तुमच तुम्ही बघा आता .. भाग 1

आज कालच्या बर्‍याच मुलांना अजिबात कोणतीच जबाबदारी नको असते, काहीही करायच नसत त्यांना, दुसर्‍यांनी त्यांच काम केल तरी ते त्यात खोट काढतात



तुमच तुम्ही बघा आता .. भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.........

आज कालच्या बर्‍याच मुलांना अजिबात कोणतीच जबाबदारी नको असते, काहीही करायच नसत त्यांना, दुसर्‍यांनी त्यांच काम केल तरी ते त्यात खोट काढतात, नाव ठेवतात, बोलत रहातात, कधी कळणार त्यांना की घरचे आपल्यासाठी काय काय करतात ते, आईने जरा मुलांना त्यांच काम करू द्याव, म्हणजे अशी वेळ येणार नाही.

विषय... सांग कधी कळणार तुला

जलद कथालेखन स्पर्धा
....

संध्याकाळचा चहा झाला, माधव राव आरती ताईंना हाक मारत होते,.. "आटोपला का आवर आरती उशीर होतो आहे",

"अहो मी नाही येत आज फिरायला, प्रिया लवकर येईल ऑफिसहून, जरा वेळ येते ती इकडे, बसते मग जाते तिच्या घरी ",.. आरती ताई.

"रोज येते ना ती, आज नाही भेटल तर चालणार नाही का तुला",.. माधव राव.

"असू द्या हो, छान माझा हातचा चहा पिऊन फ्रेश होते ती मग जाते तिच्या घरी",.. आरती ताई.

" हे अति होतय तुझ आरती, तू जरा मुलांच काम करण कमी कर आता, नुसत चहा पिऊन नाही तर नेहमी डबा घेवून जाते प्रिया इथून",... माधव राव.

"असू द्या तिच्या आई बाबांच आहे सगळ",.. आरती ताई.

" तुला ही मुल इतके बोलतात तरी समजत नाही का? चालू द्या, काहीही करा ",.. रागाने माधव राव शूज घालत होते, मी येतो फिरून.

माधव राव गेल्यावर, आरती ताईंनी मस्त कोथिंबीर निवडली, आज छान वड्या करू , कढी मुगाच्या डाळीची खिचडी कोथिंबीर वड्या मस्त बेत, प्रिया राहुल खुश होतील.

माधव राव आरती ताई यांना प्रिया राहुल दोन मुल होते, प्रियाच लग्न झाल होत ति जवळच रहात होती, ऑफिसहून येतांना आई कडे यायची ती, बरेचदा जे केल असेल ते आरती ताई तिला देत होत्या, कुठे करत बसेल ती घरी अस वाटत होत त्यांना, राहुल सुध्दा जॉब करत होता, दोघ मुलांसाठी आरती ताईंच अजूनही काम सुरूच होतं, पण मुलांना आरती ताईंच्या कष्टाची किम्मत नव्हती, या वयातही त्या नेहमी मुलांचा विचार करायच्या.

आरती ताईंचा स्वयंपाक होतच आला होता, मुल आले तर त्यांना खायचं असेल तर खाता येईल म्हणून एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं, माधवराव फिरून आले त्यांच्यासोबतच प्रिया आली होती,

"अरे कुठे भेटली ही बस स्टॉप वर का?",.. आरती ताई.

" नाही येत होती ती रस्त्याने तर सोबतच आलो",.. माधवराव.

"छान वास येतो आहे आज घरात, काय केलं आहे आई",.. प्रिया.

"कोथंबीरीच्या वड्या केल्या आहेत, नेते का? ",.. आरती ताई.

"हो दे आणि काय ग आज सकाळच्या भेंडीच्या भाजीत किती मीठ जास्त झालं होतं, काही अंदाज तुला? ",.. प्रिया.

माधवराव आरती ताईंकडे बघत होते.

"आम्ही तर खाल्ली दुपारी ती भाजी काही मीठ जास्त नव्हतं बरोबर होतं",.. आरती ताई.

" आई पण मी डाएटवर आहे तर माझ्या मिठाच प्रमाण जरा कमी हव आहे मला ",.. प्रिया.

" मी काय म्हणतो आरती तू कशाला तिच्या जेवणाचं बघत बसते, प्रिया तुला तुझं जसं हवं तसं करून खात जा ना, आता आम्हाला जे आवडतं जे लागतं ते तुम्हाला नाही चालत तर रोज उठून तेच तेल कमी, मीठ कमी करत बसण्यापेक्षा तू तुझं करून घेत जा, उद्यापासून हिला काही देत जाऊ नको इथून ",.. माधवराव आत चालले गेले.

" बघितलं का आई,.. बाबा कसे बोलता आहेत ते मला, नुसतं थोडं मीठ जास्त झालं हे सांगितलं ना मी, माझं लग्न झालं म्हणून लगेच मला परकी करतात ",.. प्रिया.

" अगं ते राहुल लाही तसेच बोलतात, राग नको मानु",.. आरती ताई.

" हो का मग बाबांची ही सवय खराब आहे, त्यांनी सवय बदलायला पाहिजे",.. प्रिया.

"तुझ्या सवयीच काय? तु सारख सगळ्या गोष्टीला नाव ठेवत असते ते बदल जरा, यांना काही बोलायचं नाही",.. आरती ताई.

" झाल्या असतील कोथिंबीरच्या वड्या तर दे लवकर, मला उशीर होतो आहे",.. प्रिया वैतागली होती,

एका डब्यात कोथिंबीर वड्या घेऊन प्रिया घरून चालली गेली,

आरती ताई आत येऊन बसल्या, माधवराव अजूनही चिडलेले होते,.." किती वेळा सांगितला आहे तुला मी की मुलांच्या अति पुढे पुढे करत जाऊ नको, एका ठराविक काळानंतर जर अलिप्त पणा ठेवावा ",

" अहो काय झालं? तुम्ही का चिडले इतके, प्रिया आपली मुलगी आहे, मी थोडं केल तीच तर काय होत? , ती आपल्याला बोलली तर एवढ काय मनाला लावुन घेताय तुम्ही ",.. आरती ताई.

" अग पण तिला जाणीव आहे का या गोष्टीची, एक दोनदा ठीक आहे तू तिच्यासाठी एवढं करते आणि ती सदोदित तुला बोलत राहते, पूर्वी पासून ती अशी करते, आई हे कर ते कर आणि केल की नाव ठेवत खाणार, तुला सुद्धा समजत नाही का, एखाद दिवशी बोलून टाकायचं, मुल समजून घेत नाही आपल्याला, तो राहुलही तसाच",.. माधवराव

" आता काय झालं राहुलचं? तो घरी तरी असतो का? तुम्हाला न उगाच चिडचिड करायची सवय लागली आहे",.. आरती ताई.

" आणि तुला पण खूप सहन करायची सवय लागली आहे",.. माधवराव

नऊ वाजता राहुल ऑफिसहुन आला, तिघं जेवायला बसले, कडी खिचडीचा बेत खुप छान झाला होता, त्याच्याबरोबर कोथिंबीर वड्या होत्या, राहुल जास्त वड्या खात होता भात कमी, आरती ताई मध्ये बोलल्या.." अरे राहुल जरा भात पण खा आणि तो मोबाईल बाजूला ठेव बरं",

" आई तुला माहिती आहे का मी काय करतो आहे ते? महत्त्वाची मेल आली आहे ते बघतो आहे आणि हे काय ग हे खा ते खा मी काय लहान आहे का, आणि मला या पुढे रात्रीचा भात नको करत जावू पोळी भाजी हवी मला" ,... तो ताट घेऊन आत मध्ये चालला गेला.

🎭 Series Post

View all