तुझे माझे जमेना.... भाग चार

Tuze Maze Jamena Bhag Char
तुझे माझे जमेना.... भाग चार


हि काल्पनिक कथा आहे वाचकांना विनंती आपला अभिप्राय आवश्य द्या. ??


नाविण्या खाजगी कंपनीत नोकरी करत असताना तिथे स्त्री म्हणून होणारा त्रास, ज्युनियर म्हणून सिनियर कडून होणारा त्रास, बायका बायका मधले खटके असले तरी या कंपनीतले रिपोर्टींग बॉस खुपच चांगले होते. HR HOD. खुप सज्जन, हुशार, अनुभवी होते. नाविण्या ला सपोर्ट करायचे, ज्युनियर म्हणून 4 गोष्टी शिकवायचे. पण प्राॅब्लेम असा होत होता की नाविण्याच्या सासरी महालक्ष्मी साठी सुट्टी घे सासूबाई चे म्हणणे. सुट्टी मागायला सरांकडे गेली तर सर 10 जणांच्या समोर बाई तु घरीच रहा येती च कशाला? 10 जण हसणार. घरी आल्यावर सासुबाई ना सांगितले सर असे म्हणाले. सासुबाई ओरडणार हिला काही करण नको. हिला काही धरण नको. दोन्ही कडून बोलणी खाऊन. दोन्ही कडून वाजवली जात होती नाविण्या.


नंतर असेच नाविण्याचे मधल्या मध्ये सँडविच व्हायचे. सासूबाई चे म्हणणे सौभाग्यवती बाईने कम्पल्सरी हातात कायम काचेच्या बांगड्या घातल्याच पाहिजे. आपली संस्कृती आहे. नाविण्या घालायची बांगड्या काचेच्या. नाविण्याला काही प्रॉब्लेम नव्हता. सासुबाईच्या म्हणण्याप्रमाणे आवळ घाल काढायला, घालायला नको रोज. आवळ घालायची नाविण्या. सासूबाई काचेच्या बांगड्या रोज घालते म्हणून कौतुक करायच्या पण कंपनीतल्या बायका खुप नाव ठेवायच्या. कुजबूज माघारी करायच्या. त्यातली एक हिला येऊन सांगायची....


प्रत्येक गोष्टी टोकांच्या विरूद्ध.. होत्या माहेरी आणि सासरी. देवसुद्धा टोकांच्या विरूद्ध लोकांना एकत्र आणतो. त्यांच्या जन्मोजन्मी च्या गाठी बांधतो. त्यात काय मजा असेल काय महित???? तो वरती enjoy करत असेल.. ईथे पृथ्वीवर च्या माहीत खर काय ते .... हुश्श.... किती जुळवून आणायचा प्रयत्न.... तारेवरची कसरत सगळी....




एक किस्सा फारच त्रासदायक.... माहेरी आईने पेलाभर दुध प्यायची सवय लावली होती. तितके घेतल्या शिवाय बाहेर जायचे नाही. शाळा, कॉलेज, कंपनी कुठेही जातांना दुध घेण कम्पल्सरी. सासरी सासुबाई ना सलत होते. उत्कर्ष साठी राहूदे दुध. मग त्याला ठेवून नाविण्या थोडे दुध घ्यायची. ते सुध्दा सासुबाई ना खटकायचे त्या म्हणाल्या "दुध पिऊन कुठे कुस्ती मारायला जायचे आपल्याला का ग ए....आss.. काही कुस्ती नाही मारायची कशाला घेते दुध...." इतके लागले बोलणे.. नाविण्या काही घेत नव्हती. किती वर्षे झाली. दुध नाही, चहा नाही, कॉफी नाही काहीच नाही. तुटलेच. एवढेच काय तिला आई आली आईला सुद्धा कपात दुध देण्याचा अधिकार वाटत नव्हता.


दुसरी गोष्ट नाविण्याची आई खेळाच्या ऑफिस मध्ये होती. सरकारी नोकरीत. उन्हाळ्यात स्पर्धा असायच्या आईला सकाळी सात वाजता मैदानावर जावेच लागायचे. त्या आधी घरचा स्वयंपाक वगैरे.. घरी यायला 7 रात्री. येताना स्पर्धेचे सर्टिफिकेट लिहायचे घरी आणून लिहायचे. भाजी उद्या साठी आणायची. कधी कूरड्या, खारोड्या करायला वेळच नव्हता. विषय हि नव्हता. खात हि नव्हते. माहेरी करायला जागा नव्हती. सासरी सासुबाई गृहिणी. घरीच. गावाकडे सगळे करतात. कुरड्या 15 किलो सासुबाई माहेरच्या लोकांना पण द्यायच्या, देतात. नाविण्या खाजगी कंपनीत नोकरीला. कधी करणार, कधी केलेल्या नाहीत. फारशी आवडही नाही. यावरून भरपूर बोलणी खाल्ली नाविण्याने. मग पुण्यात केली नाविण्याने कुरड्या, बटाटा चिप्स, बटाटा किस....


माहेरी आई सरकारी नोकरी मध्ये नाविण्या शाळा, कॉलेज, ट्युशन्, कॉम्प्युटर क्लास, नंतर कंपनी घरात नसायची माहेरी. धुण्याला भांड्याला कायम बाई. सासुबाई नी घरीच केलेली धुणी - भांडी कायम. नाविण्या खाजगी कंपनीत नोकरी करत असताना लग्न झाले. यांना महिती नोकरीवाली करताना केली. मग हिला ना धुण करण, ना भांडी करण यावरून भांडणं. नाविण्याची आई म्हणाली करताना भांडीवाली करायची होती. सासरे नाविण्याच्या आईच्या अंगावर धावून गेले. नाविण्या म्हणाली मुळीच नाही बाबा.. ती माझी आई आहे. सासऱ्या पेक्षा आई वयाने मोठी आहे.. आणि एक स्त्री आहे.. नाविण्या आईची बाजू घेत खंबीरपणे उभी राहिली. सासुबाई म्हणायच्या ना धुण करण.... ना भांडी करण.... तुझ्या काचेच्या बांगड्या कशा वाढतात. दर महिन्याला कशाला लागतात.


नाविण्याच्या माहेरी महालक्ष्मी नव्हत्या. पुढे मुलगीच कोण चालवणारे नाही. मग आणल्या नव्हत्या आईने. सासरी महालक्ष्मी. एकदा नाविण्याची मुद्दाम परीक्षा.... सासुबाई आजारी झोपूनच म्हणत होत्या या अंगावरून या अंगावर व्हायचे तर चक्कर येते. नाविण्या आणि शेजारच्या मैत्रिणी ने साड्या नेसवल्या महालक्ष्मी ला. नाविण्याने एकटीने मिरवल्या महालक्ष्मी. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला. जेवणाचे आमंत्रण 4 जण सवाष्ण, कुमारिका, बटू, ब्राह्मण.. सवाष्ण ओळखीची होती. तिने थोडी फार मदत केली. थोडे नवऱ्याने, दिरानी मदत केली. 4 दिवसांनंतर धरण 100% भरले बघायला गेले तर सासुबाई नाविण्याच्या पुढे चालत होत्या , गार्डनला गेले एवढी मोठी गार्डन नाविण्याच्या पुढेच . 4 दिवसांत इतकी ताकद आली.... काही न कळण्या इतकी दुधखुळी नाविण्या राहिली नव्हती. बोलली कधीच काही नाही... ओळखले मात्र पुर्ण..


