तुम जो आए जिंदगी मे भाग 3

कहाणी अनोख्या प्रेमाची.
______
( भाग 3)
....
आणि देव पाहतो तर नियती जोरात जमिनीवर आदळते समोर बांधावर असणाऱ्या त्या काट्यांत लडखडत पडते.
...
"देव.... देव..."  म्हणत नियती तिच्या पोटाला हात लावते तसा देव पळत नियती जवळ येतो.
...
"नियु नियु तू ठीक तर आहेस ना" म्हणत देव रडक्या स्वरात बोलत तिला त्या काट्यांमधून बाहेर काढत असतो.
नियतीच्या पूर्ण कपड्याला आणि अंगाला काटे ओरबडलेले असतात.
....
नियती रडत असते आणि देव तिला शांत करत बाहेर काढतो आणि जोरात शिवांशला आवाज देतो तसा शिवांश "काय झालं.." म्हणून धावत धावत तिथं येतो.
....
"सर सर हे काय झालं" म्हणत शिवांश विचारपूरस करत असतो.
देव त्याला नियतीसाठी पाणी आणायला सांगतो तसा शिवांश पाणी घेऊन येतो.
....
नियतीच्या दंडाला आणि पायाला ओरबडलेले काटे आणी त्यातून रक्त येत असतं.
देव नियतीला पाणी पाजतो आणि विचारायला लागतो.
...
"नियती तू ठीक तर आहें ना...बोल..!"
...
"नाही देव..पोटात खूप दुखत आहें प्लिज मला लवकर हॉस्पिटल मध्ये घेऊन चल."
...
आणि देव नियतीला कवेत उचलत शिवांशला कार मळ्याकडें आणायला सांगतो.
...
शिवांश पळत जाऊन कार मळ्याकडे आणतो. देव नियतीला मागच्या सिटवर झोपवत मागेच तिच्यासोबत बसतो तर शिवांश कार चालवत असतो.
....
कार त्या खेड्याबाहेर येता हायवेला लागते. देव गुगलवर जवळपासचं हॉस्पिटल शोधायला लागतो.
आणि शेवटी पाच किलोमीटर अंतरावर त्याला एक हॉस्पिटल शो होतं.
...
नियती पोटावर हात देत रडत असते तर देवला तिची ती अवस्था पाहून रडायला येत असतं.
...
"देव.. देव.. पोटात खूपच दुखत आहे... आपला बेबी ठीक तर असेल ना....!"
नियती विव्हळत आणि पोटातल्या बाळाची काळजी करत देवला विचारत असते.
....
"हॊ..सगळं ठिकच आहे नियु तू काही काळजी करू नको" म्हणत देव तिला समजावत असतो.
.....
अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर कार हॉस्पिटल जवळ थांबते.
देव पळत हॉस्पिटल मध्ये जाऊन एमरजर्न्सी सांगत हॉस्पिटल स्टाफच्या मदतीने स्ट्रेचर बाहेर घेऊन येतो.
आणि नियतीला स्ट्रेचर वर झोपवत हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो.
...
नियती खूपच रडत असते,
तर देव तिच्या हातात हात देत स्ट्रेचर सोबत चालत असतो.
नियतीची कंडिशन पाहता तिला एमरजन्सी विभागात ऍडमिट केलं जातं.
....
डॉक्टर तिला चेक करून बाहेर येतात.
"नियतीची कंडिशन नाजूक आहें जमिनीवर आदळल्याने तिच्या पोटाला मार बसला आहे" म्हणत "सिजरिंग करून बाळ काढवं लागेल" डॉक्टर असं सांगतात.
देव हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकते.
...
देवला आता काय निर्णय घ्यावा हे समजत नसतं.
नियतीच्या आई-वडिलांना फोन लावून काय बोलावं काय सांगावं देवला समजत नसतं.
...
शिवांश बाजूलाच बसलेला असतो देवची ती स्तिथी पाहता शिवांश देवच्या जवळ जात त्याला सांत्वना द्यायला लागतो.
...
देवच्या नयनातून अश्रू तरळत असतात.
"नियती फोटोशूट साठी नकार देत होती मीच तिला हट्ट केला."
हा विचार देवच्या मनात सारखा घुमत असतो आणि शिवांश बोलतो.
...
"सर तूम्ही तुमच्या घरी कळवा.तुमच्या एकट्याला सगळं सांभाळणं होणार नाही.."
आणि देव शिवांशला सांगतो की घरी कुणीच नाही आम्ही दोघेच बंगल्यात असतो.
त्यावर शिवांश नियतीच्या घरी कळवायला सांगतो.
"मी काय सांगू काहीच सुचतं नाहीये कोणत्या तोंडाने त्यांना ही अनहोनी सांगू" म्हणत देव तर ढसाढसा रडायला लागतो.
आणि शिवांश सुद्धा देवला पाहून इमोशनल होतो.
देवला सांत्वन देता स्वतः शिवांश नियतीच्या घरी कॉल लावून नियतीच्या आई वडिलांना हॉस्पिटलचा पत्ता पाठवून त्यांना अर्जंटमध्ये यायला सांगतो.
....
नियतीची आई तर हे ऐकून हंबरडाच फोडते. "माझी नियु ठीक तर असेल ना.
माझ्या नातवाला काही होणार तर नाही ना.!"
असे प्रश्न विचारत ती नियतीच्या बाबां सोबत हॉस्पिटलकडे निघते.
...
हॉस्पिटल मध्ये बाहेरच्या खुर्च्यांवर बसलेला देव आणि तितक्यात डॉक्टर तिथं येतात आणि देवला सिजरिंग पेपर्स वर सही करायला सांगत असतात.
