे अस ? श्री आणि हिला पाहिलं तेव्हा श्री विषयी का जाणून घ्यायचं होत मला .जेव्हा तो घरा जवळ दिसला तेव्हा मी स्वतःहुन त्याच्याशी बोलला. मला का इतकं बर वाटल जेव्हा मला कळालं कि श्री हिचा भाऊ आहे तेव्हा तर भलताच खुश झालो आणि आता हिची काळजी पोटी क्लास मध्ये थांबलो.काय होतय हे यार जिचा इतका राग येतो नेहमी आता ती समोर असल्यावर बरं का वाटत?....

ऋतू : आरव, are you ok?
आरव:.......
ऋतू :आरव..
आरव : हा...काय होतय...i mean ..ते मी ..bye
आरव फार गोंधळून जातो म्हणून तिथून निघुन जातो.पण त्याला असं विचित्र वागताना बघून ऋतू ला काही कळत नाही .
ऋतू स्वतःशीच:  हा डोक्यावर पडला आहे का ? कधी कसा वागेल सांगता येत नाही .कठीण आहे.
ऋतू परत बेंच वर डोकं टेकवते.

canteen मध्ये :

श्री : चला काय खायचं तुम्हांला सांगा आज माझ्याकडुन.
आज 1st day आहे ना माझा.
वरुण :नाही आज माझ्याकडुन .आपल्या new friendship साठी plz आता नाही नको म्हणू.
श्री: ठीके but next time माझ्याकडून ok.
वरुण :done
तेव्हढ्यात तिथे आरव येतो त्या तिघांना बघून परत जायला वळतो पण श्री ला तो दिसतो .श्री त्याला हाक मारतो आणि यायला सांगतो. तो नाही म्हणत असतो पन श्री स्वतः जाऊन त्याला जबरदस्ती आणतो. आरव आधिच ऋतू च्या विचारात अस्वस्थ झालेला असतो. तो त्या तिघांबरोबर येऊन बसतो. त्याला बघून रिद्धी वरुण एकमेकांकडे बघतात .
आरव : श्री खरंच मला भूख नाही आहे यार.
श्री :बस रे चुपचाप. तस हि ट्रीट वरुण देतोय .
आरव :मग तुम्ही लोक करा continue मी निघतो.
आरव जायला निघतो पण वरुण त्याचा हात पकडतो.
वरुण :थांब ,तुही बस आमच्या सोबत.
आरव काही न बोलता बसतो. श्री ला थोडा अंदाज आलेला असतो कि नक्की काहीतरी झालय, काहीतरी बिघडलंय यांच्यात. तो पुढे बोलायला सुरुवात करतो.
श्री : वरुण तु ,आरव ,रिद्धी आणि ऋतू एकाच शाळेत होते ना?
वरुण : अ....हो .
श्री : अच्छा मग तुम्ही.....
श्री पुढे बोलेल तोच वरुण त्याच वाक्य तोडत बोलतो.
वरुण :मी order घेऊन येतो.
असं म्हणतं वरुण जातो.श्री ला कळते त्यालाही वाटते आता एकदम विचारणे बरोबर नाही ,निवांतपणे विचारू या आता च सर्वांशी ओळख झाली आहे.
थोड्यावेळाने वरुण order घेऊन येतो.3 चीझ वडापाव घेऊन येतो आणि एक साधा वडापाव घेऊन येतो.
श्री :अरे हा साधा वडापाव कोणासाठी .
वरुण आरव कडे बघतो आणि काही बोलत नाही .
आरव च्या चेहऱा खुलतो आणि तो पटकन वडापाव उचलतो.
आरव : माझ्यासाठी आहे हा ,ते काय मला चीज़ वडापाव नाही आवडत साधा वडापाव आवडतो ना म्हणून.
श्री : ओह्ह अच्छा ......मनातच,बहूत गेहरा याराना लगता हैं|
श्री हसतच दोघांकडे बघतो वरुण आणि आरव काही बोलत नाही.
अशाच गप्पा होतात ,तितक्यात श्री ला एक कॉल येतो तो कॉल घेण्यासाठी बाजूला जातो.
आरव :thanx .
वरुण : कशासाठी ?
आरव : वडापाव साठी .
वरुण : हा .....असु दे तस हि श्री आमचा नवीन मित्र झालाय आणि तुझा हि सो .....आपल्या वादा मध्ये उगाच तो नको आणि त्याला आपल्या वादा च कारण माहित पडलं तर .....
आरव: वरुण plz stop मी आधीही सांगितलं आहे तुला कि माझी काही चूक नव्हती आणि तु....
वरुण : plz मी म्हणतोय तु इथे तो विषय नको काढू.
रिद्धी : तुम्ही दोघ शांत व्हा plz .तो विषय नका इथे काढू श्री ला कळलं तर....
