तुम देना साथ मेरा ...

Tum Dena Sath Mera

  तुम देना साथ मेरा…


मिताली श्रीकांत वराडे. वय २५ ,एका प्रायव्हेट कंपनीमधे मँनेजर होती.
अमोल श्रीरंग देशमुख, वय २७ ,एका प्रायव्हेट कंपनीमधे नोकरी करत होता.

मितालीच्या कंपनी मधे अमोल एकदा आँडीट करण्यासाठी जातो. अमोल मितालीला पहिल्यांदा बघताच तिच्या सुंदर चेहऱ्याच्या आणि लांब काळ्याभोर केसांच्या प्रेमात पडतो. आँडीटच्या कामात एकदा त्यांची नजरा - नजर होते.

पेहला पेहला प्यार है
पहेली पहेली बार है


अस काहीस होत.

मितालीला तिच करीअर करून पुढे मोठ्या पदावर जायच असल्याने ती या विचारांकडे लक्ष देत नाही.
आँडीट झाल्यावर अमोल आणि मिताली चा काही संपर्क नव्हता.

मिताली तिच्या मैत्रीणींसोबत तिचा वाढदिवस एका मोठ्या हाँटेल मधे करायला गेली होती. तिथ अमोलही त्याच्या मित्रांसोबत एका मित्राचा वाढदिवस करायला आला होता.
मिताली आणि अमोल पुन्हा एकमेकांसमोर येतात.
अमोल मितालीला
" वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "
मिताली " थँक्स "
मितालीने छानशी स्माईल दिली.
नंतर दोघेही पार्टी मधून असुनही नव्हते. दोघ एकमेकांना लपूनछपून बघत होते. हे मितालीची मैत्रीण नेहाच्या लक्षात आले..
नेहा मीतालीला विचारते , पण मिताली सांगते मला प्रेम, लग्न या सगळ्यात पडायच नाही.
मनाला मात्र अमोलची ओढ लागलेली होती.
पार्टी हून बाहेर निघतांना अमोल मितालीला बघत होता.
अमोलचा मित्र रितेश " कशी वाटली मिताली "
अमोल : "छान आहे "
अमोल नकळत बोलून गेला .
रितेश : " काय करते ? "
अमोल: " नोकरी करते,मँनेजर आहे."
रितेश : "मग कधी सांगणार आहे ?"
अमोल : "कुणाला ?"
रितेश : "मला ?"
काय ?
रितेश बोलत होता अमोलशी पण अमोल बघत होता मितालीला .
आता अमोलच्या लक्षात आल आपण रितेश जवळ बोलत होतो.


थोडे दिवसांनी पुन्हा अमोल आँडीट साठी
मितालीच्या कंपनीमधे जातो. आँडीट होत, कंपनीच्या फाँरमँलीटी पुर्ण होतात .
तिथच अमोल मितालीला प्रपोज करतो " लग्न करशील माझ्यशी "
मितालीला अचानक विचारल्याने काय उत्तर देऊ समजत नाही .प्रेम तर तीही करत होती, काही वेळ विचार करून ती हो बोलली.
तर सुरू होते लव्हस्टोरी,लव्हबर्ड्सची
लव्हस्टोरीतले लव्हबर्ड्स फिरत असतात पंख लावून . त्यांना गरज होती आता घरटयाची ,पण त्यांना कुठे समजत होते.
मितालीची मैत्रीण नेहा ,आणि अमोलचा मित्र रितेश यांना माहित होते.

मिताली आणि अमोल ची लव्हस्टोरी दोघांच्या घरी माहीत होते.
मितालीच्या घरुन लग्नाला होकार मिळत होता अमोलच्या घरी आई सोडता मितालीला सगळ्याचा होकार होता. आईला नोकरी करणारी म्हणून मिताली आवडत नव्हती, पण अमोल आणि सगळ्यांना आवडल्याने लग्न ठरते.

मिताली - अमोल
२० जानेवारी २०२०
" लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा "


नव्या नवरीचे नऊ दिवस जातात आणि सुरू होते घर आणि नोकरीची कसरत .मितालीला आधी थोड जमत नसत पण हळूहळू जमायला लागते.

लग्न झाल्यावर वरचे पहिले सणवार छान होत होते. पण कुठेतरी अमोलची आई आणि मिताली यांच जमत नव्हते. अमोलवरच्या प्रेमामुळे मिताली या गोष्टी अमोल सांगत नाही. तीही फार लक्ष देत नाही.

पहिली दिवाळी सासरी आणि माहेरी दोघी ठिकाणी छान साजरी होते.

दिवाळी मधे अमोलची बहिण मितालीला बाळ होण्या विषयी विचारते. या बोलण्याने मितालीला काय उत्तर द्याव समजत नाही. मिताली काही बोलत नाही पण मनात मात्र विचार चालू होतात.

हे असच माहेरी देखील वहिनी विचार होती.
संध्यातर मितालीला नोकरीमधे प्रमोशन घेउन पुढची पोस्ट मिळवाची होती

मिताली आणि नेहा एकदा भेटल्यानंतर
नेहा :" हाताला काय झाल आहे ? "
मिताली :"मिताली बघते तर तीला वाटत डास चावल्याने पुळी आली असेलतस ती नेहाला सांगते"
दोघी मैत्रिणी बोलून काँफी पिऊन घरी जातात.
पुन्हा काही दिवसांनी नेहा मितालीला भेटते.
नेहाच लक्ष मितालीच्या हाताकडे जात . नेहा मितालीला म्हणाली
" तुझ्या हातावरची पुळी मोठी झालेली वाटते आहे ,मला वाटत आपण फँमिली डॉक्टरांना दाखवायला पाहिजे."
मिताली हाताकडे पाहते तर खरच आधी पुळी सारख वाटणार आता मोठ झालेल दिसत.
मितालीच सासर - माहेर एकाच गावात असत.
नेहा मितालीला त्यांच्या फँमिली डॉक्टरांकडे घेऊन जाते. डॉक्टर तिला काही टेस्ट करायला सांगतात. दोघी मिळून त्या टेस्ट करतात , रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणार होते.
दुसऱ्या दिवशी नेहा आणि मिताली रिपोर्ट घेतात. रिपोर्ट पाहून दोघी खूप घाबरतात ,पण नेहा लगेच मितालीला समजवते.
मितालीचा रिपोर्ट कँसर पाँझीटिव्ह असतो.
मितालीला आता घरच्यांकडून असलेल्या बाळाच्या अपेक्षा आणि तिला मिळवण्याची प्रमोशन आणि हा हातात असलेला रिपोर्ट दिसत होता .
नेहा मितालीला समजून घरी सोडते.

रात्री मिताली अमोलला हे सगळ सांगते.अमोल तिला खूप छान समजून सांगतो. घरातही सगळ्यांना सांगतो. घरात कोणी काही बोलत नसत.
मिताली दुसऱ्या दिवशी आई- बाबांना सांगते.
अमोल आणि मितालीचे बाबा मिळून एका चांगल्या दवाखान्यात तिची ट्रीटमेंट करायच ठरवल होत..
दवाखाना मितालीच्या आईच्या घरापासून जवळ असल्याने मिताली आईकडे राहत होती. कॅन्सर ट्रीटमेंट
सुरू करण्या आधी तिला काही टेस्ट सांगितलेल्या होत्या
त्या टेस्ट दवाखान्यातून दिलेल्या तारखेला चालू होत्या.
अधूनमधून मिताली आणि अमोलचे मित्र-मैत्रीणी तिला भेटायला येत होते.

अमोल त्यांच्या घरी आलेला होता .तो आँफिसमधे जास्त काम करत असतो, जेणेकरून रजा मिळेल.मिताली सोबत राहता येइल. यामुळे त्याला मितालीशी बोलायला वेळ मिळत नसायचा.
सासरच्यांकडून असलेल्या बाळाच्या अपेक्षा मिताली आता लगेच तरी पूर्णकरू शकणार नसते.अमोल सोडता तिच्याशी कोणी बोलत नसत. लग्न झाल्यावर एक वर्षही झालेल नसतांना हातात आलेला हा रिपोर्ट , ही वेळ याच मितालीला टेन्शन नक्कीच आलेल असत.
राहून राहून तिला एकच वाटत होत .

