तुम देना साथ मेरा 1

प्रेम
तुम देना साथ मेरा...1
   

   
     ईश्वरी आज खूप गोड दिसत होती.. तशी ती होतीच सुंदर... पण आज केलेला मराठमोळा साज... हिरव्या काठांची केशरी नऊवारी, भरगच्च केसांचा अंबाडा, त्यावर घमघमणारा मोगरा, गालावर हलकेच रुळणाऱ्या केसांच्या नखरेल बटा, गळ्यात मोठ्या बोरमाळे बरोबर दिमाखात डोलणारा राणीहार आणि ठुशी, हातभर घातलेल्या हिरव्या बांगड्या....
    
     गौरीहर पुजणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला रेखा ताई अगदी मायेने निरखत होत्या. गेले पंधरा वीस दिवस खूपच धावपळीचे गेले होते.. ईश्र्वरीला अचानक चुलत आत्याच्या भावकीतून स्थळ येते काय, लगेच पसंती होवून लग्न जमते काय, आणि साखरपुडा न करता लग्नाच्या वेळेसच हळद आणि लग्न असे सर्व कार्यक्रम एकत्र च करायचे ठरते काय... सारेच अविश्वसनीय होते.. पंधरा वीस दिवसांतच सर्व तयारी करुन झाली होती.. नवरा मुलगा अत्यंत श्रीमंत होता. त्यामूळे लग्नाचा सर्व खर्च ही तेच करत होते. कपडे लत्ते, दागदागिने सर्वच गोष्टीत श्रीमंती थाट दिसून येतं होता.. डोळे बंद करुन गौरिहर समोर बसलेल्या ईश्वरी ला एकच गोष्ट खटकत होती. ती म्हणजे नवरा मुलगा धनेश चे वागणे..


      अगदी कांदे पोहे कार्यक्रम झाला तेंव्हा ते आता पर्यंत त्याचे बोलणे मोजकेच होते तिच्याशी.. बोलतानाही मी म्हणेल तेच खरे, मी काहीही करू शकतो, पैशाने सारे काही विकत घेता येते... असा ॲट्यितुड असायचा बोलण्यात.. तिला तर बाबांना काय आवडले या स्थळात हेच कळत नव्हते.. तसे दिसायला बऱ्यापैकी आकर्षक होता तो. त्यात कपड्यातून, राहणीमानात श्रीमंती झळकत होती.. मोठ्या कंपनीत मॅनेजर होता.. सहा आकडी पगार होता..

      एकंदरीत असे स्थळ मिळणे म्हणजे जणू राज योग होता कोणत्याही मुलीसाठी... त्यात तो एकटाच होता आई वडिलांना.. त्यामुळे जास्तच लाडावलेला होता.. लहानपणा पासून सर्व मनासारखे मिळत गेल्याने नकाराची सवय च नव्हती.. घरातल्यांप्रमाणे इतरांनीही फक्त त्याच ऐकावं, त्यालाच महत्त्व द्यावं अशा वृत्तीमुळे फारसा मित्र परिवार ही नव्हता.. जो काही होता तो ही त्याच्या सारखाच घमंडी, आणि हेकेखोर होता... एक तर श्रीमंत बिघडलेली मुले मुली, नाही तर त्याच्या पैशांवर मजा मारणारी त्याची हाजी हाजी करणारी , अशाच लोकांच्या संगतीत राहिल्या मुळे तो मग्रूर, आणि बेफिकीर झाला होता.. आई वडिलांना ही न जुमानता केवळ पैसा आणि स्टँडर्ड, आणि संगतीचा परिणाम की काय रोज सो कॉल्ड स्टँडर्ड च्या नावाखाली करण्यात येणार ड्रिंक... यामुळेच इश्वरी सारख्या स्थळाबद्दल कळलं तस त्याच्या आईवडिलांनी तिच्या आत्या मार्फत तिला मागणी घातली होती.

    तसे तर आज घडी पर्यंत धनेश च्या अनेक गर्ल फ्रेंड बदलल्या होत्या.. पण वडिलांनी लग्न आम्ही पसंत केलेल्या मुलिशीच करावे लागेल असे बजावून सांगितल्यामुळे तो लग्नाला तयार झाला होता.. तशी इश्वरी सुंदर होतीच. फक्त त्याच्या टाइप ची नव्हती.. पूजेला, लग्नकार्यात नेण्यासारखी होती.पण त्याच्या ऑफिस च्या मोठमोठ्या पार्टी साठी ती तशी काकूबाई च होती...तसे ही फार काही फरक पडणार नव्हता त्याला.. कारण पार्टीत मिरवण्यासाठी गर्ल फ्रेंड स्विटी होतीच त्याच्या कडे.. आणि तिला ही त्याचे लग्न कुणाशी ही झाले तरी काही फरक पडणार नव्हताच.. कारण मुळात लग्न करून स्वतः चे स्वातंत्र्य गमावणे म्हणजे मूर्खपणा होता तिच्यासाठी...

     ईश्वरी ला तर बाबांना काय आवडले या स्थळात हेच कळत नव्हते.. तसे दिसायला बऱ्यापैकी आकर्षक होता तो. त्यात कपड्यातून, राहणीमानात श्रीमंती झळकत होती.. मोठ्या कंपनीत मॅनेजर होता.. सहा आकडी पगार होता.. एकंदरीत असे स्थळ मिळणे म्हणजे जणू राज योग होता कोणत्याही मुलीसाठी... त्यात तो एकटाच होता आई वडिलांना.. त्यामुळे जास्तच लाडावलेला होता..

       लहानपणा पासून सर्व मनासारखे मिळत गेल्याने नकाराची सवय च नव्हती.. घरातल्यांप्रमाणे इतरांनीही फक्त त्याच ऐकावं, त्यालाच महत्त्व द्यावं अशा वृत्तीमुळे फारसा मित्र परिवार ही नव्हता.. जो काही होता तो ही त्याच्या सारखाच घमंडी, आणि हेकेखोर होता... एक तर श्रीमंत बिघडलेली मुले मुली, नाही तर त्याच्या पैशांवर मजा मारणारी त्याची हाजी हाजी करणारी , अशाच लोकांच्या संगतीत राहिल्या मुळे त्याला ही तसेच वागायची सवय झाली होती..

      आई वडीलांनी वाढवले ते त्यांचे कर्तव्य म्हणून, आता त्यांनी आपल्याला काही शिकवू नये.. आपले आयुष्य आपल्याला हवे तसे जगावे, अशा वागण्या मुळे त्याचे आईवडील ही वैतागले होतें.. एखादी सुंदर, मनमिळावू मुलगी सून म्हणून मिळाली , तर तो सुधारेल , आणि आपले म्हातारपण ही सुखकर होईल म्हणून त्याच्या वडिलांनी ईश्वरी बद्दल कळले तसे लग्न ठरवून टाकले होतें..

    आधी तर धनेश नाहीच म्हणत होता.. त्याला त्याच्या सारखी मॉडर्न, मौजमजा करत जगणारी मुलगी बायको म्हणून हवी होती अगदीं स्विटी सारखी.. त्याने स्विटी ला विचारले ही होतें.  ती लिव्ह इन् रिलेशन मध्ये राहायला तयार होती..पण तिला लग्न बंधन मान्य नव्हते..

   शेवटी तो वडिलांच्या म्हणण्याला होकार देत तयार झाला होता लग्नाला.. कारण लग्न नाही तर तुझे तू वेगळे राहायचे.. प्रॉपर्टी मधली एक दमडी ही मिळणार नाही असे निक्षून सांगितले होतें त्यांनी. शेवटी ईश्वरी आई वडिलांची सेवा करेल. आणि तो बाहेर स्विटी सोबत मजा मारायला मोकळा. शिवाय ईश्वरी सुंदर होती. त्यामुळे बायको म्हणून घरी ती आणि गर्ल फ्रेंड म्हणून स्विटी., असा विचार करून तो तयार झाला होता..

