Login

तुझं माझं जग.. खरच?... भाग 5 अंतिम

सासुबाईंनी त्यांचा स्वभाव सोडला नव्हता, त्या दोघं कुठे जात असतील तर मोडता घालत होत्या,




तुझं माझं जग.. खरच?... भाग 5 अंतिम

अरे संसार संसार (जलद कथा स्पर्धा)

©️®️शिल्पा सुतार
......

शरदला हे पटत होतं, आता हिम्मत करावीच लागेल,.. "सोनल ठीक आहे, तू म्हणते ते मला मान्य आहे पण या सगळ्यात कुठेही आईला त्रास होणार नाही, तिचा अपमान होणार नाही या कडे लक्ष दे",

"हो चालेल मी पण या पुढे अस काही बोलणार नाही सासुबाईं बद्दल",.. सोनल

"आता घरी चलते का तू सोनल? ",.. शरद

"तुम्ही काय ठरवलं आहे",.. सोनल

"तू म्हणशील ते करू आपण मी बोलेल आईशी ",.. शरद

" एकदा दोनदा बोलून नाही होणार, तुम्हाला कायम आपली बाजू घ्यावी लागेल",.. सोनल

" हो चालेल मलाही पटत आहे ते",.. शरद

" मला काही सासूबाईंचा राग नाही, पण आपल आयुष्य हे आपलं आहे, तुम्ही समजून घ्या",.. सोनल

" हो काही प्रॉब्लेम नाही ",.. शरद

सोनल शरद दोघे घरी आले, सोनल सासरी निघाली, सोनल खुश होती, त्यामुळे तिचे आई-बाबा पण खुश होते.

सोनल आल्यामुळे सासूबाईंना ही बरं वाटलं

सोनलने आल्या आल्या स्वयंपाक केला, सुरेशही खूप खुश होता, तो वहिनीशी खूप बोलत होता, जेवण झालं सोनल आत मध्ये आवरत होती, शरद आत मध्ये आले, ते तिच्याशी छान गप्पा मारत होते,.. "चल सोनल आपण आईस्क्रीम घ्यायला जाऊ",

सोनल तयार झाली, दोघेजण निघाले

" कुठे जाता आहात तुम्ही आता इतक्या रात्रीचे?",.. सासुबाई

"आम्ही आईस्क्रीम घ्यायला जात आहोत आई, येतो आम्ही लगेचच अर्ध्या तासात",.. दोघेजण बाहेर आले, आता आपण रोज जेवण झाल्यावर फिरायला जायचं सोनल, चालेल ना

हो.. सोनल खुश होती, दोघं फिरून आले, आईस्क्रीम घेऊन आले, रोज प्रमाणे शरद आईजवळ बसलेले होते, आता सोनलला काही प्रॉब्लेम नव्हता, रविवारी दोघेजण छान पिक्चरला जाऊन आले, यावेळी सासूबाई येत होत्या सोबत, शरदने स्पष्ट नाही सांगितलं,

दोघांना त्यांचा सोबतचा वेळ मिळाला होता, दोघं खुश होते,

सासुबाईंनी त्यांचा स्वभाव सोडला नव्हता, त्या दोघं कुठे जात असतील तर मोडता घालत होत्या, पण यावेळी आता शरद खंबीर होते, ते सोनलची बाजू घेत होते, त्यांच्या नात्याला वेळ देत होते,

"सोनल आपण लग्नानंतर फिरायला गेलोच नाही आहोत, आता जाऊया का? आपली चौथी मासिक एनिवर्सरी येईल, काय विचार आहे, सेलिब्रेट करायचे ठरवलं आहेस तू तर छान सेलिब्रेट करूया",.. शरद

सोनल आता लाजली होती,.. "आपण जाऊ फिरायला चालेल",

शरद लॅपटॉपवर बुकिंग बघत होते,

"आईंना सांगा आधी शरद ",.. सोनल

" हो ते अवघड काम आहे ",.. शरद

सासुबाई आवाज देत होत्या,.." शरद अरे केव्हाचा आत बसला आहेस तू, इकडे ये बस जरा माझ्या जवळ ",

शरद सोनल हसत होते..."येतो मी बसतो आई जवळ जरा ",

" हो चालेल मी करते स्वयंपाक", ... सोनल किचन मधे गेली.

प्रत्येक नातं वेगळं असतं, त्या नात्याची गरजही वेगळी असते, नुसतच लग्न करून बायकोला घरी आणायचं, तिला काय हवं नको ते कोणी बघायचं?

या कथेत शरद चांगले होते म्हणून लगेचच सोनल आणि शरदचा प्रॉब्लेम नीट झाला, काही काही ठिकाणी बायकांना तर एवढा त्रास असतो, नवरा ऐकत नाही सासरचे त्रास देतात, एवढीच आशा असते फक्त की एखाद दिवशी सगळं ठीक होईल, काही करू शकत नाही यावेळी,

घरच्यांनीही समजून घ्यायला पाहिजे, नवरा बायकोला त्यांच्या वेळ द्यायला पाहिजे, सदोदित मध्ये मध्ये करू नये, प्रत्येक नात्याचा मान ठेवावा.

🎭 Series Post

View all