तुझे माझे जमेना.... भाग पाच

Tuze Maze Jamena Bhag Pach


*तुझे माझे जमेना.... भाग पाच*


हि एक काल्पनिक कथा आहे. सर्व वाचकांना विनंती आपला अभिप्राय द्या.


2 वर्ष गेल्यावर.... नाविण्याच्या आयुष्यात मौसम बदलला वाईट अनुभवाचे चटके सहन केल्यावर आता आनंदाचा गारवा आला, प्रेमाची रिमझिम सुरू झाली.... नाविण्याला मुलगी झाली. नाविण्याला वाटले तिचे बालपण फिरून परत आले. नाविण्याच्या मुलीचे नाव शाश्वती ठेवले जणू आनंदाची शाश्वतीच नाविण्याला मिळाली. तिच्या रूपात लक्ष्मी आली पदरात,... रुणझुण पैंजणाच्या गोड संगितात दिवस सुखात जायचा. तिचे करण्यात दिवस बिझी जायचा. मंदार ला मुलगी झाली याचा आनंद खुपच झाला होता. नाविण्याला शाश्वतीच्या रूपात आई आली परत हा आनंद नाविण्याला सुखावणारा होता. मुलीची माया काय असते हे 3 वर्षापासुन नाविण्या अनूभवत होती. दिवस कुठे गेले नाविण्याला कळले नाही. नाविण्या आता नोकरी सोडून पुर्ण वेळ शाश्वतीलाच देत होती.


नाविण्याच कुटूंब पुर्ण झाले. नवरा, बायको, मुलगा, मुलगी. भरले गोकुळ झाले होते. सासू, सासरे, दिर कुटुंबात 7 रंग होते..
नाविण्याच्या जगात आनंद घेऊन आलेली शाश्वतीच ते चिमणीचं चिवचिवाट, बोबडे बोल, दुडूदुडू पळून, घरात शाश्वती पसारा घालणे, पसारा आवरणे यात नाविण्या पुरती दमून भागून जात होती. नाविण्याला शाश्वतीची काम करता करता दिवस पुरत नव्हता. सगळ आनंदाने, प्रेमाने करत होती. शाश्वती हुबेहुब वडीलांच्या सारखीच दिसायची. पितृमुखी सदा सुखी. मुली पहिल्या पासून समजूतदार असतात. हे जाणवत होते. मुलगी झाली की घरात आनंद घेऊन येतातच. यात शंका नाही. सगळी हौस मौज तिची पुरवायची. गंध पाहिजे, टिकली पाहिजे, खणाचे परकर पोलके, डोक्याला पिना, बँड, नेलपॉलिश पाहिजे, मोठा टेडी पाहिजे, बाहुली पाहिजे, भातुकली पाहिजे, पायातले पैंजण, कानातले, नाकातले, बांगड्या.... हुश्श लिस्ट संपतच नाही.. मुलगी खरचं एक वेगळाच आनंद....


शाश्वती च्या जन्मानंतर नाविण्या आणि मंदार यांच्या नात्यात एक वेगळा रंग चढला जो सुखावह होता. शब्दात सांगण्या सारखा नव्हता.


वडील - मुलीचे नाते किती छान असते मंदार हा अनुभव घेत होता. मुलीचे पक्के बाबा झाले मंदार राव.


उत्कर्ष ला लहान बहिण मिळाली. राखी बांधणारी. ओवाळणी मागणारी. बहिण - भावाच छान नात तयार झाले. मंदार ला सख्खी बहीण नव्हती. नाविण्याला सख्खा भाऊ नव्हता.


नाविण्या या सगळ्यासाठी परमेश्वराचे मनपूर्वक आभार मानत होती. आपण वरच्याचे खुप गोष्टीसाठी आभार नक्कीच मानले पाहिजेच.


असे म्हणतात बाळंतपणात बाई चा पुनर्जन्म होतो.. नाविण्याचा परत जन्म झाला. आता ती मनाने खंबीर झाली होती. अनुभव संपन्न झाली होती. प्रगल्भता आली होती. समजूतदार झाली होती. व्यक्तीमत्व आता जास्त निखरले होते. नाविण्या आई, बायको, सून, वहिनी अनेक जवाबदाऱ्या उत्तम पार पाडत होती. तिच्या कडून 100% देत होती.