श्री : मला काय कळलं तर..
श्री तिथेच येत बोलतो .तसे तिघ एकमेकांकडे बघतात.
वरुण : अरे काही नाही ते बस आम्ही असं.
रिद्धी : चला आता ऋतू एकटी असेल class मध्ये.
श्री : अरे....ठीके ...आरव ऐकणा तु ऋतू ला माझ्या घरी सोडतो का ,मला गाडी घ्यायला जायचं आहे.
वरुण :तुझ्या गाडी ला काय झालं.
श्री : अरे माझी गाडी सर्व्हिसिंगसाठी गेली होती म्हणून मी आरव सोबत आलो आज.आताच फोन आलाय गॅरेज मधून    
मी कॅब ने जातो .
आरव :अरे चल ना मग सोबत जाऊ गॅरेज पर्यंत .
श्री : नाही रे ते outside ला पडत खूप वेळ लागेल मला आणि ऋतू ची पण तबीयत ठीक नाही आहे तर तु तिला सोड घरी मी लवकर येतोच .
वरुण :मी सोडू का नाहीतर तिला .
वरुण असं बोलताच आरव त्याच्या कडे रागाने बघतो.
श्री : नाही रे आरव सोडेल तिला ,आणि तो माझ्या शेजारी च राहतो.
वरून :ठीके
श्री तिथून घाईत निघून जातो. इकडे आरव वरुण ला थांबवत बोलतो.
आरव : तुला काय मी इतका वाईट वाटतो का.जरा हि विश्वास नाहीये माझ्यावर.
वरुण : विश्वास अन तुझ्यावर .
आरव : जाऊदे तुला बोलून काही उपयोग नाही. तुला मी नेहमी वाईटच आहे असंच वाटते.tension नको घेऊ तुझ्या मैत्रीण ला सुरक्षित पोहोचवले.
असं बोलून आरव तिथून निघून जातो.
रिद्धी : जाऊदे ना यार किती दिवस तुम्ही लोक असं भांडणार झालं ते गेलं आता .परत उगाच त्याच  गोष्टी करून कशाला वाद करताय.
वरुण : तो जेव्हा त्याची चूक मानेल तेव्हा.
असं म्हणतं तिला चूप करतो .ते दोघ क्लास मध्ये येतात .lecture चालू असत.ऋतू ला श्री दिसत नाही म्हणून ती रिद्धी ला ईशारा करते .रिद्धी तिला नंतर बोलू असं म्हणते.
lecture संपल्यावर सर्व कलास च्या बाहेर येतात .
ऋतू : काय गं ,हा श्री कुठंय?
रिद्धी : तो त्याची कार आणायला गेलाय .
ऋतू : कुठे ,घरी ....
रिद्धी :नाही गं,गॅरेज ला ....त्याची कार सर्व्हिसिंग ला गेली होती ना ती आणायला गेलाय.
ऋतू : मग असं lecture बंक करून जायचं का .थांब त्याला सांगावं लागेल हा असा बेशिस्तपणा नाय करायचा ते
रिद्धी : बस परत सुरु नको होऊ हा आताच lecture पुरे होत मला .तु त्याला एेकवशील तुज़ lecture. माझी energy संपली हा.
ऋतू : ओय मी बरोब्बर बोलतेय हा .आज first डे आणि बंक डे पण .फोनच करते त्याला.
ती फोन करतच असते तेवढ्यात वरुण तिथे येतो.
वरुण :लवकर निघ आरव वाट बघत असेल पार्किंग मध्ये.
ऋतू: अच्छा........कायय...तो
वरुण :हो श्री ने सांगितलं आहे त्याला कि तुला त्याच्या घरी सोड म्हणून.
ऋतू : अरे यार, काय हा श्री पण ...
ऋतू जरा नाराज होतच बोलते .
वरुण : तुला नाय जायचं असेल त्याच्या सोबत तर चल मी सोडतो तुला .
ऋतू : नाय रे ,तसा काही प्रॉब्लेम नाही मला .पण त्याला असला तर..
वरुण : मला नाय वाटत
ऋतू :काय ?
वरुण :हेच कि त्याला काही problem नसेल.
ऋतू : ह्ह्ह...
वरुण ,रिद्धी आणि ऋतू पार्किंग पर्यंत येतात पण तिथे आरव नसतो ,त्याची कार असते.ते खूप वेळ त्याची वाट बघतात.
वरुण :हा काय आज कॉलेज मधेच मुक्काम करतोय का ?
रिद्धी : हान यार किती वेळ झाला .सर्वजण निघाले हा कुठे गेला .
ऋतू : होना lecture ला पण नव्हता ...एक कामं करा तुम्ही दोघ निघा येईलच तो.उगाच तुम्हाला उशीर..
रिद्धी : गप गं , आम्ही तुला असं एकटं सोडून जाणार का?