नाविण्याचे 3 मावस भाऊ आमदार, एकत्र कुटुंब पण फार श्रीमंत यांचा कधीच नाविण्याला चुकून एक फोन नाही. 1 मामेभाऊ अमेरिकेत 1 मामेभाऊ लंडनला 1 मामेभाऊ मुंबई ला कधी चुकून 1 फोन नाही का कधी 1 मेसेज नाही. तेच सासुबाईच्या माहेरचे सगळे जण जाण, येण, फोनाफोनी करणारे, रहायला जाणे, कार्यक्रमाला, सुख - दुःखात एकत्र येण, देण - घेणे चालू. सासुबाई म्हणतात माझ्या डोक्यावर इतके केस नाही इतका माझा गणगोत आहे. पण नाविण्याला मात्र दाखवून द्यायचे की ते सासूबाई च्या माहेरचे आहेत.... नाविण्या च्या नशिबी वाईट अनुभवाच्या खाणी.... तिची चुक असो वा नसो.. तिला मानसिक त्रास सहन करावा लागत होता.. वरच्यानेच तिला पक्क करायचे पक्के ठरवले होते वाटते.... एकदा एका देवब्राम्हण कार्यक्रमात नाविण्याने पंगती दिवसभर वाढल्या. मामे नणंद बोलत होत्या हि नाविण्या उद्या डोहाळेजेवणासाठी मिळाली राबायला, फुकटात तर बरं होईल. मदत तर होईलच. डोहाळे जेवण तिच्या भावजयचे हे नाविण्याने ऐकले. त्या मामे नणंदानी सांगितले लगेच नाविण्याला उद्या सकाळी 7 लाच यायचे. नाविण्या ने हो हो केलं. नाविण्याच्या सासुबाई गेल्या 7 वाजता. 7 किलो पोळ्या लाटल्या त्यांनी तिथे जाऊन. नाविण्याचा उत्कर्ष जवळ play group मध्ये जायचा तो गेला. त्याला आणले नंतर. नाविण्याला गाडी नव्हती तर अहो आल्यावर त्यांच्या सोबत गेले डोहाळे जेवणाला. तिथ जेवायला बसवले. नाविण्या आल्यावर तिच्यावर तूटून पडले. नाविण्या ला म्हणाले
"तू हारली...."

" तू आली नाही आता तुला काम पडले आम्ही येणार नाही"

नाविण्या म्हणत होती सासुबाई आल्या होत्या ना. मग काय तो आमचा मेंबर आहे म्हणत होते. सासुबाई हसत होत्या.


नाविण्या च्या डोहाळे जेवण, मुलगा झाला त्याच बारसं, जावळं, पहिल्या वाढदिवसाला कार्यालयात हे कोणी आलेच नव्हते कधीच. मदतीला हे आलेच नव्हते. नाविण्या कडूनच अपेक्षा राबवायच्या.


मामे नणंद नाविण्याला म्हणे" ए जड हाल ना.... "

नाविण्याने गच्चीवर टेबल, फळ नेली.. सगळ्या बायका गल्लीत त्याच्या आल्यावर नाश्त्याच्या प्लेट दिल्या.

तेवढ्यात मामे नणंद ए काय बसली चल ऊठ कुंकू लाव सगळ्यांना सगळ्या बायकांनी नणंदानी अपमान करतात हि बिचारी अशा नजरेने पाहिले. नाविण्या ऊठली कुंकू लावले. खाली येऊन बसली घरात

परत मामे नणंद "काय बसली ऊठ हे पोळपाट, लाटणे घासून दे." घासून दिले नाविण्याने.


नाविण्या तिच्या स्वाभिमान जपण्यासाठी परत किती वर्षे त्या लोकांत, त्यांच्या कार्यक्रमात गेली नाही.


परत सासूबाई नी सांगितले माझ्यासाठी ये. शेवटच कार्य परत जायला लागली

एकदा भांडी विसळत होती तर मामे दिर म्हणतो बहिणीला भांडी घासू नको अमेरिकेची मोलकरीण आणली. घासू नको. नाविण्याने विचारले कोणाला म्हणत आहे. मावस नणंद म्हणे " नाविण्या तुलाच म्हणत आहे अमेरिकेची मोलकरीण तुलाच तुलाच.. तुच कधी नव्हे ते भांडी घासते"

वर मावस नणंदेनी, मामे नणंदेनी नाविण्याला ब्लॉक केले.

वर नाविण्या वाईट कायमच.

लहान मामे जावा खाणाखुणा करून नाविण्याला वाढायला लावा. तिला काम सांगा. शेवटी नाविण्या बाळ कडेवर घेऊन वाढत होती.


नाविण्या एकटी होती. हे विरोधातले एक होऊन नाविण्याला वाईट अनुभव ठरलेले.


शेवटी नाविण्याला कोणत्याही कार्यक्रमात जायचा रस राहिला नाही. तिने जाण बंद केले.


नाविण्या चे वाईट अनुभव तिचा एकटीचा संघर्ष अजून आहे.. पुढे अजून संघर्ष करते. पण GIVE UP नाही करत पाहू या पुढच्या भागात....


*सौ. भाग्यश्री चाटी सांबरे*
©® 23.9.2021

🎭 Series Post

View all