तुम देना साथ मेरा..2 पर्व दुसरे.

प्रेम


    "ताई.. तू अजिबात आईचे खायचे हट्ट पुरवायचे नाहीत हां.. " त्या दोघींचे नजरेचे बोलणें लगेच कळले काकूला.. इतक्या वर्षांचा अनुभव जे होता..

   ईश्वरी खूप प्रेमाने आपल्या या जीव लावणाऱ्या सासवांना पाहत होती.. कुठे त्या सिरीयल मधल्या खाष्ट सासवा आणि कुठे या जीवाला जीव लावणाऱ्या..
जे होते ते चांगल्यासाठीच.. कीतीही काहीही केले तरी घडणारे सगळे देवाच्या मर्जी नेच.. हे बाबांचे वाक्य अगदी तंतोतंत पटले तिला.. साई शी लग्न हे ही त्या ईश्वराचेच प्रयोजन होते कदाचित..

  

    दोन्हीं आत्यांसाठी दरवर्षी प्रमाणे आज ही पुरण पोळीचा बेत केला होता काकूंनी.. जेवणाला उशिर होईल म्हणून सकाळी भरपेट नाश्ता करून घेतला होता सगळयांनी..

     दोन्हीं आत्या घरी आल्या.. आणि त्यांच्या गप्पा, जेवणे, भाऊबीज यामध्ये संध्याकाळ कधी झाली ते कळलेच नाही..

   आधीच सुंदर दिसणारी ईश्वरी आज डाळिंबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती.. लगबगीने कामात करत असलेली मदत, नम्रपणे बोलणें, यामुळे दोन्ही आत्यांना नवी सून फारच आवडली होती.. त्यांनी साईला आमच्या कडे सून बाईला घेऊन ये म्हटलें.  त्यावर ईश्वरीनेच नम्रपणे पुढच्या वेळेस नक्की येऊ असे म्हणत त्यांना नमस्कार केला.. आणि आजच्या दिवस राहून जा म्हणून आग्रह केला..

   असे ही आई वडील दोघे लवकरच वारले असल्याने आत्यांना माहेर नव्हते.. साई चे बाबा आणि काकांनी लावलेला जीव त्यांना आपल्याला सख्खा भाऊ नाही, माहेर नाही ही जाणीव होवूच द्यायचा नाही..

     नव्या सुने च्या आग्रहाला मान देत त्या दोघीही राहिल्या.. नाहीतर एरवी घरी कामे आहेत, नातवंडे वाट बघतात, म्हणून संध्याकाळी परत जाणाऱ्या आत्या राहिल्या तशा आई आणि काकूंना आनंदच झाला.. आजी आणि आजोबा ही खूश झाले.. त्यांना स्वतः ला मुली नव्हत्या.. त्यामुळें आपल्या मोठ्या जावेच्या दोन्ही मुली आजीच्या लाडक्या होत्या.. आत्या ही दर भाऊबीजेला न चुकता येतं.. रक्षा बंधन ला काका त्यांच्याकडे जात..

   "बघ ताई.. इतके वर्ष आपण राहा म्हणतो तर , काम आहेत म्हणून संध्याकाळीच दोन्हीं ताई निघून जायच्या.. आणि आता सून म्हणाली तर तीचे बरे ऐकले.." काकू हसून बोलल्याच शेवटी..

   "हां मग.. सुनेच्या हातची पुरणपोळी खाल्ली.. आता तीचे जरा लाड पण करतो.. तिच्या घरी कधी जायला मिळते काय माहीत..? आज रात्री ती आहे तो पर्यंत गप्पा होतील.." मोठी सुलभा आत्या म्हणाली..

      "आधी बॅग भरायला मदत करा तिची.. मग गप्पा मारा.." आजोबांनी लगेच म्हटलें तशा दोन्ही आत्या भुवया जुळवून आपल्या काकांकडे पाहू लागल्या..

   "बघ वहिनी काका आता लगेच नातसूने च्या कामाला लावायला लागले आम्हाला.. लेकी दिवाळी ला आल्यात त्याचे काही नाही.." छोटी शैला आत्या म्हणाली तसें सगळे हसू लागले..

   हसत खेळत जेवणे पार पाडले.. दोन्ही आत्यांच्या मदतीने ईश्वरीने तिची बॅग पॅक केली होती. आई आणि काकू ने वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, पीठ, कडधान्य असं भरपूर सामान पिशव्यांमध्ये बांधून त्याची एक गोणी तयार करून दिली होती. आजोबांनी आणि काकांनी शेतातून काही ताज्या भाज्या आणल्या होत्या. त्याही केळीच्या पानात नीट गुंडाळून कापडी पिशवीत ठेवल्या. तिच्या आई पप्पांसाठी दिवाळीचा फराळ बांधून दिला.. आणि आता आकाश सोबतच मनीष आणि काका ही त्यांना सोडायला रेल्वे स्टेशनवर निघाले होते.

   ईश्वरी आणि साईने आजी, आजोबा, आई, दोन्ही आत्या, काकू, काका सगळ्यांना नमस्कार केला. सायली मनीष आणि अनिश ला नीट अभ्यास करा, परीक्षेत चांगले मार्क मिळाले पाहिजे, फोन करत रहा, अशा बऱ्याच सूचना देत गळाभेट घेतली. आणि सर्वांचा निरोप घेत रेल्वे स्टेशनवर निघाले..
   
    सामान नीट उतरवून घे. कल्याण स्टेशनला गाडी गेल्यावर एखादा कुली सांग. जड आहे पिशवी. सुनबाईला काही उचलून देऊ नकोस. गाडी सुटता सुटता काकांनी साई ला सूचना केल्या. आणि साईने मान डोलवतच होकार दिला. कुली तर करावाच लागणार होता. येताना त्यांच्यासोबत केवळ कपड्यांचे ओझे होते. पण आता वेगवेगळे धान्य आणि पिठामुळे सामानाच्या बॅगेंची संख्या आणि वजन दोन्ही वाढले होते..

    "अग काय करतेस आता? झोप जरा वेळ.. रात्री नीट झोप झाली नाही ट्रेनमध्ये.. आता जरा एक दीड तास आराम करू. मग मी दूध घेऊन येतो बाहेरून चहाला.. " साईने बेडवर पडून आवाज देतच तिला म्हटले .

    अर्ध्या तासापूर्वी घरी पोहोचले होते ते.. सकाळचे अजून सहाच वाजलेले होते.. घरी आल्यानंतर चार-पाच दिवस बंद असलेले घर ईश्वरीने धूळ वगैरे झटकत झाडू मारत स्वच्छ केले. आताही ती किचनमध्ये काहीतरी खुडबुड करत होती.

सकाळी पाच लाच त्यांची ट्रेन पोहोचली. आणि साई तडक रिक्षा करून घरी आला होता.. सामान बराच असल्याने त्याने दीपकला बोलवून घेतले होते. दीपक डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरच आल्यामुळे कुली करण्याची गरज भासली नव्हती.

   "इशी.. अगं किती वेळ? काय करतेस? ये ना!" त्याची पुन्हा अधीरली हाक..

    "अहो, बस दहा मिनिटे फक्त.. या भाज्या तेवढ्या काढून घेते.. रात्रभर पॅक आहेत ना त्या.. घामेजल्या असतील..  तुम्ही झोपा बघू..  मी आलेच.."

   "लवकर ये. तुझ्याशिवाय झोप येणार आहे का मला?"  साई म्हणाला आणि त्याचा तो बोलण्याचा मिश्किल स्वर ऐकून भाज्या काढता काढता ईश्वरी च्या अंगावर शहारा उमटला..

     नव्याने घेतलेला प्रीतीचा अनुभव मनात आठवण अंग अंग रोमांचित झाले होते तिचे.. खाली बसलेली होती तरीही पाय जडावले... झोपायचे तर तिलाही होते त्याच्या कुशीत.. भाज्या वगैरे ठेवून झाल्या तशी ती बाहेर आली.. साई अजूनही तिची वाट पाहत मोबाईल मध्ये खुडबुड करत होता.

    "झोपला नाहीत का अजून?"  बेडच्या बाजूला येत उभे राहत तीने विचारले..

   " सांगितले ना तुला?  तुझ्याशिवाय आता झोप येत नाही मला.."

  " काहीतरीच तुमचं.. झोपा आता.. एक दीड तासात पुन्हा उठायचंय.. बेड जवळ उभ्या तिला एका हातानेच खेचत त्याने जवळ ओढले. तसे छातीवर पडली ती त्याच्या..

   "सोडा बघू.. "ती स्वतः ची सुटका करण्याचा प्रयत्न करत म्हणाली.. पण तो कसला सोडणार होता आता तिला..

   "आज आईकडे जाण जरुरी आहे का इशी.. " तो तीचा चेहरा वर उचलत तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.

   "अहो असं काय करता ? खरंतर कालच भाऊबीज होती ना.. पण काल आपण गावी होतो.."

  "हो. पण प्लीज दोन दिवसानंतरच परत ये ना..चार दिवस नको राहू.." त्यानें तिला अंगावरून खाली टाकले आणि तिच्यावर झुकत प्रेमाने पाहत म्हणाला.

   "अंह.. सुट्टी संपली, की जायला नाही मिळणार मला..  आणि आई पप्पांना काय सांगणार?  त्यांनी दिवाळीला आपल्या दोघांना बोलावलेय. तुम्ही तर नाही म्हणालात.. मला चार दिवस पाठवून देतो म्हणालात आई जवळ..  मग आता?"

  " तेव्हा माहिती नव्हते ना मला..तुझ्या प्रेमात एवढी नशा आहे ते.. आता अजिबात तुला सोडून राहू शकत नाही मी.. "

   "हट.. काहीतरीच.. "

   "अगं खरंच... तू नसल्यावर करमणार आहे का मला?"

   "हम्म..दिवसभर तर तुम्ही जॉब वर राहणार.."

   " आणि रात्री.. रात्री तुझ्या शिवाय झोप कशी लागणार आहे?" तिच्या गळ्यावर ओठ फिरवत म्हणाला. तशी ती आपल शरीर आकसून घेऊ लागली. 

   "तुम्ही ही चला मग सोबत.. तिथेच राहा.."

   "मी? नको नको.. आधीच तुझ्या पप्पां समोर दोन-तीन तास असं चोरा सारखा बसलेला असतो मी तिथे आल्यावर.. त्यात तिथेच राहायचं म्हणजे.." तो अचानक घाबरून म्हणाला. तसे ती खळखळून हसू लागली..

  " हसतेस काय? खरंच.." तो तिच्या नाकाला नाक घासत म्हणाला..

  " हो. पण आता मागे तर किती छान मोकळेपणाने बोलत होतात ना तुम्ही त्यांच्याशी.."

  " हो. ते खर आहे..  पण तरीही एक अनामिक आदरयुक्त भीती वाटते मला त्यांची.. नाही ना राहणार तू चार दिवस..? नाहीतर आता राहूच नकोस ना.. आईंना सांग मी पुढच्या महिन्यात येते.."

"अहो, कसें शक्य आहे?"

"ठीक आहे..  पण चार दिवस नाही ना .. आज रात्री रहा आणि उद्या परत ये.."

   "काही काय ? अजिबात नाही.. मी चार दिवस राहणार.." 

   "मग तर चार दिवसांचा कोटा तुला आता पूर्ण करावा लागेल.." मिश्किल हसत तिच्या गालावर ओठ फिरवत म्हणाला.

  "कोटा? कसला..?"

"हा.. या ओठातल्या गोडव्याचा.. या चार दिवसांत ज्या प्रेमाला मी वंचित राहणार त्या प्रेमाचा.. आता आणि राहिलेला आल्यावर.. चार दिवसांचे प्रेम तर वसूल करायलाच हवे ना?" तो तिच्या नाकाला नाक घासत म्हणाला..
आणि त्याच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येताच पोटात आणि पाठीत एक गोड शिरशिरी धावत गेली तिच्या..

"अंह.. सोडा.. काही प्रेम वगैरे वसूल.. " ती बोलतच होती की त्याने तिचे होठ बंद केले.. आधी लटका प्रतिकार करण्यासाठी त्याला दूर लोटणारे हात कधी त्याच्या गळ्यात गुंफले गेले तिलाही कळले नाही.. आणि सकाळी सकाळी त्यांची प्रीत पुन्हा बहरू लागली..  या चार दिवसांचा दुरावा आधीच मिटवून घेत होता तो.. तिच्या प्रेमात स्वतःला झोकून देत.


     दुपारीच ईश्वरीला साई ने तिच्या आईकडे सोडले. जरा वेळ थांबून तो मात्र घरी निघून आला.. आईने जेवायला थांबायचा इतका आग्रह केल्यानंतरही, 'नको ईश्वरीला घ्यायला येतो, तेव्हा थांबेल जेवायला..' असं म्हणत पुन्हा एकदा हळूच तिला मोबाईल कडे इशारा केला. आणि तो निघाला..

   तिने मोबाईल मध्ये पाहिलं, तर व्हाट्सअप वर, उद्या नाही शक्य झाले तरी परवा मात्र नक्की निघून ये..  चार दिवस नाही राहायचं.. आईं पप्पा ना काहीतरी कारण सांग.. मी घ्यायला येतो.. ' अशी प्रेमळ तंबी मिळालेली होती तिला.. ते पाहूनच तिच्या गाली हसू उमटले.

    
क्रमशः

कथा आवडली असेल तर रेटिंग नक्की द्या आणि त्या सोबतच दोन शब्दांची का होईना, अगदी ? अशी ईमोजी का होईना पण समिक्षा जरूर द्या...

तुमच्या समिक्षांमुळेच लिहायला उत्साह येतो..?