तुझे आई बाबा आता माझेही ( भाग 1 )

अनय मीराच्या आई बाबांशी साधं फोनवरही बोलायला टाळायचा.मीराने लग्नानंतर नेहेमीच स्वतःच्या आई बाबांपेक्षा अनयच्या आई बाबांना प्राधान्य दिलं होतं.तसे संस्कारच होते तिच्यावर.माई खेड्यात राहिलेल्या होत्या आणि मीरा शहरात वाढलेली सुशिक्षित मुलगी होती. त्यामुळे साहजिकच दोघींची मते वेगळी असायची पण मिराने माईंच मन न दुखवता नेहेमीच आपल्या मनाला मुरड घातली होती.माई जुन्या विचारांच्या होत्या , ' सुनेला नेहेमी आपल्या ताब्यात ठेवावे , तिचे कौतुक कधी करू नये नाहीतर ती डोक्यावर मिरे वाटते ' असे त्यांचे मत होते . त्यामुळे त्यांनी कधीच मीराला मुलीप्रमाणे वागवले नाही.कुठल्याही कामात कधीच हातभार लावला नाही की तिला नोकरीही करू दिली नाही.तरीही मीराने नेहेमीच आपले कर्तव्य आनंदाने केले होते आणि अजूनही करतच होती.तिला नेहेमीच वाटायचे की अनयने सुद्धा आपल्या आई बाबांशी असेच छान वागावे , आपुलकीने त्यांची चौकशी करावी पण तो कधीच तसं करत नव्हता.कधीकधी मिराने जबरदस्तीने बोलायला लावलं तर तेवढ्यापुरत बोलायचा फक्त पण कधीच स्वतःहून त्यांची काळजी , विचारपूस अनयने केली नव्हती.मीरा किचनमध्ये काहीतरी काम करत होती.तिचा फोन वाजला." मीरा अगं तुझ्या बाबांचा फोन आहे." अनयच्या या बोलण्यावर तिने एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तिने फोन घेतला.अनयने सांगूनही मिराने माई अप्पाना फोन केलाच नव्हता ." हे काय चालवलं आहेस तू मीरा ? आठ दिवस झाले तरी तू बोलली नाहीस माई अप्पाशी ? दोन मिनिट वेळ नाही का तुला ? बोलून घे बरं वाटेल त्यांना." अनय जरा चीडूनच बोलला मिराशी.


" मीरा अग दोन दिवस झाले तू बोलली नाहीस माई अप्पाशी ? माई विचारत होती.फोन करशील आज ." अनयने ऑफिसला जाता जाता मीराला सुनावले.
" बघते, करीन जमलं तर .त्यांना बोलायचं का माझ्याशी ? तसं म्हणाले का ते ? काही काम आहे का ...? " मीराने मुद्दाम विचारले.
" तसं काही नाही ग . ते म्हणत होते मीरा बोलली नाही दोन दिवस म्हणून म्हणालो मी." अनय ऑफिसला निघून गेला.
\" आठ दिवस झाले बाबांशी बोल म्हणून म्हणतेय , तर काय काम आहे का ? काय बोलू वगैरे म्हणतोय नुसता .आणि ह्याच्या आई बाबांशी मी रोज बोलायचं ? त्यांनी कधी मला स्वःताहुन केलाय का फोन ? की कधी चौकशी करतात मी कशी आहे याची ? फक्त मीच कर्तव्य पार पाडायची का ? त्यांची काहीच कर्तव्ये नाहीत.? \" मीराची स्वतःशीच चीडचीड होत होती.
मीरा अनयचे लग्न होऊन दहा वर्षे झाली होती. त्याचे माई अप्पा त्यांच्यासोबत राहायचे. दोन वर्षांपूर्वी अनयला लंडनला प्रोजेक्ट मिळाला होता आणि मीरा , अनय आणि त्यांची आठ वर्षांची परी तिकडे शिफ्ट झाले होते.माई अप्पा त्यांच्या गावी राहत होते .मीरा सासू सासऱ्यांचा अगदी आई वडीलांसारख प्रेम आणि आदर करायची. अनयपेक्षा मीराच त्यांचं सगळं करायची , त्यामुळे अनयला कधीच माई अप्पाची कुठलीच काळजी नव्हती.लंडनला आल्यापासून तर रोज न चुकता व्हिडिओ कॉल करून दोघेही त्यांची विचारपूस करायचे.घरात सगळ्या सुखसोयी होत्या .घरकामाला चांगली माणसं होती .दोघेही इथूनही त्यांची सगळी काळजी व्यवस्थित घेत होते .
पण अनय मीराच्या आई बाबांशी साधं फोनवरही बोलायला टाळायचा.मीराने लग्नानंतर नेहेमीच स्वतःच्या आई बाबांपेक्षा अनयच्या आई बाबांना प्राधान्य दिलं होतं.तसे संस्कारच होते तिच्यावर.माई खेड्यात राहिलेल्या होत्या आणि मीरा शहरात वाढलेली सुशिक्षित मुलगी होती. त्यामुळे साहजिकच दोघींची मते वेगळी असायची पण मिराने माईंच मन न दुखवता नेहेमीच आपल्या मनाला मुरड घातली होती.माई जुन्या विचारांच्या होत्या , \" सुनेला नेहेमी आपल्या ताब्यात ठेवावे , तिचे कौतुक कधी करू नये नाहीतर ती डोक्यावर मिरे वाटते \" असे त्यांचे मत होते . त्यामुळे त्यांनी कधीच मीराला मुलीप्रमाणे वागवले नाही.कुठल्याही कामात कधीच हातभार लावला नाही की तिला नोकरीही करू दिली नाही.
तरीही मीराने नेहेमीच आपले कर्तव्य आनंदाने केले होते आणि अजूनही करतच होती.तिला नेहेमीच वाटायचे की अनयने सुद्धा आपल्या आई बाबांशी असेच छान वागावे , आपुलकीने त्यांची चौकशी करावी पण तो कधीच तसं करत नव्हता.कधीकधी मिराने जबरदस्तीने बोलायला लावलं तर तेवढ्यापुरत बोलायचा फक्त पण कधीच स्वतःहून त्यांची काळजी , विचारपूस अनयने केली नव्हती.
मीरा किचनमध्ये काहीतरी काम करत होती.तिचा फोन वाजला." मीरा अगं तुझ्या बाबांचा फोन आहे." अनयच्या या बोलण्यावर तिने एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तिने फोन घेतला.
अनयने सांगूनही मिराने माई अप्पाना फोन केलाच नव्हता .
" हे काय चालवलं आहेस तू मीरा ? आठ दिवस झाले तरी तू बोलली नाहीस माई अप्पाशी ? दोन मिनिट वेळ नाही का तुला ? बोलून घे बरं वाटेल त्यांना." अनय जरा चीडूनच बोलला मिराशी.

🎭 Series Post

View all