तुझे आई बाबा आता माझेही ( भाग 2 )

फक्त सगळ्या आपेक्षा माझ्याकडुनच का ? सगळी कर्तव्ये पाळण्याचा ठेका मीच घेतलाय का ? तुम्ही सगळे मात्र मला नेहेमीच गृहीत धरता.कधीच माझ्या मनाचा विचार करत नाही.मग मी का करू ? माझ्या बाबतीत जे वागताय ते ठीक आहे पण माझ्या आई बाबविषयी जर तुला काही वाटत नसेल तर मलाही तसेच का वाटू नये ? आता या पुढे मला तसं वागायला जमणार नाही. जसं तू आई बाबांशी वागशील तसच मी सुद्धा तुझ्या माई अप्पाशी वागणार.कोणाला काय वाटायचं ते वाटू दे..मी कितीही केलं सगळ्यांच तरी कोणाला किंमत नाही मग मी का त्रास करून घेऊ ? बाबांचं ऑपरेशन होतं पण अप्पाची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी गेले नाही.हेच जर मी माई अप्पाच्या बाबतीत वागले असते तर ? त्यांना थोडं काही झालं तरी मी कासावीस होते पण तू तुला तर वर्षातून एकदाही आई बाबांना भेटायला जाता येत नाही.असा भेदभाव का ? आता यापुढे मला असं वागणं जमणार नाही . "


अनय मिराच्या वागण्यामुळे खूप रागावला होता . तिचं असं हे वागणं अनयसाठी नवीनच होतं . यापूर्वी ती कधीच अशी वागली नव्हती .
" मी तुझ्या माई अप्पाशी बोलावं असं वाटतं ना तुला मग तू सुद्धा माझ्या आई बाबांशी बोलावं असं मला वाटतं.आपण एक काम करूया.तू ज्या दिवशी आई बाबांशी बोलशील तेव्हा आणि तितकच मी तुझ्या माई अप्पाशी बोलेन ." आज मिराचाही स्वर चढला होता.
" काय बोलतेस हे मीरा ? अगं सून म्हणून तुझं कर्तव्यच आहे ना ते सासू सासऱ्यांना सांभाळणं ? आणि तुझे माई अप्पा कधीपासून म्हणायला लागलीस तू ? आधितर सारखी त्यांचं करण्यात मग्न असायचीच .मला कधी सांगावं लागलं नाही तुला इतकी तू त्यांची काळजी घ्यायची ना.माझ्यापेक्षा जास्त तू त्यांचावर लक्ष ठेवायचीस , कधी उलटून बोलली नाहीस.मला मान्य आहे माई जुन्या विचारांची आहे त्यामुळे तुला बराच त्रास होतो तिच्यामुळे , पण तू किती छान हॅण्डल करतेस सगळं .कधीच कोणाला तक्रारीची संधी नाही दिलीस .आणि आता हे काय नवीन ? अशी का वागते आहेस तू ? " अचानक मिराच्या वागण्यातला हा बदल बघून अनयचा पारा चढला.
" हो ना तेच चुकलं माझं.आधीपासून मी माझी कर्तव्ये करत राहिले . मला कितीही त्रास झाला तरीही.पण माझ्या मनाचा विचार कोणीही कधी केला नाही , अगदी तू सुद्धा नाही.मी माई अप्पाची इतकी काळजी घेते पण तू माझ्या आई बाबांची साधी चौकशी सुद्धा करत नाहीस.नेहेमी त्यांचा उल्लेख \" तुझे आई बाबा \" असा करतोस .फोन मध्ये बघ नंबर त्यांच्या नावाने सेव्ह केला आहेस पण मी मात्र तुझ्या माई अप्पाची नेहेमीच माझ्या आई बाबांपेक्षा जास्त काळजी घेतलीये.
आज मी तुझी माई अप्पा म्हणाले तर तुझ्या मनाला लागलं आणि तू तर इतकी वर्ष झाली तरी आई बाबांचा उल्लेख \" तुझे आई बाबा \" असा करतोस.तुझे कोणीच नाहीत का ते ? फक्त कधीतरी प्रेमाने त्यांची विचारपूस करावी इतकीच आपेक्षा आहे तुझ्याकडून.ती ही चुकीची आहे का ?
फक्त सगळ्या आपेक्षा माझ्याकडुनच का ? सगळी कर्तव्ये पाळण्याचा ठेका मीच घेतलाय का ? तुम्ही सगळे मात्र मला नेहेमीच गृहीत धरता.कधीच माझ्या मनाचा विचार करत नाही.मग मी का करू ?
माझ्या बाबतीत जे वागताय ते ठीक आहे पण माझ्या आई बाबविषयी जर तुला काही वाटत नसेल तर मलाही तसेच का वाटू नये ? आता या पुढे मला तसं वागायला जमणार नाही. जसं तू आई बाबांशी वागशील तसच मी सुद्धा तुझ्या माई अप्पाशी वागणार.कोणाला काय वाटायचं ते वाटू दे..मी कितीही केलं सगळ्यांच तरी कोणाला किंमत नाही मग मी का त्रास करून घेऊ ?
बाबांचं ऑपरेशन होतं पण अप्पाची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी गेले नाही.हेच जर मी माई अप्पाच्या बाबतीत वागले असते तर ? त्यांना थोडं काही झालं तरी मी कासावीस होते पण तू तुला तर वर्षातून एकदाही आई बाबांना भेटायला जाता येत नाही.असा भेदभाव का ?
आता यापुढे मला असं वागणं जमणार नाही . "
अनय मीराच्या या नवीन रुपाकडे बघतच राहिला .

🎭 Series Post

View all