तुझे माझे जमेना.... भाग नऊ

Tuze Maze Jamena Bhag Nau


तुझे माझे जमेना.... भाग नऊ


हि एक काल्पनिक कथा आहे. सर्व वाचकांना विनंती आपला अभिप्राय द्या.


नाविण्याच्या आयुष्यात शिक्षण, नोकरी, बिझनेस, सुख, दुःख, आनंद, प्रेम, माया, अडचणी, सासुरवास, वाईट अनुभव, चढ उतार, एकटेपणा, नाविण्या वर टिका, नाविण्याचे गुण, अवगुण, एक स्त्री म्हणून केलेला संघर्ष सगळे पाहिले....


नाविण्याला तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल माणूस म्हणून....? नक्की सांगा....


उत्कर्ष चा खेळण्यातला कल पाहून उत्कर्ष ला मोठ्या प्रशिक्षकाकडे क्रिकेट खेळायला पाठवले. उत्कर्ष कष्ट घेत होता. खेळण्यात आनंद घेत होता. चौकार - षटकार ठोकत होता. हे पाहून नाविण्याचा आनंद गगनाला भिडला. उत्कर्ष मोठा झाला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला. जिंकला..


शाश्वतीचे शिक्षण उत्तम चालू होते. मुल मोठी झाली. शिक्षण, करियर उत्तम झाले आई - वडीलांना यापेक्षा दूसरे काय हवे..


वेळ पंख लावून उडून गेला. मुल मोठी झाली. नाविण्याने माणूस म्हणून चांगले जगण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या अनुभवांनी ती बदलत गेली. माणूस म्हणून जन्म मिळाला आहे. तर काही आयुष्यात येऊन चांगले काही करण्याची इच्छा फार होती. या इच्छेतून लॉटरी च्या पैशातून आई वडीलांच्या नावाने वृध्दाश्रमात दान धर्म केले.. वारीत सहभागी होण्याची इच्छा खुपच होती वारीत सहभागी झाली.... शास्त्रीय संगीत शिकण्याची इच्छा होती वडीलांना आवडत नव्हते म्हणून राहिले होते. आता शिकत होती.... नाविण्या, मंदार, उत्कर्ष, शाश्वती ने बारा ज्योतिर्लिंग, अष्टविनायक यात्रा पुर्ण केली.


मंदार च्या आई - बाबा ना शुगर, बीपी, सासऱ्याचे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी झालेले, सासुबाई चे नाविण्याच्या लग्नाच्या आधी अँक्सिडेंट मध्ये मणके गेलेले. शुगर मुळे शोल्डर फ्रिज झाले दुखत होते. झोप येत नाही म्हणून गोळ्या घ्यायचे. खुपच गोळ्या औषध, बरेच डॉक्टर ट्रिटमेंट त्यांना चालू होते. सासूबाई झोपूनच रहायच्या. एकट्या नाविण्यावर स्वयंपाक, सणवार जवाबदाऱ्या असायच्या. नाविण्या करून वाईटच होती. नाविण्याला वाईट अनुभव ठरलेले. सासुबाई आई होत नाही. सुन मुलगी होऊ शकत नाही. कितीही म्हटले तरी सासु एकदा दाखवणारच कि ती सासू आहे.


नाविण्याने अंगणात खुपच छान बाग फुलवली. निसर्ग खुप आनंद देतोच.. हिरवळ, रंगेबीरंगी फुले, फळांनी बाग फुलून, बहरून गेली होती. पारिजात का सडा अंगणात पहाटे पडलेला. ओंजळीत पारीजातकाची फुल घेऊन त्याचा मंद सुगंध श्वासात भरून घेतला की मन कस शांत होत. रात्री रातराणीच्या मंद सुगंधाने बाग, घर भरून जायचे. ....त्यात फुलपाखरू, पक्ष्यांचे घरटे, सुगरणीचा खोपा आणि त्यात लाकडी झोपाळा लावला. नाविण्याची लहानपणापासूनची आवड झोपाळा. ती नाविण्याने आपली आवड पुर्ण केली. आपल्या इच्छा पूर्ण करून आनंद मिळवला. अशा छोट्या छोट्या गोष्टी मध्ये मिळणारा आनंद खुप असतो. जो कधी कधी मोठ्या गोष्टी मध्ये मिळत नाही....


नाविण्याने बिझनेस कपड्यांचा मोठा केला. त्यात वेळ, पेसे गुंतवले. कष्टाने बिझनेस यशस्वी करून दाखवला. व्यस्त झाली. स्वदेशी कपडे. स्वदेशी ब्रँड तयार केला नाविण्याने खरचं कष्ट घेतले.



दोन्ही मूल शिक्षण, करियर करून चांगली निघून. मार्गी लागली. दोन्ही मुले आणि आई आणि बाबाचे आयुष्याचे सार्थक झाले.. परमेश्वराचे खुप आभार मानले नाविण्याने. घरात मोठी पुजा करून.. केटरिंग वगैरे ठेवून नातेवाईक, ओळखीचे, खुप जणांना बोलावले गरीबांना खुप अन्नदान केले....



