तुझ प्रेम....

आयुष्य सुंदर आहे....

ओंजळीत परत आज मोगरा हि बहरुनी आला....

तुझ्या या वेड्या प्रेमाला चंद्र ही साक्ष झाला....

आठवणींच्या गावात जातांना तुझा 

उंबरठा पार करावा लागतो.....

प्रत्येक क्षणी होणारी मनाची चलबिचल

" का असं " या प्रश्नाचे दार उघडुनी जातं...

प्रेम हि निर्मळ भावना जरी असली तरी परीक्षेचे घडे भरुनी वाहले...

डोळ्यांतुनी हृदयाकडे जाणारी वाट हि खोट नटुनी रोज अपंग वाणी सोंग करी....

विश्वासाने विणलेले प्रेमाचे घरटे हे आज मनांतील वादळाने मोडोनी गेले....

तुझा हाताच्या स्पर्शाने विचारांचे वादळ थांबले...

नवीन मायेच्या घरट्यात

आज लेकराला कुशीत घेऊनी झोपवातना अंगाई गाऊ लागले....

तुझ्या आठवणी तल्या संसारात आज मी ही न्हाहुणी गेली....

प्रेम करावं लागत नाही ते जगावं लागतं हे तू जाणंवुनी दिलं....

गोड प्रवासात तुझी माझी साथ देऊनी गेलं....

तुझ्या हात माझा हाती असाच राहू दें...

बघ आज रातीला वेलींवर मोगरा हि खरचं बहरुनी आला....

तुझ्या या वेड्या प्रेमाला सख्या चंद्र हि साक्ष झाला....

🎭 Series Post

View all