वरुण : नाय तर काय ? ते पण आरव सोबत मुळीच नाही.
रिद्धी :same here
ऋतू : बस करा रे ,तो इतका वाईट नाही आहे .मी तुम्हांला आधीही सांगितलं आणि आता परत सांगते कि त्याला माझ्याशी प्रॉब्लेम आहे पण तो माझ्या बद्दल वाईट विचार करतो हे मी नाही म्हणणार.
रिद्धी :तु हे बोलतेय ,विसरली का ?त्याच्यामुळे ......
ऋतू : रिध्धे please ,जे झालं त्यात कोण चूक आणि कोण बरोब्बर हे आपण नाही ठरवू शकत .नाण्याच्या दोन बाजू असतात एक आपण पाहत असतो पण दुसरी बाजू नाण पलटल्यावरच दिसते .यासाठी जे झालं त्यासाठी मी आरव ला कधीच blame नाही केले कारण मला वाटते कि तो तुम्ही समजता तसा नाही आहे त्याचा स्वभाव थोडा वेगडा आहे . त्याचं माझ्याशी नाही जमत म्हणून तो माझ्यासोबत काहीही करेल हे मी नाही मानत.
रिद्धी : वाह....काय मस्त भाषण होत .
ऋतू : i'm serious
रिद्धी : चाल i c u मध्ये.
ऋतू :काय..अप्रतिम.......पांचट  joke...पण सद्या मूड नाही आहे.
रिद्धीच लक्ष्य वरुण कडे जाते .तो विचारात हरवलेला असतो .
इकडे कार च्या मागे आरव हे सर्व ऐकत असतो.त्याच्या मनात विचारांच काहूर मांजल होत. डोळ्यातून नकळत अश्रू ओघळत गालावर आला .इतका वेळ शाळेचे दिवस आठवत बसलेला आरव ह्या तिघांचे बोलणें ऐकत असतो.आपल्या हातात असलेल्या फोटोशी मनातच बोलत असतो.
आपण ज्या मुलीचा नेहमी द्वेष केला ,तिला नेहमी चुकीच समजलो,ती आज, आज आपल्या विषयी तिच्या फ्रेंड्स ला समजावते .मला नेहमी वाटायचं ह्या जगात तु आणि वरुण मला खूप चांगलं ओळखता पण तु तर निघून गेली आणि वरुण त्याने हि मला मी चुकीचा आहे हेच मानलं .जिच्याशी मी कधी नीट नाही बोललो ,ती म्हणते कि मी वाईट नाही. मी तिला ओळखन्यात चूक तर नाही केली ना ,सांग ना ,......मनातल्या मनात बोलत त्याने तो फोटो ह्रदयाजवळ
पकडला .....काही वेळाने स्वतः ला सावरत त्याच्या मूड मध्ये येण्याचा प्रयत्न करू लागला.तो फोटो पॉकेट मध्ये ठेवला आणि उठला .त्याला तस कार मागून येताना बघून रिद्धी ने ऋतू ला ईशारा केला .आरव समोर आला त्याने चेहऱ्यावर गॉगल घातला होता .आला तसा गाडीत जाऊन बसतो, गाडी काढतो आणि ऋतू जवळ थांबवतो.
आरव : ये बस उशीर होतोय .
तिच्या कडे न बघता बोलतो. ऋतू ला थोडं विचित्र वाटते पण ती रिद्धी आणि वरुण ला बाय करते आणि मागच्या सीट वर बसू कि पुढे हा विचार करत थांबते.आरवच्या लक्षात येत तो पुढचा दरवाजा उघडतो.ती मध्ये येऊन बसते .तिला फार विचित्र feel वाटत होत .awkward वाटत होत.आरव ने गाडी स्टार्ट केली आणि जाऊ लागले.
रिद्धी च लक्ष्य वरुण कडे जाते .
रिद्धी : वरुण इथेच राहायचं आहे का .....वरुण
वरुण :अ...हा काय ग.
रिद्धी : कुठे हरवला होता.
वरुण : भूतकाळात .
रिद्धी :काय ....हि काय टीव्ही सिरीयल आहे का कि भूतकाळ आठवायला .........वेडा
वरुण :रिद्धी आपण आरव च्या बाबतीत काही चूक तर नाय केली ना....म्हणजे त्याला समजण्यात ...जसं ऋतू बोलली.
रिद्धी : मला नाय वाटत हा ...तुझा फ्रेंड होता तो म्हणून तुला असं वाटतंय ....आणि ऋतू ,ती आणि तीच लॉजिक माझ्या डोक्यावर जाते...मला फक्त एव्हडं माहित आहे कि त्याच्या मूळे मी माझी बेस्ट फ्रेंड गमावली असती.जाऊदे तु कर विचार तिच्या बोलण्याचा मी निघते.
रिद्धी ,वरून आपाआपली गाडी काढून निघतात.

इकडे गाडी मध्ये दोघ हि शांत असतात.
गाडी मध्ये ac full चालू असतो.ऋतू ची  आधिच तबियत खराब असते ,त्यात full AC तिला जास्त अस्वस्थ वाटत होत . तिचे हातपाय कापायला लागतात .आरव च तिच्याकडे लक्ष्य जात तसा तो AC बंद करतो.तिला थोडं बरं वाटते .
आरव :sorry
ऋतू चमकून पाहते .....
ऋतू : its ok
आरव : तुला बरं नाही ये का ?
ऋतू : नाही बस थोडं
आरव : काय थोडं
ऋतू : ते डोकं दुखतय .
आरव :मग पेनकिलर घे .
ऋतू : नाही इट्स all right .
आरव त्याच्या बॅग मधून डोकं दुखायची गोळी देतो.आणि त्याच्या bottel मधलं पाणी तिच्या पुढे नेतो .
ऋतू : अरे मी काही न खाता कसकाय घेऊ.
आरव : म्हणजे तु सकाळ पासून काहीच खाल्लं नाही .
ऋतू : नाय नाश्ता केला होता.
आरव : थांब एक minute
तो त्याच्या बगेतुन एक पॅकेट काढतो .
आरव : हे खा
ऋतू : नाही रे उगाच तु पण...मि ठीक आहे ...really
आरव : तु खा गं चुपचाप .
ऋतू ते पॅकेट उघडते त्यात एक मेयोनिज़ वडापाव असतो.
ऋतू ला आवडणारा .ती पण तो खाउन घेते आणि गोळी घेते .
ऋतू:   तुझ्याकडे  हि गोळी...म्हणजे कशी ....तुला
आरव : ती मेडिकल मधे मिळते.आणि ज्यांच्याकडे डोकं असते त्यांना गरज पडते ह्या गोळी ची.
ऋतू मनातच...काय पांचट joke hota.
थोडया वेळाने ऋतूच बोलते.
ऋतू : thank you आरव
आरव : फ्रेंडशिप मध्ये thank you म्हणायच नसते.
ऋतू  ला आश्चर्य चा चांगलाच धक्का बसला .

क्रमशः

(पुढचा भाग लवकरच ....... थोडा जास्त वेळ घेतला भाग पोस्ट करायला त्या बद्दल माफ करा .....आणि हा भाग कसा वाटला नक्की सांगा )

Yogini Chaudhary.

🎭 Series Post

View all