तुम देना साथ मेरा--भाग 10
( मागील भागात--
त्याचा संकोच दूर व्हावा म्हणून ते मोकळ्या मनाने बोलत होते.
"हो, हो, नक्कीच आबासाहेब. तुमच्यासारखी देवमाणसं भेटली,अजून काय पाहिजे? सौभाग्य माझे की तुमची भेट घडली."
"अरे बापरे, ही अशी उपकाराची वगैरे भाषा बोलणार असाल तर मग मला परवानगी देण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा लागेल," असे म्हणून आबासाहेब मोठ्याने हसले.
राजही हसतच त्याचं सामान घेऊन बागेकडे निघाला.)
आता पुढे--
सदूने राजसाठी बागेतला अगदी उत्तम कोपरा निवडला होता.
जास्तीत जास्त परिसर तो बघू शकणार होता.
खुर्ची, टेबल, एक उंच कॉर्नर टेबल ज्यावर पाण्याचा गडवा भरून ठेवलेला.
टेबलला छत्रीची सोय.
ऊन जाणवलं तर कधीही उघडू शकता येणारी अशी.
सगळी व्यवस्था बघून राज खुश झाला.
जास्तीत जास्त परिसर तो बघू शकणार होता.
खुर्ची, टेबल, एक उंच कॉर्नर टेबल ज्यावर पाण्याचा गडवा भरून ठेवलेला.
टेबलला छत्रीची सोय.
ऊन जाणवलं तर कधीही उघडू शकता येणारी अशी.
सगळी व्यवस्था बघून राज खुश झाला.
" वा, सदू दादा, अपेक्षेपेक्षा जास्तच मिळत आहे मला आज. मस्त केलीत हं माझी सोय तुम्ही ," राजने सदू दादा म्हणत त्यालाही पटकन आपलेसे करून घेतले.
" दादासाहेब, काही लागलं तुम्हाला तर आवाज द्या मला," सदू देखील राजच्या वागण्या बोलण्याने खुश झाला होता.
" हो सदू दादा आणि तुम्हाला पण धन्यवाद हं ," राज बोलत होता.
बोलता बोलता त्याने त्याचे सामान टेबलवर काढले आणि कॅनव्हास स्टँड उभा केला.
सदू त्याच्या कामाला निघून गेला आणि राज परिसराचे
निरीक्षण करू लागला.
मोबाईल मध्ये सुद्धा विविध कोनातून तो परिसराचे फोटो काढू लागला.
निरीक्षण करू लागला.
मोबाईल मध्ये सुद्धा विविध कोनातून तो परिसराचे फोटो काढू लागला.
आणि तिकडे दिवाणखान्यात सुमनताई आबासाहेबांना आश्चर्याने विचारत होत्या,"एका चित्रकाराला तुम्ही परवानगी दिलीत, घरी रंगाचा पसारा मांडण्याची? विसरलात का तुम्ही सगळं? का जुन्या जखमा पुन्हा उघड्या करायच्या आहेत?"
"आमच्यावर विश्वास ठेवा सुमन. काहीतरी विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय. थोडे दिवस थांबा, तुम्हालाही योग्य वाटेल हा निर्णय."
आबासाहेब ठामपणे बोलत होते.
आबासाहेब ठामपणे बोलत होते.
"जास्त काळजी आणि त्रागा करू नका. आणि हो तो आपला पाहुणा आहे, योग्य ती बडदास्त ठेवा."
राज चित्रकार आहे म्हटल्याबरोबर त्यांच्या मनात एक वेगळीच कल्पना साकार झाली होती.
त्यात रिस्क नक्कीच होती पण राज सुस्वभावी असल्यामुळे ही रिस्क जीवघेणी नक्कीच ठरणार नाही, याची कुठंतरी खात्री पण त्यांना होती.
अगदी पहिल्याच नजरेत, पहिल्याच भेटीत राजबद्दल त्यांचे मत एकदम सकारात्मक झाले होते.
तितक्यात आभाचे मधुर स्वर देवघरातून ऐकू येऊ लागले आणि सुमनताई व आबासाहेब पूजेसाठी देवघरात निघून गेले.
