Login

तुझं माझं जग.. खरच?... भाग 2

मला काही सासूबाईंची अडचण नाही पण त्यांनी सुद्धा मिळून मिसळून रहाव ना, अगदीच हेकेखोरपणा,



तुझं माझं जग.. खरच?... भाग 2

अरे संसार संसार (जलद कथा स्पर्धा)

©️®️शिल्पा सुतार
......

सोनलची नुसती चीड चीड होत होती, शरदला ते समजत होत, पण होईल ठीक, शांत होईल सोनल, नाही जावु शकत आम्ही बाहेर दोघ, कस बोलणार आईला, ती नाही म्हणेल, सोनल काय अस करते लहान मुली सारखी, अजिबात धीर धरत नाही, सोनलला समजुन सांगाव लागेल,

सोनलला शरदचा सहवास हवा होता, खूप बोलायच होत तिला त्यांच्याशी, खुप काही अपेक्षा नव्हत्या तिच्या, मुळी साड्या दागिने तिने मागितले नव्हते, मागितला होता तो वेळ, तिच्या नवर्‍याचा वेळ तिच्या हक्काचा वेळ, तोच मिळत नव्हता तिला , काय अस, म्हणून सोनलला वाटत होत निदान या वेळी तरी आपण दोघेच कुठेतरी जाऊ, स्पेशल दिवस आहे.

संध्याकाळी साध गार्डन मध्ये जाऊन बसल तरी चालेल यावेळी कार काढायची नाही म्हणजे ती भरायला कोणी येणार नाही, चालत जावू मस्त, अगदी हॉटेलला जाऊन जेवण वगैरे असं नको आहे मला, म्हणजे खर्चही नाही होणार यांना, सासुबाई आक्षेप घेणार नाहीत, नाहीतर त्या ओरडतील. तरी माझा नवरा कमवतो, माझ्या साठी काही खर्च नको व्हायला सासुबाईंना , शरद चांगले आहेत, पण अजिबात स्टँड घेत नाहीत ते,

शरद नुकतेच ऑफिस हून आले होते, ते समोर आवरत होते, कसला विचार करत आहेत हे? बहुतेक ते त्यांच्या आईचाच विचार करत असतील, काही खरं नाही माझं इथे, आम्हाला दोघांना आमच आयुष्य जगताच येणार नाही का?

"अहो मी काय म्हणते आहे आपण जाणार आहोत का उद्या बाहेर? काल पासुन तुमच लक्ष कुठे आहे? काहीतरी तर बोला ",... सोनल

"भूक लागली खुप, झाला का स्वयंपाक? ताट कर चल",.. शरदने विषय टाळला.

"हो चला",.. सोनल ताट करत होती, शरद आईशी बोलत होते,

रोज हे ऑफिस हून येतात तेव्हा पण सासूबाई असच करतात, मी पाणी घेऊन गेले की त्या माझ्या हातातून पाणी घेतात आणि मग मुलाला देतात, जेवायला बसतांनाही त्या स्वतः शरदला वाढुन देतात, त्या त्यांच्याजवळ बसतात, हव नको ते बघतात,

मला का नाही करू देत त्या शरदच काम, मला पण हौस आहे, आमच नवीन लग्न झाल आहे, त्यांची आवड निवड माहिती आहे मला, का मधे मधे करतात या? ,

एकदा सासुबाईंना बहिणीकडे जाण्याचा प्रसंग आला होता , त्या दुपारी गेल्या, सोनल खूप वाट बघत होती शरदची, शरद आले

"आई कुठे गेली",.. शरद

"त्या मावशीं कडे गेल्या आहेत, बहुतेक उद्या येतील" ,... सोनल आवरत होती, शरद तिच्या मागे मागे करत होते, किती खुश होते ते दोघ, अगदी ओट्याजवळ उभ राहून शरद तिच्याशी बोलत होते,

सुरेश आला, ते तिघ जेवायला बसले, तिघांनी छान टीव्ही बघत जेवण केलं, हेवेदावे नाही चिडचिड नाही, प्रेमळ वातावरण होत,

जेवण झाल्यानंतर सुद्धा शरद आणि सुरेश दोघांनीच बाकीचं सगळं आवरलं होतं, मला उठू दिलं नव्हतं, नंतर जरा वेळ शरद सोनल बाहेर बसले होते, सुरेश आराम करत होता,

बाहेर रिक्षा थांबली किती घाईने रात्री वापस आल्या होत्या सासुबाई , जसं काही रात्रभर तिकडे राहिल्या असत्या तर इकडे काय होणार होत, उलट त्या नव्हत्या तर किती छान वाटत होतं, शरदही किती खुश होते, अस आवडतं मला,

सोनल उठली, तिने सासुबाईंना जेवायला दिल, शरद आईशी बोलत बसले,

मला काही सासूबाईंची अडचण नाही पण त्यांनी सुद्धा मिळून मिसळून रहाव ना, अगदीच हेकेखोरपणा, मला मुद्दाम त्रास द्यायच, हे सगळं बंद करावं, मेन म्हणजे मुलाच्या संसारात ढवळाढवळ नाही करायला पाहिजे त्यांनी,

रात्री सोनल शरदची वाट बघत होती, ते आलेच नाहीत लवकर रूम मध्ये, सोनलने झोपून घेतलं, जाऊ दे उद्या सकाळीच विचारू यांना, किती वेळा विचारणार पण , यांना यायच नसेल माझ्या सोबत उद्या, सोनल रडत होती.

🎭 Series Post

View all