तुझं माझं जग.. खरच?... भाग 4
अरे संसार संसार (जलद कथा स्पर्धा)
©️®️शिल्पा सुतार
......
......
शरद संध्याकाळी घरी आले, सोनल घरी नव्हती, त्यांनी स्वतः चहा केला, आईला नेऊन दिला, जरा वेळ ते आईजवळ बसले.
"सोनल का नाही आली, काय झालं अस अचानक? का माहेरी गेली ती? ",.. आई विचारत होती.
शरद काही म्हटले नाही, स्वयंपाकाची वेळ झाली परत आईने विचारलं,.. "सोनल कधी येणार आहे?",
शरदने फोन घेऊन सोनलला मेसेज टाकला, सोनलने तिकडे दुर्लक्ष केलं.
रोज सांग्र संगीत स्वयंपाक लागत होता सासुबाईंना, आज उठून फक्त सासूबाईंनी खिचडी टाकली आणि शरदने काही आक्षेपही घेतला नाही.
बायको स्वयंपाक करते तर चार पदार्थ हवे असतात, आई करते तर खिचडी ही चालते,
आता चांगलाच एक आठवडा झाला होता, सोनल आली नव्हती आणि तिने फोन नाही केला नव्हता, शरदही बोलत नव्हते काही, सासूबाई रोज विचारत होत्या काय झालं आहे?
काय सांगणार आता आईला की तिच्यावरून भांडण झालं आहे, पण खरच सोनल म्हणते ते बरोबर आहे, आई का अस करते, मला सोनलला वेळ द्यायला हवा, मी तिच्या शिवाय नाही राहू शकत.
शरद ऑफिस मध्ये आले, तिथून त्यांनी सोनलला फोन केला,.. "सोनल राग सोड आता, काय झालं आहे, तुला फिरायला जायचं आहे का? आपण जाऊ दोघ",
"नुसतच फिरायला जायचा प्रश्न आहे का? मला कशासाठी राग आला आहे हे अजून समजले नाही का तुम्हाला?",.. सोनल.
" काय झालं आहे? ",.. शरद
"तुम्हाला नाही समजत का की सासूबाईं आपल्या दोघांमध्ये जास्तच इंटरफेअरन्स करतात, ते मला चालणार नाही, प्रश्न नुसताच फिरायला जायचा नाही, पण आपल्या दोघांचंही काही जग आहे आणि आपल्या दोघांनीही त्या गोष्टीचा सन्मान केला पाहिजे आणि एकमेकांना वेळ दिला पाहिजे, मी तिकडे येणार नाही कारण मला या गोष्टी पटत नाही, जर माझ्यासोबत तुम्हाला राहायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला मान्य कराव्या लागतील ",.. सोनल
" काय म्हणणं आहे तुझं मी संध्याकाळी येतो तिकडे आपण व्यवस्थित बोलून घेऊ",.. शरद
" हो चालेल",.. सोनल
संध्याकाळी शरद आले घरी, सोनल आणि शरद दोघांनाही एकमेकांना बघून खूप आनंद झाला होता, दोघांच एकमेकांशी पटतच होत खूप, त्यांना एकमेकांचा काही प्रॉब्लेमच नव्हता,
सोनल तयार झाली, दोघेजण फिरायला बाहेर गेले, घरच्यांसमोर काही बोलता आलं नसतं
" बोल काय म्हणणार आहे तुझं?",.. शरद
"तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, माझं असं म्हणणं आहे की आपल्या दोघांचं नवरा बायको म्हणून वेगळ नातं आहे, आपण एकमेकाला वेळ दिला पाहिजे, घरच्यांसोबत सुद्धा राहतांना आपण आपली स्पेस जपली पाहिजे, तुम्हाला तुमच्या घरच्यांना स्पष्ट शब्दात सांगता आलं पाहिजे की मला माझ्या बायको सोबत बाहेर जायचं आहे आणि आम्ही दोघेच जाणार आहोत, हा आमचा ठराविक वेळ आहे तेव्हा आम्ही दोघं सोबत राहणारच आणि जर हे तुम्हाला पटत नसेल तर माझी काही हरकत नाही मी तिकडे येणार नाही",... सोनल
शरद ऐकत होते
" मला तुमच्या सोबत राहायचं आहे आणि आपल लग्न झाला आहे, मला वेळ द्या, माझा तो हक्क आहे तो ",.. सोनल
" मला तुझं म्हणणं पटत आहे सोनल, मी प्रयत्न करेन आईशी बोलायचा ",.. शरद
" नाही प्रयत्न नको आहे मला, स्पष्ट सांगा हो किंवा नाही, जर तुम्हाला माझी बाजू घेणं जमत नसेल, आपल्या नात्याला वेळ द्यायला जमत नसेल तर माझी काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या आई सोबत राहू शकता, मला तुमचा राग नाही, तुम्ही खूप चांगले आहात, पण सदोदित सगळ्यांसोबत मी नाही राहू शकत, मला दिवसातला ठराविक वेळ तुमचा हवाच, आठवड्यातुनही एक दोनदा मला तुमच्या सोबत बाहेर जायच आहे, माझ्या गोष्टी पटत असतील तर हो बोला",.. सोनल ठाम होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा