तुमच तुम्ही बघा आता .. भाग 2

जो आपल काम करतो, आपला स्वयंपाक करतो, त्याच्याशी प्रेमाने बोलायला पाहिजे, कृतघ्न रहायला हव, त्याच्या स्वयंपाकाची कष्टाची तारीफ करत आनंदाने जेवायला पाहिजे


तुमच तुम्ही बघा आता .. भाग 2

©️®️शिल्पा सुतार
.........

विषय... सांग कधी कळणार तुला

जलद कथालेखन स्पर्धा
....

"हे असं आहे याचं, मी म्हटलं होतं ना , तुलाच खूप हौस आहे या मुलांच्या पुढे पुढे करायची",.. माधवराव.

" तुमचं काय म्हणणं आहे मग काहीच बोलायचं नाही का मी मुलांना, काहीच काम करायच नाही का मी त्यांच, ते माझ्यासाठी माझे लहान मुलं आहेत",.. आरती ताई.

" जरा या भ्रमातनं बाहेर पड, तुझे मुलं आता मोठे झाले आहेत, उगीच मध्ये मध्ये नको करायला, ऐक माझं",.. माधवराव.

"चालेल सांगा काय म्हणण आहे तुमच? तुम्ही म्हणता तसंच करून बघू आपण एक आठवडा",.. आरती ताई.

दुसऱ्या दिवशी सकाळी आरती ताई माधवरावंसोबत फिरायला निघून गेल्या, ना चहा रेडी ना नाश्ता रेडी,

राहुल उठला आवरून बाहेर आला, किचनमध्ये कोणीच नव्हतं, त्याने बाबांना फोन लावला,

" आम्ही दोघं बागेत आलो आहे फिरायला तुझ्या हाताने चहा नाश्ता करून घे, आम्हाला अर्धा तास लागेल, नाहीतर थांबायचं असेल तर थांब",.. माधव राव.

राहुल कप भर दूध घेऊन पिऊन ऑफिसला निघून गेला,

दोघे फिरून आले, बाहेर गेट जवळच होते तेवढ्यात प्रिया आली,.. "काय केली आहे आई आज भाजी? आणि नाश्त्याला काही आहे का? खूपच भूक लागली आहे ",

" काहीही केलेलं नाही, माझ्या हातून तेल मीठ जास्त पडतं, उगीच तुम्ही मुल ओरडत रहातात",.. आरती ताई.

" तुला जर आज काही स्वयंपाक करायचा नव्हता तर कालच सांगायचं ना आई",.. प्रिया.

" काल सांगितलं होतं मी तुला, आठवत का? की तुला जसं लागतं तुझ्या हाताने करून घेत जा, मुळात तु तुझ्या आई कडुन स्वयंपाक करण्याची अपेक्षा का करते? ",.. माधव राव.

" हो मला नाही जमणार तुझ डायट फूड, तू तुझ्या हाताने तुला जे हवं ते करून घेत जा बरं, आमच्यावर अवलंबून राहू नकोस ",.. आरती ताई.

" नाश्त्याला तरी काही आहे का?",.. प्रिया.

" नाही ग आता मी फिरून येत आहे, चल आत मध्ये कपभर चहा करून देते ",.. आरती ताई.

" नको आई तू चहात खूप साखर टाकते मी बघीन काहीतरी खाईन बाहेर ",.. ती पण निघून गेली.

" अहो दोघ मुल न खाता गेले तर मला कसतरी वाटत आहे",.. आरती ताई.

" मुळातच त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी तू स्वतःवर घ्यायची गरज नाही, दोघं व्यवस्थित एल्डर आहेत, एकीचं तर लग्न सुद्धा झालेलं आहे, ते काही लहान मुलं नाहीत, जर तू असेच काम करत राहिली तर मुलं स्वतःवर कधीच जबाबदारी घेणार नाहीत" ,... माधव राव.

संध्याकाळी पण तयारी करून आरतीताई माधवरावांसोबत नाटकाला गेल्या, खूप मजा आली, त्यांच्या ग्रुपचे बरेच लोकं सोबत होते, प्रिया आली घराला कुलूप होतं तिने फोन केला, माधवरावांनी फोन उचलला नाही, तिने मेसेज टाकला मी घरी जाते आहे,

जरा वेळाने राहुल आला जवळच्या चावीने दार उघडलं परत किचनमध्ये काहीच नव्हतं केलेलं, सकाळची थोडी पोळी भाजी होती तीच त्यांने गरम करून खाल्ली.

नाटक संपल त्यानंतर त्यांचा सगळ्या ग्रुप एके ठिकाणी जेवायला गेला, जेवण करून रात्री दहा साडेदहाला दोघेजण वापस आले.

"आज काय चाललं आहे आई? सकाळ पासून घरी नाही तू",.. राहुल.

"असंच होणार आहे आता, यापुढे तुझी आई माझ्यासोबतच राहणार आहे, आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत, नाहीतर तुम्हाला आमची लुडबुड आवडत नाही ना, स्वयंपाक केला तरी बऱ्याच वेळा तू तुझं ताट घेवून रूम मध्ये जाऊन जेवतोस, मग आम्ही काही स्वयंपाकी आहोत का? ",.. माधव राव.

"काहीतरी बोलताय तुम्ही बाबा ",.. राहुल.

" जो आपल काम करतो, आपला स्वयंपाक करतो, त्याच्याशी प्रेमाने बोलायला पाहिजे, कृतघ्न रहायला हव, त्याच्या स्वयंपाकाची कष्टाची तारीफ करत आनंदाने जेवायला पाहिजे, तर तुम्ही लोक काय करतात जेव्हा आईने काही स्वयंपाक केला असेल तर त्या स्वयंपाकाला नाव ठेवत चिडचिड करत जेवतात, या बदल्यात आरती कधीच तुम्हाला काही बोलत नाही, हे मला चालणार नाही, तीच वय तर बघा, अस वागू नका, त्यामुळे मी आता तिला तुमच्या मागे मागे करायला मनाई केली आहे, समजलं का? उद्यापासून जर आम्ही संध्याकाळी घरी असू तर करू तुझा पण स्वयंपाक, नाही तर तुला काय खायच ते तू बघ",.. माधव राव.

" ठीक आहे",.. राहुल आत मध्ये चालला गेला

" अहो एवढ्या टोकाच बोलायचे गरज आहे का? ",.. आरती ताई.

" बोलू दे मला, मी बरोबर करतो आहे ते, तू जरा शांत रहा आणि हे जे चाललं आहे ते तुझ्यासाठी चाललं आहे, या आधी तूच हे करायला हव होत ",.. माधव राव.

🎭 Series Post

View all