" सांगा ना मग? असे का विचारले आज अचानक?" त्याची पोह्यांची रिकामी डिश घेत तीने चहाचा कप हातात दिला...
" दिपक आणि त्याची बायको.. सारखी भांडणे होतात त्यांच्यात.. " दिपक चा विषय निघाला. आणि त्याच्या अस्वस्थ असण्याचे कारण कळले तिला.. दिपक खास मित्र होता त्याचा.. अगदी जशी ती आणि मनाली, तसेंच ते दोघे होतें..
" अं.. त्यांचें काय? आताच तर लग्न झालेय त्यांचें.."
" हो.. पण तिला चाळीत नाही रहायचेय.. तीचे म्हणणे आहे की फ्लॅट घ्यावा भाड्याने.. "
"अहो पण ते ही दोघेच राहतात ना वेगळे? त्यांची आई त्यांच्या भावा सोबत बाजूला राहते.. मग?"
" हो. पण तिला जवळ नकोय त्यांच्या.. तीला त्यांची रोकटोक नकोय कसलीच.. आणि तिच्या मैत्रिणी ही फ्लॅट मध्ये राहणाऱ्या आहेत म्हणून ती फ्लॅट मध्ये जाऊया म्हणतेय.. लाज वाटतेय तिला चाळीत राहत असल्याची.."
" काय? अहो, पण तीचे आई बाबा पण तर चाळीतच राहतात ना? आणि.. एक मिनिट.. तुम्ही हे मला.. म्हणजे म्हणून तुम्ही केंव्हाचे मला फ्लॅट बद्दल विचारत होतात? ती तसा विचार करते, म्हणून माझे ही विचार तसेच असतील असे कसे वाटू शकते तुम्हाला? हम्म..? " क्षणात त्याच्या बोलण्याची लिंक लागली आणि स्वर चिडका झाला तिचा..
" न.. नाही ईश्वरी.. तसें नाही.. मी तर फक्त.. " तो सारवा सारव करत म्हणाला. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही.. ईश्वरी रागाने उठून किचन मध्ये निघून गेली..
असेच दिवस जात होते.. दोघे ही आता एकमेकांच्या नकळत एकमेकांजवळ येतं होतें.. सहजच होणाऱ्या एकमेकांच्या स्पर्शाने अवघडून जात असले, तरी स्पर्शाची सवय मात्र होत होती..
उद्या साई चा पेपर होता.. सेंटर मुंबई ला आले होते.. गेले आठ दिवस रात्रंदिवस अभ्यास करत होता तो.. उद्या सकाळी लवकर उठायचे म्हणून आज रात्री लवकरच झोपला होता.. ईश्वरी मात्र चुळबुळत होती.. परीक्षा त्याची होती पण टेन्शन मात्र तिला आले होतें.. छातीत एक अनामिक हुरहूर जाणवत होती.. तिने झोपेतच असलेल्या त्याच्या गालांवर ओठ टेकवले आणि मिठीत शिरली..
सकाळी लवकर उठून पुन्हा रिवीजन करत बसला होता तो.. सकाळीच इश्र्वरीचे आईं पप्पा, शिवम, गावाहून सायली , मनिष यांचे बेस्ट ऑफ लक द्यायला कॉल आले होते..
"बेस्ट ऑफ लक.. पेपर संपला की लगेच कॉल करून सांगा मला.. कसा गेला ते.. मी शाळेत असेल.. फोन नाही उचलला तर मेसेज करा.. मी शाळा सुटल्यावर कॉल करेल.." तिने त्याच्या हातावर दही साखर ठेवली..
" नक्की... पण तू नीट जा.." त्याला मात्र आपणं सकाळीच जातोय आणि तिला आता दुसऱ्या रिक्षात बसून जावे लागेल याची चिंता होती..
"अहो लहान आहे का मी? येताना येते ना.. आता ही जाईन रिक्षाने.. आणि बहुतेक सगळेच रिक्षावाले ओळखतात मला आता.."
"हम्म.. चालेल.. येतो बाय.." त्याने तिचा निरोप घेतला.. आणि जायला वळला..
"अहो, एक मिनिट.."
" काय..? राहिले का काही? पण घेतलें मी सर्व.." त्याने हॉल तिकीट वगैरे चेक करत म्हटले.. पण सर्व व्यवस्थित घेतलें होतें..
ती त्याच्या समोर ऊभी होती.. आणि तो, ती असे एकटक आपल्या डोळयात काय पाहतेय, हे पाहत होता.. तिने टाचा उंच करत त्याच्या ओठांवर ओठ टेकवले, तसें त्याचे डोळे बंद झाले.. एक सळसळती वीज दोघांच्याही शरीरात वाहत गेली.. क्षणभराने बाजूला होऊन तीने अलगद त्याला मीठी मारली.. तो तर एका वेगळ्याच विश्वात पोहोचला होता.. अभ्यासाचे, परीक्षेचे सर्व टेन्शन छू मंतर होऊन गेले होते..
"बेस्ट ऑफ लक.. सगळा पेपर खूप छान सोडवा.." म्हणत बाजूला झाली ती.. बोलताना नजर झुकलेली होती.. आता जे काही तीने केले होतें, त्यामुळे गाल लाजेने लाल झाले होते..
"आता तर खरच पेपर खूप छान जाईल असं वाटतंय.." तो मिश्किल हसत तिच्याकडे पाहत म्हणाला.. त्यानेही ती जागी असताना पहिल्यांदा तिच्या कपाळावर ओठ टेकवले..
"ईश्वरी, एवढी अस्वस्थ का आहेस तू?" मधल्या सुट्टीत मनाली आणि ती ईश्वरी च्या
" काही नाही ग.."
" अग सांग ना.. शाळेत आल्यापासून पाहते आज कशातच लक्ष नाहीये तुझं.. पिरेड संपल्यानंतर ऑफ पिरेडलाही सारखे मोबाईल चेक करत होतीस तू? साई भाऊजींचा फोन येणार आहे का?" मनाली ने जरा काळजीने तिला विचारले..
"होग.. म्हणजे त्यांची ना, आज एक्झाम आहे. पेपर कसा गेला हे मला लगेच सांगा फोन करून, म्हणून मी सांगितलं होतं. तसे तर वर्गावर असताना फोन उचलता येत नाही आपल्याला.. पण बघ ना मेसेज तरी टाका म्हणून सांगितलं होतं.. मग मीच रिसेस मध्ये फोन केला , पण उचलला नाही.. आता रिसेस संपायला आली , तरी त्यांचा काही मेसेज नाही.."
" अग, मग तू कर ना फोन.."
" नाही, नको.. काही महत्त्वाच्या कामात असतील तर.."
" पेपर तर संपला असेल ना?"
" हो. पेपर संपला असेल केव्हाच.. पण.."
" मग, उगाच एवढा काय विचार करतेस स्वतःच्या नवऱ्याला फोन करायला?" मनाली ने मस्करी करत म्हटलें.. तसें हसून नकारार्थी मान हलवली तीने..
" नाही गं.. तसे काही नाही.. "
" ईश्वरी.. एक विचारू?"
" हा.. बोल ना.." मनालीच्या प्रश्नाचा अंदाज घेत ईश्वरी जरा सावरून बसली..
" तुमच्यात.. म्हणजे.. तुमच्यात सगळं काही ठीक आहे ना?" मनालीने तिच्याकडे जरासे रोखून पाहत विचारले. तसे गडबडली ती.. ह्या प्रश्नाचे उत्तर काय देणारं होती ती..
" ए गप्पा बसा रे.. मस्ती करू नका बरं.. मधली सुट्टी संपायला आली आता.. चला डबा संपवा पटकन.." ईश्वरी ने मनालीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मुलांना सूचना द्यायला सुरुवात केली..
" ठीक आहे.. तुला सांगायचे नसेल तर राहू दे.. मी एक मैत्रीण म्हणून विचारत होते..." मनाली मात्र काही आज तिचा पिक्चर सोडायला तयार नव्हती..
" हे बघ ईश्वरी, काही गोष्टी अशा असतात की , त्या आपण आपल्या आई वडील, भाऊ बहीण किंवा सासरचे कोणी, कोणाकडेही सांगू शकत नाही.. फक्त मैत्रिणीकडेच बोलू शकतो.. मी बघ माझ्या घरातले काही प्रॉब्लेम्स असतील, माझ्या सासू बद्दल काही असेल, नवऱ्याबद्दल काही असेल तुझ्याशी मोकळेपणे शेअर करते.. तू त्यांना काही बोलावं, माझी बाजू घेऊन भांडाव अशी अपेक्षा नसते. पण मन मोकळं केलं की हलकं वाटतं.. नवऱ्या जवळही सगळेच आपण सांगू शकत नाही.. मैत्रीण ही एकच अशी व्यक्ती असते की, बिंदासपणे आपण तिच्याजवळ काही ही बोलू शकतो.. कारण माहिती असते ती काही आपल्या सासरी जाऊन सांगणार नाही.. "
नाही मनाली, तिला वाटते तसे काहीच नाही ग.. सगळे छान चाललंय आमचं.. साई खूप समजूदार आहेत.. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात.. एक भरपूर पैसै सोडले तर बाकी खूप छान आहे.. त्यांचा स्वभाव तर.."
