९) तूझ्या आठवणींचा विरह

....
प्रणव अरे तू,तुझ्या डोळ्यात पाणी"

हो मग काय? तूला सोबत घेऊन जायचा विचार करतोय तरी तू, खूश नाही मग मला वाईट वाटणारच ना "ग...

अरे पण मी" असं कुठे ?म्हणाले की, मी" खूश नाही म्हणून,

म्हणायला कशाला पाहिजे तूला विचारलं त्याचं उत्तर देण तर....सोड पण रडायलाच लागलीस मग मला तू,खुश नाही असचं वाटणार ना"

अरे वेड्या हे तर आनंद अश्रू आहेत रे.... कारण तू ,मला इथून सोबत घेऊन जाणार आहेस आयुष्यभरासाठी"उदास तर मी" तेव्हा असते जेव्हा तू एकटाच इथून गेला असतास "

म्हणजे? तू ,आता आपल्याला या नवीन नात्यांत खरच खूश आहेस ना" प्रणवने पुन्हा एकदा विचारून खात्री केली.

अरे देवा एवढ सांगून विश्वास नाही का? तूझा प्रणव "नाही म्हणजे ?मी "काय केलं तर तू़झा विश्वास बसेलं.

सांगू का? कसा विश्वास बसेल तो प्रणव चेष्टा करत गालाकडे बोटाने इशारा करत म्हणाला.

काही काय? प्रणव ती लाजून म्हणाली.

काही नाही हा प्रिया हेच हवयं  मला तरच खरं वाटेल मला बघं विचार करून द्यावी वाटली तर...नाही तर मग जाऊदे प्रणव नाटकी करत म्हणाला.

नाटकी कुठचा प्रिया हळूच पुटपुटली.

काही म्हणालीस का? प्रिया"माहित आहे मला काही म्हणं ग...पण मी" जे मागितलं ते दे ....म्हणजे? कसं तू खुश असल्याची खात्री पटेल.

गप्प रे काही काय? खात्री पटण्यांसाठी कुणी चुंबन घेत का? चिमटा काढते ना "म्हणजे? कसं जे काही घडतंय हे खरच घडतंय याची तुला खात्री चांगली होईल.

नाही नाही चिमटा नाही चुंबनच हवाय मला"तो ही आताचा आता"

अरे ....प्रणव तू पण, ना"ऐकशील तर...शपथ पण ठिक आहे तूला हवं ते मिळेलं पण तूझे डोळे बंद केलेस तरच "

अरे....माझ्या गालावर तूझ्या होंटाचा  स्पर्श होत असेल तर...फक्त डोळेच कशाला ग.....हात पाय बांधलेस तरी चालतील मला प्रणव पुन्हा गंमतीत म्हणाला.

हो का? हे जरा अती नाही का? होत प्रणव नाही म्हणजे? ते ही मान्य आहे मला तूझे हातपाय बांधायचे वैगेरे तेही करूच पण आता नाही त्याला अजून वेळ आहे ना"

हो पण तेव्हा नक्की ना" नाही म्हणजे ?मी "तेव्हा तुझं काहीच ऐकणार नाही सांगून ठेवतो.इथे प्रणव आणि प्रियांच बोलणं चालू होत तर... प्राजक्ताची फुलं त्या दोघाचा अंगावर टपटप पडत होती जणू काही स्वर्गातून सर्व देव लोकांनी आशिर्वाद रूपी ती बरसात केेली असावी.

दुसरीकडे माई आश्रमात पोहचली.आश्रमाच्या आत जाताच माईने  सर्वाना बोलवणं पाठवून एकत्र जमा केलं.माईने ही आनंदांची बातमी सगळ्यांना सांगितली.आनंदाने सर्वाचे चेहरे फुलले होते.बातमीच तशी होती लहानपणापासून  एकत्र  राहिले पण आता ते आयुष्य भरासाठी एक होणार होते.लग्नांची बातमी पुर्ण आश्रमात वार्यासारखी पसरली.

माईने प्रत्येकाला हातात एक काम दिलं.सर्वाना ती काम आपली जबाबदारी वाटली.आणि दोघांचा आनंदात आपला खारीचा वाटा म्हणून सर्वच आनंदाने ते सर्व करायला तयार झाले.

दुसऱ्या दिवशी पासून पुर्ण आश्रमात लग्नांची तयारी सुरू झाली.गुरूजींनी दोन दिवसांवर मुहुर्त सांगितला आणि आश्रमातली लग्नांच्या तयारीची लगबग वाढली.प्रत्येकांने आपआपली सोपवलेली काम चोक पार पाडायला सुरूवात केली.रात्री उशिरापर्यंत काम करून पुर्ण आश्रम फुलांनी सजला गेला.

बराच उशीर झाल्याने सर्व तिथल्या तिथे लूडकले. होते पहाटे पुन्हा उरलं सुरलं  काम करायची लबबग सुरू झाली.दुपार पर्यंत पुर्ण आश्रम आतून बाहेरून सजला होता.उद्याच  प्रिया आणि प्रणवच्या डोक्यावर अक्षता पडणार होत्या म्हणून आज सर्व मुलींनी मिळून प्रियाचा  मेंहेदीचा कार्यक्रम करायचा ठरवाला.

संध्याकाळी चार वाजता प्रियाला मेहंदी  लागणार होती.

मेंहंदी रंग प्रणवला खूप आवडतो म्हणून आज तीने त्याचं रंगाची साडी नेसली होती.त्यावर मँचिंग असा साधा ब्लाऊज सुद्धा तिच्या गोर्या रंगावर साडी उठावदार दिसत होती.आश्रमातल्याचं एका मुलींनी तीला छान सा मेअकप सुद्धा केला.तीचा तो गोरा आणि तुकतुकीत चेहरा मेअकपने अजून  सुदंर दिसायला लागला.

त्याचांवर गळ्यांत घालण्यासाठी एकीने तीच्या कडचा नकली हार सुद्धा आणला होता.त्यात मोठ मोठाले  कानातले सुद्धा होते.तो सेट सुद्धा तिच्या साडीला छान मँच झाला.योगायोग त्या हाराला मेंहंदी रंगाचा खडा होता.आणि कानातल्याचे खालचे डूल सुद्धा मेहंदी रंगाचे होते.केसाची साधीशी हेअरस्टाईल सुद्धा केली पण खालचे लाबसडक केस मात्र मोकळेच सोडले त्या, मोकळ्या केसावर आबोलीचे गजरे सोडले.कपाळावर मधोमध एक टिकली लावून प्रिया मेंहंदीसाठी सजली.

प्रियांची तयारी होता होता जरा वेळ गेला.चारचा कार्यक्रम पाच ला सुरू करण्यांत आला.मेहंदी चा कार्यक्रमात फक्त मुलीच  होत्या कारण बायकांना उद्याचा महत्वाचा दिवसांची तयारी करायची होती कारण उद्या लग्नांचा आधी सकाळी प्रणव प्रियाला हळद लागणार होती. म्हणून काही  जणींनी हळद वाटायला सुरूवात केली.

प्रियाला घेऊन सर्व मुलीं आश्रमातल्या आवारात आल्या. प्राजक्ताच्या झाडाखाली तीला बसायला छान आसन म्हणून बैठक मांडली.प्रिया मधोमध त्याचावर बसली आणि तीच्या समोर दोन मुलीनी बसून तीच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली.मधे मध्ये तीच्यावर ती प्राजक्ताची फुल बरसत होती त्यामूळे प्राजक्ताचा सडा तीच्या अवतीभवती पडला होता. आणि त्याचा दरवळ सर्वत्र पसरला होता.त्याने वातावरणात अगदीच प्रसन्नता जाणवत होती.आणि समोरचा स्पिकर लागला. त्यावर प्रत्येकींनी निवडलेल्या गाण्यांवर तोडीस तोड डान्स सुद्धा केला.

दुसरी कडे प्रणव इकडून तिकडे फेऱ्या मारत होता.कारण प्रिया त्याला आज दिवसभर दिसली नव्हती.

सर्वाचे डान्स होता होता प्रियाचा दोन्ही हाता पायावर  मेहंदी सुद्धा काढून झाली.प्रिया मात्र सतत ते मेहंदी लावलेले हात बघून बघून गालात हसत होती.तीच्या मेहंदीत मधोमध प्रणवच नाव जे लपलं होतं.ते नाव बघून ती काही तरी विचार करून हसत होती.

प्रणवला काही करून प्रियाला बघायचं होतं.पण कसं हे काही सुचत नव्हतं.बराच विचार केला आणि तो तिथे आश्रमाच्या आवारात गेला.समोर प्रिया सर्वा सोबत बसून हसत होती.कारण तीला सर्व जणी प्रणवच नाव घेऊन घेऊन चिडवत होत्या.हे सर्व बघून तो सुद्धा हसला.त्याचा हसण्यांचा आवाजाने सर्वाच लक्ष समोर उभ्या असणाऱ्या प्रणवकडे गेलं तसं त्याच्यातल्या एकीने प्रणवच्या दिशेने जात त्याचा हाताला पकडून प्रिया समोर उभ केलं.आणि सगळ्या जणी निघून गेल्या.आता तिथे प्रणव आणि प्रियाच होते प्रणव तीच्याकडे एकटक बघत होता .त्यामुळे प्रियाने लाजून मान खाली घातली होती. तो मात्र एकटक तीच्या कडे बघतं होता.

काय? बघतोस असा शेवटी तीने बोलून त्याचातली शांतता भंग केली.

म्हणजे? माझ्या बायकोला बघायला कोणाच्या परवानगी ची गरज नाही मला"प्रणव कोर्टाने म्हणाला.

कोण? बायको कोणाची बायको मी "काही कोणाची बायको वगैरे नाही अजून त्यामूळे असं कोणाकडे बघणं चांगलं नसतं माहित नाही का?तूला"

अरे ....वा माझी वाघींन माझ्या वरच गुरगुरायला शिकली घे ग... घे... माझी मजा घे ...आता मी"पण बघतो किती वेळ तुझं गुरगुरणं चालू ठेवतेस प्रणवं मनात म्हणाला.प्रिया मात्र त्याला शांत बघून मनात हसत होती.आणि डोळ्यांने खाणाखूणा करत होती.

तीचं तसं खाणाखुणा करण्याचे प्रणवची नजर विचलीत झाली. आणि तो विचारातून बाहेर येत"....

माहित आहे कोणाकडे असं बघण बरं नसत पण काय? करू ही माझ्या समोर बसली ती कोणाची कोण?आहे माहित नाही ती इतकी सुंदर दिसते की,काय? सांगू नजरेनेच घायल करते मला त्यात तीने माझ्या आवडीच्या रंगाची साडी नेसलीय त्यामूळे माझी नजर तीच्या वरून हटतच नाही.पण एक सांगू ज्याची कोणाची ती असेल ना"तो खूपच म्हणजे? खूपच नशीबवान आहे.

नाटकी कुठचा कोणाची कोण? म्हणजे काय? रे....मी"कोणाची आहे तूला माहित नाही का?

नाही ना" तो पुन्हा नाटकी करत म्हणाला.

बरं ती बारीक तोंड करत म्हणाली आाणि तीच्या डोळ्यातून  एक अश्रू ओघळला.

अरे.... अरे..... रडू नको  तो तीचे अश्रू बघून गडबडत म्हणाला.

मग का? म्हणतोस असा की, मी " कोणाची आहे हे तूला माहित नाही म्हणून,

अग... मी "मस्ती केली ना


🎭 Series Post

View all