जब कोई बात बिघड जाये,
जब कोई मुशकील पड जाये
तुम देना साथ मेरा ओ हमनवाज…
ना कोई है ना कोई था
जिंदगी मे तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा ओ हमनवाज…
ओ हमनवाज…

कॅन्सर ट्रिटमेंट सुरु होण्याच्या आधीच्या जवळपास सगळ्या टेस्ट झालेल्या असतात. काही काही टेस्टच्या वेळेला तिला खूप त्रास होत होता.

खूप दिवसांपासून अमोलला तिला भेटायला वेळ नसतो ,आणि इकडे मितालीला त्याची खूप आठवण येत होती.
आज तारीख असते २० जानेवारी २०२१ , दुसऱ्या दिवशी मितालीच्या केमोथेरपीला सुरुवात होणार असते.
सकाळपासून मिताली अमोलच्या फोनची वाट पहात होती.
आता दुपार झालेली होती.मिताली जेवण झाल्यानंतर आराम करत होती .तीला अमोलची आठवण येत होती दुसऱ्या दिवसाची भिती वाटत होती. या विचारात तिला झोप लागते.
संध्याकाळी पुढच्या खोलीत आवाज येतो म्हणून मिताली ऊठून पहाते तर…..
अमोल आलेला असतो

२० जानेवारी २०२१
" लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "

अमोल ,नेहा ,रितेश दोघांची फँमिली मिळून छोटीशी पार्टी अरेंज केलेली होती.

दुसऱ्यादिवशी मितालीचा पहिला केमोथेरपीचा डोस असतो.अमोल मितालीच्या सोबत होता।
यानंतर मितालीचे केमोथेरपी चे डोस सायकल चालू होतात. काही वेळेस मिताली सोबत अमोलला यायला जमायच तर कधी नाही. तिच्या सोबत आई- बाबा ,कधी मित्र - मैत्रीणी , येत होते.

केमोथेरपी मुळे मितालीचे केस उतरले होते. ज्या काळ्याभोर केसांच्या प्रेमात अमोल पडला होता. आता मितालीच्या दिसण्यातही बऱ्याच प्रमाणात फरक पडला होता.

आई आणि बरेच नातेवाईक अमोलला दुसऱ्या लग्न कर सांगत होते.मितालीच सौंदर्य कमी झाल होत , ती खूप थकून गेली होती. केमोथेरपी मुळे खाण्याच्या डाएट डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे फाँलो कराव लागत होत. बाळ थोडे दिवसतरी होऊ द्यायच नाही अस डॉक्टरांनी सांगितल होत.

असही मितालीच्या दिसण्यात फरक पडला होता. नोकरी पहिल्या सारखी जमत नव्हती. बाळ केव्हा होईल, होईल नाही होणार ते सांगता येत नव्हते.कँसर साठी लागणारा खर्च , या सगळ्यामुळे बरेच नातेवाईक त्याला दुसर लग्न कर सांगत होते.

या सगळ्यात अमोल प्रेम डळमळत होत. पण अमोलच मितालीवर खुप प्रेम तर होतच पण आता त्याला ते तिच्या सौंदर्या पेक्षा तिच असण ,ति पुर्णपणे चांगल होण महत्वाच वाटत होत.

अमोल रितेश दोघ भेटले असता नातेवाईक आणि आईच म्हणणे सांगितले होते.
रितेशने मितालीची मैत्रीण नेहा आणि फँमिली डॉक्टर मिळून अमोल आणि घरच्यांना खुप समजवल . मिताली पुर्णपणे बरी होईल ,बाळ हि होइल ,आजारातून बर व्हायला थोडा वेळ लागेल . यासगळ्यामुळे अमोलची आई आणि घरचे तरी समजले होते.

आता मितालीचे केमोथेरपी सायकल पुर्ण झालेले होऊन ती पुर्णपणे बरी झाली होती.यासगळ्यात मीतालीला अमोलने खूप छान जपल होत ,तसच मित्र - मैत्रीणीही सोबत होते.
अमोलच्या नातेवाईकांनी न समजल्यामुळे अमोल - मिताली लग्न -प्रेम या सुंदर नात्यावर काळ आणला होता, पण त्यांच्या दोघांवरच्या प्रेमामुळे वेळ आलेली नव्हती.
अमोल आणि मितालीच्या नात्याच्या काळ आला होता पण वेळ आली नव्हती.