तुझे माझे जमेना.... भाग तीन

Tuze Maze Jamena Bhag Teen
*तुझे माझे जमेना.... भाग तीन*


ही एक काल्पनिक कथा आहे. सर्व वाचकांना विनंती आपला अभिप्राय आवश्य द्या.


सोप आहे ते आयुष्य काय? सरळ असेल तो संसार कसला? नाविण्या चा त्रास, संघर्ष अजून वाढत चालला.... हा किस्सा नाविण्या च्या मनावर खोल घाव करून गेलेला. ज्या कंपनीत नोकरी करत होती. कायमस्वरूपी झाली होती. याच कंपनीच्या मोठ्या शाखेत (प्लॅन्ट) 15 दिवसा करता बदली झाली. आता ही शाखा घरापासून लांब होतीच. जाण्या येण्यात 4 ते 4.30 तास, 8 तास नोकरी. 12 ते 13 तास जाणार होते. ती शाखा मोठी तिथे कामाचा व्याप ही मोठा. खुपच काम करावे लागणारच. यात भर म्हणजे ज्या दिवशी तिला बदली शाखेत जायचे त्याच दिवसापासून धुणी - भांडी आणि पोळ्या ला जी एकच बाई होती ती 15 दिवस सुट्टी वर आणि त्यात कहर म्हणजे सासू - सासरे गावाकडून त्याच दिवशी इथे येणार. कसे काय काय करावे लागेल काही कळत नव्हते. *अग्निपरीक्षाच*. कंपनीची बस सकाळी 7.10 ला चौकात येणार त्या बस मध्ये जायचे. मग 7.10 च्या आधी सकाळी आपल आवरण, डबा बनवणे, डबा भरायला मंदार मदत करायचा. घरच्या साठी जास्त बनवणे. कंपनी मध्ये 9.10 ला पोहचले की नाविण्या टेलिफोन ऑपरेटर, कुरीअर, रिसेप्शनिस्ट, इंटरव्ह्यू साठी रोज 30 - 40 मुला कडून फॉर्म भरून घ्या. आत HR मॅडम ना द्या फॉर्म. मुलांना आत पाठवा. मॅडम खुपच कडक. कोणत्या ना कोणत्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू असायचेच. दिवसभरात कानाला हेडफोन सतत 500 फोन येणारे. 500 फोन लावून द्यायचे. कुरीअर भरमसाट. कंपनी मध्ये फक्त चहा मिळत होता. नाविण्या फक्त दुध घ्यायची. जेवायला दिड . सकाळच्या घाईत काही खाल्लेले नाही. कंपनीची बस कंपनीतून साडे सहा ला निघणार. घरी यायलाच 8.30 रात्री. कंपनीच्या बस मध्ये सगळ्यात पहिली नाविण्या चढणार आणि उतरताना सगळ्यात शेवटी. घरी आल्यावर अजून दारातच असताना सासुबाई म्हणाल्या कुकर लावला आहे. साध वरण उकळी काढ. कुकर मध्ये बटाटे लावले भाजी कर. सासुबाई आणि मंदार उद्या साठी भाज्या, आंबे आणायला गेले. सासरे घरात बसले होते. बाहेरच्या खोलीत पत्रिका तयार करत होते. सिरीयल चे गाणे लागले होते. ऐकत होती. नाविण्या आताच 13 तास बाहेर नोकरी करून पार दमून भागून आली होती. शुज आणि सॉक्स काढले. मिनीटभर बसली असेल जरा मोकळा श्वास घेऊ इतक्यात सासरे अंगावर धावून आले. सासरे नाविण्या ला तोंडावर हात करून म्हणाले "ए काय बसली चल ऊठ.... हि तुला वरण, भाजी करायला सांगून गेली. चल ऊठ.. ते पहा.. चल निघ.... चल...." नाविण्याच्या ध्यानीमनी नाही. अचानक अंगावर धावून आले. तिला अशा पध्दतीने ओरडले. ती घाबरून गेली. आत गेल्यावर हात पाय, तोंड धुतले, कपडे बदलले, बेडरूम मध्ये तिच्या वडिलांचा फोटो होता त्याला जवळ घेतले आणि रडत होती. अचानक सावरली. मग साध वरण बटाट्याची भाजी घाई घाईत केली. इतक्यात सासू आणि नवरा मंदार आले. भाज्या, आंबे घेऊन. दुसऱ्याच दिवशी शुक्रवार चा विकली ऑफ होता. त्या दिवशी सासुबाई च्या भावाच्या फॅमिली ला मुंजीच केळवण करायचे होते. तेवढीच एक सुट्टी कामात जाणार होती. शिवाय धुणीभांडी घरीच. नाविण्याने नवऱ्याला रात्री झोपताना बेडरूम मध्ये सासरे असे वागले ते मनातले दुःख सांगितले. रडली. मनमोकळं केले. अशा प्रसंगातून नाविण्या फारच दुखावल्या जात होती. सासर कसे असते. सासरचे कसे असतात. ते कळत होते. त्यांना हि नोकरी करून 13 तासांंनी आली दमून भागून आली याच्याशी काहीही घेणे देणे नव्हते. आणि आपण सासऱ्यांना बाबा म्हणतो. नाविण्या चे वडील वारले होते. ते बाबा कसे होते. सासरे कसे वागतात. दोन बाबा मध्ये किती जमिन अस्मानाचा फरक आहे. हे समजले.... आई - वडीलांच्या प्रेमाची किंमत सासरी नांदणाऱ्या मुलीलाच कळू शकते. जेव्हा ते मिळत नाही.... माहेर ची सर सासरला येणार नाही.... आई बाबा ची जागा कोणीच घेऊ शकत नाही.


बघता बघता लग्नाला एक दिड वर्ष झाले. सासुबाई नाविण्याला म्हणत होत्या तिच्या आईच्या तोंडावर. तुझ्या आईला लग्नानंतर पाच वर्षे मुलबाळं नव्हते तू तुझ्या आईच्या वरच गेली वाटते. मग गावाकडे प्रसिद्ध, हूशार स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरीण होती तिच्या कडे नेले. तिने चेक केले. नाॅर्मल आहे असे सांगितले. मंदारला टेस्ट केली शुक्राणू चे प्रमाण कमी आहे . गोळ्या दिल्या दोघांना. शंकराचे व्रत केले, नाविण्याच्या नाकात कोणत्या नाकपुडी मध्ये कोणत्या नक्षत्रात दुर्वाचा रस घातला सासुबाई नी. नारळाचा कोंब दात न लावता डायरेक्ट गिळायला सांगितले नाविण्याने केले. नाविण्या प्रेग्नंट राहिली. 9 व्या महिन्या पर्यंत नोकरी केली. नाविण्याने. कंपनीला गाडी वर जायचे यायचे पुर्ण खड्ड्यांचा रस्ता. नाविण्या ला कंपनी मध्ये लंच टाईम मध्ये दुसऱ्या टेबलावर मुळ्याची भाजी आणली तरी नुसत्याच वासाने नाविण्याला तिच्या टेबलावर जेवताना मळमळ व्हायची. भुक लागायची. सारख्या उलट्या व्हायच्या. कंपनी मध्ये काम करताना बाळ पोटात जोरात फिरायचे. अचानक 9 महिने झाले. 101 ताप अचानक. थंडी वाजून यायला लागली. पुण्यात मोठ्या डाॅक्टरीणकडे ट्रिटमेंट चालू होती. तिच्या कडे गेले तिने अ‍ॅडमिट करून घेतले. 8 दिवस नुसते दूध, बिस्किटे यावरच, सलायन चालू अधूनमधून.. कोणत्या सोनोग्राफी केल्या नंतर नाविण्या पाणी प्यायली. नंतर नारळ पाणी प्यायली. नंतर सोनोग्राफी रिपोर्ट डाॅक्टरीण मॅडम कडे नेले त्या म्हणाल्या तापामुळे गर्भातले पाणी कमी झाले. बाळाचे ठोके कमी भरत आहे. लगेच सीझर केले असते. तु पाणी कशाला प्यायली. उद्या सकाळी सीझर ठरले. सासू, सासरे गावाकडून गाडी करून आले. नाविण्याची आई आली. मावस नणंद सुनिता फारच जवळची सख्या नणंदेच्या सारखीच त्या आल्या. नाविण्या ची आई नाविण्या ला म्हणाली खंबीर व्हायचे. कुठ कापा. पण बाळ आणि बाळंतीण सुखरूप राहू दे. सगळ चांगले होईल. आईचे बोलण्याने नाविण्याला खंबीर केले. भुलीचे इंजेक्शन, सीझर चालू. नवरा मंदार बाहेर रडत होता. आत बाळाचा रडण्याचा आवाज झाला. नाविण्या म्हणत होती. मला दाखवा. काय झाले. मुलगा झाला. डॉक्टरीण मॅडम ने सांगितले. नाविण्याच्या जीवाला काय वाटले.. हे शब्दात सांगण्यासारखे नाही. आई किती पण बाळंतपणाचा सीझरचा, काळाचा त्रास सहन करते. बाळ सुखरूप झाले हा आनंदच फारच मोठा असतो. एका जिवाला तुम्ही या जगात आणणे यात काय आनंद तो शब्दात व्यक्त होण्यासारखा नाहीच. निर्मिती ची शक्ती परमेश्वराने स्त्रीलाच देणगी दिली आहे.... सासूबाई, सासऱ्यांना मुलगाच हवा होता. ते आनंदून गेले. नाविण्याच्या आईला आनंद झाला. आई आता आजी झाली. लहान दिराला मुलगा हवा होता. सगळे आनंदाने नर्स ला नोटा देऊ लागले. पेढे आणले. मंदार ला मात्र मुलगी हवी होती....


नंतर 4-8 दिवसात टाके काढले. बाळ बाळंतीण सुखरूप घरी आले. सासुबाई ने तुकडा, पाणी, औक्षण केले. धुरी, शेक कोळशाची शेगडी, घुट्या, गरम पाणी प्यायला, वापरायला, डिंकाचे लाडू सासुबाई आणि मावस नणंदेनी केले. नाविण्याच्या आईचे 68 वय वर्षे होते. आईची 40 वर्षे सरकारी नोकरी पुर्ण झाली होती. थकली होती. हात थरथर कापत असायचे. नाविण्याचे बाळंतपण सासुबाई नी केले. धुण्या- भांडी ला बाई होती. बाळाला अंघोळ घालायच्या, सीझर टाके असले तरी नाविण्या बाळाला रात्री अपरात्री कधीही बसूनच दुध पाजायची. बाळाला कपडे नाविण्याच्या आईने आणले. भरपुर बाळंते, लंगोट, बंड्या, टोपडं, टोप्या....बाळ लहान असले बाळाचा पसारा घर टाकतो. गंध, पावडर, काजळाचे, घुट्याचे, डेटॉल चे लंगोट धुतल्याचे वास घरभर.... ESIC ची 4 महिने बाळंतपणाची सुट्टी नाविण्या ला..


दिवाळी जवळपास आली. सासुबाईनी सगळ्या गोधड्या भिजवल्या. सोलापूरी चादरी भिजवल्या. नाविण्याचे सीझर झालेले अडीच महिने पण नव्हते झालेले. नाविण्या म्हणत होती सासुबाई तुम्ही नका धूऊ. धुणीभांडीवाली बाईशी नाविण्या बोलली 100 रूपयात धुवून देते म्हणाली. असे नाविण्या सांगत होती. सासुबाई म्हणत होत्या. मी कुठे कमवते. मी कुठे पैशाच्या जोरावर उड्या मारू. मी करते कष्ट. करा कष्ट व्हा नष्ट.... सासुबाई म्हणत होत्या. मी माझ्या आईच दुध प्यायली आहे. मीच धुवून टाकते. नाविण्या म्हणाली की तिला अजून तीन महिने डॉक्टरीण मॅडम ने जड उचलू नका. पोटावर वाकू नका. सीझर झाले जपा सांगितले आहे. 100 रूपये देऊन टाकेन बाई धूवेल. सासुबाई रक्तच दाखवते माझे म्हणाल्या. नाविण्या चिडली सोलापूरी चादर घेतली. म्हणे मी माझे रक्त दाखवते काही हो. टाके निघो. मीच धुते. सासूबाई तिच्या हातातून चादर ओढत होत्या. बाळंतीण बाई पडू नये म्हणून तिथल्या ड्रमला धरले नाविण्याने. सासुबाई नी जोरात आवाज काढला. रिकामी बादली लांब फेकली. वरच्या मजल्यावरचे 13 जण होते घरमालक खाली आले. त्यांच्या समोर डोके वरून जोरात घ्यायचे जमीनीवर हळू ठेवायचे असे आदळले. टेंगूळ सुध्दा आले नाही. साध लाल झाले नाही. झोपल्या तिथे धुण धुवायच्या जागी. उठल्या जमा झालेल्या लोकांना ओरडून सांगत होत्या. नाविण्या मला नीट पहात नाही. घरमालकिणी सोबत वर गेल्या. वरून मोठी सुन आली घरमालकिणीची नाविण्या ला सांगत होती. तुझी सासू म्हणत होती माझ्या सासु ला नाविण्याने सासूला ड्रमात, भिंतीत दाबले. नाविण्या म्हणाली बाळंतीण माझ्या मध्ये काय ताकद आहे कुणाला कशाला दाबू. नंतर सासूबाई खाली आल्या. मंदार आणि केदार दोन मुलांना येताना पाहून लगेच 1 मिनीटभर श्वास रोकून खाली बसल्या दोन्ही मुलाने कांद्याचा वास दिला घरात नेले. सासुबाई काहीही सांगत होत्या. लहान दिर नाविण्याला मारायला अंगावर धाऊन येत होता. नवरा एक शब्दही नाविण्याच्या बाजूने बोलला नाही. नाटकी प्रसंग नाविण्याच्या विरोधात घडला.... नाविण्या च्या मनाला महित होते ती काही चुकीची वागली नाही. नाविण्याला आयुष्य काय काय दाखवणार काय महित वाटत होते.



