१२) तूझ्या आठवणींचा विरह

.....
अस म्हणायला हरकत नाही माईने तीला समजवलं तस तीच्या डोळ्यात पाणी आलं.आणि माईने तीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला.तसे प्रियाला तीचे अश्रू अनावर झाले आणि ती माईच्या मिठीत शिरत.हुंदके देऊ लागली.माईने तीला आजिबात आडवलं नाही रडू दिलं.

बस बस शांत हो बघू रडू नकोस थोडा वेळाने माईने तीला शांत केलं.

माई तू ,किती आई सारखी माया करतेस आमच्या सर्वांवर माझी आई गेली. पण...तूझ्यां मायेत मला माझ्या आईचा मायेचा वास जाणवतो.तूझ्यां मांडीवर डोक ठेवलं ना"की तूझा डोक्यावरून फिरणाऱा हात माझ्या आईचाचं आहे असं वाटतं.मला लहान पणी बरं नसायचं तेव्हा प्रेमाने शातीशी  कवटाळायचीस ना" तेव्हा काळजीने तूझं हृदय धडधडायचं तेव्हा सुद्धा माझ्या आईचं हृदय धडधडतंय असचं वाटायचं आणि मग मात्र मी" तुझ्या भोवती माझे हात अजून  घट्ट करायची"

ज्या दिवशी मी "आश्रमात आले त्या दिवसानंतर मला आईची आठवण नाही आली कधी का? माहित आहे कारण मला नेहमी तूझ्यात माझी आईच दिसायची पण आज मला खूप आठवण येतेय तीची "

कळतंय ग... बाळा हा दिवसचं तसाच आहे. आईची आठवण येण्यांसारखा' नेहमी सारखा दिवस नाही ना" हा लग्न आहे तूझं या दिवशी आईची तूला आठवण येणं सहाजिकच आहे. एवढचं नाही तर....आई सुद्धा जिथे असेल तिथून तूला बघत असेलं आणि खूप खूश सुद्धा असेलं.त्या उलट डोळ्यांत आनंद अश्रू सुद्धा असतीलं.पण, एक सांगू का? झालेल्या गोष्टी बदलता येत नाही .त्यामुळे तूला  ते सर्व विसरून पुढे जावं लागेलं.

पण माई आता आई असती तर...

तर ...सर्व गोष्टी आता आहेत तशा नसत्या त्याच सपूर्ण चित्रच वेगळ असेल.आनंदाने ती लग्नांत  सगळ्यात पुढे राहून तयारीला लागली असती.एवढच कशाला महत्वाचं म्हणजे? तू या...आश्रमात नसतीस"...

अजून एक प्रिया "झालेल्या गोष्टीचा मनस्ताप करण्यापेक्षा तूझ्यां समोर तूझं नवीन आयुष्य तूझी वाट बघतेय त्याच हसत हसत स्वागत कर आणि प्रणवच्या आयुष्यात तूझं लक्ष्मीरूपी पाऊल टाक"आणि प्रणव सोबत पुढे जा...आणि तूझं तूझं एक कुटुंब बनव.असं कुटुंब ज्या कुटुंबातली सर्व माणसं तूझी असतील फक्त तूझी"

तूला नव्यांने सांगायला नको प्रणव कसा आहे कसा नाही हे, तूला चांगलच माहित आहे तू, त्याला लहान पनापासून बघतेस.तो ही तूझ्या सारखाच आहे.प्रेमाचा भूकेला.ते प्रेम" तू ,दे....त्याला मला खात्री आहे तो ही तूला तितकचं किवां त्यापेक्षा जास्त प्रेम देईलं.माझा आशिर्वाद आहे तुमचा संसार सुखाचा होईल.माईने तीला समजवून सांगितलं आणि जाण्यासाठी निघाली.

अरे देवा मी"कशाला आले विसरलेच बघ" माई मध्येंच थांबून काही तरी आठवण्यांचा प्रयत्न करत म्हणाली.

प्रिया माई काय? बोलतेय म्हणून माईच्या पुढच्या बोलण्याची वाट बघत होती.

हा प्रिया मी "काय? म्हणते आज  पार्लरमधून एक मुलगी येईल थोड्या वेळात ती तयार करेलं तूला लग्नांसाठी "

अग प़ण माई कशाला एवढा खर्च पार्लरवाले घरी येणार म्हणजे? पैसे सुद्धा तसेच घेतील.त्यापेक्षा मी" झाले असते ना" साधी तयार"

हो ,मला माहित आहे तू ,स्वत:सुद्धा खूप छान तयार होतेस बघितलं मी" मेहंदीच्या दिवशी आणि आज सकाळी ‌हळदीला सुद्धा"छानच तयार झाली होतीस पण आज आता नको आता  तूला पार्लर वालीच तयार करेल.

अग पण माई"

काय? माई पैश्यांचा विचार नको करू ते मी" बघते तू ,स्वप्न बघ नवीन संसाराची"....चल आवर बाकी तोपर्यंत ती सुद्धा येईल" मी" पण येते आता प्रणवला बघून त्याला सुद्धा  समजुतीच्या चार गोष्टी सांगाव्या लागतील ना"माईच बोलून झालं आणि ती रूम बाहेर पडून प्रणवच्या रूमच्या दिशेने गेली.

येऊ का? आत माई दारातून म्हणाली.

माई अग तू ये  ना" तूला परवानगीची गरज नाही.तूला तर...माहिती आहेच ना"आवाजाच्या दिशेने वळत प्रणव अर्धवट म्हणाला.

