हॅलो हॅलो सुरज अरे मी बापू बोलतोय आवाज येतोय का?
सुरज हा बोला बापू काय म्हणताय?
हॅलो कसा आहेस तू
मी बरा आहे
सुरज तुझी आई बोलत होती खूप दिवस झाले तू गावी आला नाहीस आपल्या झाडाला भरपूर आंबे आले आहेत कधी येतोय ते सांग.
सुरज बोलतो गावी येण्यासाठी मला कायमची नोकरी सोडावी लागेल.
ते तुमचे दोनशे रुपयांचे आंबे खाण्यासाठी मी माझी महिना दोन लाख रुपये पगार देणारी कंपनी सोडतो आणि कायमचा गावीच येऊन राहतो आणि तुम्ही शेतात जे पिकवता तेच खातो.
सुरजचा चिडलेला आवाज ऐकून बापू म्हणतात काय झालं बाळा ऑफिस मध्ये काही टेन्शन आहे का?
हो बाबा ....ऑफिसचं टेन्शन आणि तुम्ही सतत गावाला ये गावाला ये करून फोन करता त्याचा वेगळाच टेन्शन....
बरं तुला यायचे त्यावेळी ये ठेवू का फोन? बापू बोलतात...
सुमन बोलते.. आहो फोन माझ्याकडे द्यायचा ना मलाही त्याच्यासोबत बोलायचं होतं?
अग तो जरा कामाच्या गडबडीत होता म्हणून मीच म्हटलं ठेवतो फोन?
सुमन.... पण कधी येतोय सुरज?
अग त्याला यायला वेळ नाही.
सुमन... तुम्ही एक काम करा या दोन-चार दिवसात तुम्हीच आंबे घेऊन मुंबईला जा?
हो पण त्याआधी झाडावरून आंबे खाली उतरवावे लागतील सुरज आला असता तर थोडीफार मदत झाली असती.
तेवढ्यात समोरून मोहन जाताना दिसतो मोहनला बघून बापू मोहनला आवाज देतात अरे मोहन इकडे ये....
मोहन ...काय बोलताय बापू....
अरे तुझा मुलगा मुंबईवरून आला ना?
हो आला दोन दिवस झाले येऊन...
अरे आमचा सुरज येणार होता पण त्याला थोडं काम लागलं म्हणून तो येणार नाही...
आणि झाडाला इतके आंबे आहेत तर थोडे त्याच्यासाठी घेऊन जातो मुंबईला आणि राहिलेले आंबे तू घेऊन जा..
मोहन चालेल की ! कधी उतरवायचा आंबा आज की उद्या?
उद्या ये, उद्या सकाळी आपण सर्वआंबे काढू . त्याच्यातील थोडेफार आंबे तू घेऊन जा.. उरलेले मी मुंबईला घेऊन जातो.
सर्व आंबे काढून झाल्यानंतर बापू दोन मोठ्या बॉक्स मध्ये चाळीस ते पन्नास आंबे भरतात....
सुमन शेतातून कोथिंबीर ,अळूची पाने ,शेतातील वांगी, भेंडी थोडेफार पेरू चिकू सर्व काही एका पिशवीमध्ये भरते...
बापू मुंबईला जाताना भाजीपाल्याची एक पिशवी, आंब्याच्या दोन पेट्या, एक गोणी तांदूळ व एक गोणी गहू सर्वसामानाची बांधा बांध करून एसटीने मुंबईला जाण्यासाठी निघतात....
निघण्याआधी ते सुरज ला फोन करतात पण सुरज फोन उचलत नाही.....
समस्या आहे

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा