तुझा वेळ ही महत्वाचा... भाग 2

आईची धुसपुस सुरू होती,.. "किती गार आहे जेवण, थोड खातो आपण, ते चांगल हव अस वाटत


तुझा वेळ ही महत्वाचा... भाग 2

©️®️शिल्पा सुतार
.........

" इकडे ये मनीषा इथे शांत बस आधी चहा घे",.. सचिनने तिला स्वतः चहा दिला.

" हे बघ मला बोलायच आहे तुझ्याशी, प्रत्येकाला अशी हॉटेल सारखी फाइव स्टार ट्रीटमेंट देणं कमी कर जरा, जाला त्याला ज्याच त्याच काम करू दे, नंतर तुला ते कठीण जाईल, आणि या मुळे तुझी किम्मत कमी झाली आहे ",.. सचिन.

"माझ्या कडून होतं तोपर्यंत करते मी, इथे आपले लोक आहेत सगळे, आणि काही ऑप्शन आहे का आपल्या कडे, करण आहे सगळ्यांच",... मनिषाला आता हल्ली वाटत होत आपण काहीही केल तरी घरच्यांना पसंत पडत नाही, स्वतः साठी वेळ मिळत नाही, बरेच वर्ष झाले लग्नाला तरी तेच सुरू आहे, पण बोलणार काय, ती दुर्लक्ष करत होती, होईल जस व्हायच तस, आई बाबा एक रात्र कुठे जात नाहीत, छोटे दीर त्यांची फॅमिली मजेत आहेत, जावू दे आपल ठरलं ना त्या विषयी विचार करायचा नाही,

"ठीक आहे मग तुला त्रास झाला तर नको सांगू, तू ऐकत नाही माझ ",.. सचिन.

आई बाबा फिरून आले, त्यांचा चहा झाला, जरा वेळाने मनीषाने सगळ्यांना नाश्ता दिला, तिने पण थोडसं घेऊन खाऊन घेतलं, आवरून सचिन ऑफिसला गेला.

दिवसभर परत मनीषाची धावपळ होती, ज्याला जे हवं ते ती करत होती,

मुलांची परीक्षा सुरू होती, मुलं लवकर आले शाळेतून, त्यांचं खाणं झालं, तीच आई बाबांच जेवण झाल, लगेच दुसऱ्या दिवशीचा अभ्यास करायला लागले मुलं.

आज मनीषाने लवकरच स्वयंपाक करून घेतला. ती पूर्ण वेळ मुलां जवळ बसलेली होती, पियूला ती वाचून दाखवत होती, राघव त्याचा अभ्यास करत होता. काही समजल नाही तर तो विचारात होता.

जरा वेळाने सचिन ऑफिस होऊन आला, आई-बाबा जवळ बसला, जरा वेळाने मनीषाने ताट घेतले, जेवेपर्यंत स्वयंपाक गार झाला.

आईची धुसपुस सुरू होती,.. "किती गार आहे जेवण, थोड खातो आपण, ते चांगल हव अस वाटत, का करते ही मनीषा अस, एवढ होत नाही का तिच्या कडून, इनमिन चार पाच लोक ",

"आई अग ठीक आहे ना, परीक्षा सुरू आहेत मुलांच्या, किती छान की मनीषा घरच सांभाळून मुलांच करते, एखाद्या वेळी आपण ही अॅडजेस्ट करायला हरकत नाही, शांत हो, जेवताना गडबड नको" ,.. सचिन.

मनीषाने ऐकल सासुबाई चिडल्या ते, ती नाराज होती, रात्री रूम मध्ये येवून सचिन जवळ बसली ती, जास्त बोलत नव्हती आज.
.........

🎭 Series Post

View all