हो मला माहित आहे आई मुलाचा रुम मध्ये कधीही येऊ शकते. माईने त्याचं अर्धवट वाक्य पूर्ण केलं.

हो ना "मग ये ....ना "परवानगी कशाला मागतेस माई"

अरे प्रणव असं काय? करतोस आज नंतर माझ्या मुलाची रूम माझ्या सुनेची असेलं ना "मग विचारून येण्याची सवय नको का?

सून "माई सुनेच्या रुममध्ये येताना तुला विचारून यावं लागतं असेल तर ...गरज नाही.तू ,प्रियाला सून मानायची त्यापेक्षा तू, तीला मुलगी मान तसंही मी "तीचा हात तूझ्यांकडे मागितला खर्या अर्थाने त्या क्षणांपासून तू ,माझ्यांसाठी तीची आईच आहेस"प्रणव म्हणाला आणि माई काही न बोलता फक्त प्रणवकडे बघत होती.

माई अग काय? झालं विचार काय? करतेस तूला काही वाटलं तरी सुद्धा प्रियाला तूला मुलगीच मानावं लागेल नाही तर...ती तूझ्यांवर फूगून बसेलं आणि मग मात्र स्वर्गातला देव सुद्धा काही करू शकत नाही.प्रणव हसत म्हणाला.

तूला हसू येतयं का?वेडाच आहेस मग तू ...तिला जर ...मी" मुलगी नाही सून मानणार आहे ह्याची थोडी तरी भनक लागली ना"तर ती रूसेलं की, नाही हे माहित नाही पण...ती तूझ्यांसोबत लग्नांला नकार नक्की देईल हे मी" विश्वासाने सांगते.

माईच वाक्य ऐकून प्रणव मनातच तीनताड उडाला आणि माईकडे तोंडाचा आ... वासून उभा होता.

काय? रे... काय? झालं बरोबर बोलतेयं ना"मी"की काही चूकत असेलं तर...सांग माई प्रणवला त्या अवस्थेत बघून हसतच म्हणाली.

माईचं बोलण त्याचा कानात शिरण्याऐवजी डोक्यांवरून निघून सुद्धा गेलं होत कारण तो अजूनही तसाचं उभा होता.अगदीच स्तब्ध"....

प्रणव काही भानावर येईना म्हणून मग माईचं जरा प्रणवच्या जवळ गेली.आणि त्याने तोंडाने वासलेला आ" ... हाताने बंद केला तसा प्रणव भानावर आला.

काय? रे कधीपासून तोंडाचा आ"... करून उभा आहेस लग्न आहे ना "आज विसरलास की, काय?

विसरलो नाही ग... माई पण तू ...तू...प्रियाची आईच बनून राहा तूला सासू बनायचीच असेल तर ...माझी बन प्रणव  अडखळत म्हणाला.

इतका बावचलू नकोस मी...ना"तूझी सासू ना" तीची मी...तुमची दोघांचीही आईच आहे.पण प्रणवं ही आई तुमच्या सोबत तूझ्या घरी नसणार कारण तीच घर हे आश्रम आहे आणि आश्रमातल्या मुलांना माझी गरज आहे.त्यामूळे ती माझी पहिली जबाबदारी आहे.त्यामूळे त्या नवीन घरात तूम्हालाचं एकमेकांसोबत राहाणं आहे.तीला सांभाळून घेणं तूझं काम आहे. हे विसरू नको दोघांसाठी ते सुरूवातीचे दिवस खूप अवघड असतीलं कारण सर्वच नवीन असणार आहे.काम सांभाळून तूला तिला सुद्धा वेळ देण महत्वाच आहे.त्याहून महत्वाचं तीच्या सोबत राहून संसारात येणारे चढ उतार दोघांचा संमतोल सावरायचा आहे.यासाठी कायम सोबत राहाणं गरजेच आहे आहे दोघांच नात सावरायला तिसऱ्या व्यक्तीची गरज लागता कामा नये एवढच लक्षात ठेव काही अगदी काही झालं तरी आजपासून प्रिया तूझी पहिली जबाबदारी आहे. माईने प्रणवला समजुतीच्या चार शब्द सांगत होती तर प्रणव माईचा प्रत्येक शब्द मन लावून ऐकत मान हलवत होता.

चला बास एवढच खूप झालं फक्त  ते लक्षात ठेव बाकी तू समजूतदार आहेस.

हो ग माई तूझा शब्दं न शब्द मी ऐकलायं आणि तू जे काही समजवलंस हे मी"कायम लक्षात ठेवेन काळजी नको करू तूझ्या मुलीची मी "खूप चांगली काळजी घेईनइतकी की तीला तूझी आठवण सुद्धा येणार नाही पण काय? ग माई हे फक्त माझ्या साठीच का? "नाही म्हणजे? तीला पण सांगितलंस की, नाही माझी काळजी वैगरे घ्यायला"

नाही त्याची गरज नाही"

असं कसं माई तिला पण समजवायचं ना" काही तरी...

अरे.... पण मी" तूला आताचं म्हणाले ना....की, तू समजुतदार आहेस मग"काय? गरज आहे तिला काही समजून सांगायची"

असं कसं माई हा तर ....भेदभाव झाला.मी "समजूदार असलो म्हणून काय? झालं, मलाही आवडेलच ना" तीने माझ्यांसाठी काही केलं तर.... मलाही आवडेल तीच्या प्रेमात भिजायला.

क्रमश:

🎭 Series Post

View all