११) तूझ्या आठवणींचा विरह

....
अरे.... हे काय? मी काय? मिस्टर इडिया आहे का? म्हणून मी" हिला दिसलोच नाही.की, काय?प्रणव स्वत:शीच म्हणाला.आणि तो सुद्धा तिथून निघून गेला.तो आजूबाजूला नजर फिरवत प्रियाला शोधत होता.

तेवढ्यात त्याचा कानावर हसण्यांचा आवाज पडला.आणि तो तिथेचं थांबला.आणि थोडस त्या खोलीत त्या डोकावला
तर...आश्रमातील सर्व मूलीनी ती खोली गच्च भरली होती.पण त्यात प्रिया त्याला काही दिसली नाही.म्हणून तो तिथून निघणार होताच की,

काय? ग.. काय म्हणाला तुझा प्रणव"त्यांचातलीच एक मुलगी तीला चिडवत म्हणाली.तसा प्रणव दोन पावलं मागे आला.  आणि त्या खोलीत पुन्हा डोकावला.तेव्हा त्याला प्रियाची थोडीशी झुळूक दिसली.

अग ये काय? विचारते तू, इतक शांत वातावरण त्यात दोघचं असताना  ते फक्त इतका वेळ गप्पाच मारत असतील अस  कशावरून ग...मला तर वाटतंय फक्त म्हणाला नसेलं ग... काही तरी केलं ही असेलं हो ना" ग...प्रिया लगेच त्यातून दूसरी मुलगी म्हणाली.त्यावर प्रिया मात्र कावरी बावरी झाली होती .

अग ये लाजतेस  काय? अशी सांग ना "काय? केलं प्रणव ने  पुन्हा कुणीतरी म्हणालं.आणि तिला मात्र कुठे? जाऊ अस झालं ती लाजतच उठली.आणि त्याचातून रस्ता काढत बाहेर येतच होती तेवढ्यात प्रणव दरवाजातून आत आला.तशी खोलीतून बाहेर जाण्यासाठी उठलेली प्रिया प्रणाला जाऊन आदळली.

तोशी ती सरळ त्याचा मिठीत सामावली.आणि तिथे सर्वाचा हश्या पिकला.आणि त्या आवाजाने प्रियाची त्याचा मिठ़ीतून बाहेर पडायची धांदल उडाली.त्याने मात्र तीला इतक घट्ट पकडलं की,तीला त्याचा मिठीतून बाहेर पडता आलच नाही.

प्रणव अरे सोड ना "असं काय? करतो सर्व आपल्याला बघतात ना" ती हळूच पुटपुटली.

अरे बघू दे...मी" माझ्या बायकोला पकडल़य ना त्यात काय? लाजायचं कुणीही बघू दे...त्यांना वाटली लाज तर ते डोळे  बंद करतील ना"प्रणव प्रियाला छेडत म्हणाला.

अरे काय? बोलतोस तू ती त्याला हळूच म्हणाली.त्या दोघांन मधलं बोलण़ तिथे असणाऱ्या प्रत्येकीने अगदीच कान देऊन ऐकलं.तसा आधीचा हळूहळू हसण्यांचा आवाज एकदम मोठा झाला.आणि प्रियाने लाजून प्रणवला धक्का देत त्याचा मिठीतून स्वत:ची सुटका करून पळत बाहेर गेली.

त्याने एकदा जाणाऱ्या प्रियाकडे हसून बघितलं आणि पुन्हा समोर बघितलं तर ...त्या सगळ्या जणीं प्रणवकडे एकटक बघत होत्या तसं त्यालाही आता तिथे अगदीच कस तरी झालं. त्याने लाजून केसातून हात फिरवला आणि हसतच निघून गेला.

चला ग ....लव्ह बर्ड तर गेले आपण काय? करायचं जाग राहून झोपूया बराच उशीर झालायं तसंही उद्या लग्न आहे लवकर उठावं लागेल त्याचा पैकी कुणीतरी प्रणव जाताच म्हणालं. त्यानंतर मात्र बाकी सगळ्याचा नाईलाज झाला.आणि  प्रत्येकीने  होकारार्थी मान हलवली आणि झोपण्यासाठी निघून गेल्या.

इकडे प्रिया सुद्धा तीच्या अधरूणांत पडली होती. पण थोड्या वेळापूर्वी त्या दोघांमध्ये जे काही घडलं त्या गोड आठवणीत छान रमली होती. ते सर्व आठवून क्षणोक्षणी तीच्या चेहर्यावर चे हावभाव बदलत होते.

दुसरीकडे प्रणवची सुद्धा तीच अवस्था होती. त्याला सुद्धा झोप येत नव्हती इकडून तिकडे कुस बदलून कधीतरी त्यालाही झोप लागली.

दोघांच्या ही मनात गोड आठवणी होत्या त्यामुळे बर्याच उशीराने  लागलेली झोप सुद्धा सुखाची झोप होती.

दुसरा दिवस आज पहाटेच आश्रम गजबजलं होतं.मोठ्या आवाजात हळदीची गाणी स्पिकरवर लागली होती.

हो आज प्रणव आणि प्रियाची हळद आहे त्यामुळे सगळीकडे रागोळीचा सडा पाडायला सुरुवात झालीच होती.हळदीचा सुंगध पुर्ण आश्रमात दरवळत होता.आश्रमाचा भल्या मोठ्या आवारात दोन पाट ठेवण्यांत आले होते.आणि दोन्ही पाटासमोर आरतीच सजवलेल ताट हळदीने भरलेलं वाडग आाणि आंब्याची पाने ठेवण्यात आली होती.

थोड्यांच  वेळात  पिवळसर रंगाचा कुर्ता आणि पांढरा पैजामा घालून प्रणवला काही मुल घेऊन आले तसा तो पाटावर बसला.

पिवळी साडी आणि हिरव्यागार ब्लाऊज मध्ये प्रिया उठून दिसत होती.केसाची एक वेणी आणि त्यावर डूलणारे आबोलीचे गजरे थोड्यांत साधासा मेअकप सुद्धा तिच्या चेहर्यावर असणाऱ्या हसूमूळे उठून दिसत होता. प्रिया तयार झाली आणि थोड्याच वेळात  बाहेर आली तश्या सगळ्याचा नजरा तीच्याकडे वळल्या ती मात्र मान खाली करून कशीबशी पाटावर येऊन बसली.

प्रणवची नजर एकटक तिलाच बघत होती तेवढ्यात दोघांच्या मध्ये पडदा पडला. तसा प्रियाचा चेहरा दिसेनासा झाला आणि प्रणव भानावर आला.

तुझीच रे....तूझीच आहे ती आता नंतर बघत बस रे...तीला तसंही पायावर धोंडा मारून जो घेतलास त्यामुळे आयुष्यभर तीलाच बघाव लागणार आहे अगदी तूझी इच्छा नसली तरी कुणीतरी म्हणालं.तशी पडद्याचा पलिकडे प्रिया गालात हसली .

माई आली माईच्या हातून प्रणवला हळद लागली.मग बाकी सगळ्यानी एक एक करून प्रणवला हळद लागली.

मग मात्र त्याची उष्टी हळद प्रियाकडे गेली आणि माईच्या हातून तिला सुद्धा हळद लागली मग सर्वानी हळद लावली.आणि स्पिकर वर लागलेल्या गाण्यांवर नाचून सुद्धा झालं.

बराच वेळ झाला हळदीचा खेळ काही थांबेना दुपारी लग्नांचा मुहुर्त होता.

बस झालं पोरांनो अचानकपणे एक आवाज सर्वत्र घूमला तशी सगळीकडे शांतता पसरली.सर्वानी आवाजाच्या दिशेने बघितलं. तशी माई पुढे म्हणाली.

अजून खूप बाकी आहे  विसरलात की काय? आजच लग्न आहे अजून बरीच तयारी बाकी आहे  जेवणं लवकर करून घ्या नवरा नवरीला अंघोळीला घेऊन जा ...आवरा पटापट लग्नाचा मुहुर्ता च्या वेळेत नवरा नवरी तयार झालेली पाहिजे"माईच बोलून झालं आणि सर्वाची पुढची धावपळ सुरू झाली.

प्रिया आाणि प्रणव  आंघोळीला निघून गेले तर बाकी सर्व जेवण्यासाठी निघून गेले.

प्रिया प्रणवची आंघोळ आटपली आाणि ते सुद्धा जेवायला आले पण वेगवेगळे"

लग्नाआधी नवरा नवरीने एकमेंकाना बघायचं नाही हे माईने त्याना आधीच ठणकावून सांगितलं होत़"त्यामुळे माईचा शब्द दोघांनीही पाळला होता.हळद लागल्या पासून दोघांनीही एकमेंकाना चोरून सुद्धा बघायचा प्रयत्न केला नाही.

थोड्याच वेळ गेला आणि जेवणाच्या पंक्ती उठल्या आणि आपआपली तयारी करायला निघून सुद्धा गेले.

रक्तांची नसली म्हणून काय? झाली पण आश्रमातलं प्रत्येक मुलं तीच्या माये खालीच लहानाच मोठ होत होत तसेच प्रिया आणि प्रणव सुद्धा होते तिच्यासाठी "

आज माईची एक मुलगी तीच्या सासरी जाणार होती म्हणून माई मनातून जितकी आनंदी होती तितकीच दु:खी सुद्धा होती

प्रिया".... येऊ का? आत माईने आवाज दिला तसं प्रियाची नजर दारात उभ्या माईवर गेली.

अग.... माई तूला किती वेळा सांगितलं अशी येत नको जाऊ मला बोलवलं असते तर ....मी "आले असते ना "पण तू काही माझं ऐकत नाही बघ"

अग... हो बोलवलं असत पण म्हटलं आपली लेक आता सासरी जाणार तर...तीला चार समजुतीच्या गोष्टी सांगाव्या म्हणून आले बघ  त्यामूळे तूझ्या सोबत थोडा वेळ घालवताही येईलं.

अग हो एवढच ना मग बोलवलं असत मला तरी  हे करू शकत होतीस ना तू"

नाही हळदीचा अंगाने फिरत नसतात प्रिया "म्हणून मी" आले

ओ असं पण असत का?प्रियाने शंकेने विचारलं. त्यावर माईने होकारार्थी मान हलवली.

माई तू इथे का? आलीस हे मला कळलं नाही अस नको समजू माहित आहे माझ्यासाठी जितकी  आनंदी आहेस तेवढीच दु:खी आहेस तू शेवटी आमच्या अनाथाची आई आहेस तू"
तूला त्रास होण सहाजिकच आहे पण मग तू दु:खी राहाणार असशील तर मी नाही जात "

अग अस नको बोलुन आज तुझी पाठवणी आहे प्रिया "

हे माई पण तूला दू:खी करून नाही करायची मला पाठवणी"

अरे..... लेक आता सासरी जाणार संसारात रमणार  आईकडे ती कधी कधीच येणार रोज रोज येणं तीला नाही जमणार  मग आईला  वाईट वाटणारच ना"हे दु:ख दु;ख नसतं  ते आईच्या आयुष्यातलं मोठ सुख असतं

             


🎭 Series Post

View all