सकाळची पूजा आटोपली आणि न्याहारीसाठी सगळे जमले.
"बाईसाहेब, त्या चित्रकार दादांना दोन वेळा बोलवायला गेलो पण ते इतके कामात गढले हाय का यायला तयारबी न्हाय," सदू नुकताच बागेतून राजला आवाज देऊन आला होता.
थोडावेळ वाट बघून सुमनताई म्हणाल्या,"आभा, तू बागेतच त्यांना न्याहारी नेऊन दे. इकडे यायला संकोचत असतील कदाचित."
"सदू दादाला सांग," आभाला तसंही त्याचं येणं आवडलं नव्हतं फारसं.
त्यातही तो रंगवेडा म्हटल्यावर तर त्याच्या समोर जाणे नकोसे वाटत होते तिला.
पण आबासाहेबांनी परवानगी दिली म्हटल्यावर ती काहीच बोलू शकत नव्हती.
त्यातही तो रंगवेडा म्हटल्यावर तर त्याच्या समोर जाणे नकोसे वाटत होते तिला.
पण आबासाहेबांनी परवानगी दिली म्हटल्यावर ती काहीच बोलू शकत नव्हती.
"अगं, सदू आणि सखू आपल्या मदतीला आहेत फक्त. आलेल्या पाहुण्यांचा योग्य मानपान करणे ही आपल्या घराण्याची पद्धत आपणच जपायला नको का?, " मघाशी आबासाहेबांना जाब विचारणाऱ्या सुमनताईंचे विचार एकदम बदलले होते.
कदाचित आबासाहेबांच्या मनात काय सुरू आहे याची कल्पना त्यांना देखील आली असावी!
आणि तसेही चित्रकार असो किंवा कुठलाही पाहुणा असो त्याची योग्य ती बडदास्त ठेवण्याची आबासाहेबांच्या घराण्याची परंपरा होती. जी सुमनताई मनापासून नेहमीच पाळत होत्या.
राजसाठी न्याहारी घेऊन जायला त्यांनी आभाला तर सांगितले पण तरीही आभाचा काही मूड नाही हे ओळखून शेवटी सुमनताई म्हणाल्या,"बरं बाई नाही तुझी इच्छा तर राहू दे. मीच जाते. तसंही सदू गावात गेला आहे."
गुढघ्यावर हात ठेवत "अरे देवा" म्हणत सुमनताई उठू लागल्या.
" थांब, देते मी नेऊन. तू उगाच उठू नको.
पायऱ्या चढउतार करशील आणि मग तुझी आणि तुझ्या गुढघ्याची कुरकुर मलाच ऐकावी लागेल.
आण ती प्लेट, देते त्यांना नेऊन, " नाराजीनेच का होईना पण आभा राजसाठी न्याहारी घेऊन निघाली.
पायऱ्या चढउतार करशील आणि मग तुझी आणि तुझ्या गुढघ्याची कुरकुर मलाच ऐकावी लागेल.
आण ती प्लेट, देते त्यांना नेऊन, " नाराजीनेच का होईना पण आभा राजसाठी न्याहारी घेऊन निघाली.
" हे पप्पा पण ना, काहीच समजत नाही याचं काय करावं ते. अश्याने तर कुणीही ऐरा गैरा नत्थू खैरा येईल, परवानगी मागेल आणि मग आम्ही त्याची वरवर करीत बसायचं...अजिबात पटले नाही हे मला.
कमीतकमी आईच्या तब्येतीचा तर विचार करायला पाहिजे ना..." असेच काहीसे पुटपुटत आभा बागेत जाऊन पोहोचली.
कमीतकमी आईच्या तब्येतीचा तर विचार करायला पाहिजे ना..." असेच काहीसे पुटपुटत आभा बागेत जाऊन पोहोचली.
आबासाहेबांच्या मनातल्या वादळाची तिला कल्पना नव्हती.
पण संस्कार आणि औपचारिकता म्हणून ती बागेत गेलीचं.
क्रमशः
© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा