तुझी साथ 1

Marathi katha

तुझी साथ1

चला आज तुम्हांला घेऊन चलते ऋतू च्या प्रवासात तिची साथ द्यायला.एक अशी मुलगी जि वेळे ला महत्व देते पण सकाळी मात्र उशिरा उठते,हुशार ,थोड कमी बोलते,दिसायला सुंदर थोडी उंची कमी .एका सामान्य कुटुंबातील आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी.ऋतू चे स्वप्न  आपल्या आई वडिलांना अभिमान व्हावा असं काही करून दाखवायचं होता . नुकताच 11वी ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता .तर ऋतू ची ओळख तर झाली आता पुढें प्रसंगातून बाकीचे पात्रांना भेटूया .

रिद्धी  ' ये ऋतू चल ना किती वेळ लावशील यार .'रिद्धी बराच वेळ ऋतू च्या घराबाहेर स्कुटी वर बसली होती पण ऋतू मॅडम जेवत होत्या.
ऋतू : हो गं झालच माझं बस 5 मिनिट.
' त्सुनामी जरी आला ना तरी हि जेवण करुन च मरेल' रिधी स्वतः शीच पूटपूटली .

'लवकर उठायचं नाही आणि मग उशीर झाला कि असं घाईघाईत जेवायचं' ऋतू ची आई सुनीता रागात बोलत होत्या ,पण ऋतू बाई तर खाण्यात मग्न होत्या .
'मी काही बोलतेय चिऊ( ऋतू) तुला 'आई ओरडली.
'हो गं आई ऐकते मि तु बोल' ऋतू बाई पटापट जेवत बोलल्या.
'मी काय भजन करतेय का ऐकायला तुला,देवा कसं होणार या पोरीचं 'आई डोक्यावर हात मारत बोलली.
'आता तु कॉलेज जातेय बदल जरा मोठी होतेय तु'

'होणा गं मम्मी थांब जरा 'ऋतू .

'काय थांब ?'आई.
'इथेच थांब मि मोठी होऊन येते.' ऋतू

काय्य्य? आई
'अग बाई कॉलेज जातेय ग बाय येते लवकर' ऋतू
आई काही बोलणार तो पर्यंत ऋतू जेवणाचे ताट ठेऊन बेग उचलून पडाली.

'काय गं किती वेळ चल उशीर झालाय आधीच्, रिद्धी गाडी सुरु करत बोलली .
'होहो चल सॉरी हा 'ऋतू बसत बोलते.
'सॉरी ची बच्ची उद्या जर असं केलं ना तर मि निघून जाईल मग ये सायकल ने' रिद्धी रागात बोलते.
'चालेल कि मला पण तेच पाहिजे' ऋतू हळू आवाजात बोलली.
'काय बोल्ल्लिस 'रिद्धी ला ऐकू नाही आलं.
'अग हेच कि ....फास्ट चालव जरा' ऋतू

कॉलेज च्या गेट वर रिद्धी तिला उतरवुन गाडी लावायला पार्किंग मध्ये जाते.

थोड्या वेळाने त्या दोघीं क्लास मध्ये जातात .लेक्चर सुरु व्हायला 10 मिनिटे बाकी होती.
'काय गं एव्हढा उशीर?'
वरुण ने रिद्धी ला आल्या आल्या विचारलं.
'अरे ह्या चिऊ ताई दाना खात होत्या म्हणून' रिद्धी तिच्या मागे असलेल्या ऋतू कडे बोट दाखवत बोलल्या.

'ओय बरोबर वेळेवर आलोय आपण ,तस पण एव्हढ्या अर्धा तास आधी येऊन काय करणार .' ऋतू
'अच्छा बेटा ये मग उद्या सायकल ने अर्धातास आधिच निघशिल बरोबर .' रिद्धी .
'हो येते कि तु नको येऊ  मी थोड़ी ना बोलले कि ये घ्यायला'
ऋतू रागात मागच्या बेंच वर जाऊन बसली .
'अग मागे कुठे बसतेय् ये पुढे बस .वरुण ऋतू ला बोलावतो.
मला सवय आहे स्कुटी वर  पण मागे बसते मी.' ऋतू रागात तोंड वाकड करत रिद्धी कडे पाहत बोलली.
रिद्धी पण काय हार मानतेय् ' होका मग पुढे बसण्यासाठी स्कुटी चालवायला शिकावं लागत '.
ऋतू काही बोलेल तेवढ्यात सर वर्गात आले.
आणि सर्व शांत झाले .
सर्वांनी 'good morning sir'......
.....so students today .......(lecture चालू होत  maths च कोणाला झोप येत होती तर कुणी बेंच खाली  लपवून फोन चालवत होत .इकडे ऋतू आणि रिद्धी अधूनमधून एकमेकांस रागीट नजर ने पाहत होत्या .तेव्हड्यात वर्गाच्या दारात एक मुलगा येऊन उभा राहिला .
'May I come in sir '....??
Yes come ....sir
तो मुलगा सरड मागे जाऊन बसला ऋतू च्या बेंच शेजारी कारण तिथे त्याचे अन्य मित्र सुद्धा होते.
ऋतू चे या कडे लक्ष नव्हते.ती सम सॉल्व करण्यात व्यस्त होती.पण रिद्धी आणि वरुण त्याला रागात बघत होते.

तो मुलगा येताच त्याचे मित्र गप्पा मारायला लागले . ऋतू चे लक्ष गेलं तो मुलगा तिच्या कडेच बघत होता ,तिने परत वहीत तोंड घातलं .तिला बघतच मित्रांना बोलला 'हि आज मागे कशी काय ....बॅकबेन्चर व्हायचं का आता.आणि हसायला लागला ......why are you laughing ....2nd last bench ......sorry sir.....

Lecture संपताच ऋतू उठून रिद्धी कडे गेली.आणि चेहरा पाडून् म्हणाली,'sorry रिध्धे मी त्रास देते ना खूप .प्लीज सॉरी .
'जाऊदे तुझ पण तर बरोबर आहेना वेळेचं 'रिद्धी
होणा ,ठीक आहे मग ह्याच् वेळेवर यायचं .' ऋतू हसत बोलते.
'तु ...ना ...नाही सुधारणार 'रिद्धी तिला मारत बोलते.
तुम्ही दोघ पण ना आतातरी असं भांडण सोडा आपण 11वी ला आहोत शाळेत नाही' वरुण त्यांच्या बेंच जवळ जात बोलला .
'अरे हो आम्हाला माहीतच नव्हतं 'ऋतू रिद्धी ला टाळी देत बोलली .
'वरुण अरे आम्ही पण आहेत बर विसरू नको, तो मुलगा वरून ला हाक मारत बोलला.
'अरे हो तु कसाकाय लेट आज '?  वरून खोटं हसत बोलला.
'मित्रा आपण कॉलेज ला येतो शाळेंत नाही 'तुम्ही लोक वाटते शाळेतून नाही निघाला अजून .' तो एक नजर ऋतू वर टाकत बोलला.

'शाळा असो वा कॉलेज वेळेच महत्व असावं लागते जाऊदे भावा तुला नाय समजणार ,' वरुण बोलला आणि पुन्हा पुढे पाहायला लागला ............

'ऑफ लेक्चर आहे चला library मध्ये जाऊ या' ऋतू रिद्धी आणि वरुण ला म्हणते .
'अग तूच जा आम्ही कॅन्टीन जातोय तुझ काय,तु आलीयेस  खाऊन ' रिद्धी
'ठीक आहे बुक्स घेतले कि येते मी ' ऋतू जायला निघते आणि दुसऱ्या बाजूने तो मुलगा सुद्धा निघत असतो .नकळत दोघांना एकमेकांचा धक्का लागतो .
'दिसत नाही का तुला ' तो ऋतू ला रागात म्हणतो.
ऋतू फक्त सॉरी बोलून त्याच्या कडे न बघता निघून जाते.

त्याला तिचा राग येत असतो ,तो तसाच तिथून रागात बाहेर जातो.
हे सगड रिद्धी आणि वरून बघत असतात .
'यार इथे पण चालू होईल का यांचं भांडण',शाळेत तर कंटाळा आला होता, आता इथे पण ' रिद्धी वैतागुन बोलली.
'होणा माहित नाही आरव ला काय प्रॉब्लेम आहे ऋतू चा ,त्याच्या अश्या वागण्याने आमची घट्ट मैत्री तुटली.' वरुण
'वर्गात मॉनिटर व्हायचं असो वा कोणताही कारण असो नेहमी तिला त्रास द्यायचा , खूप जळतो रे तो ,' रिद्धी
'पण शाळेत हि ऋतू ने इग्नोर केलं आणि इथेही तेच करतेय, आणि मुळात ती चुकीची नव्हती म्हणून मि नेहमी तिला सपोर्ट केला .' वरुण
'पण या सगड्यात तुमची फ्रेंड्सशिप तुटली,'रिद्धी

'तसा वाईट नाही गं तो ,फक्त तिच्या बाबतीत चुकला जर तिला नीट ओळखल असत ना त्याने तर नक्कीच आपल्या हुन जास्त हा जवळ चा फ्रेंड असता तिचा ' वरुण
'ते तर आहे , पण आता उठ आणि चल नायतर ती महामाया  आपल्याआधी पोहचेल कॅन्टीन ला 'रिद्धी
हो चल ' वरुण

तर आपल्याला माहित झालं असेल कि तो मुलगा कोण होता ,तो होता आरव देशमुख उंच ,गोरा ,रुबाबदार,एका श्रीमंत बापाचा लाडावलेला मुलगा, त्याला जि गोष्ट हवी असते ती त्याला कशीही करून मिडवायची असते.खूप हट्टी पण मनातून इतकाही वाईट नसतो बस त्याच्या जीवनात एक कमी  आहे ज्यामुळे तो अश्या स्वभावाचा असतो.
.आरव ,रिद्धी ,वरून ,ऋतू एकाच शाळेत होते.पण आरव हा रिद्धी ,ऋतू,वरून चा मित्रा नव्हता कारण त्याला ऋतू शी प्रॉब्लेम होता तो म्हणजे तीच अभ्यासात परफेक्ट असणं ,वर्गात मॉनिटर तर आरव असे पण मॉनिटर चि कामं जास्त तीच करी कारण सर आणि मॅडम तिच्यावर खुश होत्या यामुळे आरव ला तिचा राग यायचा .तो मुद्दाम असं काही करायचा कि त्यामुळे ऋतू ला त्रास होईल .वरून आरव फ्रेंड्स होते ते पण बेस्ट फ्रेंड्स पण त्याच्या अश्या वागण्याने वरून आणि त्याची मैत्री तुटली .याच कारण हि आरव ऋतूला च मानतो.

ऋतू बुक्स कॉलेक्ट करून कॅन्टीन कडे जात असते तेवढ्या तिच्या पायाला ठेचं लागते आणि ती जोरात पडते.
तिचे सगडे हातचे पुस्तकं बाजूला पडतात.
आसपास चे तिला हसायला लागतात पण ती त्यांच्याकदे बघते तेव्हा शांत होतात, तिथे आरव पण असतो तो हि जोर जोरात हसत असतो .पण तीही अचानक स्वतः च्या अश्या पडल्यावर हसायला लागते. तिला हसताना बघून सगडे परत हसायला लागतात पण आरव मात्र शांत होतो.तिच हसणं बघत बसतो.

पागल स्वतः च्या पडण्यावर हसते ,बधिर, आरव मनातच बोलतो आणि नकळत त्याच्या ओठांवर स्मित हसू येत.

ती तशी उठायला लागते तोच कुणी तरी तिला हात देत.....
क्रमशः

(कोण असेल ज्याने ऋतू ला हात दिला ? आरव आणि ऋतू ची मैत्री होणार कि भांडण होणार? पाहू या पुढच्या भागात....)

नमस्कार सर्वाना, "तुझी साथ " चा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा ,तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे.हि मैत्री ची आणि प्रेमाची कथा आहे त्यासोबत हि प्रेरणादायी कथा पण आहे ते पुढे समजेल .हि एक काल्पनिक कथा आहे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही .काही चुकलं तर माफ करा .
????..Yogini chaudhary ..