" होग ते कळते मला.. स्वभाव आणि स्वाभिमानी पणा या बाबतीत खरचं मानायला पाहिजे त्यांना. एखादा माणूस असता तर सासऱ्या कडून कितीतरी गोष्टींची अपेक्षा केली असती.. तुझ्या पगारातून खर्च केला असता.. पण साई भाऊजी तर तुझ्या बाबांचे घर असून सुद्धा, त्याचे भाडे नियमितपणे देतात.. पण तरीपण नव्या जोडप्यांमध्ये जी ओढ असते, जे चेहऱ्यावर भाव असतात, ते नाही दिसत मला तुझ्या चेहऱ्यावर.."
" म्हणजे ? असं का म्हणतेस ? खूश आहे की मी."
"म्हणजे बघ, नवीन नवीन लग्न असतं, नवीन नवीन रोमान्स असतो.. नजरेत एक ओढ असते, ते काही.."
"चल बेल झाली.. नंतर बोलूया.." रीसेस संपल्याची बेल वाजली आणि ईश्वरीने तिच्या विषयाला स्टॉप केले..
काय सांगणार होती ती.. अजून साई आणि तिच्यामध्ये नवरा बायकोचे संबंध निर्माण झालेच नव्हते.. प्रेम तर दोघांच्याही डोळ्यात दिसत होते.. पण अवघडलेपण संपत नव्हते..
" ईश्वरी.. तू विषय टाळते आहेस, पण एक सांगू तुला, काहीही, केव्हाही , काही बोलायचं असेल, मनातलं सांगायचं असेल, मन मोकळे करायचं असेल तरी ही हक्काची मैत्रीण आहे तुझ्याकडे हे लक्षात असू दे.. अगदी खूप खाजगी पर्सनल गोष्टीही तू मला सांगू शकतेस.. आफ्टर ऑल लग्नाच्या बाबतीत सिनियर आहे मी तुला.." मनाली ने हळूच तिच्या कानात सांगून, डोळे मिचकावले..
" चल चावट.. काहीतरीच तुझे.. जा तुझ्या वर्गावर आता.." ईश्वरी ने तिला दरवाज्याकडे ढकलले.. चेहरा मात्र लाजेने लाल झाला होता.. तिने पटकन वर्गावर नजर फिरवत चेहरा निर्विकार केला.. समोर तीचे विद्यार्थी होतें.. जे अजूनही आपल्या टीचर चे लक्ष नाही पाहून बडबड करत होते..
पुन्हा एकदा मोबाईल चेक केला. तरीही साईचा काहीही मेसेज नव्हता..तिने मग मोबाईल पर्समध्ये ठेवून पर्स लॉकरला ठेवून दिल.. आता घरी गेल्यावरच कळेल काहीतरी.. डोक्यात मात्र मनालीचे बोलणे फिरत होते..
मनाली एवढं तिच्या सासू बद्दल, नवऱ्याबद्दल सांगत असते.. मग त्यांच्या दोघांमधले संबंध ही असतील का असेच रोमँटिक? तसे तर तिच्या लग्नाला ही खूप वर्ष नाही झालेत.. आताशी दोन वर्ष होतील.. पण भाऊजींच प्रेम आहे तिच्यावर.. म्हणून तर आईचा विरोध पत्करून सुध्दा दोघांनी लग्न केलं..
फक्त त्यांच्या आईसमोर ते काही बोलत नाहीत किंवा तिची बाजू घेत नाहीत.. पैशांबाबतीत थोडा स्वार्थी स्वभाव आहे त्यांचा.. तिच्या वडिलांकडून अपेक्षा असतात.. पण प्रेम मात्र मनाली वर खूप आहे, हे तिच्या बोलण्यातून नेहमीच जाणवतं .. आणि भूषण भाऊजी ही कधी भेटले की, तिच्या बद्दल च्या बोलण्यातून, थट्टा मस्करीतून कळतच ते..
भूषणचा विचार करता करताच साईच्या ही मनात आपल्याबद्दल असल्या काही भावना असतील का? हा विचार क्षणात चमकून गेला.. सकाळची त्याची ती मिश्किल नजर , तो मिश्किल स्वर आणि कपाळावर टेकवलेले होठ , पुन्हा एकदा अंगावर शहारा उमटवून गेले.. मनातले विचार झटक्यातच तीन पुन्हा वर्गात मुलांना शिकवायला सुरुवात केली...