नाविण्या च्या आयुष्यात आनंदी आनंद झाला. नाविण्याला उत्तम उद्योजिका म्हणून मोठा अवॉर्ड जाहिर झाला. बाहेरच्या जगात कामाची दखल घेऊन कौतुकाची थाप मिळाली. असे असते बाहेर कौतुक घरात टिका.... दोन्ही गोष्टी आपल्याला तितक्याच सहजतेने घेता आल्या पाहिजेत. कौतुक डोक्यात न जाऊ देता पाय जमिनीवर राहिले पाहिजे. आणि टिकेनी खचून न जाता. ज्यावर टिका होते ती गोष्ट सुधारणा आपल्यात करता आली पाहिजे. नाविण्याच्या आयुष्यातल्या संघर्षाने हे शिकवले होते. परमेश्वराचे आभार मनापासून मागितले. नाविण्याच्या उत्तम उद्योजिका ची मुलाखत घेतली ती पेपर मध्ये छापून आली. कौतुकाचे काही जणांचे फोन आले.



नाविण्याची शाश्वती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत चालली सोबत नाविण्या हि निघाली. उत्कर्ष हि क्रिकेट खेळात इकडे भारतात चांगले करीअर चालू होते. मंदार होता उत्कर्ष सोबत भारतात. मुलांच शिक्षण, करीअर खुपच महत्त्वाचे. नाविण्या, शाश्वती अमेरिकेत घर सेटल झाले. शाश्वतीचे शिक्षण चांगले चालू झाले. बघता बघता दिवस चालले. पण शिक्षण अजून तीन वर्ष द्यायचीच होती. नाविण्या तिथे बिझनेस कोर्स करत होती. व्यस्त झाली होती. नाविण्या तिथे शिकत होती. नवीन जग.. नाविण्याने शिकणे सोडले नाही.... पण आपला देश हा आपलाच देश असतो. आपल्या देशातल्या, राज्यातल्या तिथे रहात असलेल्या काही नवीन मैत्रीणी झाल्या.... नाविण्या शाश्वती च्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य देत होती. शाश्वती चे शिक्षण उत्तम चालू होते. शाश्वती फर्स्ट सेमिस्टर मध्ये चांगला स्कोर केला. शाश्वती चांगल्या ग्रेड ने पास झाली. नाविण्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.


आई वडील मुलांना कडक शिक्षा करतात, रागावतात, प्रसंगी मारतात, नंतर त्यांनाच वाईट हि वाटत आणि कधी हळहळ व्यक्त होत असते. पण सगळे मुलांना शिस्त लावण्यासाठी, शिक्षण घ्यावे, त्यांच करीअर उत्तम व्हावे उद्देश हाच असतो. उद्देश चांगला असतो. जेव्हा मुलांचे करीअर चांगले होते. सगळ्यात जास्त आनंद आई - वडीलांनाच होतो. आई वडीलांच्या रागातले प्रेम मुलांना कळले पाहिजे. नाविण्याला आई वडील नव्हते त्यामुळे आई - बाबा ची किंमत तिला कळली होती. मारल्याने मुल कधी दुखावली जातात. आई, वडीलापासून भावनिक दूरावली जातात. जेव्हां ते आई, बाबा होतील तेव्हाच त्यांना कळू शकत.. जायी त्याच्या वंशा तेव्हा कळे..


नाविण्याला आपल्या घराची, मंदार ची, उत्कर्ष ची खुपच आठवण यायला लागली. भारतीय बायका विशेष आपल्या संसारात, नवऱ्या, मुला - बाळात जास्त भावनिक गुंतलेल्या असते. घर, संसार हेच त्यांचे विश्व असते. सहज सोडण शक्य नसतेच. मंदार आणि नाविण्या ला उचकी सारखी लागायला लागली....



नाविण्या आणि मंदार एकमेकांना लग्नानंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा सोडून राहिले. मुलांच्या शिक्षणासाठी, करीअरसाठी. मंदारला नाविण्याची उणीव भासत होती. दोघांनाही एकमेकांची आठवण खुप येत होती. माणूस दूर गेला की किंमत कळते. माणूस जवळ असला की आपण गृहित धरतो, भांडत होते, वैचारिक मतभेद खुप टोकाचे होते. प्रत्येक गोष्टीत. आज विरहात करमेना एकमेकांना दोघांनी एकमेकांना एकाच वेळी फोन लावला दोघांचाही फोन बिझी येऊ लागला. बोलण झाल नाही. आधीच दिवस - रात्र दोघांचे वेगवेगळे फोन कधी लावावा यावर बंधने.. त्यात इतक्या लांब आठवणी पाठ सोडेना.. विरहाने दोघांच्या डोळ्यात अश्रु तरळले आठवणीने. इतक्या लांब होते की आठवण आली लगेच एक चक्कर मारली भेट घेतली एवढे सहज नव्हते. "नाविण्या आणि मंदारचे नाते तुझे माझे जमेना अन् तुझ्याविना करमेना.... अशा स्थितीत सध्या आहे...."



नाविण्या च्या आयुष्यात पुढे काय होणार पाहूया पुढच्या भागात....


क्रमशः


*सौ. भाग्यश्री चाटी सांबरे*
©®


हि कथा फ्री आहे सबस्क्रिप्शन ची गरज नाही.


कथा आवडली तर शेअर नक्की करा.

🎭 Series Post

View all