नावीण्याने MPM ची CET दिली होती प्रेग्नंट असताना. ती पास झाली होती. तो RESULT आला. MPM ADMISSION केली. MPM चे लेक्चर सुरू झाले. बाळंतपणाच्या सुट्टी मध्ये लेक्चर ATTEND केले नाविण्याने. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी राहिला. शिकण्याची आवड असेल तर कधीही शिकता येते. शिक्षण कधीच सोडू नये. काही तरी शिकत रहावे. जगात खुप ज्ञान आहे. ज्ञान घेत राहावे. ज्ञान कधीच वाया जात नाही. आपल्या जवळचे ज्ञान वाटावे. गाडी चालवत जात होती नुकतेच सीझर झालेली. लेक्चर चालू असताना पान्हा फुटायचा ओढणी घ्यायची अंगभरून. नंतर नोकरी करून, घरकाम, स्वयंपाक करून, बाळ लहान, सणवार करून MPM केले. बाळाचे बारसे केले उत्कर्ष नाव ठेवले. उत्कर्ष रात्री रडायचा त्याला प्यायला घ्यायचे आणि रात्री अभ्यास करायचा रात्री उत्कर्ष ला एकीकडे झोका द्यायचा दुसरी कडे पाठांतर करायचे. रात्री उत्कर्ष मुळे रोज अभ्यास व्हायचा नाविण्याचा. सकाळी कंपनी. सासुबाई उत्कर्ष ला सांभाळायच्या. घरी आल्यावर त्याला पाजायचे. स्वयंपाक करायचा. सगळे वर्किंग असल्याने रात्री लेक्चर MPM चे 7 ते 9 मंदार घ्यायला यायचा नाविण्याला. रात्री घरी जाऊन जेवण.. असे शिक्षण, घरचे, बाळ, नोकरी सगळे नाविण्या करत होती. याला जीवन ऐसे नाव.... संघर्षा शिवाय जीवन नाही. पुढे सासुबाई होत्या. सासुबाई मुद्दाम शुक्रवारी कुरड्या, खारोड्या चा घाट घालायच्या. या पहाटे कुरड्या करून दमले म्हणत खाली येऊन झोपायच्या. धुणी - भांडी वाली पुर्ण महिना शुक्रवारी आलीच नाही. मग नाविण्याची शुक्रवारची सुट्टी धुणी - भांडी, स्वयंपाक, झाडलोट, बाळ लहान दिवस जायचा. MPM परीक्षा जवळ आलेली अभ्यासाला वेळ मिळेना. रात्री जागून अभ्यास उत्कर्ष ला सांभाळत. 2 वर्ष पूर्ण केली. नाविण्याला 65% MPM ला मिळाले. 1st क्लास मिळाला. पास झाली. सासुबाई म्हणत होत्या . मी स्टँड उभे राहिले. उत्कर्ष ला सांभाळले म्हणून नाविण्या पास झाली....


नाविण्याच्या आयुष्यात अजून खुपच घडामोडी घडणार होत्या. हि तर सुरूवात होती. नाविण्या चा संघर्ष आणि शिकवण पुढच्या भागात पाहूया...


क्रमशः

*सौ. भाग्यश्री चाटी सांबरे*
©® 21.9.2021

🎭 Series Post

View all