तुम देना साथ मेरा..11 पर्व दुसरे.

प्रेम



    "अग झाडावर काय? खरचं सांगतोय मी.. हल्ली माझ्या पेक्षा तुझ्यावरच प्रेम करतात सगळे.. आईं ला काही म्हटलें की आई म्हणते ईशू ला विचार.. सायली शी बोलताना ही वहिनी चेच कौतुक असतें.. तो अन्या तर काय जेंव्हा फोन करावा तेंव्हा म्हणतो वहिनी ला पाठव नाहीतर मला घेऊन जा तिकडे.."

 " हां.. अनिश दादांना कोणी रागवत नाही ना जास्त, मी असल्यावर.. आणि अभ्यासा बद्दल ही ओरडा खावा लागत नाही.. आपणं मनिष सोबत त्यांना ही आणूया का सुट्टीत आपल्या कडे.." ती त्याच्या कडे आशेने पाहत म्हणाली..

   "झालाच मग मनिषचा दहावी चा अभ्यास.." साई कपाळावर हात मारत हसून म्हणाला.


   "काय हो, तुम्ही सगळे असं करतात त्यांना.. लहान आहेत अजून ते.. आम्ही तर गेल्या वेळीच ठरवले होते.. सुट्टीत अनिश दादा आणि सायली ताई आपल्या कडे येणारं होते.. आणि आपण त्यांना मुंबई फिरवणार म्हणून.." तीने त्याच्या पोटाला वेढा घातला आणि त्याला बिलगत म्हणाली.

   "बापरे बरेचं प्लॅनिंग करून ठेवलय की तुम्ही.. पण इशी.. सायली ला ताई म्हणतेस ते ठीक आहे पण अनिश किती लहान आहे.. त्याला का दादा म्हणतेस तू?" त्याने तिचे कपाळावर भुर भुरणारे केस मागें सारत विचारलें..

   "अहो..मान आहे तो त्यांचा.. आईं ने आधीच सांगून ठेवले होते, कोणत्या नात्याला काय संबोधायचे म्हणून.."

   "हो पण काळ बदललाय आता.. हल्ली नवऱ्याला ही अरे तुरे करतात.. आणि तू.." तो तिच्या केसांत बोटे फिरवत बोलतं होता.. आणि त्या सुखद स्पर्शाने तीचे डोळे जड होऊ लागले होते.

    "हो अहो... पण माझी आई ला लहान पणापासून सर्वांना मान देतच बोलताना पाहिलेय मी.. मला ही तशीच सवय आहे.. आणि आपले गाव खेडे आहे.. तुम्ही च सांगा मी जर गावी गेल्यावर आरे कारे बोलले तर काय म्हणतील आजू बाजूचे.." ती म्हणाली आणि त्याला हसू आले.

   "का हसलात का...?"

  " अग नाही. सहज मनात विचार आला.. तू जर अनिश, मनिष किंवा सायली ला अहो जाओ केले नाही तर सगळ्यात आधी शेजारची निर्मला आजी म्हणेल, माय माय.. त्या साईची बायको नंणदेचा मान बीन काही ठेवत नाही.. शहरातल्या पोरींना बोलायची काय पध्दतच नसते.. त्याने अगदी आजी च्या टोन मध्ये म्हटलें आणि तिला हसू आले.." अजून ही तो तिच्या केसांत बोटे फिरवत काही बाही बोलत होता. आणि हीचे डोळे मात्र मिटता मिटता मिटून गेले..

    "ईशी.. झोपली?"  त्यानें वाकून पाहिले तर तिला झोप लागून गेली होती.. अलगद तिचे डोके उशी वर ठेवत तिला कुशीत घेऊन झोपून गेला तो ही..
  
   "काय ग? आज डबा नाही नेत आहेस तू ? फक्त माझ्या पुरताच बनवलं आहेस? आणि एव्हढ्या लवकर तयारी पण केलीस?" तिने त्याच्या पुरत्याच चपात्या केलेल्या पाहून त्याने विचारलें.

  " हो.. मला शाळेत नाही जायचे आज.." ती त्याच्या टिफीन ला बॅगेत भरत म्हणाली.

  "का? तुला सुट्टी आहे आज? "

  "अहो..नाही.. आज पासून ट्रेनिंग आहे माझे पाच दिवस.. ते ही दुसऱ्या शाळेत.. तर लवकर जायचे आहे.."

 "  ट्रेनिंग? कसले?"

