तुम देना साथ मेरा--भाग 6
( मागील भागात--
पाच मिनिटे तिथे थांबल्यानंतर ती राजला म्हणाली, "उठून चालून बघा आता थोडे. कळ लागते आहे का अजून बघा जरा. दुखत असेल तर सांगा तसे..."
राजने चालून बघितले.
त्या पाल्याने तर जशी काही जादूच केली होती.
दुःख जाणवत होतं पण ठसठसतं नव्हतं.
तो चालू शकणार होता.
पण तरीही त्याने तिला "खूपचं दुखतंय हो अजून," असे सांगितले.
तिला आश्चर्य वाटले. त्याच्या नजरेला आता तिने तिची नजर रोखली होती.)

आता पुढे---
तिने रोखून बघताच तिला त्याच्या नजरेतले मिश्किल भाव जाणवले आणि तो मुद्दाम खरं सांगत नाही आहे हे तिने ओळखले.
तसंही तिला आत्मविश्वास होता की पाल्याचा रस इतक्या वेळेत त्याची कमाल करतोच म्हणजे त्याला बरे नक्कीच वाटत आहे.
"ठीक आहे, दुखतंय ना अजून तर मग बसून रहा इथेच. थोड्या वेळात वाघोबा नाहीतरी सिंहोबा, कुणीतरी तुम्हाला सोबतीला येईलच, मी तर निघाले आता," असे म्हणून ती तणक्याने उठली आणि चालू लागली.
"अहो, चिडता काय अश्या. थांबा, मी पण येतोय," असे म्हणत राज धडपडत उठला आणि थोडासा लंगडत चालू लागला.
एकही शब्द न बोलता राजसाठी म्हणून आता तिने आपसुकच तिच्या चालण्याचा वेग मंद केला होता.
हे लक्षात येऊन राज पुन्हा सुखावला.
"आहे, आहे, माणुसकी आणि सौजन्य अजून जिवंत आहे अजून या जगात," असे विचार मनात येऊन त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले होते.
पण आता तो देखील काहीही न बोलता, शांतपणे तिच्या सोबत चालला होता.
चालता चालता राज तिचं निरीक्षण करू लागला.
ती सुंदर होती.
छान काळ्याभोर लांबसडक केसांची चापूनचोपून वेणी घातली होती.
ती सुंदर होती.
छान काळ्याभोर लांबसडक केसांची चापूनचोपून वेणी घातली होती.
"इतका सुंदर मौसम, गार हवा, हिने हिचे सुंदर केस मोकळे सोडून छान फुलं माळायला हवी होती", नकळत राजच्या मनात विचार आला.
अगदी फिक्या पांढऱ्या रंगाचा ड्रेस, कानात नाजूक छोटेसे पांढऱ्याच खड्याचे स्टडस् आणि चेहऱ्यावर काहीशी उदासी तर डोळ्यांत नैराश्य राजला जाणवलं.
तिने जेव्हा राजकडे रोखून बघितले होते, तेव्हा तिची भावनाशून्य नजर त्याला कुठंतरी बोचली होतीच.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या वयाला न शोभणारा एक पोक्तपणा तिच्या वागण्याबोलण्यात होता.
शेवटी त्याला चूप बसून राहवलेच नाही आणि अजून तो तिला काहीतरी विचारणार होता, विषय काढून बोलते करणारच होता तेवढ्यात पायवाट संपून मेन रोड वर ते आले आणि समोरून अंशु येताना दिसला.
"अंशु...," राजने त्याला मोठ्याने आवाज दिला व त्याचे लक्ष जावे म्हणून त्याच्याकडे बघून हात हलवला.
अंशु दिसताच आणि तो राजच्या ओळखीचा आहे, त्याला घ्यायलाच आला असावा हे बघून ती तिच्या वाटेने निघून गेली. जाताना ना अंशुसोबत बोलली ना राजसोबत.
पण अंशुने तिला राजसोबत येताना बघितले होते.
"राज, बरं झालं लवकर निघालास जंगलातून.
तुला घ्यायलाच वापस आलो होतो मी.
चल बैस गाडीवर. आणि ही मुलगी कुठे भेटली तुला?"
तुला घ्यायलाच वापस आलो होतो मी.
चल बैस गाडीवर. आणि ही मुलगी कुठे भेटली तुला?"
राजने त्याला काय घडले ते सांगितले.
इतका वेळ बोललो, सोबत होतो पण तिचे नाव आभा आहे आणि कुठलीतरी वनस्पती घ्यायला ती आली होती, याव्यतिरिक्त त्याला तिच्याबद्दल काहीच कळलं नव्हतं.
"अंशु, कोण रे ही आभा? काय करते? तुला माहीतच असेल ना."
"नाही रे, फारसं नाही माहीत. अगदीच जुजबी ओळख आहे.
ही आभा म्हणजे गावातल्या आबासाहेब पाटलांची मुलगी आहे. शहरातच वाढलेली.
व्यवसायानिमित्त बरेच वर्षांपासून आबासाहेब शहरात स्थायिक झाले होते.
अधूनमधून गावी चक्कर टाकायचे.
यंदा मात्र बराच लांबलाय त्यांचा मुक्काम.
पण यावेळेस ते गावातल्या वाड्यात न राहता गावाबाहेर त्यांची शेती आहे, तिथल्या मोठ्या फार्महाऊस मध्ये राहत आहेत. त्यामुळे तसाही त्यांचा संपर्क फार कमी येतो.
आणि आभाबद्दल तर आम्हा कुणालाच काही माहिती नाही."

"हम्मम, मलाही जरा गूढचं वाटलं तिचं वागणं-बोलणं,"राज विचारात गढला.
"गावातल्या इतक्या मोठ्या व्यक्तीची मुलगी आणि गावातल्या लोकांना तिच्याबद्दल माहिती नाही? कोडंच आहे हे तर," इति राज.
"अहो चित्रकार, तुम्ही तर विचारातच गढले त्या आभाच्या, चला उतरा घर आलं आपलं केव्हाच."
नंतरही बराच वेळ त्यांची थट्टामस्करी सुरू राहिली.
"तसं नाही रे, गूढ वगैरे काही नाही.
ना ओळख ना पाळख, एकदम ती कशी काय तुझ्याशी मोकळी बोलणार होती.
माणुसकीच्या नात्याने जंगलातून तुला बाहेर घेऊन आली हे तुझं नशीब समज आणि देवाचे आभार मान."
ना ओळख ना पाळख, एकदम ती कशी काय तुझ्याशी मोकळी बोलणार होती.
माणुसकीच्या नात्याने जंगलातून तुला बाहेर घेऊन आली हे तुझं नशीब समज आणि देवाचे आभार मान."
अंशुचं बोलणं राजला पटत होतं पण तरीही काहीतरी खटकत होतं.
आभा म्हणजे एक कोडं वाटू लागली.
तिच्या निरस, उदास वागण्याबोलण्याबद्दल, भावनाशून्य नजरेबाबत राज विचार करायला लागला.
तिच्या निरस, उदास वागण्याबोलण्याबद्दल, भावनाशून्य नजरेबाबत राज विचार करायला लागला.
"पुन्हा भेटली ना तर नक्की शोधून काढू तिच्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं. पण भेटेल का ती पुन्हा कधी?"
क्रमशः
(राज आणि आभा भेटतील का?कधी आणि कसे? काय गूढ आहे आभाच्या जीवनात, पुढील भागात नक्की वाचा)
© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा