तुझी साथ 2

Marathi katha

ती तशीच उठायला लागते तर कुणी तरी तिला हात देत....

पुढे..

श्री.....तु ..इथे कसा आणि केव्हा ? ऋतू श्री चा हात पकडत उठते.
'तु जेव्हा साष्टांग नमस्कार घालत होती तेव्हा, श्री तिची बुक्स उचलत बोलतो.
'अरे पण अचानक माझ्या कॉलेजला,तु तर पुण्याला होताना मग औरंगाबाद ला कसा आला ',ऋतू आश्चर्याने विचारात होती.
'तिथून तर चालत नाही आलो पण घरापासून बाईक ने अँड पार्किंग पासून इथे पायाने.'श्री मस्करी करत बोलला.

'फार बकवास होता जोक' ऋतू वाकडं तोंड करत बोलते.'तुझ्या सांगत चा परिणाम आहे हि ...ही ...ही'
श्री हसत म्हणतो.आणि ते तसेंच बोलत जातं असतात आणि इकडे आरव च पूर्ण लक्ष त्यांच्या कडे असत.
कोण असेल हा ? हा प्रश्न डोक्यात घुमत असतो.

'रिद्धी ,वरून हे बघा आपला न्यू फ्रेंड अँड माझ्या मावशीचा मुलगा श्री 'ऋतू श्री ची ओळख करून देते.
'हाय श्री ,दोघ

Actually त्याच आजच ऍडमिशन झालय ,म्हणजे हा हॉस्टेल ला राहायचा आधी पुण्याला पण आता मावशीची तब्बेत् खराब होती आणि काका कामा निम्मित्त बाहेर देशात गेले आहे म्हणून याला इथे ऍडमिशन घ्यावं लागलं.' ऋतू ने सांगितले.

'ओह्ह अच्छा  don't worry bro be comfortable 'वरुण श्री ला हात मिळावीत बोलला.
'चला रे मला भूक लागलीये काही तरी आणा' ऋतू बुक्स बॅग मध्ये ठेवत बोलली.
'हो गं भुकडं माहित होत मला आल्याआल्या भूक भूक करशील 'रिद्धी उठत च् म्हणाली.
'ओह माझी क्युट फ्रेंड किती चांगलं ओळखते मला,आता जा लवकर,' ऋतू हसत बोलते.....

'चला मी निघतो उद्या येतो कॉलेज बाय, आणि चिऊ तुला कल मी पिक करतो.' श्री ऋतू ला उठत बोलला.
'नाही ती माझ्या सोबत येते.'रिद्धी त्याला थांबवत बोलली .
'श्री तस हि तुला रस्ता उलट पडेल,राहूदे आम्ही सोबत येतो रोज' ऋतू लगेच बोलली.
'वाह क्या दोस्ती हें ,सकाळी तर ह्या मुद्द्यावरुन भांडत होत्या,हा' वरुण चेष्टा करत म्हणाला.
’तु गप्पे ,आम्ही दोघी मध्ये नको पडू' रिद्धी
'हो बाई तुमच्या मध्ये पडून डोक्याचं खोक नाय करायचं मल' वरून हसत म्हणाला.यावर श्री पण हसायला लागला.
'तुम्ही चालू द्या मे जातो ,भेटू उद्या,बाय' श्री .
………........
______
कॉलेज संपल्यावर तिघ् जायला निघतात.वरून बाय करून निघतो आणि रिद्धी गाडी घ्यायला पार्किंग मध्ये गेली. ऋतू गेट जवळ उभी होती.आरव आपल्या कार मधून जात असतो ,त्याची नजर ऋतू वर पडते ती फोन वर बोलत असते ,त्याच लक्ष तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर जाते तिला तिथे खरचटले होते. तो तसाच कार थांबवून तिला बघत असतो, त्याने कार गेट च्या मधेच् थांबवली होती .मागून मुलांचे आवाज आले गाडी काढण्यासाठी,तोच तो तन्द्री तून बाहेर आला .आणि गाडी स्टार्ट करून निघून गेला.
'हो आई बस 10 मिनिटात आलोच' ऋतू फोन कट करते.
तेवढयात रिद्धी येते.आणि त्या घरी जायला निघतात.

रिद्धी ऋतू ला तिच्या घरी सोडून निघते.

'मम्मी, कठे गं तु ,? ऋतू रूम मध्ये जातच बोलते.
'इथेच आहे कुठे जाऊ ,तुम्ही बापलेक् कुठे जाऊ देतात का?,एकाच शहरात राहतो तो तरीही आम्ही बहिणी 2 महिन्यापासून नाही भेटलो' . आई जरा वेतागत बोलली.

'आई आपण उद्या जाऊया मावशी कडे ,आणि तुला माहिती आहे श्री ने माझ्याच कॉलेज ला ऍडमिशन घेतलं' आहे.' ऋतू किचन मध्ये आली
'काय? मला तर ताई काही बोलली नाही ,आणि इथे का घेतलं ऍडमिशन,म्हणजे पुणे सोडून इथे का?'आई ने बद बद प्रश्नांची बरसात केली.
'अग मम्मी दम घे जरा उद्या जाऊना आपण मग मावशी ला विचार'ऋतू  ने मावशी आजारी आहे बोलन टाळलं.

'अप्पा केव्हा येणार ?ऋतू
'हो येतीलच थोड्या वेळात ' मम्मी.

मम्मी टोमॅटो चिरत होती, ऋतू ताटातील टोमॅटो खायला हात पुढे करते.
'चिऊ... ऊ हातपाय धु आधी मग खा ',आई ओरडत बोलते.
'काय यार मम्मी तु पण' ऋतू नाक मुरडत जाते.

रात्री 8 वाजता सर्व जेवत असतात.

'मम्मी काय मस्त केलीय गं खिचडी ...वाह! ऋतू
हम्म .....आई
'पापा आपण उद्या मावशी कडे जाऊया ना' ऋतू
'हो जा तुम्ही दोघ' पापा
'तुम्ही पण चला ना ,मावशी ला बरा वाटेल आपन सर्वाना बघून,' ऋतू
'ठीके मी बघतो जमलं तर येतो' पापा
'मम्मी उद्या श्री च्या आवडीचं काही बनून घेशील हा' ऋतू
.......
मम्मी ....कुठे हरवली आहेस.' ऋतू
'हा ...काय गं ,आई ची तंद्री तुटली.

'काय येवढा विचार करतेय तु मी केव्हाची बोलतेय' ऋतू 'काही नाही गं जेव गुपचूप',आई तिला टाळत बोलली.
पण ऋतू चे बाबा ना समजलं होत .

जेवण झाल्यावर ऋतू रूम मध्ये जाते आणि फोन चेक करते .स्कूल ग्रुप वर काही शाळेचे फोटो टाकलेले असतात.ते बघता बघता तीच लक्ष आरव च्या फोटो कडे जाते .आणि पाहतच बोलते ' काय प्रॉब्लेम आहे तुझा ,का इतका चिडतो काय माहित ,मी तर इतक दूर राहण्याचा प्रयत्न.वाटेला सुद्धा जात नाही पण तरीही ह्याला का माझा इतका राग येतो .शाळेत पण तेच आणि आता कॉलेज मध्ये पण तेच .कडू कारल,' ऋतू तोंड वाकडं करून फोन ठेवते.
आणि झोपी जाते.

सकाळी 8:30 वाजता

'चिऊ उठ 8:30 वाजले मग घाई करते ' आई वैताग आणत बोलली.
बस 5 मिनिट ....ऋतू तोंडावर ब्लँकेट घेत म्हणाली .

उठ लवकर चिमणे ......आई ने तिच्या अंगावरून ब्लँकेट काढलं .
mummmy plz.... ऋतू डोळे चोडत बोलली.
'उठ जा बाथरूम मध्ये' मम्मी रूम बाहेर जात म्हणाली.

'यार मम्मी जरा वेळ झोपू दे ना गं',ऋतू डोळे उघडून मम्मी गेली हे बघून परत लेटली .
'चिऊ ये, चहा घे झाला का ब्रश', मम्मी कामं करत ओरडली.
आवाज नाही आला आणि परत गेली रूम मध्ये तर चिऊताई मस्त झोपल्या होत्या .
चिऊ ऊ ऊ...आई जोरात ओरडली.
आई चा चढलेला आवाज ऐकून ऋतू खळबळून उठली .आणि बाथरूम मध्यें पडाली....

...
.....
आई नाश्ता तयार झाला का?  दे पटकन नायतर रिद्धी आली कि ओरडेल.' ऋतू टेबलं वर बसत बोलली.
'आज लवकर कसकाय जातेय'. आई
'अग आज प्रॅक्टिकल आहे ना म्हणून ,हि रिद्धी आली का मम्मी बाहेर बघ जरा .ऋतू

नाही आलीये अजून नीट आणि हळू खा ',आणि लवकर ये जायचं आहे मावशी कडे .' आई
'अ..हो मम्मी मी श्री बरोबर डायरेक्ट येते मावशी कडे ' ऋतू

' ठीके तुम्ही या दोघ. तुझी आई आणि मी येतो मग .' पापा
तुम्ही येणार नक्की ?  ऋतू ची आई तिच्या बाबाकडे पाहत म्हणाली.
हो ' पापा

बाहेरून रिद्धी चा आवाज येतो आणि ऋतू बेग उचलुन पळते .

तुम्ही खरच येणार का? ' सुनीता(ऋतू ची आई)

हो.....तस हि ताई आजारी आहे तुझी चिऊ ने आपल्याला नाही सांगितलं आणि त्यांच्या तबेत पुढे कोणतीच गोष्ट महत्वाची नाही. सुनील (ऋतू चे बाबा)
हे ऐकून सुनीताबाई चे डोळे पाणावले .

'बस आता गंगा नको वाहू तयारी कर आणि ताई साठी काहीतरी बनवुन घेऊन चल त्यांना बर वाटेल' सुनिल राव

हो ........सुनिताबाई थोड़ हसत

इकडे ऋतू आणि रिद्धी कॉलेज पोहचल्या. रिद्धी गाडी लावायला गेली.ऋतू तिची वाट बघत उभी होती.तोच तीच लक्ष समोर येणाऱ्या कार कडे गेलं, आणि ती शॉक मध्ये बघत होती.

चिमणे बाजूला हो अशी रस्त्यात का उभी आहे.' श्री कार मधून उतरत बोलला.
'तु यांच्या सोबत कसा काय ' ऋतू आरव कडे बघून श्री कडे बघते.

'अग आरव आमचा शेजारीं आहे ,काल संघ्याकाळी ओळख झाली ,आणि मग मला समजलं हा पण ह्याच कॉलेज ला आहे what a coincidence ! ना . श्री
हा .....ऋतू चा तर चेहरा उतरला मनातच ,आता हेच बाकी होत ,देवा कधी ह्याचा पिच्छा सुटेल काय माहित.

चिऊ उ उ ....श्री तिला हलवत बोलला .
तसा आरव ओठ दाबून हसायला लागला .
श्री dont call me chiu ....plz' ऋतू चिडत बोलते .
'ठीक आहे इतक का चिडते गं ,श्री

'काहीं नाही चल प्रॅक्टिकल ला लेट होतय , ऋतू रागात निघून गेले.
'हिला काय झालं' श्री आरव कडे पाहत बोलतो .
ती तशिच आहे ज्या गोष्टी कडे लक्ष्य द्यायच त्याकडे नाही देत आणि जिथे नाही द्यायच त्यावर चिडते,' आरव ती गेलेल्या दिशेकडे पाहत म्हणतो.

तुला कसं माहित ?, श्री तिरप्या नजरेने त्याला बघतो .
'अरे ती शाळेत होती माझ्या सांगितलं होत ना तुला.' आरव आपण काय बोलून गेलो ह्याची सारवसरव् करत.

अरे श्री हाय ,रिद्धी आली आणि आरव ला बघून ती ला नवल वाटत .
'हाय चल लवकर आज् पहिला दिवस आहे उशीर नको व्हायला मला.' श्री

सर्व लॅब मध्ये येतात तिथे आपापल्या डेस्क जवळ जातात .

प्रॅक्टिकल झाल्या नंतर रिद्धी ऋतू जवळ येते .
का गं हा आरव आणि श्री एकमेकांना ओळखतात का?

हा ...ऋतू
मग ??? रिद्धी
मग काय? ऋतू
तुला काही फरक पडत नाही.' रिद्धी
हे बघ मला आधीही त्याचा काही problem नाही होता आणि आता हि नाही आहे,बस ,'ऋतू तिला स्पष्ट बोलून बेग उचल जायला लागली .

lecture सुरु व्हायला वेळ होता .सर्व क्लास मध्ये आले आज आरव मागच्या बेंच वर नाही पुढे श्री बरोबर बसला होता.वरुण फक्त श्री शी बोलत होता आरव कडे त्याने दुर्लक्ष केले.हे श्री ला हि जाणवले ,नक्की काहीतरी problem आहे कारण एकाच शाळेतुन आहेत हे चोघे पण असे का वागताय आरव शी.

चा फोन वाजतो आणि तो विचाराच्या तन्द्री तून बाहेर येतो.
....
हो आई
...
ठीके मि तिला सोबत घेऊन येईल.
......
हो बाय

फोन ठेवता च तो
ये चिऊ तु मला सांगितलं नाही कि मावशी आणि काका आज घरी येणार आहे.' श्री
अरे surprise होत ना म्हणून,' ऋतू
'ठीके सोबत जायच आहे हा आपल्याला माझ्या घरी 'श्री

हो...ऋतू
आरव तुला काही प्रॉब्लेम नाही ना ऋतू आपल्या बरोबर आली तर', श्री
नाही रे मित्रा नो problem ,'आरव ऋतू कडे नजर टाकत बोलला.

ऋतू काहीशी थकलेली वाटत होती आणि आज खूप शांत पण होती तिला काय होतय हे तिलाच समजत नव्हते.आज तिने कॅन्टीन ला पण जायच टाळलं .
चाल गं काही खाउन् घे ,रिद्धी तिचा हात ओढत बोलली.
'नाय न यार तुम्ही सर्व जा मी नाही येत '.ऋतू बेंच वर डोकं ठेवत बोलली.
चिऊ काय होतय तुला ? श्री काळजी ने म्हणाला .
अरे काही नाही मला थोडा वेळ डोळे बंद करून बसू दे तुम्ही लोक जा , ऋतू
ऋतू ने सर्वांना शेवटी जायलाच लावले.पण आरव त्याच्या मित्रांशी बोलत क्लास मधेच थांबला.

ती बेंच वर डोकं ठेऊन होती .तोच कोणीतरी बोललं.
बरं नाहीये का ? ????
हम्म्म्म......ऋतू
तिला आवाज ओळखीचा वाटला,तिने पटकन मानवर करून पाहिलं .....

क्रमशः

(आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. काही चूक झाली असेल तर लहान समजून माफ करा.)

Yogini chaudhary.

🎭 Series Post

View all