पण देवला नियतीच्या आई वडिलांच्या गैरहजेरीत सही करावी कि नाही हे उमजत नसतं.
शेवटी देव सही करायचा निर्णय घेतो.
डॉक्टर सोबत केबिन मध्ये जाता आणि हातात सहीसाठी पेन घेता देवचा हात अचानक थरथरायला लागतो.
तसा शिवांश मागणं येत देवच्या हातावर हात ठेवत त्याच्याकडे पाहतो.
शिवांश हात काढता देव शेवटी सही करतो.
पेपर्सवर सही होता देव शिवांश सोबत केबिन बाहेर येऊन खुर्च्यांवर बसतो.
देवचा चेहरा खुपच उतरलेला असतो.
शिवांशला उद्या दुसरी फोटो शूटची ऑर्डर असते त्याला घरासाठी निघायचं असतं.
पण देवला या अवस्थेत सोडून जाणं त्याला ठीक वाटत नाही.
मात्र शिवांशची ऑर्डर लग्नासाठीची असल्या कारणाने त्याला जाणं भाग पडतं.
"काळजी घ्या" म्हणत शेवटी शिवांश देवचा निरोप घेतो.
...
देव त्याला केलेल्या मदतीसाठी धन्यवाद देतो.
...
शिवांश जाताच ऑपरेशन थिएटर बाहेर रेड लाईट लागतो.
ऑपरेशन थिएटरमध्ये नियतीचं सिजरिंग चालू होतं.
...
बाहेर बसलेला देव मात्र खुपच नाराज असतो.
त्याला नियतीची खूप काळजी वाटत असते.
सातव्या महिन्यात बाळ जन्म घेणार आहें बाळ ठीक तर असेल ना.
नियती पाय घसरून पडल्या मुळे काही अनहोनी तर घडणार नाही ना?
देवच्या मनात येणारे प्रश्न काही थांबता थांबत नाहीत.
..
पाहता पाहता अर्धातास होतो. देवला तर खूप काळजी वाटत असते.
तितक्यात त्याला नियतीच्या आईचा कॉल येतो.
"माझी नियु ठीक तर आहें ना जावई बापू" म्हणत नियतीची आई विचारपुस करत असते.
...
देव होकार देत त्यांना लवकर यायला सांगतो.
आणि शेवटी एक तासाने एक नर्स देव जवळ येऊन त्याला सांगायला लागते.
"अभिनंदन तुम्हाला मुलगा झाला आहें.
मॅम एकदम ठीक आहेत तूम्ही त्यांना भेटू शकता."
आणि हे ऐकता तर देवच्या चेहऱ्यावर आनंद भाव येतात देव खूप खूप खुश होतो.
आणि उठून नियतीकडे जायला लागतो.
नियती रूम नंबर 455 मध्ये असते. दरवाजा आत लोटता देव तिच्यावर नजर टाकतो तर.
झोपलेली नियती आणि बाळाला ती पान्हा पाजत असते.
...
देव तिच्या जवळ जात तिचे पाय पकडतो आणी बोलायला लागतो.
"आय एम सॉरी नियु आय एम सॉरी खरंच मला माफ कर..आज माझ्यामुळे तुझा जीव धोक्यात पडत होता."
देवच्या डोळ्यातुन अश्रू तरळताना पाहता नियतीला खूप वाईट वाटते.
...
नियती देवला डोळ्याने इशारा करत जवळ बोलवते.
तसा देव तिच्या जवळ जातो नियती बाळाला देवच्या हातात देते.
तसा देव त्याला पाहता तोंडून शब्द काढतो.
"नियु हे आपलं बाळ आहें...नियु तू बोलली होतीस की आपल्याला मुलगा झाला तर आपण अनाथ आश्रमात पेढे वाटू.
मी उद्याच तिथं जाऊन पेढे वाटेल बघ"....आणि नियती तें ऐकून स्मितहास्य करते.
"किती ही घाई" हळू आवाजात नियती बोलत असते.
"घाई म्हणजे मी बाप झालोय नियु बाप...! मी खूप आनंदी आहें."
म्हणत देव बाळाच्या गालावर चुंबन घेतो तसं बाळ अचानक रडायला लागतं.
....
"अरे अरे बाळ रडतंय नियु" म्हणत देव बाळाला नियतीच्या हातात देतो.
नियती त्याला पान्हा पाजायला लागते.
आणी बाळ पान्हा न पिता अजूनही जोरात आक्रोश करत रडायला लागतं.
नियती बाळाचं रडणं ऐकून घाबरून जाते.
आणि अचानक बाळाच रडणं बंद होतं.
...
तितक्यात नियतीचे आई बाबा तिथं येतात. नियती तिच्या आईला पाहता तर खूप आनंदी होते.
देवला तर त्यांना पाहता त्याला आधार भेटल्या सारखं वाटतं.
इतका वेळ देव ने इतके सारे विचार करत काढेलेला तो वेळ.
आणि याच क्षणी त्याला त्याच्या आई वडिलांची आठवण त्त्यांची कमी त्याला नकळत भासायला लागते.
...
तर नियतीचे आई बाबा तिच्या बाजूला बसून तिला बोलत असतात.
नियती बाळाला तिच्या आईकडे देते आणी अचानक तिच्या पोटाच्या भागाला तिला काहीतरी जाणवल्या सारखं होतं म्हणून ती पोटाला हात लावते.
आणी पोटाला हात लावता पाहते तर तिच्या सीझरिंग केलेल्या भाग तिला पानवल्या सारखा जाणवतो.
नियती पोटाला लावलेला हात काढत डोळ्या समोर आणत पाहते तर...नियती खूप घाबरून जाते...!
....
काय कारण असेल नियती घाबरण्या मागचे..?
काय होईल समोरच्या भागात...?
Stay tuned..!
....
© सुनिध सोहमे.


🎭 Series Post

View all