   इकडे ईश्वरी ही लग्नासाठी तयार झाली होती.. फारशा भेटी नसल्या तरी एक अनामिक हुरहुर जी कोणत्याही मुलीला आपल्या जोडीदाराला स्मरून जाणवते. ती तिलाही वाटतं होती..

    धनेश बद्दल फारशी माहिती नसली तरी आपल्या बाबांवर विश्वास होता तिचा.. आणि बाबांचा तिच्या चुलत आत्यावर... कारण त्यांच्या पडत्या काळात आत्याच्या बाबांनी म्हणजे तिच्या बाबांच्या काकांनी खूप मदत केली होती त्यांना.. शाळेतली नोकरी ही त्यांच्यामुळेच लागली होती.. आत्याने आणलेले स्थळ म्हणजे पारखलेले च असणार याची खात्री होती.. आत्याच्या मिस्टरांनी ही वेळोवेळी त्यांना मदतच केली होती..

     तसे ईश्वरी चे बाबा दिनकर गुरुजी एक प्रामाणिक, स्वाभिमानी आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रसिध्द होते.. शिस्तीच्या बाबतीत कडक असलेल्या त्यांनी आपल्या मुलांनाही धाकात ठेवलेले होते.. ईश्वरी आणि तिचा भाऊ शिवम दोघांची ही काय बिशाद, की ते आपल्या पप्पांच्या विरोधात जातील.. असे असले तरी दोघांचे ही आपल्या आई आणि पप्पांवर खूप जीव होता.. भीती असली तरी आदर आणि अभिमान ही होता..

    जेंव्हा तिच्या आत्या आणि त्यांच्या मिस्टरांनी ईश्वरी ला मागणी घातली तेंव्हा तिच्या बाबांनी तिला विचारलें होतें.. आणि तुम्हाला पसंत असेल तर मला चालेल.. फक्त मुलगा सुस्वभावी आणि निर्व्यसनी असावा.. असे ईश्वरी ने सांगितले होते..

    असे ही त्यांना ही आपल्या मुलीसाठी सुस्वभावी, संस्कारी व निर्व्यसनीच मुलगा हवा होता.. आत्याच्या म्हणण्या प्रमाणे धनेश तसा होता.. कधी तरी मित्रांसोबत ड्रिंक करतो असे सांगितले होते आत्याने. पण तेवढे ठीक होते.. नाहीतरी आता कंपनीत जॉब करणारे कधीतरी पार्टी करतच असतात... पण आपली मुलगी तिथे राणी सारखी राहील यातच ते खूश होतें..

     ईश्वरी ही गौरीहर पुजतांना धनेश चाच विचार करत होती.. तसे तर तो व्यवस्थित बोलत होता तिच्याशी. पण तरीही काहीतरी खटकत होते तीला...


    "असे कसे ते वागू शकतात ते? मुहूर्ताची वेळ टळून गेलीय तरी ही नवऱ्या मुलाचा पत्ता नाही.. या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी..!!"

    बाहेरची कुजबुज तिला ऐकायला आली तसे तीचे कान टवकारले गेले..
खरेच मुहूर्ताची वेळ टळून गेली होती.. केंव्हापासून असे एका स्थितीत बसून तीच्या पायांना रग लागली होती. पण आई ने इथून उठायचे नाही सांगितले होतें.. त्यामुळे ती बाहेर जाऊ शकत नव्हती..

   बाहेरचा आवाज जास्तच यायला लागला तसे तीने पुन्हा ऐकायचा प्रयत्न केला..

   "अग अजून नवरदेव इकडे यायला निघालाच नाही म्हणे!!"

  " काय?? अग पण का??"


क्रमशः