तुटलेल्या नात्याची विसंगता....
दोघांच्या लग्नाला साधारण पाच वर्षे पूर्ण झाली होती, पण नात्यात दिवसेंिवस कटुता वाढतच चालली होती, आता हे नाते आणखी किती विकोपाला जाणार बस या गोष्टीची वाट पाहणे चालू होते....
नात्यात कटुता आली की नाते तुटायला काहीच वेळ लागत नाही हे जेवढे सत्य आहे तेवढेच महत्त्वाचे म्हणजे त्या नात्याला टिकविणे...
खर सांगायचे झाले तर कोणतेही नाते तुटताना काही ना काही माध्यम असतात च अथवा कोणतीतरी व्यक्ती जबाबदार असते....पण दोन जीवांचे नाते तोडताना कोणाचेही भल होत नाही...सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नात्यात विश्वास हवा...एकदा जर विश्वास तुटला तर ते नाते कसे तुटेल याची कल्पना देखील केल्या जात नाही...
नात मजबूत असायला एकमेकांवर प्रेम,विश्वास,सहानुभूती,आणि नात टिकविण्याची स्वईच्छा पाहिजे...तेव्हाच ते नाते टिकून राहतात..व जीवनाला नवीन आधार देतात...काही काही नाते ही फक्त नावापुरती मर्यादित असतात...आणि अशा नात्याचा अंत कसा होईल हे सांगता येत नाही...
नात्याची पालवी ही मनावर तर अवलंबून असते त्याच बरोबर विश्वासावर सुध्धा असते,,,आणि विश्वास जर का नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही...काही काही लोक एकमेकांचा फायदा घेऊन अथवा मजबुरी म्हणून नात्यात अडकून पडतात पण त्या नात्याला काहीच अर्थ नसतो....
नात्यात चुका होतात पण चुका या एकतर्फी नसतात तर दोन्ही बाजूने होतात,,,मग काही शहाणे लोक एकाचे चूक दाखुन मोकळे होतात नाते तोडायला...अन् काही लोकांच्या नशिबात तर सुख म्हणजे काय हे नसते,आणि अशा लोकांना नाते जोडणे व तोडणे एक खेळ वाटतो...
कोणत्याही नात्यातला गोडवा कायम ठेवायचा असेल तर त्या नात्यातला खरे खोटे पना हा पारदर्शक असायला हवा...तेव्हाच त्याच्या मध्ये प्रेमाची सावली पडून नात्यात गोडवा निर्माण होतो....
कोणतेही नाते हे शांतपणे विचार करून त्यामागील कारणे शोधून नंतर समजूतदारपणे दोबाजूने विचार करून टिकविता येते....नाते टिकविणे फार कठीण याउलट नाते तोडणे खूप सोपे.....आणि म्हणूनच नात्यात अडकून राहा,भलेही थोडी नोकझोक का असेना....ते म्हणतात ना"तुझ माझं जमेना...अन् तुझ्यावाचून करमेना".....अगदी तसच....
लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा......
Ashwini Galwe Pund....