तुझं माझं जग.. खरच?... भाग 3

आई झालं तेही करून, नाही समजत यांना, माझी बाजू घ्यायची नाही त्यांना, त्यांच्या आईला जे आवडतं तेच करायचं आहे



तुझं माझं जग.. खरच?... भाग 3

अरे संसार संसार (जलद कथा स्पर्धा)

©️®️शिल्पा सुतार
......

सकाळी सोनाली उठली, तिने शरदला एनिवर्सरी विश केलं, ते पण खूप खुशीत होते,

"काय करू मी बोलून बघू का परत यांच्याशी",.. तिने शरदला विचारलं काय ठरत आहे मग आज आपलं? ",..

कसलं?.. त्यांनी विचारलं

"आज आपण जाणार आहोत का बाहेर संध्याकाळी दोघ? मी कालपासून विचारते आहे तुम्हाला? ",.. सोनल

"नाही जमणार सोनल, मुळात असं तू काही ठरवत जाऊ नको",.. शरद

" का नाही ठरवायचं मी? तुम्हाला आईंसाठीच वाटत आहे ना? त्यांनाही घेऊन जाऊ संध्याकाळी आपल्या सोबत, गार्डनमध्ये बसतील त्या आपल्यामध्ये एका बाकावर",.. आता सोनलला खूप राग आला होता.

तिने असं म्हटल्यावर शरदही खूप चिडला,.." काय चाललं आहे हे सोनल? समजत का काय बोलते आहेस तू आई बद्दल? काय फिरायला जायचं.. फिरायला जायचं चाललं आहे तुझ, कुठेही जाणार नाही आहोत आपण, परत मला तेच तेच विचारायचं नाही, चल मला चहा नाश्ता दे",.. शरद

सोनल बाहेर आली नाही, ती रडत होती, स्वतःच्या हाताने चहा नाश्ता घेऊन आईला देऊन शरद ऑफिसला निघून गेले, ते आत मध्ये सोनलला भेटायला आले नाही,

एवढी छान एनिवर्सरी पण रागातच दिवस सुरू झाला, पूर्ण दिवस असाच गेला सोनलचा, संध्याकाळी तिने स्वयंपाक करून घेतला, रात्री नेहमीप्रमाणे शरद आले, जेवण झाल, जरा वेळ ते आई बरोबर बसले होते, सोनलने झोपून घेतलं, कुठे ही गेले नाहीत ते,

सकाळी सोनल उठली, शरद उठले होते, ऑफिसचं काम करत होते,

" मी माझ्या आई कडे जाते आहे आज",.. सोनल

शरद काही म्हटले नाही, ते ऑफिसला गेल्यानंतर सोनलने तिची बॅग भरली आणि ती माहेरी निघून गेली,

सासूबाई विचारत होत्या,.. "काय झालं सोनल?",

ती काही बोलली नाही

"संध्याकाळी येशील का ग घरी वापस?",..

सोनलने उत्तर दिलं नाही

आता कशाला लागते आहे मी? घरकाम करायला का? नाही तरी तुम्ही आणि तुमचा मुलगा खुशच आहात एकमेकां सोबत, माझं काय काम आहे इथे, यांना स्वतःच्या मनाने काही करायच नाही, रहा तुमचे तुम्ही आरामात, मला या अश्या वातावरणात रहाता येणार नाही, बर झालं लवकर समजल,

माहेरी सगळे विचारत होते काय झालं सोनल? , काही न बोलता ती आत मध्ये निघून गेली.

आईने चहा केला, आई चहा घेऊन आत गेली, आईच्या गळ्यात पडून सोनल रडत होती.

" काय झालं सोनल?",.. आई

ती आईला सगळं सांगत होती,.. "आई तिकडे माझ कोणी ऐकत नाही, साधी अपेक्षा होती मला शरद सोबत थोडा वेळ घालवायचा होता, ते देखील यांच्या कडून झाल नाही, काय अर्थ आहे ग तिकडे रहाण्यात" ,

"असं करतात का सोनल? धीराने घे थोड, शांत पणे बोलून बघ तू शरद रावांशी",.. आई

"आई झालं तेही करून, नाही समजत यांना, माझी बाजू घ्यायची नाही त्यांना, त्यांच्या आईला जे आवडतं तेच करायचं आहे, आता मी अजून भांडत बसणार नाही तिकडे, मी माझा निर्णय घेतला आहे, मी तिकडे जाणार नाही आई, मी कायम माझ सुख मला कधी मिळेल याची वाट बघत बसू का? माझ्या कडुन नाही होणार हे ",.. सोनल

" असंच असतं जीवन बेटा ",.. आई

" चोविस तास तर घरचे सगळे सोबत असतात ना, त्यातले एक तास आम्ही दोघ फिरायला गेलो तर काय फरक पडतो, शरद ठाम निर्णय घेत नाहीत आई ",.. सोनल

" काय ठरवलं तू मग? ",.. आई

" सध्या तरी काहीच ठरवलं नाही, पण मी राहते इथे थोडे दिवस",.. सोनल

ठीक आहे

बाहेर बाबा विचारत होते काय झालं आहे सोनलला? आई सांगत होती होईल ठीक नवीन लग्न झालं आहे.

🎭 Series Post

View all