Login

तुझा वेळ ही महत्वाचा... भाग 1

आता हल्ली सचिनला मनीषा सोबत घालवायला वेळ मिळत नव्हता, घरच्या जबाबदारीत मनीषा पूर्ण अडकली होती,


तुझा वेळ ही महत्वाचा... भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.........

"पाण्याची बाटली घेतली का पियू राघव? सगळ्या वह्या घे पियु, राघव तुझा अभ्यास झाला आहे, काळजी करू नकोस, नीट लिही पेपर",.मनीषा.

"हो आई माहिती आहे आम्हाला सगळं, किती काळजी करते प्रत्येक गोष्टीची",.राघव.

शाळेची बस आली, दोघं मुलं बस मध्ये बसून निघून गेले.

मनीषा घरात आली, सचिन तिच्याकडे बघत होता,." झाली का सकाळची धावपळ, बस अशी".

" अजून कसलं काय, तुमचा चहा नाश्ता डबा बाकी आहे",.. मनीषा.

" तयारच आहे ना सगळा स्वयंपाक, बोल माझ्याशी पाच मिनिट, आपण मुल शाळेत गेल्यावर वॉकला जायच का,कधीच विचारतो आहे मी ",. सचिन

"कस जमेल किती काम असतात सकाळी, अस बसून कसं चालेल नंतर बोलते मी, तुमचा चहा आणते",.मनीषा लगबगीने किचनमध्ये केली एकच कप चहा घेऊन आली,

" तुझा चहा कुठे आहे?",.. सचिन.

" हो घेईन मी नंतर पोळ्या करते आहे ",.. मनिषा.

" किती वर्ष झाले अशीच धावपळ सुरू आहे हिची, अजिबात शांततेत घेत नाही",.. सचिन.

आता हल्ली सचिनला मनीषा सोबत घालवायला वेळ मिळत नव्हता, घरच्या जबाबदारीत मनीषा पूर्ण अडकली होती, घरचे समजून घेत नव्हते, सगळ अगदी नीट वेळेवर झालेल हव होत त्यांना.

सचिन घरातील मोठा मुलगा, अतिशय समजूतदार, मनीषाला खूप समजून घ्यायचा तो, जोडी छान होती ती सचिन मनीषा, आई बाबा त्याच्या कडे होते, लहान भाऊ वेगळा रहात होता, थोडे दिवस त्याने ही जबाबदारी घ्यावी आई बाबांची अस सचिनला वाटत होत, पण आई बाबा ऐकत नव्हते, सगळी जबाबदारी या दोघांवर होती, आई त्यात मनीषाला नेहमी बोलत असत, छोटी सून जी काही करत नाही तिचे गोडवे गात असत,

सासुबाईं मुळे मनीषा घरात घाबरलेली असायची, नको बोलायला कोणी काही मला, आपण आपल नीट काम करा,

मनीषाच काम परफेक्ट होत, नेहमी ती घरच्यां साठी सगळ्यांना हव ते करायची, स्वतः साठी वेळ नव्हता तिला, अगदी जो जे म्हणेल ते ऐकायची ती. एक वेळ सचिन कडे दुर्लक्ष झाल तरी चालेल पण सासू सासरे यांच नीट करत होती ती.

.........
0

🎭 Series Post

View all