Jan 26, 2022
नारीवादी

तुझा मान सम्मान माझी जबाबदारी.......

Read Later
तुझा मान सम्मान माझी जबाबदारी.......

 "ऊठ सीमा आवर ग आता", आई ओरडत होती 

तिच्या कडे साफ दुर्लक्ष करून सीमा आरामात लोळली होती, "कसा होणार आहे या मुलीच काय माहिती"? कसल्याही कामाची सवय नाही...... आई लटका राग दाखवत होती 

सीमा अतिशय हुशार मुलगी होती, कुठलीही गोष्ट एकदा सांगितली की लगेच सीमा आत्मसात करायची 

सध्या सीमाचा सगळा वेळ ऑफिस मध्ये जायचा, घरकाम येत होत पण प्रॅक्टिस नव्हती, सीमाला वाटायचे की नवरा करेल मदत, नाही तर मी करून घेईन त्याचा कडून, सीमा होतीच तेवढी सुंदर, कॉलेज मध्ये सगळे मागे पुढे होते तिच्या, त्यामुळे तिला विश्वास होता नवरा आपले फार लाड करेन, पण तिच्या बाबतीत वेगळच घडणार होत.... 

एक चांगला स्थळ सांगून आल, परेश मोठ्या पोस्ट वर कामाला होता, घरात कसली कमी नव्हती सीमाला बघताच परेशने पसंद केल, 

"मला घर काम येत, पण प्रॅक्टिस नाही आहे" सीमा सांगत होती 

"काही काळजी करू नको आमच्या घरातले सगळे खूप छान आहेत, मदत करतील , तुला काहीही काम पडू देणार नाही तू निर्धास्त रहा"..... परेशने सीमाचं मन जिंकलं होतं

सीमा खूष होती की चांगला समजूतदार नवरा मिळाला

दोन महिन्यात वाजत गाजत लग्न झाल 

लग्नानंतर सीमा सासरी आली, कॉलेज नंतर नौकरी इतर मुलींन प्रमाणे तिला घरकामाची अजिबात सवय नव्हती, 
दुसर्‍या दिवसापासुन पूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर आली, उठायला थोडा उशीर झाला सासुबाई रागावलेल्या होत्या... 

आटपत जा सीमा लवकर लवकर अजून चहा नाश्ता रेडी नाही? सगळ्यांची ऑफिसला जायची वेळ झाली 

कामाची सवय नसलेल्या सीमाला काय कराव सुचत नव्हते, सासूबाई मदत करायला तयार नव्हत्या, उलट प्रत्येक कामात चुका काढून तिला बोल लावत होत्या, 

"शिक्षणासोबत जरा दोन कामाच्या गोष्टी शिकल्या असत्या तर बरं झालं असतं, आता का सगळ आम्ही शिकवायचं तुला ",...... सासुबाई डाफरल्या 

सीमाला अपेक्षा होती नवऱ्याकडून "परेश उठ ना प्लीज मला मदत कर" 

हे बघ सीमा याआधी मी कधीही काहीही काम केलेला नाही आणि मला ऑफिसचं काम खूप आहे, आई सांगते तसं तू कर, आईची मदत घे.... परेश चिडलेला होता

अरे पण ऑफिस आणी घरचं काम मला जास्त होत आहे, तू जर मदत केली तर बर होईल, नाहीतर आपण एक मदतनीस ठेवूया का?.... सीमाने सुचवून बघितल

आईला आवडत नाही मदतनीसच्या हातच काम आणि काय करते विशेष अस तु? घरात माझी आई किती वर्षापासुन काम करते तिला नाही झाला कधी त्रास तू जास्तच बाऊ करते..... परेश

पण लग्नाआधी तर तू बोलला होतास की आमच्या घरात सगळे मदत करतील तुला, खूप चांगली आहेत सगळे.... सीमाला आठवलं 

मग काय तुला इथे त्रास आहे का? आम्ही नीटच वागतो आहे कि तुझ्याशी..... परेश आता त्रासला होता

परेश सिमाला अजिबात समजून घेत नव्हता तो ही आईच्या सोबत सीमाला त्रास द्यायचा, मदत करायला सांगितले की बोलायचा "नसेल जमत तर सोड नौकरी, काही कमी नाही आपल्याला" , त्याला समजत नव्हता की मुलीला सासरी आधाराची गरज असते, नवऱ्याचे कर्तव्य तो पूर्ण पणे विसरला होता, 

सीमाला समजत नव्हत काय कराव? कस समजावाव परेशला? काही तरी चमत्कार होईल अशी आशा ठेवून ती दिवस घालवत होती..... 


एक दिवशी सीमाची नणंद मीना सकाळी सकाळी सामान घेवुन घरी आली, काही ना बोलता तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, मीनाच नुकतच लग्न झालं होतं, चांगलं सासर मिळालं होतं तिला, मग असं अचानक काय झालं? सासुबाईंन सकट सगळे काळजित होते, 

शेवटी संध्याकाळी दार उघडून तिने परेशला आत बोलवलं , "दादा लग्नाआधी वाटलं होतं तसे हे लोक चांगले नाहीत , माझा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळा वेळ कामात जातो, मी कशासाठी एवढी शिकली आहे हेच मला समजत नाही आणि बोलणे बसतात ते वेगळेच, मला अजिबात आवडत नाही तिकडे,"... मीना रडायला लागली

हो का पण त्यांनी थोडा तुला वेळ द्यायला पाहिजे ना ? समजून घ्यायला पाहिजे,... परेश काळजी करत होता

 एवढी शिकलेली माझी बहीण तिचा सासरी असा छळ होतो हे ऐकल्यावर परेश ला खूप वाईट वाटले, 

मीनाचा नवरा खूप शिकलेला समजूतदार वाटत होता, तोही असं वागला, नवराही यात सामील आहे हे ऐकुन परेशला खूप वाईट वाटल, 

पण म्हणतात ना दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं तर चार बोट आपल्याकडे असतात तसंच, आपण ही वाईट वागतो सीमाशी, बरेच दिवस झाले सीमा सांगते आहे मदतीला ये असं, पण आपण अजिबात मदत करत नाही सीमाला, परत आधार देण्याच्या ऐवजी वाईट साईट बोललो तिला, किती त्रास सहन केला असेल सीमाने, मीना सारख सीमाला ही आपला राग येत असणार, कंटाळा आला असणार, आपण तिला दिलेलं वचन पूर्ण केलं नाही, अजून तिच्या त्रासात वाढ केली, याचा त्याला पश्च्याताप झाला, ती काय विचार करत असेल आपल्याबद्दल खूपच चुकलं वागण, यापुढे आपण बायको चि काळजी घेणार हे त्याने मनोमन ठरवल 


सीमाला आत बोलवून बहिणी समोर परेशने सीमाची माफी मागितली, "सीमा मला माफ कर, मी तुला समजून घेऊ शकलो नाही, नवीन लग्न झाल्यावर नव्या घरात मुलीला सपोर्टची, प्रेमाची गरज असते हे साफ विसरून गेलो मी, सगळेच विसरून जातात पण यापुढे तू म्हणशील तसं करू, माझं चुकलं, आयुष्यभर प्रेम सम्मान देण्याचा वचन देतो आहे मी तुला" , आज माझ्या बहिणीला त्रास झाला तेव्हा मला तुझ्या त्रासाची कल्पना आली, 

अपराधी वाटत होता त्याला, या पुढे आईला ही समज देईन असं वचन दिलं त्याने , स्वतःच्या बहिणीला त्रास झाल्यामुळे बायकोचा त्रास परेशला कळला, पण या ऐवजी आधी थोड समजून घेतलं असते तर, किती छान झाले असते असतं..... 

दुसर्‍या दिवशी मीनाच्या घरी जावून सगळ्यांना परेशने समजावल , मीना ही भावाचे आभार मानून घरी परतली. सीमा आणि परेश च्या सुखी संसाराची सुरवात झाली होती, सीमा ने मनोमन देवाचे आणि नणंदेचे आभार मानले.

©️®️ शिल्पा सुतार

पोस्ट नावासकट शेअर करायला काही हरकत नाही 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now