अचानक एक दिवस गरीब मुलीला मदत म्हणून एक लॉटरीचे तिकीट घेतले. नंतर साफ विसरून गेली. नंतर समजले 10 कोटीच बक्षीस मिळाले होते नाविण्याला. यात स्वतःच घर झाले , दोन मुलांसाठी तरतूद करून ठेवली. नाविण्या, मंदार, 2 पोर.... वर्ल्ड टूर ला गेले. सगळ प्रसिद्ध पाहण्यात आले. कुठे बर्फाळ, कुठे अथांग पसरलेला समुद्र, कुठे ऊंच कोसळणारे धबधबे, कुठे ऊंच इमारती त्यावरून दिसणारे शहर सगळे डोळ्याचे पारणे फिटले. महिती मिळाली. निसर्गाच्या सान्निध्यात राहून सुखावले. निसर्गा इतका आनंद कुठेही मिळत नाही. फक्त निसर्ग एक नवी ऊर्मी मनाला देऊन जातो. आपण माणस या निसर्गाला जपू या. प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर टाळूया. वर्षाला 1 तरी झाड लावून मोठे करूया. निसर्ग आपल्याला मुक्त हस्ते खुप देत असतो कायम. निसर्गात जाण म्हणजे सगळ्या टेन्शन पासून दूर, रोजच्या रहाट गाडग्यातून दूर, निवांत क्षण लाभले. बऱ्याच वर्षांनी एकमेकांना वेळ दिला नाविण्या आणि मंदारनी. चार सुखाच्या क्षणात नाते उमलले. खुप फिरले, खुप पाहिले, खुप शाॅपिंग झाली, खुप आठवणी गोळा केल्या.. फोटो, सेल्फी तो बनती है.... परत आले शेवटी आपले घर आपला देश,आपली माती.... यांच महत्त्व कायम आहे राहिलच.. यात शंका नाही.


नाविण्या ने स्वतःचा बिझनेस सुरू केला. कपड्यांचा. जम बसवला.. हळूहळू यशस्वी झाली.. बिझनेस मोठा केला. आपल्या पायावर उभी राहिली. स्वावलंबी झाली. नाविण्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. नाविण्या सुखात नाहून निघाली. पाचो उमलिया घी में.... नाविण्या च्या जगात दुःखाला जागा नव्हती. सुख ओसंडून वाहत होते.


नाविण्या मुलांवर लक्ष केंद्रित करून भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करत होती. त्यांची आवड, कल पाहून त्या क्षेत्रात त्यांना पाठवून त्यात लक्ष देत होती. मूलांच खाण - पिण ते करीअर आई मोठी भुमिका पार पाडत होती. मुल मोठे होत होते. नाविण्याची प्राथमिकता आता मुलच झाले होते. आईसाठी आपली मुले सर्वस्व असतात..


नाविण्या चे आयुष्य बदलेल छानच होत. कुणाला कधी वरचा काय दिल सांगता येत नाही. वरच्यानेच सगळे पत्ते त्याच्या हातात ठेवले. आपण फारच सामान्य आहोत. हे नाविण्याला महित होते पक्के. त्यामुळे पैशाने , सुखाने श्रीमंत झाली हात आकाशाला टेकले. तरी पाय मात्र जमिनीवरच होते नाविण्याचे. ती हवेत नव्हती. हे तिला मधल्या संघर्षानेच शिकवले होते. त्या शिकवणीचे पण ती आभार परमेश्वराकडे मानत होती. वाईट अनुभव पण तिला खुप शिकवून गेले होते. ती ते आयुष्यभर विसरू शकणार नव्हतीच. तेच जीवनाचे गम्य नाविण्याला अपसूकच उलगडले होते. कमी वयात खुपच अनुभव संपन्न झाली होती नाविण्या.


सर्व उत्तम चालू आहे. परमेश्वराच्या कृपेने.... परमेश्वर द्यायला लागतो तेव्हा छप्पर फाडकेच देतो.. अजून काय होणार नाविण्याच्या आयुष्यात कोणते सुख येतय पुढील भागात पाहूया..


क्रमशः


*सौ. भाग्यश्री चाटी सांबरे*
©® 26.9.2021.

🎭 Series Post

View all