  " नवीन शिक्षणपद्धती आहे. त्याचे पाच दिवसांचे ट्रेनिंग करायचेय सर्व शिक्षकांना.."

   "असे अचानक? म्हणजे काल काही नाही बोललीस तू?"

 " अहो माझा नंबर पुढच्या आठवड्यात होता.. पण बनकर मॅडम ना जमणार नाहीये या आठवड्यात.. तर त्यांचा कॉल आला होता मघाशी.. तुम्ही दूध घ्यायला गेला होतात तेंव्हा... माझ्या ऐवजी तू जाणारं का विचारायला. मी हो म्हटलें.. असे ही पुढच्या आठवड्यात जायचेच आहे.. ते आता जाते.. माझ्या ठिकाणी त्या जातील मग.."

   "मग डबा का नाही नेत आहेस?"

  "चहा आणि जेवण आहे तिथे.. अहो थांबा जरा..मी पण तुमच्या सोबत येतेय.." ती स्वतः चे आवरत म्हणाली..

   "बरं.. चल लवकर..संध्याकाळी उशिर होईल का तुला?"

   "नाही हो.. साडे नऊ ते साडेपाच आहे ट्रेनिंग.. रोजच्या वेळेच्या आधीच येईल कदाचीत.. कुलूप त्याच्या कडे दिले. आणि पायात सँडल घालत ती म्हणाली.. त्याने कुलूप लावले. आणि पुढे निघाला..

  " वा! आज जोडीने? सुट्टी का? फिरायला निघालात? " शेजारच्या दामले काकांनी त्या दोघांचे निरीक्षण करत विचारलें.

  "नाही हो काका.. ड्युटी वरच चाललोय!"

  "नाही नेहमी साडीत असतात ना सूनबाई.. आज ड्रेस घातलाय.. आणि उशिरा जातात रोज शाळेत..आज सोबत चाललाय दोघे.. म्हणून मला वाटले.. काका दोघांकडे हसून पाहत म्हणाले. आणि ईश्वरी ने साई कडे पाहत ऑकवर्ड पणे हसून पाहिले..

   "अहो.. किती लक्ष ठेवतात लोकं आपल्याकडे.." रिक्षात बसल्यावर ती म्हणाली.

   हम्म.. आपणं कुठे जातो, काय करतो? आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही, पण लोकांचे बरोबर लक्ष असतें आपल्याकडे.. आणि दामले काका तर काय? रिपोर्टर आहेत आपल्या चाळीतले.. रिटायर्ड माणूस.. कोण काय करते, कुठे जाते? या सगळ्याची खबर ठेवायची असतें त्यांना.. "

 " हो ना? तुम्हाला माहितीय? आमच्या शाळेच्या रस्त्यावर पुढें एक लसूण विकणारा असतो... त्या दिवशी मी लसूण घेतला त्याच्याकडून.. माझ्या कडे सुट्टे पैसे नव्हते, तर तो म्हणाला, राहू द्या मॅडम.. उद्या द्या.."

   "काय? पण सहसा ओळखीचे ही कोणी असे म्हणत नाहीत.."

  " हो ना.. मी तर त्याला म्हणाले ही की नको.. हवे तर मी उद्या घेते.. तर तो म्हणाला की मी ओळखतो तुम्हाला माझे तर कधी लक्ष नव्हते गेले त्याच्याकडे.. तो खूप च आग्रह केला.. मग मी घेतला शेवटीं लसूण.. आणि दुसऱ्या दिवशी दिले पैसै.."

     "हम्म.. तुला सांगू का ईशी.. हल्ली किती ही जोक सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकांवर होत असले, तरी हाडाच्या आणि प्रामाणिक शिक्षकांना जो मान, इज्जत मिळते ना समाजात तो कोणाला ही मिळत नाही.."

   "हो.. खरे आहे.. जेंव्हा आपला एखादा विद्यार्थी किंवा त्याचे पालक कधी बाहेर भेटतात ना.. एव्हढा रिस्पेक्ट देऊन बोलतात ना.. खूप अभिमान वाटतो.."

   "चला आले स्टेशन.." रिक्षावाला म्हणाला तसें त्यांच्या गप्पांना ब्रेक लागला.

   "तू दूसरी रिक्षा पकडतेस का इथून आता.." साई ने रिक्षा वाक्याला पैसै देऊन झाल्यावर ईश्वरी ला विचारलें.
   
  "हो.. तुम्ही जा.. पुढे मिळेल मला रिक्षा.."

 " हो.. नीट जा.. रस्ता नीट क्रॉस कर.." आजूबाजूची गर्दी पाहत त्याने म्हटलें.

  "हो अहो.. रोजच जाते ना मी.."

    "हो.. पण इथे किती गर्दी असतें माहितीय ना रिक्षांची.. त्यात कुठून रिक्षा येईल हे सांगता येतं नाहीं.." त्याने तिचा एक हात पकडत तिला एका बाजूला केलें.. आजूबाजूला रिक्षा बाईक, बस, पायी चालणारे साऱ्यांचीच पुढें जाण्यासाठी लगबग सुरू होती.

  " हो ना.. कुठून ही घुसवतात रिक्षा रिक्षावाले.. स्वतः च्या मालकीचा रस्ता असल्या सारखे मधून चालवतात रिक्षा. चालणाऱ्या लोकांना धक्का लागेल की काय हे तर बघतच नाहित..अगदी जवळून नेतात.. एखाद्याला धक्का लागला तरी ते उलट त्यालाच..... सॉरी सॉरी.. तुमच्या बद्दल नव्हते बोलत मी.." ती रिक्षा वाल्यांबद्दल बोलतं असताना तो रोखून पाहू लागला तशी जीभ चावत सॉरी म्हणाली..

    "चल बाय.." तिला घेऊन रस्ता क्रॉस केल्यावर तो स्टेशन कडे निघाला. आणि ती निघाली पुढे जाणाऱ्या रिक्षा स्टॉप कडे.. आता पाच दिवस तिला असेच त्याच्या सूचना ऐकत गर्दीतून वाट काढावी लागणारं होती.

   पाच दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये भरपूर काही शिकायला मिळालं  तिला. आपल्याला उपजत असलेलं ज्ञान, शिकवण्याचं कौशल्य, नवीन पद्धतीने कस आजमावायचं.. अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन अभ्यासाच्या पुढील पातळीपर्यंत कसे आणायचे.. विविध बौद्धिक खेळातून त्यांचे ज्ञान कसे वाढवायचे.. असे बरेच काही या पाच दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये ती शिकली. काही जुन्याच मैत्रिणींशी नव्याने ओळख झाली.. काही नवीन मैत्रिणी मिळाल्या.. दिवसभरात ट्रेनिंग मध्ये नवनवीन शिकायचे, गट कार्य करायचे, उपक्रम राबवायचे, आणि घरी आल्यावर त्याबद्दल भरभरून सार काही साईला सांगायचे.. त्यानें दिवसभरात काय केलें हे ही विचारून घ्यायचे..

     दोघे ही बिझी असले , दोघांची धावपळ होत असली तरी ही दोघेही खुश होते आपल्या संसारात.. एकमेकांवर भरभरून करत असलेले प्रेम, ईश्वरी च्या घरच्यांची साथ, गावाकडील काकांचा निवळलेला राग, सगळ्यांचे वारंवार येतं असलेले कॉल, आणि स्थिर स्थावर झालेला जॉब.. अजून काय हवे?

   ईश्वरी ला पुढचा टप्पा मंजूर झाला होता.. जेंव्हा पगारात वाढ मिळेल तेंव्हा मिळेल. पण बारा तेरा हजाराने पगार वाढणार होता. तिच्या मनात आता स्वतः चे घर घ्यायचे विचार तीव्र होत होते.. बोलता बोलता अनेकांना सांगून झाले होतें. मनाली च्या बिल्डिंग मध्ये रिसेल चा एक फ्लॅट होता. पुढच्या आठवड्यात मनाली चे डोहाळे जेवण होते.. साई आणि तिला दोघांना बोलावले होतें. तेंव्हाच फ्लॅट पाहून घेऊ असा विचार केला होता तिने.  अजून साई ला सांगायचे बाकी होते.. रविवारीच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळें तो किती ही नाही म्हणाला तरी ती हट्टाने त्याला घेऊन जाणारं होती..

   क्रमशः

कथा आवडली असेल तर रेटिंग नक्की द्या आणि त्या सोबतच दोन शब्दांची का होईना, अगदी ? अशी ईमोजी का होईना पण समिक्षा जरूर द्या...

तुमच्या समिक्षांमुळेच लिहायला उत्साह येतो..?

कथेचे नोटिफिकेशन मिळण्या साठी मला फॉलो नक्की करा..