तुमचा आंनद तुमच्या हाती

Anand
कोणीच तुम्हाला खुश करायला जन्म घेतलेला नाही ,तुम्हाला आंनद मिळावा यासाठी कोणी कष्ट घेणार नाही.. मग ही जबाबदारी कोणाची असेल सांगा... कोण असेल जो तुमच्या आनंदासाठी स्वतः झट घेईल...ते ही कायमच.. आहे का कोणी असा... हो..तर त्याचे उत्तर माझ्यापेक्षा तुम्हालाच चांगल्या प्रकारे माहीत आहे.. शोधा कोण आहे तो...
म्हणजे पहा छान पाऊस पडत आहे... छान थंडगार वारा सुरू आहे..आणि तुम्ही ह्या पावसात छत्री घेऊन उभे आहात... थकून भागून ,दमून वैतागुण घरी जात आहात.. तर आंनद सुख आता माझ्या आयुष्यात कुठेच राहिला नाही ह्याच विचारात तुम्ही आहात.. काय ही नुसती कटकट आहे ,कधी हे सगळे संपेल कधी मी मुक्त होईल ह्या जाचातून असे वाटत असते... का? कश्यासाठी ही नौकरी करायची...मस्त कुठे तरी लांब जाऊन सुख अनुभवायचे तर पडलो ह्या नौकरीच्या फांदात... मस्त घरी बसलो असतो तर छान चहा तो गरम आणि आयता हातात मिळाला असता... पाऊसाची मज्जा घेता आली असती... पण कुठे आपले नशीब असे बलवत्तर...!! पण तुम्हाला आता ही तो आंनद घेता येऊ शकतो आता ही तुम्ही मस्त गरमागरम अद्रक वाली चहा घेऊ शकतात, आता ही छान पाऊसाची मज्जा घेऊ शकतात...सोबत भजे ही घेऊ शकतात...पण हे आपल्या डोक्यात येतच नाही...कारण आपले व्यापच किती वाढले आहेत...आपल्या लेखी आंनद म्हणजे आपण आखलेली मर्यादा आहे हे कसे कळत नाही...जरा ती विस्तारायला हवी ना...जरा ती छत्री बाजूला ठेवा ( डोक्यावर जे ओझे ,आणि काही डोक्यात असलेले छत्री रुपी ओझे बाजूला ठेऊन तर बघा...जरा थंडी हवा बिलगू द्या, मग पहा मज्जा ) आंनद तुम्हाला बिलगायला तयार बसला आहे...☺️

©®anuradha andhale palve