तुझं माझं जग.. खरच?... भाग 1

नवीन लग्न झालं होतं तेव्हा असेच करायच्या त्या, अगदीच रात्री पुरते शरद खोलीत यायचे ते पण खूप उशिरा



तुझं माझं जग.. खरच?... भाग 1

अरे संसार संसार (जलद कथा स्पर्धा)

©️®️शिल्पा सुतार
......

सोनल आणि शरद एक प्रेमळ जोडपं, त्यांच्या लग्नाला नुकतेच तीन महिने पूर्ण होणार होते, तिसरी मासिक एनिवर्सरी होती ती स्पेशल करायची, एकदम मस्त एंजॉय करायच, खूप स्वप्नं बघितले होते सोनलने, कालपासून सोनल शरदला म्हणत होती ,.. "आपण दोघ कुठेतरी बाहेर जायचं का? , दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा ना आपण, चालेल ना शरद" ,

सोनलने असं विचारल्यावर शरद मुद्दामून प्रत्येक वेळी वेगळा विषय काढून बोलत होता किंवा गप्प तरी बसत होते, काय कराव शरदला समजत नव्हत, सोनल नाराज नको व्हायला, पण आम्ही दोघ कुठे गेलो तर आई चिडेल, ती नाही म्हणेल, काय करू?

सोनल या वेळी हट्टाला पेटली होती,.. "आपण जाणार, ते ही फक्त दोघ, मला तुमच्या सोबत एन्जॉय करायच आहे,आपल लग्न झालं आहे का घाबरता तुम्ही एवढे?",

शरद परत गप्प होता.

"का करतात हे शरद असं नेहमी काही समजत नाही, यांच वागणच विचित्र आहे. नक्की हे सासुबाईंना घाबरत असतिल अणि मला कुठे नेणार नाही , पण मी ही हा विषय सोडणार नाही, माझा हक्क मी मिळवणार आहे या वेळी ",..सोनल

घरात चार माणसं होती, सोनल शरद दिर सुरेश आणि सासुबाई, सुरेश नोकरी करत होता, त्याच लग्न झालं नव्हतं, कधीही कुठे जायचं असले की चौघे सोबत जात होते, एकदाही ते दोघेजण फिरायला असे गेले नव्हते,

सुरेश नेहमी म्हणायचे की तुम्ही दोघे जाऊन या आम्ही घरी रहातो, सारख काय सोबत आम्ही तुमच्या, पण सासूबाई मोडता घालायच्या, गाडी काढता आहात तर कशाला गाडी रिकामी जाऊ देता, चला आपणही जाऊ म्हणून त्या यायच्या सोबत.

म्हणजे गाडी भरायची म्हणून येतात का त्या सोबत? की त्यांना त्यांच्या मुलासोबत मला जाऊ द्यायचं नाही , एवढं होतं तर लग्न कशाला केलं मुलाच , राहू द्यायचं मुलाला एकटं स्वतःसोबत, बर बाहेर कुठे गेलं की यांना सांभाळत बसा आपण, त्यांचा हात धरा त्यांना बाथरूमला घेऊन जा, काय हवं नको ते विचारा, त्यांची सेवा करत बसायची का प्रत्येक ठिकाणी? आणि त्या तर इतक्या म्हातार्‍या असल्यासारखे वागतात बाहेर गेलं की, नुसत स्वतः च कौतुक करून घेतात, एवढंच जर काही जमत नाही बाहेर तर घरात थांबायचं ना, नाही पण मुलगा सुन एन्जॉय करतील ना हे कस सहन होईल त्यांना ,... सोनल खूपच चिडली होती यावेळी.

सासुबाईं पेक्षा तिला शरदचा राग येत होता, यांना सांगता नाही येत का स्पष्ट आईला की मी सोनल सोबत बाहेर जातो आहे, लग्न झालं आहे आमचं, आम्हाला ही आमच आमच आयुष्य आहे, एवढा घाबरट स्वभाव म्हणजे अति होतं आहे,

सासुबाई पण काय असं करतात किती इन्सेक्युअर होतात त्या, एकदा जर त्यांचा मुलगा माझ्यासोबत बाहेर आला तर काय कायमचा त्यांच्यापासून दुरावणार आहे का? , कोण सांगेल पण त्यांना हे.

नवीन लग्न झालं होतं तेव्हा असेच करायच्या त्या, अगदीच रात्री पुरते शरद खोलीत यायचे ते पण खूप उशिरा, आईशी बोलत बसायचे ते, सकाळी तिला लवकर उठावं लागायचं, दोघांना असं नीट सोबत रहायला वेळच मिळायचा नाही,

शरदने सोनल साठी काही आणल की ते ही गुपचूप देणार, तिला सांगणार सांगु नको कोणाला, गजरे साड्या फुल सगळ दोन, लग्न झाल तेव्हा शरदचा पगार वाढला त्यातून त्यांनी सोनल साठी कानातले आणले होते, किती चिडल्या होत्या सासुबाई तेव्हा, दुसर्‍या दिवशी त्या स्वतः शरद सोबत जावून अंगठी घेवून आल्या तेव्हा त्यांना बर वाटल होत , समजुतदार पणा असा नाहीच अंगी, सगळीकडे बरोबरी,

शरदचे वडील आता दोन वर्षा पुर्वी वारले होते, त्यामुळे मुल खूप जपत असत त्यांना, जपा काही हरकत नाही पण चुकीच्या गोष्टीना तरी विरोध हवा, नाहीतर चुकी करणारी व्यक्ति गैरफायदा घेते प्रत्येक वेळी,

झाल ना आता वय, केल ना इतके वर्ष संसार, नवऱ्यानेही केल ना खुप कौतुक, आता थोड अलिप्त व्हायला काय हरकत आहे, कोण सांगेन हे सासुबाईंना पण, मुलाला सुनेला थोड जगु द्या त्यांच्या मना प्रमाणे.

🎭 Series Post

View all