तुमच्यात नेमके काय सुरू आहे

Tumchyat



गोष्ट छोटी डोंगरा एव्हडी..!
मैत्री एक वेगळे समीकरण..

प्रत्येकवेळी काय प्रेमच असायला हवे का ,मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा असे मित्र आणि मैत्रीण म्हणून नाही आवडू शकत का ,त्यात इतका बाऊ का करायचा..? रेणू रागात बोलत होती..

नेहमी ताईच्या नजरेतून आणि आईच्या बोलण्यातून तिला विनयबद्दल विचारल्या जाणाऱ्या आणि कात्रीत पकडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना अवघड वाटे.. आणि त्यांच्या त्या नजरा चुकवाव्या लागे.. आज तर ठरवलेच होते रेणुने की काही झाले की हा विषय न टाळता उघड उघड बोलायचा आणि काय तो किस्सा संपवूनच टाकायचा , सुरुवात ताईपासून झाली, मुद्दाम केली..ताईने निदान जग पाहिले आहे, तिला ही अनुभव होते.एक मुलगा मुलगी चांगले मित्र मैत्रिणी असलेली किती तरी उदाहरण होते तिच्या नजरेत तरी तिने रेणुच्या विनय सोबत असलेल्या मैत्रीबद्दल असा विचार करणे हे योग्य नव्हते..

तिच्या आणि विनयच्या नात्याला नेहमीच का प्रेमाच्या दृष्टीकोनातून बघायचे..तिला नेहमी हा प्रश्न विचारला जायचा../ ए रेणू खरं सांग ना ,तुझे आणि त्याचे काही आहे का ? म्हणजे मला म्हणायचे तू समजून घे.."

तितक्या रेणू रागात म्हणालीच ते शब्द जे तिच्या ताईला म्हणायचे होते पण हिम्मत नाही झाली ..

"म्हणजे ताई तुला असे म्हणायचे का, आमचे अफैर तर चालू नाही ना !!! हेच म्हणणार होतीस , हेच विचारणार होतीस ना तू ही ,अगदी इतरांप्रमाणे तू ही ह्या मैत्रीच्या नात्यावर प्रेमाची गुडी उभारून मोकळी झालीस.."

"अग तसे काही मला म्हणायचे नाही ,पण वाटले की सहज विचारू तुझ्या मनातले. "...प्राजक्ता..

"नको विचारत जाऊ तू ,जर असे काही असेलच ना तर मी सर्वात आधी तुलाच येऊन सांगेन ना, इतकी का घाई तुझी ". रेणू आता ताईला फ़ैलावर घेणार होती..


"आईची आपल्या सोबत जी मैत्रीणी सारखे संबंध आहेत त्यावर तू शंका घेऊ नकोस ,एकदा विश्वासात घेऊन मनातले सांगून बघ..मी हवं तर तुझ्या बाजूने उभी राहीन." प्राजक्ता

"नको अग अजून काही दिवस थांब मग बोलते मी तिच्यासोबत आणि सगळे सांगते ,ती जसे समजते तसे काही नाही ,फक्त आम्ही चांगले मित्र मैत्रिणी आहोत हेच, फार विचार करावा असे आमच्यात काही नाही"... रेणू

"रेणू ,आईला विनय बद्दल सांगताना जरा विचार करून बोल ,कारण तुला माहीत आहे आईच्या नजरेतून खोटे लपून रहात नाही , तश्या आपण खूप सरळ आहोत हे तिला माहीत आहे. त्यावर तिचा तिच्या लेकींवर खूप विश्वास आहे ".. प्राजक्ता


"हो ग ताई ,विनय बद्दल सांगताना मला जरा ही भीती वाटत नाही, कसे सांगू मी आईला हा मुद्दाच नाही कारण लपवण्यासारखे असेल तर भीती वाटते , हे सरळ सरळ आहे , मैत्री ही एक निखळ गोष्ट आहे की त्यात काही कोणापासून लपवण्यासारखे काहीच नाही ,आणि ते आईला ही समजेल, लग्न ,प्रेम, आकर्षण ह्यापलीकडे आहे आमची मैत्री."...रेणू


"तू आईला खरे खरे सांगून मोकळी हो, काय ते तुमच्यातील मैत्रीचे नाते आहे हे सांगून झाले की पुन्हा आई वेगळ्या दिशेने विचार नाही करणार ,तसे तिचे विचार फारच बुरसटलेले नाहीत " ...प्राजक्ता


"तू पण किती कुठल्या गोष्टीचा बाऊ करतेस ताई ,तुझी ही अशीच एक मैत्री होती ना, पण तू त्यात मैत्री नाही तर प्रेम शोधायला गेलीस आणि एक चांगला मित्र तू गमावलास, तरी अजून ही तू तेच तसेच विचार करतेस, दरवेळी कोणा स्त्रीला प्रेम हे हवेच असते असे नाही, मला मित्र हवाय ,आणि तो मी प्रेमात पडून गमवणार नाही. आणि विनय तसा मित्र आहे की ज्याच्या विषयी हे विचार मनात कधीही आणणार नाही " ...रेणू


"असेच तुझे विचार असतील तर तुझ्या विचारांशी सहमत आहे, मग आई ला काही सांगायची गरज नाही. "..प्राजक्ता


तसे नाही ग ताई ,इतके दिवस आमची मैत्री ही निखळ मैत्री होती ,आणि त्याबद्दल आईला माहीत होते ना....रेणू

"अग तू जे त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे खायला घेऊन जातेस ,तू त्याच्यासोबत बिनधास्त वावरतेस , रात्री त्याच्यासोबत नाटकाची तालीम संपवून घरी येतेस, त्याच्या साठी शर्ट चॉईस करतेस , लग्नाविषयी बोलतेस, तो आईची अशी काळजी घेतो, मला ही कितीदा घरी आणून सोडले होते, किती समरस झाला आहे तो तुझ्यात आणि तू त्याच्यात म्हणून सहज विचार यायचे की तुमचे नेमके काय सुरू आहे ." प्राजक्ता


"ताई तू मैत्री विषयी हा गैरसमज करू घ्यायला नको होता , तुझ्या लेखी हे सगळे आपण फक्त प्रियकरासाठी करतो आणि मैत्रीला फक्त औपचारिकता सोबत जोडतो असे काही वाटते , पण मैत्री अशी ही असते.. मी सगळे दिलखुलास पणे त्याच्या सोबत बोलू शकते, वागू शकते ,तो ही त्या माझ्या बिनधास्तपणे वागण्याचा गैरफायदा घेत नाही , मी कशी कुठे चुकते ह्यावर त्याचे अंकुश नसते ,पण मी बरोबर वागले हे सांगायला तो सगळ्यात आधी असतो...त्याने माझ्याबरोबर इतर कोणते ही नाते नको निभवायला ,ना भावाचे ,ना नवऱ्याचे असे मला वाटते , तो फक्त आणि फक्त मित्र म्हणूनच मला हवा, काही मनातले साठलेले असते ते मी त्याच्या कडे सगळे रीते करून येते..जे कधीकधी तुझ्याकडे ही करू शकत नाही ते सगळे...कारण तू लगेच मला judge करतेस....पण तो तसा करत नाही.." रेणू ने विनयचे तिच्याशी असलेले नाते ह्या बद्दल ताईला सांगितले...

जी रेणू आता स्पष्ट बोलत होती तिला देखील तिची विनय सोबत असलेली मैत्री म्हणजे एक खास देण वाटत होती...ज्या मैत्रीला अजून कोणते ही नाव देण्याची गरज नव्हती..


"तुला पटेल तेच कर रेणू, मला जे जाणून घ्यायचे होते ते तू चांगलेच समजावलेस ,अजून मी तुला कधीच काही विचारणार नाही, तू ठाम आहेस मैत्रीवर तर मी कोण विचारणारी ह्याबद्दल. मला वाटत होते मीच तुझी एकमेव मैत्रीण आहे जीच्यासोबत तू मनातले सगळे बोलून मोकळी होतेस. पण खरे सांगायचे तर तुझ्यामध्ये जो positive बदल दिसत आहे, तुझ्या चेहऱ्यावर आंनद दिसत आहे ,तू पुन्हा जगायला नव्याने सुरुवात केली आहेस ती तुमची ही मैत्री झाल्यापासूनच ,तुझे ताण तणाव ही कमी झाले ,तू जीवनाला वेगळ्या नजरेतून पाहू लागली आहे ,हे फक्त विनयमुळेच म्हणून कुठे तरी वाटले , हाच तुझा जोडीदार ,जीवनसाथी ,भावी नवरा असावा...बाकी काही नाही मनात माझ्या किंवा आईच्या ."


"नाही ताई, विनय फक्त मित्र म्हणून आहे , पण तू त्याहून ही खास आहेस, तू तरी जगावेगळी मैत्रीण आहेस ,माझ्या ताई सारखी कोणीच नाही, तो त्याच्या जागी आणि तू तुझ्या जागी, तुझी जागा खास आहे ,जिने मला सतत जगण्याची हिम्मत दिली ,जिच्यामुळे मी बाहेर पडले ,आणि माझी आवड जपली ,जिला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी कधीच वाकडे पाऊल टाकणार नाही ती तूच...असे मी कधीच समजणार नाही की तू ऑल टाइम avaliable आहेस तर माझ्या लेखी तुझी काही किंमत नाही..तू अशी मैत्रीण आहेस की जीची मी किंमत करू शकत नाही..हो पण एक मैत्री ती ही आहे जी मला जपायची आहे ,अगदी माझे लग्न झाले तरी..त्याच्याबद्दल माझ्या नवऱ्याला ही सांगणार आहे हे नक्की...कारण मैत्रीत लपवण्यासारखे काही नसते.." रेणू तिच्यावर रुसलेल्या ताईची समजूत काढत होती


आई दोघींच्या बोलण्याने बाहेर येते..

"काय हितगुज सुरू आहे दोघींचे ,जरा मला ही घेत जा तुमच्या गप्पांच्या मध्ये, मी आपली वाट बघत असते ,की कधी दोघी म्हणतील आई चल आज गप्पा मारायचा मूड झाला आहे, पण तुम्ही दोघी आईला विसरूनच जातात एकदा गप्पा मारायला सुरू झाल्या की. " आई

"अग तसे नाही ग ,सहज गप्पा होत्या ह्या, ताईला आणि मला लहर आली आणि मग गप्पा मारत गेलो ,तुला बोलवणारच होतो तर तूच आली ,जस्ट सुरू झाल्या होत्या गप्पा आमच्या." रेणू

आई, "रेणू तुझा मित्र कधी येणार आहे ,म्हणजे आज चार जणांचा स्वयंपाक करू ,त्याच्यासोबत ही काही गप्पा करू ."


"अग आई त्याच्या सोबत इतर कसल्या गोष्टीबद्दल चर्चा कारण तो फक्त एक चांगला मित्र आहे, बाकी काही नाही ,हे रेणुने स्पष्ट केले." प्राजक्ता


"मग काय मी त्याच्यासोबत लग्नाच्या गप्पा थोडीच करणार होते ,मला माहित आहे तो एक चांगला मित्र आहे आपल्या रेणूचा ,आणि म्हणूनच मी ही फार विषय वाढवणार नव्हते..इतका तर फकर कळतो ह्या अनुभवी मैत्रिणीला तुमच्या..तुम्ही जरी दोघी काही बोलत नसलात तरी मी केव्हाच समजून गेले होते..हो ना रेणू " आई


आईच्या ह्या बोलण्याने रेणुला खूप हलके हलके वाटले ,आईने समजून घेतले पण आपण आईला समजून घेण्यात चुकलो...इतकी ही आपली आई जुन्या विचारांची नाही की तिला मैत्री आणि प्रेमाची समज नसावी...


आई ही आईच असते...हे समजायला वेळ यावी लागते...